ads
ads
आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

•न्यायव्यवस्था बदनाम करण्याचा हा सुनियोजित कट, •सर्वोच्च न्यायालयाचा संताप,…

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

•पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्ला, दरभंगा, २५ एप्रिल – आतापर्यंत पाकिस्तानची…

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मुंबई, २४ एप्रिल – राग, नाराजी असे माणसाच्या स्वभावाचे…

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

•अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण, वॉशिंग्टन, २४ एप्रिल –…

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

•मृतांची संख्या ३२१, भारतीयांचा आकडाही वाढला, ४० जणांना अटक,…

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

•चीनने व्यक्त केली भीती, बीजिंग, २३ एप्रिल – इराणकडून…

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

•राहुल गांधी यांनी स्वीकारला •विरोधी पक्षनेतेपदही सोडले •काँग्रेसला आणखी…

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

•खोट्या जाहिरातींचे प्रकरण, मुंबई, २२ एप्रिल – शेतकर्‍यांना पाच-दहा…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 18:44
अयनांश:

कुपोषण : एक गंभीर समस्या!

॥ अभिप्राय : डॉ.वाय.मोहितकुमार राव |

कुटुंबात आणि समाजात महिलांना सन्मान प्राप्त झाला, त्यांची आर्थिक स्थिती मजबूत झाली तर भावी पिढीच्या भरणपोषण आणि शिक्षणाकडे चांगले लक्ष देता येईल, यातून भावी पिढी सुदृढ आणि सुशिक्षित होईल व त्याचा फायदा शेवटी समाज आणि देशालाच होईल, ही बाब विचारात घेतली तरी आपल्याला नीती आयोगाने केलेल्या सूचनेचे महत्त्व लक्षात येईल. त्यामुळे पैसा महिलांच्या बँक खात्यात जमा केला तर त्यातून त्या त्यांच्या आवडीचे भोजन घेऊ शकतात. असे झाल्यास गरोदर महिला सुदृढ बाळाला जन्म देतील आणि ज्यांना मूल झाले आहे अशा महिला बाळाचे पोषण नीट करू शकतील.

Kuposhan

Kuposhan

देशातील कुपोषणाची स्थिती संपुष्टात यावी यादृष्टीने केंद्रातील मोदी सरकार प्रामाणिक प्रयत्न करीत असले तरी व्यक्तिगत पातळीवरही प्रत्येक नागरिकाने प्रयत्न करणे आवश्यक ठरते. देशातील प्रत्येक तिसरे मूल कुपोषित आहे, असे जर कुणी सांगितले तर आपण त्याला वेड्यात काढू. पण, ही वस्तुस्थिती आहे. देशातील ३५.७ टक्के मुलं ही कमी वजनाची आहेत, ३८.४ टक्के मुलांचा संपूर्ण विकास झालेला नाही आणि प्रत्येक दुसर्‍या मुलाच्या शरीरात रक्त कमी असल्याची समस्या आहे. १५ ते ४९ वर्षे वयोगटातील ५३ टक्के महिला रक्ताच्या अल्पतेने पीडित आहेत. महिला आणि मुलांमध्ये किती भयंकर कुपोषण आहे, हेच या आकडेवारीवरून स्पष्ट होते. ही आकडेवारी दुसर्‍या-तिसर्‍या कुणी प्रकाशित केली असून, राष्ट्रीय कुटुंब स्वास्थ्य सर्वेक्षण या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेने अर्थात, एनएफएचएसने जारी केली आहे. देशात केलेल्या सर्वेक्षणानंतर ही आकडेवारी जारी करण्यात आल्याने ती गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. प्रत्येकच बाबतीत सरकारला जबाबदार ठरवण्यापेक्षा आपल्यापैकी प्रत्येकाने देशाप्रति थोडे थोडे जरी योगदान दिले तरी समस्येवर मात करता येऊ शकते.
गरोदरपणात महिला आणि प्रसूतिनंतरही माताच जर कुपोषित असेल तर बाळाच्या प्रकृतीवर त्याचा परिणाम होणारच ना? कुपोषण संपुष्टात आणण्यासाठी सरकारने अनेक योजना तयार केल्या आहेत. त्यासाठी आर्थिक तरतूदही केली आहे. परंतु, अंमलबजावणी करणार्‍या यंत्रणा कुठेतरी कमी पडत आहेत, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. सरकारकडून माध्यान्ह आहार योजना राबविली जात असली तरी तिची परिणामकारकता पाहिजे त्या प्रमाणात दिसून येत नाही. मुळात ही योजना अतिशय दमदार आहे. गरज आहे प्रभावी अंमलबजावणीची. एकीकृत बाल विकास सेवा अर्थात, आयसीडीएस ही योजनाही परिणामकारक रीतीने राबविली जाण्याची आवश्यकता आहे. गर्भवती महिला आणि मुलांसाठी खास तयार करण्यात आलेल्या या योजनेची अंमलबजावणी अधिक गंभीरतेने झाली तर समस्या सोडविण्यास नक्कीच मदत होऊ शकेल. जन्माला आलेले मूल जर कुपोषित असेल तर त्याला नंतर कितीही खाऊपिऊ घातले तरी त्याच्या शरीरावर जो वाईट परिणाम झालेला असतो, तो शेवटपर्यंत त्याला जाणवत राहतो. तसे पाहिले तर आयसीडीएसच्या केंद्रस्थानी आंगणवाड्या आहेत. पण, या आंगणवाड्यांकडून अपेक्षित परिणाम अद्यापतरी अनुभवास आलेला नाही. सदोष नीतिनिर्धारण आणि भ्रष्टाचार ही सकारात्मक परिणाम अनुभवास न येण्यामागची कारणे आहेत. लाभार्थ्यांना योग्य त्या सोईसुविधा मिळाव्यात यादृष्टीने योजनांची अंमलबजावणी परिणामकारकपणे होणे क्रमप्राप्त ठरते.
आयसीडीएसमध्ये ज्या उणिवा आढळून आल्यात, त्याचा उल्लेख भारताचे नियंत्रक आणि महालेखापाल यांनी, म्हणजेच कॅगने आपल्या अहवालात केला आहे. महिला व बाल कल्याणासाठीच्या योजनांसाठी जे बजेट निर्धारित केले जाते, त्यातील रक्कम अन्यत्र खर्च केली जाणे, खर्चाची बिले अवास्तव सादर केली जाणे अशा काही अनियमितता कॅगला आढळून आल्यात, त्या दूर करण्याचीही नितांत गरज आहे. आयसीडीएसचा किती प्रभाव पडला आणि मुलांमध्ये कुपोषणाची काय स्थिती आहे, याचा एक अभ्यास करण्यात आला होता. २०१५ साली जो कार्यक्रम मूल्यांकन अहवाल तयार करण्यात आला होता, त्यात असे नमूद करण्यात आले होते की, २२.५ टक्के आंगणवाडी केंद्रांमध्ये आवश्यक त्या सोईसुविधाच उपलब्ध नाहीत, ४१ टक्के केंद्रांमध्ये जागाच उपलब्ध नाही आणि केवळ ४८.२ टक्के केंद्रांमध्येच स्वच्छता व आरोग्यविषयक बाबींकडे नीट लक्ष दिले जाते. आयसीडीएस अधिक प्रभावी, परिणामकारक करायची असेल, त्याची जबाबदारी सुनिश्‍चित करायची असेल तर आयसीडीएसचे पुनर्गठन करणेच योग्य होईल.
महिला आणि बालकांमधील कुपोषण दूर करण्याच्या दृष्टीने आयसीडीएस ही फार महत्वपूर्ण संस्था आहे. मुलांचे भरणपोषण नीट व्हावे, त्यांचे आरोग्य उत्तम राहावे, त्यांचा मानसिक आणि शारीरिक विकास उत्तम व्हावा, योजनेची अंमलबजावणी प्रभावी रीतीने व्हावी यासाठी संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय प्रस्थापित करावा, अशी अनेक उद्दिष्टे आयसीडीएसची आहेत. मध्येच शाळा सोडून जाणार्‍या मुलांकडे लक्ष देऊन त्यांचे मनपरिवर्तन घडवून आणत त्यांना पुन्हा शाळेत आणण्याचे मोठे उद्दिष्ट आयसीडीएसपुढे आहे. कुपोषित मुलांच्या ज्या माता आहेत आणि ज्या स्वत:ही कुपोषित आहेत, त्यांनी त्यांचे आरोग्य उत्तम राखावे आणि स्वत:चे भरणपोषणही व्यवस्थित करावे, यादृष्टीने अशा मातांना प्रशिक्षण देण्याचे कामही संस्थेला करावे लागेल. आंगणवाडी केंद्र पूरक पोषण, प्री स्कूल गैरऔपचारिक शिक्षण, पोषण आणि स्वास्थ्य शिक्षण, लसीकरण, आरोग्य तपासणीसारखी अनेक कामे आयसीडीएसला करावे लागतात. ही कामे जर प्रभावी रीतीने करण्यात आली तर कुपोषणाची समस्या सोडविण्याच्या मार्गातील अनेक अडथळे सहज दूर होतील, यात शंका नाही. सगळी उद्दिष्टं पार करण्यासाठी आम्ही एकाच धोरणानुसार वाटचाल करीत असल्याने एकाही उद्दिष्टप्राप्तीत संपूर्ण यश मिळत नाही, हे वास्तवही दुर्लक्षित करून चालणार नाही. याचा जो परिणाम आहे तो मातांच्या आरोग्यावर होताना दिसतो. यात गरोदर स्त्रियाही आहेत आणि प्रसूती झालेल्या माताही आहेत. असे होऊ नये म्हणून सेवा वितरणाचे जे मॉडेल आहे, ते आपल्याला अधिक विकसित करावे लागेल.
या सगळ्या बाबी लक्षात घेऊनच नीती आयोगाने आयसीडीएसमध्ये काही सुधारणा सुचविल्या आहेत. आंगणवाडी केंद्रात महिलांसाठी पोषण आहार उपलब्ध करून देण्याऐवजी नियमानुसार जो पैसा दिला जातो, तो थेट संबंधित महिलांच्या खात्यात जमा केला जावा अशी एक महत्त्वपूर्ण सूचना नीती आयोगाच्या ‘भारत राष्ट्रीय पोषण धोरणा’ने केली आहे. उज्ज्वला योजनेअंतर्गत ज्याप्रमाणे गरीब व गरजू महिलांना घरगुती वापराचे गॅस सिलेंडर दिले गेले आणि अन्य अनेक सामाजिक सुरक्षा योजनांतर्गत लाभ देण्यात आलेत, ते परिणामकारक ठरले आहेत. त्यामुळे पोषणाच्या बाबतीतही महिलांच्या खात्यांमध्ये थेट पैसा जमा केला तर त्याचे अधिक चांगले परिणाम भविष्यात दिसून येतील, असे वाटते. दारिद्र्य आणि कुटुंबाचे कमी उत्पन्न ही कुपोषणाची खरी कारणं आहेत. पण, आयसीडीएसअंतर्गत कौटुंबिक गरिबीसाठी मदत करता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आपल्याकडे अजूनही पुरुषप्रधान कुटुंब पद्धती आहे. त्यामुळे कुटुंबात महिलांची स्थिती हवी तेवढी मजबूत नसते. पोषण आहार योजनेअंतर्गत त्यांना आंगडवाड्यांमध्ये आहार न देता त्याचा पैसा जर थेट त्यांच्या खात्यांमध्ये जमा करण्यात आला तर अशा महिलांची स्थिती मजबूत होण्यास मदतच होणार आहे. शिवाय, स्वत:जवळ पैसा असल्याने या महिला आपल्या मुलांच्या भरणपोषणाची जबाबदारीही सक्षमपणे सांभाळू शकतील.
कुटुंबात आणि समाजात महिलांना सन्मान प्राप्त झाला, त्यांची आर्थिक स्थिती मजबूत झाली तर भावी पिढीच्या भरणपोषणाकडे आणि शिक्षणाकडे चांगले लक्ष देता येईल, यातून भावी पिढी सुदृढ आणि सुशिक्षित होईल व त्याचा फायदा शेवटी समाज आणि देशालाच होईल, ही बाब विचारात घेतली तरी आपल्याला नीती आयोगाने केलेल्या सूचनेचे महत्त्व लक्षात येईल. आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे. आंगणवाडी केंद्रात जो आहार महिलांना मिळतो ना, तो प्रत्येक महिलेच्या आरोग्याला अनुकूल असतोच असे नाही. त्यामुळे पैसा महिलांच्या बँक खात्यात जमा केला तर त्यातून त्या त्यांच्या आवडीचे भोजन घेऊ शकतात. असे झाल्यास गरोदर महिला सुदृढ बाळाला जन्म देतील आणि ज्यांना मूल झाले आहे अशा महिला बाळाचे भरणपोषण नीट करू शकतील. काय खावे आणि काय खाऊ नये, हे ठरवत आपण जिथे राहतो तेथील हवामानानुसार आहार घेण्याचे स्वातंत्र्य या महिलांना मिळाले तर त्याचा त्यांच्या आरोग्यावर निश्‍चितच सकारात्मक परिणाम होईल, यात शंका नाही. आता कुणी असे म्हणू शकतो की थेट रक्कम जमा करण्याच्या योजनेतही गडबड होऊ शकते. असे होऊ नये यादृष्टीने एक पायलट तपासणी कार्यक्रमही राबविला जाऊ शकतो. काहीही करून अशा ज्या योजना आहेत, त्या यशस्वी करणे आणि देशभरातील महिला व बालकांमधील कुपोषण थांबविणे, हा सरकारचा आणि समाजाचा एक घटक या नात्याने आपल्यापैकी प्रत्येकाचा प्राधान्यक्रम असला पाहिजे, एवढेच यानिमित्ताने सुचवावेसे वाटते.

Posted by : | on : 18 Nov 2018
Filed under : आसमंत, डॉ.वाय.मोहितकुमार राव, पुरवणी, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, डॉ.वाय.मोहितकुमार राव, पुरवणी, स्तंभलेखक (406 of 1372 articles)

Indian Railways
अर्थपूर्ण : यमाजी मालकर | सणासुदीला आपल्या देशात कोट्यवधी नागरिक प्रवास करतात आणि आपल्या देशातील प्रवासाच्या सेवासुविधांविषयी आपण बोलू लागलो ...

×