ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, ब्रि. हेमंत महाजन, स्तंभलेखक » कुरापती नि कारवाई करण्याची भारताची क्षमता

कुरापती नि कारवाई करण्याची भारताची क्षमता

॥ राष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन |

मोठ्या हेडक्वार्टरवर कारवाई करण्याची ताकद भारताकडे आहे, हेही यातून भारतीय लष्कराने ध्वनित केले आहे. काश्मीरमधील स्थानिक लोकांमध्ये यातून एक संदेश जाणार आहे. भारतीय शासन आणि लष्कर जर थेट पाकिस्तानातील मुख्यालयाला टार्गेट करू शकते, तर काश्मीरमधील फुटीरतावाद्यांवर, दहशतवाद्यांच्या पाठिराख्यांवरही कठोर कारवाई होऊ शकते, हे तेथील जनतेला कळून चुकणार आहे.

Indian Army Soldiers Ap

Indian Army Soldiers Ap

पाकिस्तानच्या हाजिरा भागातील लष्कराच्या ब्रिगेड हेडक्वार्टरवर अलीकडेच भारतीय सैन्याकडून लक्ष्य करून उद्ध्वस्त करण्यात आले. २९ सप्टेंबर २०१६ रोजी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकसारखा हा सर्जिकल स्ट्राईक नव्हता. त्या स्ट्राईकमध्ये भारतीय सैन्य नियंत्रण रेषा पार करून पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेले होते आणि तिथे त्यांनी दहशतवादी प्रशिक्षण तळ, लाँच पॅड्स व पाकिस्तानी सैन्याचेही नुकसान केले होते.
दि. २१ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्यदलांवर हल्ला केला होता, त्यानंतर पुन्हा २३ ऑक्टोबर रोजी पाकी सैन्याने पुंछ भागात असाच हल्ला केला. या हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारतीय सैन्याने थेट पाकी सैन्याचे मुख्यालयच २९ ऑक्टोबर रोजी उडवल्याची माहिती आहे. याबाबत प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओजमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या मुख्यालय असलेल्या भागात मोठ्या प्रमाणावर धूर येताना दिसत आहे. सदर कारवाईमुळे पाकिस्तानी सैन्याच्या या मुख्यालयाचे जबरदस्त नुकसान झाले आहे. भारतीय लष्कराने आम्ही आमच्या सोयीनुसार योग्य त्या पद्धतीने पाकिस्तानला उत्तर देऊ असे सांगितले होते.
हाजिरा ब्रिगेड हेडक्वार्टर उद्ध्वस्त केले
हा हल्ला ब्रिगेड हेडक्वार्टरवर करण्यात आला आहे. त्या-त्या स्थानिक क्षेत्रातील कारवाया संचलित करण्याचे काम अशा मुख्यालयातून होत असते. अशा मुख्यालयालाच टार्गेट करून ते गोळीबार करून उद्ध्वस्त करण्यात आले. पूर्वीपेक्षा भयंकर स्वरूपाचा हा दणका होता. या कारवाईमध्ये किती नुकसान झाले, हे पाकिस्तान कधीही सांगणार नाही. कारण, भारताने केलेल्या हल्ल्यात लष्कराचे नुकसान झाले आहे, ही गोष्ट तेथील जनतेला कळाल्यास पाकिस्तानी लष्कराची नाचक्की होईल.
हा हल्ला बहुतेक तोफखाना, मोटर्स आणि इतर मोठ्या शस्त्रांस्त्रांच्या मदतीने केला असावा. दोन वर्षांपूर्वी जेव्हा सर्जिकल स्ट्राईक झाला होता तेव्हा भारतीय सैन्याने लक्ष्य केलेल्या जागा हे दहशतवाद्यांचे लाँच पॅड्स होते. लाँच पॅड काय असतात? दहशतवाद्यांचे प्रशिक्षण संपल्यानंतर त्यांना नियंत्रण रेषेच्या जवळ आणले जाते. तिथून भारतीय सीमांची टेहळणी केली जाते. जिथून आत प्रवेश करायला रस्ता मिळेल तिथून घुसखोरीचा प्रयत्न केला जातो. अर्थात ही लाँचपॅड एलओसीपासून अगदी जवळ म्हणजे एक ते दीड किलोमीटरवर असतात. पाकिस्तानी सैन्य एलओसीवर तैनात असते. ते पिकेट म्हणजे पोस्ट किंवा छोट्या किल्ल्यांच्या मदतीने सीमेचे रक्षण करत असतात. त्यांचे नेतृत्व बटालियन हेडक्वार्टर आणि कर्नल हुद्याचा अधिकारी करतो. मात्र भारतीय लष्कराने आता जिथे हल्ला केला आहे ते ब्रिगेड हेडक्वार्टर हे बटालियन हेडक्वार्टरपेक्षाही वरिष्ठ आहे. म्हणजेच पाकिस्तानी सैन्याच्या एका वरिष्ठ मुख्यालयावर भारताने आघात केला आहे.
पाकिस्तानी सैन्याचे नुकसान करण्यास सुरुवात
गेल्या तीन दशकांपासून पाकिस्तान दहशतवाद्यांचा वापर करून काश्मिरमध्ये दहशतवाद पसरवत आहे. मात्र आता भारतीय सैन्याच्या दहशतवादविरोधी अभियानामुळे काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले आहे. दहशतावाद्यांना नियंत्रण रेषेवर/ सीमेवरच रोखण्यात आपल्या लष्कराला यश मिळत आहे. तथापि, या अभियानामध्ये आणि दहशतवादीविरोधी अभियानातमध्ये आपले अधिकारी, जवान पण शहीद होतात. मात्र पाकिस्तानी सैन्याचे या आधी फारसे नुकसान होत नाव्हते. कारण ते पडद्यामागे सर्व दहशतवादाचे सूत्रधार आहेत. त्यामुळे त्यांना धडा शिकवण्याची गरज होतीच. यासाठीच भारताने आता धोरणात्मक बदल करून पाकिस्तानी सैन्याचे नुकसान करण्यास सुरुवात केली आहे. ताजा हल्ला हे याचे एक ठळक उदाहरण आहे. गेल्या काही महिन्यात भारताने सीमापार गोळीबाराला दिलेल्या प्रत्युत्तरामध्येही अनेक पाकिस्तानी सैनिक मारले गेले आहेत.
ज्या ज्या वेळी पाकिस्तान भारताविरोधात मोठी कुरापत काढतो, तेव्हा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला करण्याची गरज भारताला पुन्हा पडणार आहे. कारण पाकिस्तानला जशास तसे हीच भाषा समजते. कारण आक्रमक कारवाई करून पाकिस्तान सैन्यावर वर दबाव टाकल्याखेरीज हा देश वठणीवर येणार नाही. तसेच अशा प्रकारचा दणका दिल्यामुळे पाकिस्तानी सैन्याचीही त्यांच्या देशात नाचक्की होत असते. त्याच वेळी आपल्या देशातील नागरिकांमध्ये समाधानही व्यक्त केले जाते. पाकिस्तानच्या हल्ल्यात भारतीय जवान शहीद होत राहिले तर नागरिकांचे, सैन्याचे मनोधैर्य खच्चीकरण होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा कारवाया गरजेच्याच असतात व त्यांना प्रसिद्धी देणेही तेवढेच महत्त्वाचे असते. तथापि, केवळ तेवढ्यावरच समाधान मानून चालणार नाही. युद्धशास्राच्या नियमानुसार शत्रूला नेस्तनाबूत करण्यासाठीचे अन्य मार्गही अवलंबणे गरजेचे आहे.
५० टक्के पाकिस्तानी सैन्य दहशतवादी विरोधी अभियानात व्यग्र
सध्या पाकिस्तान लष्कराची अवस्था वाईट आहे. सर्वसाधारण परिस्थितीत ८५ टक्के पाकिस्तानी सैन्य हे पाक- भारत सीमेवर तैनात असते आणि केवळ १५ टक्के लष्कर अफगाणिस्तानच्या सीमेवर तैनात असते. मात्र आता यामध्ये एक मोठा फरक झाला आहे. पाकिस्तानमध्ये कार्यरत असणार्या तेहरिके ए तालिबान- पाकिस्तान या दहशतवादी संघटनेविरुद्धच्या झर्ब ए अज्ब या अभियानांतर्गत वझरिस्तान, फाटा आणि अफगाणिस्तानला लागून असलेल्या भागात ५० टक्के पाकिस्तानी सैन्य व्यग्र आहे. एवढेच नव्हे, तर बलुचिस्तान लिबरेशन आर्मी देखील या त्रासात भर घालत आहे. चीन-पाकिस्तान आर्थिक परिक्षेत्रांतर्गत जो ४५०० किलोमीटर मार्गाचा रस्ता पाकिस्तानातून चीनमध्ये जातो, त्याचे संरक्षण करण्यासाठी १५ ते ३० हजार पाकिस्तान लष्कर गुंतले आहे. दहशतवादी अभियानात सहभागी झाल्याने पाकिस्तान लष्कराचे बर्यापैकी नुकसान होत आहे.
पाकिस्तानची आर्थिक कोंडी
याशिवाय सध्या पाकिस्तानची आर्थिक परिस्थितीही गंभीर आहे. त्यांना आर्थिक अरिष्टातून बाहेर येण्यासाठी १२ बिलियन डॉलर्सची गरज आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सौदी अरेबियामध्ये गेले; पण तिथून त्यांना ३ अब्ज डॉलर्स किमतीच्या तेलाची मदत मिळणार आहे. कर्जफेडीसाठी सौदी अरेबियाकडून फारशी मदत मिळालेली नाही. कारण सौदी अरेबियाची आर्थिक परिस्थितीच बिकट आहे. त्यांच्या देशातील जनतेवर होणारा खर्च हा त्यांच्या वार्षिक उत्पन्नाहून अधिक आहे.
सध्या पाकिस्तानचे पंतप्रधान ७ दिवस चीनच्या दौर्यावर आहेत आणि चीनकडूनही ते अशाच प्रकारची मदत मागणार आहे. चीनची अर्थव्यवस्थाही बिकट अवस्थेतूनच जात आहे. अमेरिकेसोबतच्या व्यापार युद्धामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेवर खूप मोठा परिणाम झालेला आहे. चीनने वेगवेगळ्या देशांमध्ये ‘वन बेल्ट वन रोड’ हा व्यापारासाठी रस्ते बांधण्याचा जो कार्यक्रम सुरू होता, त्यामध्येही त्यांना नुकसानच होत आहे. म्हणूनच पाकिस्तानला मदत करण्याची चीनची क्षमता संशयास्पद आहे. अमेरिकेसोबत सुरू असलेलं ट्रेडवॉर आणि अर्थव्यवस्थेची मंदावलेली गती यामुळे चीनचं चलन युआन डॉलरच्या तुलनेत कमकुवत झालं आहे. १ नोव्हेंबरला ही किंमत ६.९७ डॉलर प्रति युआन झाली होती. मे २००८नंतरची युआनची ही सर्वांत खालची पातळी होती.२००८च्या जागतिक आर्थिक मंदीनंतर चीनची आर्थिक वाढ पहिल्यांदाच मंदावली आहे. चीनने जुलै-सप्टेंबर तिमाहीत ६.५टक्के इतक्या विकासदराची नोंद केली आहे. अमेरिका आणि चीन या दोन जागतिक महासत्तांमधलं ट्रेड वॉर आता चांगलंच पेटलं आहे. अमेरिकेने चीनवर नव्याने २५० अब्ज डॉलर्स एवढ्या प्रचंड रकमेचे निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे पाकिस्तानसमोर आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मदत घेण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय नाही.
पाकिस्तानने आपल्या कुरापती न थांबवल्यास आणखी आतमध्ये, याहून अधिक महत्त्वाच्या-मोठ्या हेडक्वार्टरवर कारवाई करण्याची ताकद भारताकडे आहे, हेही यातून भारतीय लष्कराने ध्वनित केले आहे. काश्मीरमधील स्थानिक लोकांमध्ये यातून एक संदेश जाणार आहे. भारतीय शासन आणि लष्कर जर थेट पाकिस्तानातील मुख्यालयाला टार्गेट करू शकते, तर काश्मीरमधील फुटीरतावाद्यांवर, दहशतवाद्यांच्या पाठिराख्यांवरही कठोर कारवाई होऊ शकते, हे तेथील जनतेला कळून चुकणार आहे.
आर्थिक आणि मुत्सद्दी दबाव
फायनान्शिअल अ‍ॅक्शन टास्क फोर्स ही संयुक्त राष्ट्रांची संस्था जगामध्ये दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न करणार्‍या देशांवर लक्ष ठेवून असते. त्यांचे पाकिस्तानवर बारीक लक्ष आहे. पुढच्या फेब्रुवारीमध्ये पाकिस्तानला दहशतवादाला खतपाणी घालणारा देश म्हणून घोषित करायचे का यावर निर्णय घेतील. म्हणूनच भारताला खूप चांगली संधी आली आहे. त्याचा पुरेपूर वापर करून आर्थिक आणि मुत्सद्दी दबाव वाढवून पाकिस्तानची भारताविरोधातील दहशतवादी कारवाया करण्याची क्षमता नक्कीच कमी करता येईल. •

Posted by : | on : 18 Nov 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, ब्रि. हेमंत महाजन, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, ब्रि. हेमंत महाजन, स्तंभलेखक (251 of 1224 articles)

Rahul Manmohan Sonia
जागता पहारा : भाऊ तोरसेकर | चौहान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात जमिन अस्मानाचा फरक आहे. मागल्या सोळा वर्षात सोनियांनी ...

×