ads
ads
सजा पक्की : कशी? ते लष्कर ठरवेल!

सजा पक्की : कशी? ते लष्कर ठरवेल!

•पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पांढरकवड्यात पाकला इशारा •कोलामी, बंजारा,…

पाकिस्तानातील आयातीत वस्तूंवर २०० टक्के कर

पाकिस्तानातील आयातीत वस्तूंवर २०० टक्के कर

नवी दिल्ली, १६ फेब्रुवारी – पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती…

भारताला स्वरक्षणाचा अधिकार

भारताला स्वरक्षणाचा अधिकार

•अमेरिकेच्या एनएसएचा अजित डोवाल यांना फोन, नवी दिल्ली/वॉशिंग्टन, १६…

भारताने डगमगू नये, ठोस कारवाई करावी

भारताने डगमगू नये, ठोस कारवाई करावी

•अमेरिकेतील ७० खासदारांची भूमिका, वॉशिंग्टन, १६ फेब्रुवारी – पुलवामातील…

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी

•पाकिस्तानने व्यक्त केली वचनबद्धता •कुलभूषण जाधव प्रकरण, लाहोर, १६…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:27
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, भाऊ तोरसेकर, स्तंभलेखक » केजरीवाल का तिखा लाल

केजरीवाल का तिखा लाल

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर |

नाट्यमयता ही केजरीवालांच्या रक्तात आणि आम आदमी पक्षाच्या डीएनएमध्येच सामावलेली आहे. त्यामुळे आता निवडणूकांचे वेध लागले असतील तर अशा नाटकांचे नवनवे अविष्कार पुढल्या काळात दिसणार आहेत. वाहिन्यांना नाट्यमयता हवीच असल्याने त्याला वारेमाप प्रसिद्धी मिळणारच. तेव्हा वाहिन्यांच्या प्रेक्षकांनीही तशा नाटकाची सवय लावून घेतलेली बरी. आज मिरची पुड टाकलेली आहे. उद्या सुहाना वा एमडीएच वगैरे मसाला कंपन्यांची जाहिरात केजरीवाल यांनाच मॉडेल म्हणूनही वापरू लागण्याची शक्यता कोणी नाकारू शकणार नाही.

Kejriwal

Kejriwal

काल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आपल्या कार्यालयातून बाहेर पडत असताना कोणीतरी त्यांच्यावर मिरची पुड फेकल्याची बातमी आली आणि पाच वर्षापुर्वी ज्या घटना घडत होत्या, त्याचे स्मरण झाले. तेव्हा केजरीवाल किंवा त्यांचे निकटवर्तिय कोणी आप नेते कुठे जातील, तिथे त्यांच्यावर शाई फेकण्याचा सपाटा लागलेला होता. दिल्ली असो किंवा वारणाशी असो, तिथे कोणी तरी गर्दीतून अकस्मात पुढे घुसायचा आणि केजरीवाल यांच्या अंगावर शाई फेकून अटक करून घ्यायचा. कधीतरी त्याला आपचे कार्यकर्ते यथेच्छ झोडपूनही काढायचे. मग विनाविलंब टिव्हीच्या विविध कॅमेरासमोर आपचे प्रवक्ते येऊन भाजपावाल्यांनीच तो हल्ला केल्याचे तावातावाने कथन करू लागायचे. केजरीवाल व शिसोदिया वगैरे मंडळी तशा माखल्या तोंडाने व रंगलेल्या कपड्यानिशी आपल्या व्यासपीठावर जाऊन भाषणे देत भाजपाच्या नावाने शिव्याशाप देण्याचा उद्योग सुरू करायचे. हळुहळू वाहिन्यांनाही त्याचा कंटाळा आल्यामुळे लोकसभेच्या निकालानंतर शाई फेकण्याचे प्रकार थंडावलेले होते. मजेची गोष्ट म्हणजे त्या निकालानंतर केजरीवाल कुठेही कसेही फिरत होते आणि लोकांमध्ये मिसळत होते. पण विधानसभेच्या निवडणुका लागण्यापर्यंत पुन्हा कोणी त्यांच्या वाटेला शाई घेऊन गेला नव्हता, की कुणावर आरोप करायची सवड आपनेत्यांना मिळालेली नव्हती. आता त्यात प्रगती झालेली दिसते, शाईच्या बाजी कोणाला नवा काही पदार्थ वापरण्याची बुद्धी झालेली आहे. येत्या काही दिवसात किंवा लोकसभेच्या निवडणूका होईपर्यंत अनेकदा केजरीवाल किंवा अन्य आप नेत्यांवर आता मिरची पुड वा अन्य काही मसाल्याचे पदार्थ फेकण्याचे प्रकार वाढत जातील. कारण अशा बातम्यांना वाहिन्यांच्या बाजारात खुप मागणी असते. सहाजिकच त्याचा पुरवठा करण्याचे कंत्राट आम आदमी पक्षाने घेतलेले असेल तर असे प्रकार वाढण्याला पर्याय नाही.
तेव्हा म्हणजे मागल्या लोकसभेपुर्वी केजरीवाल यांनी अशी अनेक नाटके रंगवली होती. त्यांना त्यातून वारेमाप प्रसिद्धीही मिळालेली होती. शाईतून एक नवखा पुढारी थेट देशाचा पंतप्रधान व्हायला निघाला होता आणि वाहिन्यांच्या पत्रकारांनी आम आदमी पक्षाला भाजपाचा मुख्य प्रतिस्पर्धी बनवून कॉंग्रेसला परस्पर निकालात काढले होते. पण सुदैवाने आपल्या देशात वाहिन्यांच्या वा पत्रकारांच्या मतांवर निकाल लागत नसल्याने कॉंग्रेसचा जबरदस्त पराभव झाला, तरी देशातला तोच दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष म्हणून लोकसभेत निवडून आला. केजरीवाल यांच्या दिल्लीतल्या सर्व उमेदवारांना पराभवाची चव चाखावी लागली होती. देशात तर केजरीवाल यांच्या पक्षाने इतिहासात सर्वाधिक अनामत रकमा जप्त होणारा पक्ष म्हणून विक्रम साजरा केला होता. खुद्द केजरीवालही वाराणशीमध्ये मोदींच्या विरोधात पराभूत झाले होते. काही बाटल्या शाई आणि वारेमाप प्रसिद्धी त्यांना निवडणूकीत यश मिळवून देऊ शकली नाही. त्यामुळे पंतप्रधान होण्याची महत्वाकांक्षा गुंडाळून ठेवत केजरीवाल पुन्हा दिल्लीची जमिन शोधत फिरू लागले होते. लौट के बुद्दू घरको आये, या उक्तीप्रमाणे त्यांनी आपले कार्यक्षेत्र दिल्लीपुरते मर्यादित करून विधानसभेची तयारी सुरू केली आणि चांगले यश मिळवले. मजेची गोष्ट म्हणजे त्या मध्यावधी विधानसभा निवडणूकीच्या प्रचारात मोकाट फिरणार्‍या केजरीवाल यांच्यावर कोणीही पुन्हा शाई फेकली नाही, की कुठली उचापत केली नाही. त्यानंतर थेट आता हा मिरची पुड फेकण्याचा उद्योग झालेला आहे. याचा अर्थच आम आदमी पक्ष जुन्याच मार्गाने लोकसभेच्या तयारीला लागला असे म्हणावे लागेल. कारण असली काही नाटके तमाशे केल्याशिवाय केजरीवाल यांना प्रसिद्धी मिळत नाही आणि प्रसिद्धीच्या झोताबाहेर गेल्यावर त्यांना चैन पडेनाशी होते ना?
तेव्हा लोकसभेचे वेध लागलेले असताना एका धरण्याचा कार्यक्रम योजलेला होता. तिथे केजरीवाल नव्हते आणि त्यांचे अन्य सहकारी तिथे बसलेले होते. योगेंद्र यादव यांच्यावर असाच हल्ला झालेला होता. कोणीतरी थेट मंचावर अकस्मात आला आणि त्याने यादवांच्या तोंडाला काळे फासले होते. मग तशाच रंगलेल्या तोंडाने यादवांनी वाहिन्यांना मुलाखती दिल्या होत्या, तर प्रवक्त्‌यांनी भाजपावर झोड उठवली होती. पुढे अधिक चौकशी झाली आणि कार्यकर्त्यांनी ज्याला झोडपून पोलिसांच्या ताब्यात दिलेले होते, तो त्यांच्याच पक्षाचा कोणी कार्यकर्ता असल्याचे निदर्शनाला आलेले होते. मग कशाच्या आधारावर आप प्रवक्त्‌यांनी भाजपा किंवा कॉंग्रेसवर हल्ल्‌याचे आरोप केलेले होते? हेच कशाला अशाच एका निवडणूक प्रचार फेरीत कोणीतरी एक उत्साही कार्यकर्ता केजरीवाल यांच्या उघड्या जिपच्या समोर आला आणि हार घालण्याच्या निमीत्ताने अगदी जवळ पोहोचला. हार घालून होताच त्याने केजरीवाल यांच्या कानशिलात सणसणित वाजवली होती. ती इतकी जबरदस्त होती, की केजरीवाल यांचा चेहरा सुजलेला होता. मग तसाच चेहरा घेऊन त्यांनी एकदोन तास गांधी समाधी राजघाट येथे धरणे धरलेले होते. तपासाअंती तोही त्यांच्याच पक्षाचा कोणी कार्यकर्ता असल्याचे निष्पन्न झालेले होते. वारंवार असे प्रकार एकाच पक्ष वा नेत्याच्या बाबतीत घडू लागले आणि त्यात त्याचाच कोणी कार्यकर्ता असल्याचे उघड होऊ लागल्यावर अधिक काळ ते नाटक चालू शकले नाही. त्या नाटकाचे प्रयोग प्रेक्षकाअभावी वाहिन्यांनाही थांबवावे लागलेले होते. बहुधा म्हणूनच आता नव्या कलाकारांच्या संचात आणि नवी नेपथ्य रचना करून मिरची पुड हा खेळ सुरू झालेला असू शकतो. कारण असे हल्ले आम आदमी पक्ष व केजरीवाल सोडून अन्य पक्षांच्या वाट्याला फारसे आलेले नाहीत. नाट्यमयता हा या नव्या पक्षाचा आत्मा राहिला आहे.
मागल्या लोकसभा निवडणुका जाहीर होण्याच्या बेताला केजरीवाल पक्षाचा प्रचार करण्यासाठी गुजरातला पोहोचले होते आणि अचानक त्यांनी मुख्यमंत्री नरेंद्र मोदींची भेट मागितली. ती नाकारली गेल्यावर त्यांनी तिथेच तमाशा सुरू केला होता. आपण दिल्लीचे माजी मुख्यमंत्री असतानाही आपल्याला गुजरातचा मुख्यमंत्री तात्काळ भेट देत नाही, ह्याला ‘आम आदमी’ पक्षाचा नेता लोकशाहीचा अपमान ठरवून नाटक रंगवत होता. मग त्याच दरम्यान निवडणूक आयोगाने लोकसभेच्या मतदानाचे वेळापत्रक जाहीर केले आणि आचारसंहिता लागू झाली. तर आचारसंहितेचे कारण देऊन केजरीवाल यांच्यासोबत चाललेल्या तीसचाळीस गाड्यांचा ताफा पोलिसांनी रोखला. तर त्याला भाजपाची दादागिरी ठरवून केजरीवालनी मोठा तमाशा केला होता. त्यांचे दिल्लीतले दोनतीनशे समर्थक भाजपाच्या पक्ष कार्यालयाजवळ जमा झाले आणि तिथे त्यांनी दगडफेक सुरू केली. अशाप्रकारे त्या पक्षाने आपण गांधीवाद व अहिंसक असल्याची साक्ष दिली होती. त्याची किंमत त्यांना लोकसभा मतदानातून मोजावी लागली होतीच. पण नाट्यमयता ही केजरीवालांच्या रक्तात आणि आम आदमी पक्षाच्या डीएनएमध्येच सामावलेली आहे. त्यामुळे आता निवडणूकांचे वेध लागले असतील तर अशा नाटकांचे नवनवे अविष्कार पुढल्या काळात दिसणार आहेत. वाहिन्यांना नाट्यमयता हवीच असल्याने त्याला वारेमाप प्रसिद्धी मिळणारच. तेव्हा वाहिन्यांच्या प्रेक्षकांनीही तशा नाटकाची सवय लावून घेतलेली बरी. आज मिरची पुड टाकलेली आहे. उद्या सुहाना वा एमडीएच वगैरे मसाला कंपन्यांची जाहिरात केजरीवाल यांनाच मॉडेल म्हणूनही वापरू लागण्याची शक्यता कोणी नाकारू शकणार नाही. आम आदमी पक्षाचे नेते वा केजरीवाल यांच्या अंगावर फेकलेली मिरची पुड म्हणजे आमचाच ‘एव्हरेस्टचा तिखा लाल’ असल्याची जाहिरात झळकली तर मला आश्चर्य वाटणार नाही. कदाचित कंपनी आपली जाहिरात बदलून ‘केजरीवालका तिखा लाल’ अशीही जाहिरात करू लागण्याची शक्यता आहे.

Posted by : | on : 25 Nov 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, भाऊ तोरसेकर, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, भाऊ तोरसेकर, स्तंभलेखक (231 of 1220 articles)

What's The Real Reason You Hate
मानसरंग : मयुरेश डंके | आपलं दुर्दैव हेच आहे की, एका बाजूला आपण शैक्षणिकदृष्ट्‌या अत्यंत सक्षम असाही तरूण निर्माण करू ...

×