ads
ads
ना विसरणार, ना माफ करणार!

ना विसरणार, ना माफ करणार!

•सुरक्षा दलांना पूर्ण मोकळीक! •पुलवामा हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी…

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

सर्वाधिक पसंत देशाचा दर्जा काढला

•पाकिस्तानला जगात एकटे पाडणार, नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी –…

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिजला कट

नवी दिल्ली, १५ फेब्रुवारी – पुलवामात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

अबुधाबी न्यायालयात हिंदीचा समावेश

दुबई, १० फेब्रुवारी – अबुधाबी सरकारने तेथील न्यायालयांमध्ये तिसरी…

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

फास्ट फूडवर ताव मारूनही डोनाल्ड ट्रम्प ठणठणीत!

वॉशिंग्टन, १० फेब्रुवारी – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

रोज व्हॅली, शारदा चिटफंट घोटाळा

॥ विशेष : बबन वाळके | ममतांना अशी वाटते…

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

॥ प्रासंगिक : विनय बन्सल | नानाजी देशमुख यांच्यासारख्या…

कोण चौकीदार? कोण चोर?

कोण चौकीदार? कोण चोर?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | राजीव कुमारपाशी…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:26
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, भाऊ तोरसेकर, स्तंभलेखक » कोण चौकीदार? कोण चोर?

कोण चौकीदार? कोण चोर?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर |

राजीव कुमारपाशी महत्वाचे पुरावे असून, त्याने तोंड उघडले तर ममता दिदीचा मुखवटा गळून पडायला वेळ लागणार नाही. म्हणूनच एका कायदेशीर प्रकरणाला ममतांनी राजकीय मुलामा चढवला आणि लोकशाही संस्थांचा मोदी बळी घेत असल्याची बोंब ठोकलेली आहे. पण त्यात कुठेही मोदी वा लोकशाहीचा संबंधच नाही. राजीव कुमार सीबीआयच्या हवाली पुरावे करून मोकळे झाले असते, तर हा विवाद झाला नसता. पण ममता मात्र सापळ्यात अडकल्या असत्या. पण मुद्दा ममताचा नाही किंवा मोदींचाही नाही. विषय लोकशाही मूल्यांचा आहे. कोणी लोकशाही संस्था व मूल्यांना हरताळ फासला आहे? मोदी विरोधात टोकाला जाताना हेच लोक एक एक करून तमाम लोकशाही संस्थांना सुरूंग लावत चालले आहेत.

Mamata Banarjee Rajiv Kumar

Mamata Banarjee Rajiv Kumar

२००२ पासून २०१४ पर्यंत नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि त्यांच्यामागे गुजरात दंगलीचे शुक्लकाष्ट लावून एकामागून एक सीबीआय तपासाचा ससेमिरा लावण्यात आला होता. सुप्रिम कोर्टाने तीन एसआयटी इशरत चकमक खोटी असल्याच्या आरोपासाठी बसवल्या होत्या. त्यापैकी एकदा दहा तास सलग मुख्यमंत्री मोदी यांची कसून तपासणी सीबीआय पथकाने केलेली होती. पण त्यांच्यावर मोदींनी कधी सुडबुद्धीचे राजकारण म्हणून प्रत्यारोप केला नाही. तेव्हा केंद्रात युपीए काँग्रेसचे सरकार होते. याच काळात सोहराबुद्दीन चकमकीसाठी अमित शहांवर आरोप झाले आणि त्यांना सीबीआयने काही महिने तुरूंगात डांबले होते. त्यांना गुजरातमध्ये येण्यावर प्रतिबंध लावला गेला होता. तरीही त्यांनी कधी सुडबुद्धीच्या राजकारणाचा आरोप काँग्रेसवर लावला नाही, की सीबीआयला गुजरातमध्ये काम करण्यास प्रतिबंध घातला नाही. याला लोकशाहीतील संस्थांवर विश्‍वास दाखवणे किंवा काम करू देणे म्हणतात. पण तोच विश्‍वास आज आपल्यावर तशी वेळ आल्यानंतर तमाम विरोधी पक्ष वा काँग्रेस दाखवू शकले आहेत काय? चिदंबरम, शशी थरूर वा राहुल सोनियांपासून ममता लालूंपर्यंत कोणाचा तरी सीबीआय किंवा सुप्रिम कोर्टावर विश्‍वास असल्याचा पुरावा कोण देऊ शकेल काय? जे आज कोलकात्यात ममता बानर्जी करीत आहेत, तेच तेव्हा नरेंद्र मोदी आपल्या विविध पोलिस अधिकार्‍यांना अटक व्हायची पाळी आली तेव्हाही करू शकले असते. गीता जोहरी, अशोक सिंघल वा वंझारा अशा अर्धा डझन वरीष्ठ पोलिस अधिकार्‍यांना काही वर्षे तुरूंगात डांबले गेले, पण मोदी-शहांनी राजकीय सुडबुद्धीचा आरोप सीबीआयवर केला नाही की न्यायालयावर केला नाही. प्रतिकुल असतानाही कायद्याशी सहकार्य केले. याला लोकशाही संस्थांचा सन्मान व त्यावरील विश्‍वास म्हणतात ना? रविवारी ममतांनी त्याच लोकशाहीचा गळा घोटला आणि तमाम विरोधी पक्ष त्यांच्या बाजूने उभे राहिले आहेत. मग त्यांचे म्हणणे काय असावे?
लोकशाही वाचवण्यासाठी लोकशाहीलाच ठार मारले पाहिजे, यापेक्षा ममतांच्या कृतीचा काही वेगळा अर्थ निघू शकतो काय? कारण त्यांनी एका पोलिस आयुक्ताला वाचवण्यासाठी इतका आटापिटा केलेला नाही. ज्या आर्थिक घोटाळ्यात लक्षावधी सामान्य लोकांच्या काही हजार कोटी रुपयांचा अपहार झाला आहे, त्यात खुद्द ममताच गुंतल्या असल्याचे काही पुरावे आहेत. ते दडपण्यात याच पोलिस आयुक्ताने मदत केलेली आहे. जेव्हा ही अफरातफर बाहेर आली आणि स्थानिक पोलिसांनी तपास सुरू केला, तेव्हा त्याची सुत्रे याच राजीव कुमार यांच्याकडे होती आणि त्यांनी नारदा शारदा या घोटाळ्यात गुंतलेल्या तृणमूल नेत्यांना वाचवण्याचेच पराक्रम केलेले आहेत. त्यामुळेच काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी सुप्रिम कोर्टात धाव घेऊन सीबीआय चौकशीची मागणी केली. ती मान्य झाल्यावर आजपर्यंत या राजीव कुमारनी आधीच्या तपासात हाती लागलेल्या पुरावे व कागदपत्रे सीबीआयच्या हवाली करण्यात टंगळमंगळ चालवली होती. शेवटी त्यालाच उचलून माहिती मिळवण्याचा पवित्रा सीबीआयने घेतला, तेव्हा ममतांचे धाबे दणाणले आणि त्यांनी आपल्या स्वभावानुसार रस्त्यावरचा तमाशा सुरू केला. त्यातून हा घटनात्मक पेचप्रसंग सुरू झाला आहे, त्याचा केंद्र-राज्य संबंधांशी काडीमात्र संबंध नाही, की राजकारणाशीही काडीमात्र कर्तव्य नाही. मुद्दा राजीव कुमार याच्यापाशी महत्वाचे पुरावे असून, त्याने तोंड उघडले तर ममता दिदीचा मुखवटा गळून पडायला वेळ लागणार नाही. म्हणूनच एका कायदेशीर फौजदारी प्रकरणाला ममतांनी राजकीय मुलामा चढवला आहे आणि लोकशाही संस्थांचा मोदी बळी घेत असल्याची बोंब ठोकलेली आहे. पण त्यात कुठेही मोदी वा लोकशाहीचा संबंधच आलेला नाही. राजीव कुमार सीबीआयच्या हवाली पुरावे करून मोकळे झाले असते, तर हा विवाद झाला नसता. पण ममता मात्र सापळ्यात अडकल्या असत्या.
पण मुद्दा ममताचा नाही किंवा मोदींचाही नाही. विषय लोकशाही मूल्यांचा व संस्थांचा आहे. कोणी लोकशाही संस्था व मूल्यांना हरताळ फासला आहे? मोदी विरोधात टोकाला जाताना हेच लोक एक एक करून तमाम लोकशाही संस्थांना सुरूंग लावत चालले आहेत. आधी चंद्राबाबूंनी आंध्रामध्ये सीबीआयला काम करू देणार नसल्याची गर्जना केली आणि ममतांनी त्यांचे अनुकरण केले. पण एक विचार करा की हेच २००२ नंतर मोदीही करू शकले असते. कारण युपीएतली काँग्रेस आणि सत्तेत बसलेले तमाम पुरोगामी, विविध मार्गाने मोदींनाच सुडबुद्धीने वागवत होते. त्यासाठी सीबीआयच नव्हेतर प्रत्येक लोकशाही संस्थांचा व न्यायालयीन प्रक्रीयेचा बिनधास्त वापर झालेला होता. अनेक खटले तर गुजरातबाहेर हलवण्यात आले आणि इतक्या अग्निदिव्यातून तावून सुलाखून मोदी बाहेर पडले. पण त्यांनी कधीच सीबीआय वा कोर्ट अशा संस्थांच्या हेतूवर शंका घेतली नाही. आणखी एक बाब म्हणजे आपण चुक वा गुन्हा केलेला नसल्याचा आत्मविश्‍वासच त्यांना त्यातून सुखरूप बाहेर काढू शकला, तो आत्मविश्‍वास चंद्राबाबू, मायावती वा ममतापाशी असता, तर त्यांना असली नाटके करावी लागली नसती. पण आज ममता असले नाटक रंगवित आहेत, कारण आपला गुन्हा त्यांना पक्का ठाऊक आहे. योग्य मार्गाने कसून चौकशी झाली, तर त्यात आपले हातपाय अडकणार याचा मात्र पक्का आत्मविश्‍वास आहे. म्हणून त्या सातत्याने चौकशी वा तपासात अडथळे आणत राहिल्या आहेत. आधी बंगाल पोलिस त्यांच्याच अखत्यारीत होते आणि चौकशीला लगाम लावणे त्यांच्याच हाती होते. पण कोर्टाने सीबीआयला तपासकाम सोपवल्याने त्यांची अडचण झालेली आहे. ज्यांनी मुळ चौकशी केली व पुरावे गोळा केले, त्याला पुरावे द्यावे लागतील. किंवा तेच नष्ट केले असेतील तर आपला गळा सोडवण्यासाठी त्यालाच माफीचा साक्षिदार व्हावे लागेल, हे भूत ममतांना भेडसावते आहे.
ममतांची अनेक फडतूस चित्रे कलाकृती या अफरातफर केलेल्या चिटफंडवाल्यांनी प्रचंड किंमतीत विकत घेतली आणि त्यांचेच एकाहून एक निकटवर्तिय त्यात फसलेले आहेत. काही अटकेत आहेत आणि आता राजीव कुमार त्यातला भागीदार तपास अधिकारी आहे. त्याला वाचवले नाही, तर तो ममतांना अडकवून देण्याची भिती आहे. त्याच चिंतेपोटी ममतांनी आपल्या घोटाळ्याला राजकीय रंग चढवला आहे. त्यात मोदी विरोधाच्या अतिरेकाने भरकटलेले विविध राजकीय पक्ष येऊन आयतेच अडकलेले आहेत, उद्या कोर्टात हे प्रकरण फसले, मग त्या पक्षांना जगाला तोंड दाखवता येणार नाही. कारण हा मामला केंद्र राज्याच्या नसून अफरातफरीचा आहे. कोर्टानेच त्याची चौकशी सीबीआयवर सोपवलेली असून, त्यात अडथळा आणणे कोर्टाचा अवमान ठरू शकतो. तसे झाले मग इतर पक्षांना कुठलेही कारण नसताना ममतांचे समर्थन केले म्हणून भ्रष्टाचाराचे समर्थक म्हणून टीकेचे घाव सोसावे लागणार आहेत. चौकीदार चोर है म्हणणारेच चोर असल्याचा तो सुप्रिम कोर्टाने मान्य केलेला सर्वात मोठा पुरावा असेल. महागठबंधन ही चोरांची टोळी आहे, असे आरोप नरेंद्र मोदी व अमित शहा नेहमीच करीत असतात. पण उद्या राजीवकुमारचा बचाव फसला आणि त्याला सुप्रिम कोर्टाने सीबीआयच्या ताब्यात दिले, मग ममताच नव्हेतर सगळे महागठबंधन सहकारी तोंडघशी पडतील. ममता तरी केलेल्या पापाची फळे भोगतील. पण राहुल, मायावती, केजरीवाल, चंद्राबाबू इत्यादिंना खुलासे देत बसण्याची नामुष्की येईल, त्याचे काय? कारण जो हजारो कोटींचा चिटफंड घोटाळा झाला आहे, त्याचे लाभार्थी फक्त तृणमूलचे नेते पदाधिकारी आहेत. पण आज ममताच्या हाकेला ओ देऊन धावलेले, उद्या चोर ठरणार आहेत. वैचारिक दिवाळखोरी व तिरस्काराच्या राजकारणाची ती सर्वात केविलवाणी किंमत असेल.

Posted by : | on : 10 Feb 2019
Filed under : आसमंत, पुरवणी, भाऊ तोरसेकर, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, भाऊ तोरसेकर, स्तंभलेखक (7 of 1208 articles)

Euflag 2 Zx7rx6
परराष्ट्रायन : वसंत गणेश काणे | ब्रेक्झिटचा ठरावासोबत अविश्‍वास प्रस्तावही फेटाळला गेल्यानंतर थेरेसा मे हतबल झाल्या आहेत. ‘‘ब्रेक्झिटला ( युरोपियन ...

×