ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी » गरज विज्ञानवादी समाज निर्मितीची!

गरज विज्ञानवादी समाज निर्मितीची!

॥ विशेष : डॉ. संजय पुजारी |

आपलं रोजचं जगणं विज्ञानाशी निगडित आहे. त्या अर्थानं रोजच विज्ञान दिन असतो, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. विज्ञानाच्या सहाय्यानं निर्माण केलेली अनेक साधनं आपल्याला रोजच्या रोज वापरावी लागत आहेत. मोबाईलसारखं साधन तर आता मूलभूत गरज ठरू लागलं आहे. वाढत्या लोकसंख्येची अन्नधान्याची गरज भागवण्याच्या दृष्टीनं उत्पादनवाढीसाठी केलेले प्रयत्न हे विज्ञानातूनच पुढं आले होते. आजही कमी कालावधीत, अधिक उत्पन्न देणार्‍या तसंच रोग-किडीला सहजासहजी बळी न पडणार्‍या पिकांच्या नव्या वाणांबाबत सातत्यानं संशोधन सुरू आहे. त्याला यशही येत आहे. म्हणजे अन्नाची मूलभूत गरज भागवण्यासाठीही विज्ञान कामी येत आहे.

Researchindia

Researchindia

आपलं रोजचं जगणं विज्ञानाशी निगडित आहे. विज्ञानाच्या सहाय्यानं निर्माण केलेली अनेक साधनं रोज वापरावी लागत आहेत. वैज्ञानिक क्षेत्रात भारतानं उल्लेखनीय असं कार्य केलं आहे. मात्र, या देशातील समाजावर अजूनही अंधश्रद्धेचा पगडा बर्‍याच प्रमाणात कायम आहे. या पार्श्‍वभूमीवर विज्ञानाच्या प्रचार-प्रसाराला आणखी चालना दिली जायला हवी. तसं झालं तर विज्ञानवादी समाज निर्मितीचं स्वप्न प्रत्यक्षात येऊ शकेल.
सध्याचं युग विज्ञान-तंत्रज्ञानाचं आहे. साहजिक या क्षेत्रात सातत्यानं वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. अधिकाधिक प्रगत तंत्रज्ञानाच्या वापराकडील ओढा वाढत आहे. त्यामुळे अनेक कठीण बाबी सुकर झाल्या आहेत. मात्र, या क्षेत्रातील आजवरच्या वाटचालीत काही महत्त्वाचे टप्पे लक्षात घेणंही गरजेचं आहे. देशात ब्रिटिशांचं राज्य होतं तेव्हा प्रसिद्ध शास्त्रज्ञ सी. व्ही. रमण यांना प्रकाश वर्णपंक्तीवर केलेल्या संशोधनासाठी नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आलं. या संशोधनाला ‘रमण इफेक्ट’ असं नाव देण्यात आलं.
तत्कालिन ब्रिटिश सरकारनंही याचं कौतुक केलं. पुढे देश स्वतंत्र झाल्यानंतर ज्येष्ठ संशोधक वसंतराव गोवारीकर तसंच अन्य शास्त्रज्ञांनी विज्ञानाच्या प्रचार-प्रसारावर भर दिला. समाजाच्या सर्व स्तरात विज्ञानाच्या विचारांचा प्रचार, प्रसार व्हावा, विज्ञानाकडे लोकांचा ओढा वाढावा, यासाठी प्रयत्न केले. आजही विज्ञानविषयक विचाराच्या प्रसाराचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र, विज्ञानवादी समाज निर्मितीचं स्वप्न अजूनही कायम आहे.
खरं तर आपलं रोजचं जगणं विज्ञानाशी निगडित आहे. त्या अर्थानं रोजच विज्ञान दिन असतो, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. विज्ञानाच्या सहाय्यानं निर्माण केलेली अनेक साधनं आपल्याला रोजच्या रोज वापरावी लागत आहेत. मोबाईलसारखं साधन तर आता मूलभूत गरज ठरू लागलं आहे. वाढत्या लोकसंख्येची अन्नधान्याची गरज भागवण्याच्या दृष्टीनं उत्पादनवाढीसाठी केलेले प्रयत्न हे विज्ञानातूनच पुढं आले होते. आजही कमी कालावधीत, अधिक उत्पन्न देणार्‍या तसंच रोग-किडीला सहजासहजी बळी न पडणार्‍या पिकांच्या नव्या वाणांबाबत सातत्यानं संशोधन सुरू आहे. त्याला यशही येत आहे. म्हणजे अन्नाची मूलभूत गरज भागवण्यासाठीही विज्ञान कामी येत आहे.
विविध प्रकारच्या प्रगत उपचारांमुळे अनेक रुग्णांना दिलासा मिळत आहे. हे प्रगत उपचार पुढं आणण्यात विज्ञानाचा वाटा मोलाचा आहे, हे वेगळं सांगायला नको. म्हणजेच विज्ञानानं आपल्या रोजच्या जगण्याला एक अर्थ दिला आहे. यावरून आजच्या काळातील मानवी जीवनात विज्ञानाचं असलेलं महत्त्व लक्षात येतं.
असं असलं तरी समाजात विज्ञानवादी विचार अजूनही म्हणाव्या त्या प्रमाणात रुजू शकलेले नाहीत. उदाहरण द्यायचं तर आपण ऑक्सिजन घेतो, त्याला वैज्ञानिक आधार आहे. विविध संसर्गजन्य विकारांचा प्रसार रोखण्यासाठी संशोधकांच्या अथक प्रयत्नातून लसींचा शोध लागला. त्यामुळे जीवघेण्या विकारांच्या प्रसाराला आळा घालता आला. तरिसुद्धा ही सर्व देवाची करणी आहे, अशी मानसिकता बर्‍याच प्रमाणात पाहायला मिळते. अशा परिस्थितीत संशोधक वृत्ती अधिक प्रमाणात निर्माण होण्याची आवश्यकता आहे.
प्रत्येक गोष्टीत वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवायला हवा तसंच त्या त्या गोष्टींमागील कार्यकारणभाव जाणून घ्यायला हवा. आपल्या देशातील जनतेवर अजूनही अंधश्रद्धेचा पगडा पाहायला मिळतो. विशेष म्हणजे प्रत्येक जाती-धर्माच्या अंधश्रद्धा वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे विज्ञानवादी विचार सर्वदूर पोहोचवणं आणि ते जनतेच्या मनात रूजवणं कठीण ठरत आहे. असं असलं तरी विज्ञानाच्या प्रसाराचं कार्य नेटानं पुढं सुरू आहे आणि त्याचे अपेक्षित परिणामही दिसून येत आहेत. २० जुलै १९६९ रोजी मानवानं चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं. त्यावेळी ‘यानंतर अंतराळ संशोधन क्षेत्रात मानव मोठी क्रांती करेल’ असे उद्गार काढण्यात आले होते. ते खरे झाल्याचं दिसून येत आहे. विशेषत: भारतानं अंतराळ संशोधन क्षेत्रात मोठीच झेप घेतली आहे.
गतकाळात १०४ उपग्रहांचं एकाच वेळी झालेलं
यशस्वी प्रक्षेपण हा यातील महत्त्वाचा टप्पा ठरावा.अलिकडे स्मार्ट फोनमध्येही क्रांती झाली आहे. दुर्धर आजारावरील यशस्वी उपचार प्रणालीमुळे माणसाचं आयुर्मान वाढलं आहे. असं असलं तरी विज्ञान श्रेष्ठ की अध्यात्म, असा प्रश्‍न अधूनमधून पुढे येत असतो. त्यात विज्ञानाची व्याख्या करता येऊ शकते, तशी अध्यात्माची व्याख्या होऊ शकते का, हा भाग विचारात घेतला जायला हवा. कोणत्याही गोष्टीचा चिकित्सकपणे केलेला अभ्यास म्हणजे विज्ञान अशी साधारणपणे व्याख्या केली जाते.
या पार्श्‍वभूमीवर विज्ञानाच्या प्रसाराच्या प्रयत्नांवर दृष्टीक्षेप टाकायला हवा. अलिकडे शालेय पातळीवर पाचवी-सहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी विज्ञान विषयक नवनवी पुस्तकं येत आहेत. त्याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी आणखी वाढावी असा प्रयत्न आहे. या शिवाय ज्ञानरचनावाद प्रकल्प पद्धतीही अंमलात आणली जात आहे. परंतु शासनाच्या या प्रयत्नांसाठी शिक्षक फारसे बदलायला तयार नाहीत, असं चित्र दिसतं. ते पूर्वीच्याच शिकवण्याच्या पद्धतीवर, परीक्षा पद्धतीवर भर देत आहेत. आजकाल स्मार्ट क्लासरूम, डिजिटल क्लासरूम या संकल्पनेवर भर दिला जात आहे. परंतु यातून विद्यार्थी स्वत: प्रयोगशील होतात का, हे पाहिलं जायला हवं.
उदाहरण द्यायचं तर पूर्वी शिक्षक लाकडी कंपासच्या सहाय्यानं फळ्यावर मोठं वर्तुळ काढून दाखवायचे. आता डिजिटल क्लासरूममध्ये पडद्यावर आपोआप वर्तुळ तयार होतं. मग विद्यार्थी तसंच वर्तुळ वहीत काढू पाहतात. परंतु त्यांना ते नीटसं जमत नाही. अशा ठिकाणी प्रचलित शिकवण्याच्या पद्धतीत काही बदल गरजेचे ठरतात. अलिकडे जागोजागी विज्ञान प्रदर्शनं भरवली जातात. त्या त्या भागातील मुलांमध्ये वैज्ञानिक प्रयोगशीलता वाढीस लागावी, त्यांच्यात संशोधक वृत्ती निर्माण व्हावी, हा या विज्ञान प्रदर्शनांमागील मुख्य उद्देश आहे. त्यादृष्टीने काही प्रमाणात विद्यार्थी प्रामाणिक प्रयत्न करताना आढळतात. यात विद्यार्थ्यांनी स्वत: प्रकल्पाचं सादरीकरण करावं, त्या संदर्भातील आवश्यक ती माहिती द्यावी, अशी अपेक्षा असते. परंतु यातही शिक्षकांनीच प्रकल्प तयार करायचा किंवा उपकरणं बनवायची आणि ती विद्यार्थ्यांच्या नावे सादर करायची, असे प्रयत्न होताना दिसत आहेत. एवढंच नाही तर आजकाल तयार विज्ञान प्रकल्पही बाजारात उपलब्ध होत आहेत. त्याची योग्य ती किंमत मोजायचीआणि तो प्रकल्प विज्ञान प्रदर्शनात नेऊन मांडायचा की काम झाले. मग अशानं विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्ती कशी वाढीस लागणार हा खरा प्रश्‍न आहे.
विविध शाळा-कॉलेजांच्या दरवर्षी सहली निघतात. त्यामध्ये विविध निसर्गरम्य ठिकाणांबरोबरच ऐतिहासिक ठिकाणांनाही भेटी दिल्या जातात. वास्तविक त्या त्या ठिकाणची भौगोलिक, वैज्ञानिक माहिती उपलब्ध असते. परंतु ती जाणून घेण्याचे फारसे प्रयत्न होत नाहीत. खरं तर वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणांच्या सहलीच फारशा निघत नाहीत. केंद्र सरकारने विविध शाळांसाठी मोठ्या प्रमाणावर विज्ञान विषयक पुस्तकं दिली आहेत.
परंतु त्यांचा म्हणावा तसा वापर होत नाही. काही ठिकाणी आपल्या शाळेत अशा प्रकारची पुस्तकं उपलब्ध आहेत, याची विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना माहितीही नसल्याचं दिसून येतं. हे चित्र बदलणं आवश्यक आहे. विज्ञान क्षेत्रात काम करायचं तर शास्त्र शाखेचं शिक्षण आवश्यक असल्याचा समज कायम आहे. परंतु विज्ञान हे सर्वांसाठी आहे. ते पाठ्यपुस्तकाशी संबंधित नाही तर रोजच्या जगण्याशी संबंधित आहे. त्यामुळे कोणत्याही शाखेचं शिक्षण घेणारा विद्यार्थी वैज्ञानिकदृष्ट्या प्रयत्न करू शकतो. विज्ञानाच्या प्रचार-प्रसारात प्रसिद्धी माध्यमांची भूमिकाही महत्त्वाची ठरते. हल्ली टीव्ही माध्यमांचं महत्त्व बरंच वाढलं आहे. मात्र, टीव्हीवरील विविध मालिकांमध्ये गंडेदोरे, ताईत, करणी-धरणी, भूतप्रेत आदी बाबी दाखवण्यात येत असल्याचं पहायला मिळतं. अशा मालिकांचा जनमानसावर काय परिणाम होत असेल, याचा विचार केला जायला हवा.
खरं तर टीव्हीवर विज्ञानवादी कार्यक्रम अधिक प्रमाणात प्रसारित व्हायला हवेत. त्यादृष्टीने मुलांनी डिस्कव्हरी, नॅशनल जिऑग्राफी या वाहिन्यांवरील कार्यक्रम आवर्जून पहावेत, असा आमचा आग्रह असतो. पोगो वाहिनीवरही मुलांमधील संशोधक वृत्ती वाढीस लागण्यासाठी काही कार्यक्रम प्रसारित केले जातात.अशा कार्यक्रमांची संख्या वाढणं ही काळाची गरज आहे.
या सर्व बाबी लक्षात घेऊनप्रत्येकानं विज्ञाननिष्ठ विचारांची कास धरायला हवी. आजच्या विज्ञानयुगाची ही खरी गरज आहे. तरच विज्ञान खर्‍या अर्थानं घरोघरी पोहोचलं असं म्हणता येईल आणि घरोघरी वैज्ञानिक तयार होतील.
(लेखक डॉ. कल्पना चावला विज्ञान केंद्र, कराडचे संस्थापक सचिव आहेत.)

Posted by : | on : 18 Nov 2018
Filed under : आसमंत, पुरवणी.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी (168 of 835 articles)

Kuposhan
अभिप्राय : डॉ.वाय.मोहितकुमार राव | कुटुंबात आणि समाजात महिलांना सन्मान प्राप्त झाला, त्यांची आर्थिक स्थिती मजबूत झाली तर भावी पिढीच्या ...

×