ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, सोमनाथ देशमाने, स्तंभलेखक » तरीही काँग्रेसला का लटकतात हिंदू?

तरीही काँग्रेसला का लटकतात हिंदू?

॥ संवाद : सोमनाथ देशमाने |

गांधीहत्येनंतर काँग्रेसने हजारो ब्राह्मणांच्या घरादारांची राखरांगोळी केली, तरीही हिंदू काँग्रेसलाच चिकटलेले! इंदिराहत्येनंतर काँग्रेसने हजारो शिखांची कत्तल केली, तरीही हिंदू काँग्रेसलाच लटकलेले! काश्मिरी पंडितांवर अत्याचार करुन काश्मिरातून हाकलून दिले, तरीही हिंदुंनी काँग्रेसला ठोकरले नाही! इतक्या वर्षानंतर मोदी सरकार काश्मिरी पंडितांच्या सन्मानपूर्वक घरवापसीसाठी प्रामाणिक प्रयत्न करीत असताना विरोध करीत आहे. रोहिंग्या-बांग्लादेशी घुसखोर मुसलमानांचे वकीलपत्र घेणार्‍या काँग्रेसविरुध्द हिंदू पेटून का उठत नाहीत? तळपायातच आग नसेल, तर ती मस्तकात जाणार कशी? पाळीव प्राणीही आपल्या धन्याशी प्रामाणिक असतात आणि आम्ही मात्र आमचा देश, आमचा धर्म यांच्याशी प्रतारणा करतो?

Modi Vs Rahul Sonia

Modi Vs Rahul Sonia

काँग्रेस म्हणजे घराणेशाही, काँग्रेस म्हणजे वंशवाद, काँग्रेस म्हणजे जातीयवाद, काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार, काँग्रेस म्हणजे हिंसाचार! काँग्रेस म्हणजे हिंदुंचे प्रताडन, मुस्लिमांचे लांगूनचालन आणि ख्रिश्‍चन मिशनर्‍यांसाठी मोकळे रान! आजपर्यंतच्या इतिहासात हिंदुंच्या भावभावनांची, आस्थांची कधीही पत्रास न बाळगणार्‍या काँग्रेसने मुसलमान तिच्या विरोधात जातील असे कृत्य कधीही केले नाही. प्रत्येक वेळी काँग्रेस मुसलमानांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहत आली आहे, स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर आजतागायत मुसलमानांचे लांगुननचालन आणि तुष्टीकरण करत आली आहे. अ‍ॅट दी कॉस्ट ऑफ हिंदुज! त्यातूनच धर्माच्या आधारावर देशाची फाळणी झाली, पाकिस्तान नावाचे इस्लामिक राष्ट्र निर्माण झाले, पण हिंदुंच्या उर्वरित भारताला काँग्रेसने हिंदुराष्ट्र होऊ दिले नाही. फाळणीमुळे व्यथित झालेल्या हिंदुंना काँग्रेसकडून दरडावण्यात आले, जे मिळालंय त्यातच समाधान माना! स्वतंत्र भारतातला हिंदू सतत दबावाखालीच राहिला पाहिजे यासाठी काँग्रेस सतत प्रयत्न करत आली आहे. तरीही राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड ही तीन राज्ये हिंदुंनी भाजपाकडून काढून घेऊन काँग्रेसच्या झोळीत टाकली! सत्तेत येताच कमलनाथांनी वंदे मातरमवर बंदी घातली! हिंदुंना सतत लाथाडणार्‍या काँग्रेसला हिंदू पुन्हा पुन्हा का आलिंगन देतात?
पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांचा सोमनाथ मंदीर जीर्णोध्दारास प्रचंड विरोध होता. सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. राजेंद्र प्रसाद, कन्हैयालाल मुन्शी यांच्यासारख्या ताठ कण्याच्या हिंदुंमुळे सोमनाथ मंदिराचा जीर्णोध्दार करणे शक्य झाले. उदारता, अभिव्यक्तीस्वातंत्र्य, सर्वधर्मसमभाव याचे प्रतीक म्हणून ज्या जवाहरलाल नेहरुंची प्रतिमा काँग्रेसकडून नंतर उभी केली गेली त्याच नेहरुंनी सोमनाथ मंदिराचे पुनर्निर्माण म्हणजे हिंदू पुनरुत्थानवाद आहे असे म्हणत जीर्णोध्दारास विरोध केला होता. हिंदुंच्या स्वतंत्र भारतात हिंदुंच्या पुनरुत्थानाला विरोध? मग काय मोगलांचे पुनरुत्थान हवे होते का नेहरुंना? मुसलमानांसह खंडित भारत स्वीकारलेल्या हिंदुंच्या पुनरुत्थानाला पंडीत जवाहरलाल नेहरु इतके का घाबरत होते? जागृत झालेले हिंदू मोगलांनी हिंदू मंदिरं पाडून त्याठिकाणी बांधलेल्या मशिदींसह आणखी बरंच काही उचकटून बघतील याची नेहरुंना भीती वाटत असावी! भारतातील हिंदू आणि मुसलमान आपल्या मुळांचा शोध घेत घेत थेट राम, कृष्ण, विश्‍वनाथादींपर्यंत पोहचले तर आपल्या छद्मी सेक्युलॅरिझमच्या चिंधड्या उडतील आणि आपली घराणेशाही उध्वस्थ होईल म्हणून नेहरुंनी वामपंथी भाटांकडून भारताचा खोटा इतिहास लिहून घेऊन हिंदू पुनरुत्थानाला बांध घातला. नेहरुंच्या इतिहासात अकबर दी ग्रेट असतो, छत्रपती शिवराय, महाराणा प्रताप लुटारु असतात, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग प्रभूती क्रांतीकारक वाट चुकलेले असतात, १८५७ चे स्वातंत्र्यसमर हे सैनिकांचे बंड असते! हिंदुंना हतोत्साहित करणारी काँग्रेसची ती मानसिकता आजतागायत कायम आहे. सोमनाथ मंदीर ते जन्मभूमीवरील प्रस्तावित राममंदीर व्हाया पवित्र रामसेतू! काँग्रेसचा विरोध कायम आहे.
गांधीजींच्या अतिरेकी अहिंसावादामुळे आणि नेहरुंच्या विकृत सेक्युलॅरिझममुळे हिंदू अधिकाधिक नेभळट आणि मुसलमान अधिकाधिक आक्रमक होत गेले, कारण इस्लाममध्ये धर्माच्या आड येणार्‍या अहिंसा आणि सेक्युलॅरिम यांना थारा नाही. अल्लाह, वतन आणि इस्लाम यांचा अपमान मुसलमान कधीच सहन करत नाहीत. विधर्मी, विदेशीधार्जिन्या हिंदुंना मात्र देव, देश आणि धर्म यांचा कुणीही, कितीही घोर अपमान केला, तरी काहीही फरक पडत नाही. हिंदू रोजच्या जगण्यापलिकडे कशाचा विचारच करत नाहीत!
काँग्रेसची हिंदुद्वेष्टी मानसिकता सोनिया गांधींनी काँग्रेसचा ताबा घेतल्यापासून तर ती अधिकाधिक कडवी होत चालली आहे. राहुल गांधी यांनी घेतलेले शिवभक्त जानवेधारी हिंदू असल्याचे सोंग हिंदुंना कात्रजचा घाट दाखविण्यासाठी आहे हे किती हिंदुंच्या लक्षात आले आहे का माहीत नाही, पण ख्रिश्‍चन आणि मुसलमान मात्र जराही विचलित झाले नाहीत! ख्रिश्‍चन आणि मुसलमान कुठलाही निर्णय त्यांच्या धर्माज्ञेनुसारच घेतात. कुठल्याही आमिषाला ते बळी पडत नाहीत. त्यांच्या धर्मनिष्ठेला मी प्रणाम करतो. जात, पंथ, भाषा, प्रांत असे भेद ख्रिश्‍चन, मुसलमान यांच्यातही आहेत. त्यांच्याही आपापसात मारामार्‍या होत असतात, पण धर्मासाठी ते सारे एक होतात. सारा ख्रिश्‍चन एक! सारा मुसलमान एक! तडजोड नाही! मग सारा हिंदू एक ही आमच्यातली भावना कुणी, कधी मारुन टाकली? स्वधर्मीयाला धडा शिकविण्यासाठी ते परधर्मीयाला कधीच आमंत्रण देत नाहीत. आमच्याकडे मात्र जयचंदांचा तुटवडा कधीच भासत नाही. आठवा ती कमलनाथांनी मुसलमानांना केलेली विनंती? जगात कुठेही मुस्लिमेतरांकडून मुसलमानांवर अन्याय झाला, तर जगभरचे सारे मुसलमान पेटून उठतात! ख्रिश्‍चनेतरांकडून ख्रिश्‍चनांवर अन्याय झाला, तर सारे ख्रिश्‍चन पेटून उठतात! सारं जग ख्रिस्तमय करण्यासाठी ख्रिश्‍चनांनी गेल्या दोन हजार वर्षात आणि सारं जग इस्लाममय करण्यासाठी मुसलमानांनी गेल्या चौदाशे वर्षात पृथ्वीवरचा किती भूभाग व्यापलाय आणि हिंदुंनी किती भूभाग गमावलाय ते जरा डोळे उघडून बघा माझ्या हिंदू बांधवांनो! गमावलेला भूभाग परत मिळविण्याचा विचारही कधी आमच्या डोक्यात येत नाही, कारण काँग्रेसने आम्हाला तसा विचार कधी करुच दिला नाही! म्हणून तर आज भारतातल्या आठ-दहा प्रांतात हिंदू अल्पसंख्यक झाले आहेत. पाकिस्तान-बांग्लादेशातील अल्पसंख्यक हिंदुंना किती यातना सोसाव्या लागतात?
भारतात काँग्रेसची राजवट असली की हिंदुविरोधकांना अनुकूल वातावरण तयार होत असते. हिंदू आतंकवाद, हिंदू अतिरेकी या संकल्पना जन्माला घालण्याचा प्रयत्न सोनिया राजवटीतच झाला ना? कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंग, स्वामी असिमानंद यांना प्रदीर्घ काळ तुरुंगात कुणी सडवले? हिंदुंचे धर्मगुरु शंकराचार्यांवर हत्येचा खोटा आळ आणून भल्या दिवाळीत अटक करण्याचा निंदणीय अपराध यांच्याच कारकीर्दीत घडला ना? काँग्रेसला मतदान करताना हिंदुंना या निरपराधांचे चेहरे समोर दिसत नाहीत का? संपुआ पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणाले होते, देशातल्या प्राकृतिक संसाधनांवर पहिला हक्क मुसलमानांचा आहे! भाषा मनमोहन सिंग यांची असली तरी शब्द सोनिया गांधी यांचे होते! काँग्रेसच्या नजरेत भारतीय हिंदू हे उपरे आहेत की काय? कुठल्याही दंगलीचा ठपका हिंदुंवर ठेवता यावा म्हणून संपुआ सरकारने २०११-१२ साली एक कम्युनल व्हायलन्स बिल, दंगा नियंत्रण कानून, नावाचा षडयंत्रकारी प्रस्ताव आणला होता. सोनिया गांधी यांच्या ज्या खास चमूने हा प्रस्ताव तयार केला होता, त्यात ज्यांना आज शहरी नक्षली म्हटले जाते त्यांचा भरणा अधिक होता! शहरी नक्षल्यांना महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली तेव्हा उगीच थयथयाट करत नव्हती काँग्रेस? सर्वोच्च न्यायालयातील काँग्रेसी वकीलांची फौज प्रामुख्याने कुणाकुणाचे खटले लढवत असते, ते जरा बारकाईने तपासा हिंदुंनो! बाबरीची बाजू घेऊन राममंदिराला विरोध करणारी काँग्रेस हिंदुंची होऊच शकत नाही!
बाटला हाऊस चकमकीत पोलिसांकडून मारल्या गेलेल्या अतिरेक्यांसाठी सोनिया गांधी धाय मोकलून रडल्या म्हणे, पण त्याच चकमकीत शहीद झालेल्या हिंदुस्थानी पोलिसांसाठी त्यांच्या डोळ्यातून एक ठिपूस निघाला नाही! गुजरात दंगलीचे निमित्त करुन नरेंद्र मोदींना मौत का सौदागर संबोधणार्या सोनिया गांधींनी गोध्रा स्टेशनात आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या कारसेवकांसाठी साधी हळहळ व्यक्त केल्याचे ऐकिवात नाही. इथली माती, इथली सनातन हिंदू संस्कृती यांचा सतत दुःस्वास करणारांकडून काय अपेक्षा करणार? काँग्रेस उमेदवारांच्या विजयी मिरवणुकीत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या जातात, त्या काँग्रेसी उमेदवाराला हिंदुंनीच निवडून दिलेले असते ना? कोदंडधारी श्रीराम, सुदर्शन चक्रधारी श्रीकृष्ण, त्रिशूलधारी शंकर यांचे वंशज आहोत ना आम्ही? मथुरेत अंग चोरुन उभा असलेला कन्हैया, त्याच अवस्थेतील हिंदुंच्या अध्यात्मिक राजधानीतील काशीविश्‍वनाथ आणि जन्मभूमीवरील अस्थायी झोपडीतील रामलल्ला बघून का पेटून उठत नाहीत हिंदू? प्रभू रामचंद्रांचे अस्तित्व नाकारणार्‍या, रामसेतू तोडायला निघालेल्या काँग्रेसविरुध्द असंतोष का निर्माण होत नाही हिंदुंमध्ये? होत असेल तर तो मतपेट्यांमधून जोरकसपणे का व्यक्त होत नाही? कल्याण सिंह यांच्यासारख्या हिंदू सिंहाचा पराभव करुन रामसेवकांवर गोळ्या झाडणार्‍या समाजवादी पार्टीला कुठल्या लाचारीतून निवडून दिले होते हिंदुंनी?
गांधीहत्येनंतर काँग्रेसने हजारो ब्राह्मणांच्या घरादारांची राखरांगोळी केली, तरीही हिंदू काँग्रेसलाच चिकटलेले! इंदिराहत्येनंतर काँग्रेसने हजारो शिखांची कत्तल केली, तरीही हिंदू काँग्रेसलाच लटकलेले! काँग्रेस राजवटीत मुसलमानांनी हजारो काश्मिरी पंडितांवर अनन्वित अत्याचार करुन काश्मिरातून हाकलून दिले, तरीही हिंदुंनी काँग्रेसला ठोकरले नाही! इतक्या वर्षानंतर मोदी सरकार काश्मिरी पंडितांच्या सन्मानपूर्वक घरवापसीसाठी प्रामाणिक प्रयत्न करीत असताना काँग्रेस आणि तिची पिलावळ विरोध करीत आहे. रोहिंग्या-बांग्लादेशी घुसखोर मुसलमानांचे वकीलपत्र घेणार्‍या काँग्रेसविरुध्द हिंदू पेटून का उठत नाहीत? तळपायातच आग नसेल, तर ती मस्तकात जाणार कशी? त्यासाठी पायात जोडा, ताठ कणा, हातात लाठी आणि मस्तकात प्रखर देशाभिमान, धर्माभिमान असावा लागतो! पाळीव प्राणीही आपल्या धन्याशी प्रामाणिक असतात आणि आम्ही मात्र आमचा देश, आमचा धर्म यांच्याशी प्रतारणा करतो? हिंदुंच्या रक्ताने बरबटलेल्या काँग्रेसच्या हातावर शिक्का मारताना हिंदुंचे हात का थरथरत नाहीत?
मातृभूमीला परकीय लुटारुंच्या दास्यातून मुक्त करण्यासाठी आपली शीरकमळं भारतमातेच्या चरणी हसतहसत अर्पण करणार्‍या हजारो क्रांतीकारकांची अवहेलना करणारी काँग्रेस भारताला स्वातंत्र्य आम्हीच मिळवून दिले म्हणत श्रेय घेत असेल, तर फाळणीचे पापही काँग्रेसनेच पदरात घेतले पाहिजे. सरदार वल्लभभाई पटेल पंतप्रधान व्हावेत हा काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बहुमताचा कौल डावलून जवाहरलाल नेहरुंना पंतप्रधानपद देण्यात आले! ते शपथ घेत होते आणि तिकडून पाकिस्तान हिंदूंच्या प्रेतांनी खचाखच भरलेल्या रेल्वेगाड्या ‘आझादी का तोहफा’ म्हणून पाठवत होते. हे पापही काँग्रेसलाच स्वीकारावे लागेल. पाकिस्तानात सर्वस्व गमावून हिंदूंच्या जीवंत प्रेतांचे लोंढेच्या लोंढे भारतात दाखल होत होते. त्यांना मानसिक आधार द्यायचे सोडून ज्यांनी फाळणी मागितली होती, त्यांच्या सरबराईत काँग्रेस गुंतली होती. हे पापही काँग्रेसच्याच खात्यावर जमा आहे. फाळणी हिंदूंनी मागितली नव्हती. माझ्या देहाचे तुकडे झाले तरी मी फाळणी होवू देणार नाही असं महात्मा गांधी म्हणत होते, तरीही फाळणी झाली! कुणाच्या दबावाखाली? संपूर्ण लोकसंख्येची अदलाबदल करा असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगत होते, पण काँग्रेसने त्यांचे ऐकले नाही. कुणाच्या दबावाखाली होती काँग्रेस? धर्माच्या आधारावर फाळणी करायला लावणार्‍या सर्वांना काँग्रेसने त्याच वेळी तिकडे जाऊ दिले असते, तर आज खंडित भारताच्या दुसर्‍या फाळणीचा आवाज उठलाच नसता. पाकिस्तान निर्माण व्हावे ही नेहरुंचीच आंतरिक इच्छा होती की काय, अशी शंका येते!
काँग्रेसचे पाकिस्तानप्रेम आजतागायत तसूभरही कमी झालेले दिसत नाही. पाकिस्तानचे नाक दाबून त्यानं घशात घातलेला काश्मिर परत मिळविण्याच्या अनेक संधी पाकिस्तानधार्जिन्या काँग्रेसने सोडून दिल्या. पाकिस्तानचे ९० हजारावर युध्दकैदी काँग्रेसने परत पाठवले, पण पाकिस्तानच्या तुरुंगात खितपत पडलेल्या आमच्या सैनिकांना काँग्रेसने परत आणले नाही. नेहरुंच्या नेभळट पंचशीलमुळे भारताचा हजारो मैल भूप्रदेश चीनने गिळंकृत केला. आज त्याच काँग्रेसचे वारसदार लोकनियुक्त मोदी सरकार उलथवून टाकण्यासाठी पाकिस्तानचे पाय चाटतात. डोकलाममध्ये चीनी सैन्य भारताच्या छाताडावर येऊन उभे राहिले असताना नेहरुंचा दिवटा पणतू चीनच्या दूतावासात पिस्ता-बर्गरवर चोरुन ताव मारतो. उद्या भारत-पाकिस्तान, चीन-भारत संघर्ष पेटला तर काँग्रेस आगीत तेल ओतण्याचे काम करील. मोदींना पराभूत करण्यासाठी आपण काँग्रेसला मदत केली पाहिजे, असं पाकिस्तान उघडपणे म्हणत आहे! भारताची पुन्हा फाळणी होऊ द्यायची नसेल तर राजकीय पटलावरुन काँग्रेसला हद्दपार करावेच लागेल. हे पवित्र कार्य हिंदुंनाच पार पाडावे लागणार आहे, कारण हा देश हिंदुंचा आहे!
एका गावात बारमाही गोड्या पाण्याची विहीर होती. सार्‍या गावाची तहान भागवत होती. कुठून तरी घाण वास येतोय अशी गावकर्‍यात कुजबुज सुरु झाली. विहिरीच्या पाण्याचा वास येतोय या निष्कर्षापर्यंत मंडळी पोहचली पण तो का येतोय आणि त्यावर काय उपाय करावेत हे मात्र समजत नव्हते. गावकरी साधुकडे गेले. साधू म्हणाला, विहिरीत गंगाजल टाका! काही उपयोग झाला नाही. तुलसीदल, बेलफळ टाका! काही फरक पडला नाही. साधू स्वतः विहिरीजवळ गेला, विहिरीत डोकावून बघितलं आणि गावकर्‍यांवर भडकला. अरे मुर्खांनो, एक कुत्री विहिरीत पडलीय. तिला बाहेर काढा आणि दूर जंगलात फेकून या! नरेंद्र मोदीही हेच सांगताहेत, स्वच्छ भारत, काँग्रेसमुक्त भारत, भ्रष्टाचारमुक्त भारत! भारत काँग्रेसमुक्त झाला की काँग्रेसने पसरवलेली कम्युनिस्टादी घाण आपोआप संपेल. काँग्रेस आणि वामपंथी दल आज राजकीयदृष्ट्या कमकुवत दिसत असले तरी असे एकही क्षेत्र नाही, जिथे यांचे षडयंत्रकारी हस्तक आजही कार्यरत नाहीत! यांनीच सारा देश पोखरुन काढला आहे.
साखर कारखाना जवळ येत असल्याची चाहुल बाहेरच्या लोकांना बर्‍याच दूरवरुन लागते, पण त्या परिसरात राहणार्‍या लोकांना मळीच्या दुर्गंधीची सवय झालेली असते. त्यांना त्या परिसराबाहेरील शुध्द, सुगंधी वातावरणात गुदमरल्यासारखे होते. काँग्रेसला पुन्हा पुन्हा लटकणार्‍या हिंदुंची अवस्थाही तशीच होत असावी!
एक इंग्रज आपल्या आत्मचरित्रात लिहितो, हिंदुस्थानला गुलाम बनविण्यासाठी आम्ही जेव्हा पहिली लढाई जिंकल्यानंतर विजयी मिरवणूक काढत होतो, तेव्हा तिथे उपस्थित असलेले हिंदुस्थानी मिरवणूक बघून टाळ्या वाजवत होते! आपल्याच राजाचा पराभव झालेला असतानाही ते आमचे आनंदाने स्वागत करत होते! तो पुढे लिहितो, … जर तिथे उपस्थित असलेल्या सर्व हिंदुस्थान्यांनी मिळून त्याचवेळी एक एक दगड उचलून आमच्यावर भिरकावला असता, तर इसवी १७०० मध्येच हिंदुस्थान इंग्रजमुक्त झाला असता! त्यावेळी आम्हा इंग्रजांची संख्या केवळ ३००० होती!
भारत काँग्रेसमुक्त करण्यासाठी हिंदुंना हातात दगड घेऊन तो काँग्रेसवर भिरकावण्याची गरज नाही, तर हिंदुंच्या भावी पिढ्यांच्या सुरक्षिततेसाठी आज शुध्दीवर असणे गरजेचे आहे! हाच नववर्षाचा संकल्प करुया! वंदे मातरम!

Posted by : | on : 6 Jan 2019
Filed under : आसमंत, पुरवणी, सोमनाथ देशमाने, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, सोमनाथ देशमाने, स्तंभलेखक (187 of 1299 articles)

Christian Missionary
कटाक्ष : गजानन निमदेव | देशाबाहेर देशाविरुद्ध कारस्थानं रचली जात असताना, आपल्याकडची राजकारणी मंडळी आपसात कुरघोड्या करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ...

×