ads
ads
आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

•न्यायव्यवस्था बदनाम करण्याचा हा सुनियोजित कट, •सर्वोच्च न्यायालयाचा संताप,…

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

•पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्ला, दरभंगा, २५ एप्रिल – आतापर्यंत पाकिस्तानची…

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मुंबई, २४ एप्रिल – राग, नाराजी असे माणसाच्या स्वभावाचे…

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

•अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण, वॉशिंग्टन, २४ एप्रिल –…

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

•मृतांची संख्या ३२१, भारतीयांचा आकडाही वाढला, ४० जणांना अटक,…

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

•चीनने व्यक्त केली भीती, बीजिंग, २३ एप्रिल – इराणकडून…

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

•राहुल गांधी यांनी स्वीकारला •विरोधी पक्षनेतेपदही सोडले •काँग्रेसला आणखी…

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

•खोट्या जाहिरातींचे प्रकरण, मुंबई, २२ एप्रिल – शेतकर्‍यांना पाच-दहा…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 18:44
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी » तापमानवाढीचा धोका वाढतोय

तापमानवाढीचा धोका वाढतोय

॥ विशेष : अ‍ॅड. गिरीश राऊत |

विकास पृथ्वीची जडणघडण आणि जैविक विविधता नष्ट करत आहे. तो शाश्‍वत असूच शकत नाही. जीडीपीच्या दरातल्या वाढीवर आधारित अर्थव्यवस्थेमुळे जीवावरण, वातावरण, जलावरण आणि भूआवरणात दर दिवशी अनिष्ट जीवनविरोधी बदल होत आहे. परंतु मर्यादित पृथ्वीवर अमर्याद अर्थव्यवस्था राबवली जाऊ शकत नाही, हे लक्षात घेणं गरजेचं ठरणार आहे. जागतिक हवामान संघटनेने आमचं वातावरणाबद्दलचं तसंच हवामान बदलाबाबतचं आकलन संपलेलं आहे आणि आपण सारे अज्ञात प्रदेशात शिरलो आहोत, अशा शब्दात सध्याच्या परिस्थितीचं गांभीर्य विशद केलं. यातून आपण कधी बोध घेणार हा खरा प्रश्‍न आहे. त्यामुळे येत्या काळात केवळ हवामान अंदाजावर अवलंबून राहणं उचित ठरणार नाही. त्याच बरोबर तापमानवाढीचे दुष्परिणाम वेळीच लक्षात घेऊन ही वाढ रोखण्यासाठी प्रयत्न गरजेचे ठरणार आहेत. अर्थात, त्यासाठी फार कमी कालावधी हातात उरला आहे, हे ही तितकंच खरं.

Globle Warming

Globle Warming

अलिकडच्या काळात पृथ्वीचं तापमान वाढत असून याचा परिणाम म्हणून ध्रुवीय प्रदेशातला बर्फ वितळू लागला आहे. यापुढे ही तापमानवाढ रोखण्याबाबत वेळीच योग्य उपाययोजना करण्यात आली नाही तर २१०० सालापर्यंत तापमानात ५ ते ६.४ डिग्री सेल्सियसनं वाढ होईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. साहजिक याचे गंभीर दुष्परिणाम समोर येणार आहेत. त्याबाबत पुरेशा गांभीर्यानं विचार होणं ही काळाची खरी गरज आहे.
फार पूर्वी म्हणजे आदिम काळात मनुष्याची उत्पत्ती कशी झाली आणि तिथून पुढे मानवाचा कसा कसा विकास होत गेला, या विषयी आजवर बरंच संशोधन करण्यात आलं. त्याद्वारे मानवाच्या उत्क्रांतीचे विविध टप्पे उलगडून दाखवण्यात संशोधकांना यश आलं. यातला एक समान धागा म्हणजे पूर्वीपासून मानव आणि निसर्गाचं अतूट असं नातं राहिलं आहे. किंबहुना, मानवाची जडणघडण निसर्गाच्या सान्निध्यातच झाली. त्यामुळेच की काय, आपल्या संस्कृतीत, सण-समारंभांमध्ये निसर्गपूजेला महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे. असं म्हणतात, फार पूर्वी शास्त्र विकसित झालं नसलं तरी तेव्हाच्या काही अभ्यासूंनी उपलब्ध साधनांद्वारे आणि उपजत ज्ञानाद्वारे, विचारपूर्वक संशोधन करून काही महत्त्वाचे निष्कर्ष काढले होते. ते आजही तितकेच महत्त्वाचे ठरतात. त्याचबरोबर पूर्वीच्या संशोधकांनी, अभ्यासकांनी संशोधनातून काढलेल्या निष्कर्षांना रूढी-परंपरांची जोड दिली. त्यामुळे रीतीरिवाज म्हणून लोक परंपरा पाळू लागले आणि त्यातून निसर्गरक्षण, निसर्ग संवर्धन, निसर्गप्रेम या बाबींचं आकलन होऊ लागलं. त्यातून त्यांचं निसर्गासोबतचं नातं अधिक दृढ होत गेलं. परंतु प्रगती आणि विकासाचा हव्यास माणसाला स्वस्थ बसू देईना. त्यातून औद्योगिक क्रांतीच्या दिशेनं पावलं पडत गेली आणि पाहता पाहता औद्योगिक क्रांती प्रत्यक्षात आली. त्यानंतर जगात बरेच बदल घडत गेले. उद्योगांचा पाया विस्तारत गेला. उद्योगांमुळे रोजगारनिर्मितीला चालना मिळाली, हे खरं असलं तरी केवळ औद्योगिकीकरणातूनच विकास शक्य असल्याचा अनेक राष्ट्रांचा दृढ समज झाला. त्यातून औद्योगिकीकरणाला अधिकाधिक चालना दिली जाऊ लागली. अन्य देशांमधील उद्योग आपल्याकडे यावेत यासाठी विविध देशांमध्ये जणू स्पर्धा सुरू झाली. उद्योगांसाठी सोयी-सवलती दिल्या जाऊ लागल्या. उद्योगांचं महत्त्व इतकं वाढलं की देशाच्या अर्थव्यवस्थेवर औद्योगिक मंदीचे परिणाम होऊ लागले.
या पार्श्‍वभूमीवर औद्योगिक विकासाचा हव्यास जीवसृष्टीच्या अस्तित्त्वालाच धोका निर्माण करणारा ठरतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याचं कारण उद्योगांमुळे मोठ्या प्रमाणावर होत राहिलेलं प्रदूषण आणि त्यातून उभं राहिलेलं तापमानवाढीचं संकट. जगात औद्योगिक क्रांतीपूर्वी दहा हजार वर्षांमध्ये पृथ्वीचं तापमान ०.१ डिग्री सेल्सियसच्या वर वाढलं नव्हतं. परंतु तापमानातली ही वाढ औद्योगिक क्रांतीनंतर सुरू झाली. जगात औद्योगिक क्रांतीनंतर १९९० पर्यंत जागतिक तापमानात एक डिग्री सेल्सियसनं वाढ झाली. त्यानंतर या वाढीमागील कारणांचा शोध घेण्यात आला.
सर्वसाधारणपणे वातावरणातल्या कार्बन डाय ऑक्साईडचं प्रमाण ५०० अब्ज टन झाल्यावर तापमानात एक डिग्री सेल्सियसनं वाढ होते. या पार्श्‍वभूमीवर आज वातावरणातल्या कार्बन डाय ऑक्साईडचं प्रमाण ७५० अब्ज टन इतकं आहे. या वाढत्या प्रमाणाचा परिणाम म्हणून १९९० पासून आजअखेर जागतिक तापमानातली वाढ १.३ ते १.५ डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचली आहे. साधारण अंदाज बांधला तर दर वर्षी वातावरणात १७ ते २० अब्ज टन कार्बन डाय ऑक्साईडची वाढ होत असल्याचं दिसून येतं. जगातल्या विविध देशांमधून कार्बन उत्सर्जन होत असतं. त्यात कोणाचं कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण अधिक आहे, हे जाणून घेण्यात आलं तेव्हा एकूण कार्बन उत्सर्जनात अमेरिकेचा वाटा ३० टक्के असल्याचं दिसून आलं. या शिवाय कार्बन उत्सर्जनात युरोपीय देशांचा वाटा ५० टक्के इतका आहे. चीनबाबत हे प्रमाण दहा टक्के तर भारताबाबत तीन टक्के आहे. हे प्रमुख देश वगळता अन्य सर्व देशांचा एकूण कार्बन उत्सर्जनातला वाटा सात टक्के इतका आहे. थोडक्यात सांगायचं तर, एकूण कार्बन उत्सर्जनाबाबत युरोपीय समूह आणि अमेरिका-चीन-भारत हे तीन देश महत्त्वाचे ठरणार आहेत. साहजिक कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण नियंत्रित करण्यात या चार देशांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. अलिकडच्या काळात वातावरणातल्या कार्बन डाय ऑक्साईडच्या वाढत्या प्रमाणामुळे तापमानात वाढ होत आहे. एकूण पृथ्वीचंच तापमान वाढत आहे. या तापमानवाढीचा परिणाम म्हणून ध्रुवीय प्रदेशातला बर्फ वितळण्यास सुरुवात झाली आहे. या बर्फ वितळण्यामुळे समुद्राच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. याच कारणामुळे आतापर्यंत समुद्राच्या पाणीपातळीत २० ते २५ सेंटीमीटरने वाढ झाली. एवढंच नाही, तर यापुढे ही तापमानवाढ रोखण्याबाबत वेळीच योग्य उपाययोजना करण्यात आली नाही तर इ. स. २१०० पर्यंत तापमानात ५ ते ६.४ डिग्री सेल्सियसनं वाढ होईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. साहजिक याचे गंभीर दुष्परिणाम समोर येणार आहेत. मुख्यत्वे तापमानातल्या एवढ्या वाढीमुळे पृथ्वीवरील ध्रुवीय प्रदेशातील बर्फ पूर्णपणे वितळेल आणि समुद्राच्या पाणीपातळीत तब्बल ९० ते १२० सेंटीमीटरची वाढ होईल, असा तज्ज्ञांचा दावा आहे.
समुद्राच्या पाणीपातळीत इतक्या मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे पृथ्वीवरील २७ देश पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या परिस्थितीत भारतातली समुद्रकिनार्‍याजवळील काही शहरं, गावं पाण्यात जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे आताच पूर्व किनार्‍यावर याचा परिणाम दिसायला सुरूवात झाली आहे. समुद्राची पातळी वाढून पाणी नागरी वस्तीत घुसू लागल्यानं आंध्र प्रदेश, तमिळनाडू, ओडिशा या राज्यातली बरीचशी गावं स्थलांतरीत होण्यास सुरूवात झाली आहे. यावरून तापमानवाढीचा धोका आता उंबरठ्यावर येऊन ठेपल्याचं स्पष्ट होतं. हवामान खात्याच्या या संदर्भातल्या अहवालानुसार जागतिक तापमानवाढीमुळे ध्रुवीय प्रदेशातील बर्फ वितळून समुद्राची पाणीपातळी वाढल्यानं अंदमान, निकोबार ही बेटं पुढील २५ वर्षांमध्ये पूर्णत: पाण्याखाली जातील. त्यामुळे अनेक प्रश्‍न निर्माण होतील, असं या अहवालात म्हटलं आहे.
खरं तर तापमानवाढीचा सर्वात जास्त धोका उष्ण कटिबंधात असणार्‍या देशांना आहे. याची जाणीव झाल्यानं कार्बनचं उत्सर्जन कमी करून तापमानवाढ दोन डिग्री सेल्सियसच्या खाली ठेवण्याच्या उद्देशाने विविध देश एकत्र आले. या सर्व देशांची एक आंतरराष्ट्रीय परिषद डिसेंबर २०१४ मध्ये पॅरिसमध्ये पार पडली. या परिषदेत १९० देशांनी सहभाग नोंदवला होता. यावेळी कार्बन उत्सर्जन कमी करण्यासंदर्भात योजावयाच्या उपायांबाबत करारावर चर्चा झाली. त्यानंतर १२ डिसेंबर २०१५ रोजी परिषदेत सहभागी झालेल्या सर्व देशांनी या कराराला तोंडी मान्यता दिली. पुढे २२ एप्रिल २०१६ रोजी १९५ पैकी १७५ देशांनी या करारावर सह्या केल्या. अन्य देशांनी सह्या केल्या नसल्या तरी त्यांना हा करार मान्य होता. पण सीरिया आणि निकाराग्वा या देशांनी हा करार मान्य केला नाही. वास्तविक, यापूर्वी जागतिक तापमानवाढीवर अंकुश ठेवण्यासाठी क्योटो करार झाला होता. पण या कराराची अंमलबजावणी झाली नाही. विशेष म्हणजे या करारातूनही अमेरिका बाहेर पडली होती. त्यावेळी अमेरिकेनं या करारात संख्यात्मक उद्दिष्ट नसल्याचं कारण दिलं होतं. त्यावेळी प्रगत देशांनी विकसनशील देशांना प्रदूषण कमी करण्यासाठी, कार्बन डाय ऑक्साईडचं उत्सर्जन कमी करण्यासाठी हरित तंत्रज्ञान द्यायचं कबूल केलं होतं. त्यासाठी आर्थिक मदत करण्याचा करारही झाला होता पण त्याचीही अंमलबजावणी झाली नाही. जगाच्या पाठीवर वेगाने विकसित होणार्‍या देशांमध्ये चीन आणि भारताचा क्रमांक आहे. हे लक्षात घेऊन त्या परिषदेत कार्बन उत्सर्जनाला आणि पर्यायानं तापमानवाढीला हे दोन देश जबाबदार आहेत, असं मत विकसित देशांनी मांडलं होतं. थोडक्यात, कार्बन उत्सर्जनाचं खापर या दोन देशांवर फोडण्यात आलं. पॅरिस परिषदेतही एका बाजूला विकसित राष्ट्रं आणि विरुध्द बाजूला विकसनशील राष्ट्रं असंच स्वरूप दिसून आलं.
वास्तविक, विकसित राष्ट्रांनीच विकासाच्या वेळी कार्बन डाय ऑक्साईड भरपूर प्रमाणात बाहेर टाकला आहे. असं असताना हे देश कार्बन उत्सर्जनाचा दोष दुसर्‍याला देत आहेत. या पार्श्‍वभूमीवर पॅरिसच्या परिषदेत युरोपीय राष्ट्रं, अमेरिका, चीन आणि भारत यांच्यासह ५५ देश कार्बन डाय ऑक्साईडच्या अधिक उत्सर्जनासाठी जबाबदार आहेत, हे मांडण्यात आलं आणि ते मान्यही करण्यात आलं. या करारानुसार कार्बनचं उत्सर्जन कमी करण्यासंदर्भात ५५ देश आपला आराखडा सादर करणार होते. त्या दृष्टीने जुलै २०१६ पर्यंत केवळ १५ देशांनी आराखडा सादर केला, तर डिसेंबर २०१६ पर्यंत ३२ देशांनी आराखडा सादर केला. यावेळी कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी आणि हरित तंत्रज्ञान अंमलात आणण्यासाठी विकसित देशांनी विकसनशील देशांना आर्थिक सहाय्य करायचं ठरवलं खरं; परंतु तशी मदत मिळाली नाही आणि या उद्दिष्टाची अंमलबजावणी होत असल्याचं दिसून आलं नाही. खरं तर जागतिक तापमानवाढ आणि त्यातून होणार्‍या हवामानबदलाचे दुष्परिणाम लक्षात घेऊन त्या संदर्भात योग्य उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पॅरिस कराराचं महत्त्व अनन्यसाधारण होतं. मात्र, या करारातून बाहेर पडण्याचा निर्णय अमेरिकेनं घेतला. यामुळे तापमानवाढ रोखण्याच्या प्रयत्नांमध्ये एक प्रकारे खोडा घातला गेला. खरं तर तापमानवाढीच्या दुष्परिणामांपासून अमेरिका अलिप्त राहिलेली नाही. जवळपास सार्‍याच देशांना जागतिक तापमानवाढीच्या दुष्परिणामांचा सामना करावा लागत आहे. हे संकट वरचेवर तीव्र बनत चाललं आहे आणि वेळीच उपाययोजना न केल्यास पृथ्वीतलावरील मानवाचं अस्तित्त्वच धोक्यात येणार आहे. मात्र, हे अमेरिकेच्या लक्षात येऊ नये, हे आश्‍चर्यकारक ठरलं.
तापमानवाढीचा संबंध प्रदूषणाशीही आहे. त्या दृष्टीने विचार करायचा तर भारतातली काही शहरंही प्रदूषणाबाबत अग्रेसर ठरत आहेत. उदाहरण द्यायचं तर, राजधानी दिल्लीत अलिकडेच प्रदूषणाची पातळी बरीच वाढल्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं होतं. हे लक्षात घेऊन शाळा, कॉलेज काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. बीजिंगमध्येही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी काही दिवस विविध कार्यालयं बंद ठेवावी लागली होती. हे नवं आव्हानही विचारात घेण्यासारखं आहे. खरं तर वाढत्या प्रदूषणाला आळा घालणं फारसं कठीण नाही. विशेषत: वाहनांच्या धुरामुळे प्रदूषणात पडणारी भर कमी करता येण्यासारखी आहे. त्या दृष्टीने दिल्लीत रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी करण्याच्या दृष्टीने काही प्रयत्न करण्यात आले. परंतु या प्रयत्नांना म्हणावं तसं यश येताना दिसत नाही. खरं तर रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी करणं आणि या वाहनांच्या धुरामुळे हवेच्या प्रदूषणात होणारी वाढ वेळीच रोखणं, ही काळाची गरज आहे. अमेरिकेतही वायू प्रदूषणात होत असलेली वाढ चिंताजनक आहे. या प्रदूषणामुळे अमेरिकेत दर वर्षी दोन लाख लोकांचा मृत्यू होतो असं आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. सर्वसाधारणपणे कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड हे घटक हवेतील प्रदूषण वाढवण्यास कारणीभूत ठरतात.हे घटक उद्योगांद्वारे तसंच वाहनांद्वारे बाहेर टाकले जातात आणि हवेत मिसळतात. त्यामुळे हवेतील प्रदूषणवाढीला हातभार लागतो. हे लक्षात घेऊन हवेत होणार्‍या या घटकांच्या उत्सर्जनावर नियंत्रण आणणं महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु जागतिकीकरणाच्या रेट्यात औद्योगिक विकासाला दिली जाणारी चालना, या धावपळीच्या युगात वाहनांच्या वापरावरील भर यातून प्रदूषणवाढीला आळा घालणं हे मोठं आव्हान आहे. मात्र, सार्‍या मानवजातीच्या अस्तित्त्वाचा प्रश्‍न अधिक महत्त्वाचा आहे. तापमानवाढीमुळे उत्तर ध्रुवावरील बर्फ मोठ्या प्रमाणावर वितळून समुद्राच्या पाणीपातळीत होणारी वाढ चिंताजनक आहे. त्यातून समुद्रालगतच्या शहरांना धोका निर्माण होत आहे. दुसरीकडे त्सुनामी, चक्रीवादळ, अतिवृष्टी अशा संकटांचा सतत सामना करावा लागत आहे. त्यातच कडाक्याच्या थंडीचा इतिहास नसलेल्या ठिकाणीही तापमानात मोठ्या प्रमाणावर होणारी घट, बर्फवृष्टी याही समस्या समोर येत आहेत.
गेल्या वर्षी मार्च-एप्रिलमधील उष्णतेच्या लाटांमधे भारतात तमिळनाडूमध्ये तर जगात अनेक ठिकाणी लाखो मृत पक्ष्यांचा खच पडला. ओखी चक्रीवादळाने पश्‍चिम किनारपट्टीला समांतर वाटचाल करत भारताला इशारा दिला. या घटनांमागे वाढत्या तापमानाचं समान सूत्र आहे. पक्ष्यांना याची जाणीव झाली तरी राजकीय पक्षांना होत नाही. ते आर्थिक विकास आणि वृध्दीच्या, सतत विनाश घडवणार्‍या पाश्‍चात्य रूढ प्रतिमानाला धरून आहेत. ‘चलन’ हे विनिमयाचं फक्त साधन आहे. ज्याचा विनिमय होतो ती गोष्ट पृथ्वीच्या घडणीचा आणि जीवसृष्टीचा नाश करून मिळवली जाते. हा विकास पृथ्वीची जडणघडण आणि जैविक विविधता नष्ट करत आहे. तो शाश्‍वत असूच शकत नाही. जीडीपीच्या दरातल्या वाढीवर आधारित अर्थव्यवस्थेमुळे जीवावरण, वातावरण, जलावरण आणि भूआवरणात दर दिवशी अनिष्ट जीवनविरोधी बदल होत आहे. परंतु मर्यादित पृथ्वीवर अमर्याद अर्थव्यवस्था राबवली जाऊ शकत नाही, हे लक्षात घेणं गरजेचं ठरणार आहे.
जागतिक हवामान संघटनेने आमचं वातावरणाबद्दलचं तसंच हवामान बदलाबाबतचं आकलन संपलेलं आहे आणि आपण सारे अज्ञात प्रदेशात शिरलो आहोत, अशा शब्दात सध्याच्या परिस्थितीचं गांभीर्य विशद केलं. यातून आपण कधी बोध घेणार हा खरा प्रश्‍न आहे. त्यामुळे येत्या काळात केवळ हवामान अंदाजावर अवलंबून राहणं उचित ठरणार नाही. त्याच बरोबर तापमानवाढीचे दुष्परिणाम वेळीच लक्षात घेऊन ही वाढ रोखण्यासाठी प्रयत्न गरजेचे ठरणार आहेत. अर्थात, त्यासाठी फार कमी कालावधी हातात उरला आहे, हे ही तितकंच खरं.

Posted by : | on : 18 Nov 2018
Filed under : आसमंत, पुरवणी.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी (250 of 926 articles)

Statue Of Unity
मानसरंग : मयुरेश डंके | गेटवे ऑफ इंडिया, इंडिया गेट ह्या तर ब्रिटीशांनी बांधलेल्या वास्तू आहेत. मग यापूर्वीच्या सरकारांनी त्यांचे ...

×