ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी » दरेकसा : स्वामी विवेकानंदांचे पहिले भावसमाधीचे स्थान!

दरेकसा : स्वामी विवेकानंदांचे पहिले भावसमाधीचे स्थान!

॥ प्रासंगिक : देवाशिष चित्तरंजन रॉय |

इ. स.१८७७ मध्ये, वयाच्या चौदाव्या वर्षी आठवीत असताना नरेंद्रच्या आयुष्यात एक बदल झाला. आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने त्यांच्या वडिलांना, विश्‍वनाथबाबूंना मध्य भारत आणि उत्तर भारत या भागांत दूरदूरच्या ठिकाणी जावे लागे. आजच्या मध्यप्रदेशातील छत्तीसगड भागात असलेल्या रायपूरला त्यांना एक महत्त्वाचे काम मिळाले. विश्‍वनाथबाबूंच्या ध्यानात आले की, रायपूरला आपले बरेच दिवस वास्तव्य होणार. म्हणून त्यांनी भुवनेश्‍वरीदेवींना मुलांसह तेथे बोलावून घ्यावे असे ठरवले आणि त्यांना घेऊन येण्याची जबाबदारी नरेंद्रावर सोपवली. त्या वेळी रायपूरला जाण्यास कलकत्त्याहून लोहमार्ग नव्हता.

Vivekananda

Vivekananda

स्वामी विवेकानंद (१२ जानेवारी, १८६३ – ४ जुलै, १९०२) यांचे पूर्वाश्रमीचे नाव नरेंद्रनाथ विश्‍वनाथ दत्त असे होते. त्यांचा जन्म बंगालमधील उत्तर कलकत्त्यातील सिमुलिया भागात दि. १२ जानेवारी १८६३ रोजी संक्रांतीच्या दिवशी झाला. त्यांचे वडील विश्‍वनाथ दत्त हे कलकत्ता उच्च न्यायालयाचे अ‍ॅटर्नी (वकील) होते. त्यांच्या मातोश्री भुवनेश्‍वरी देवी या धार्मिक वृत्तीच्या होत्या. नरेंद्रनाथांना घडविण्यात त्यांच्या पालकांचा सिंहाचा वाटा होता. नरेंद्रनाथांना तत्त्वज्ञान, इतिहास, कला, साहित्य इत्यादी अनेक विषयांत जशी रुची होती तशी त्यांना वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, भगवद्गीता आदी धार्मिक साहित्यातही होती. त्यांना शास्त्रीय संगीताची विशेष जाण होती. विवेकानंद हे मित्रपरिवारात अतिशय प्रिय होते. त्यांचे मित्र त्यांना ‘बिले’ या नावाने हाक मारीत असत. त्यांना वाचन, व्यायाम, कुस्ती, मुष्टियुद्ध, पोहणे, घोडेस्वारी, लाठीयुद्ध, गायन आणि वादन इत्यादी छंद होते.
इ. स.१८७७ मध्ये, वयाच्या चौदाव्या वर्षी आठवीत असताना नरेंद्रच्या आयुष्यात एक बदल झाला. आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने त्यांच्या वडिलांना, विश्‍वनाथबाबूंना मध्य भारत आणि उत्तर भारत या भागांत दूरदूरच्या ठिकाणी जावे लागे. आजच्या मध्यप्रदेशातील छत्तीसगड भागात असलेल्या रायपूरला त्यांना एक महत्त्वाचे काम मिळाले. विश्‍वनाथबाबूंच्या ध्यानात आले की, रायपूरला आपले बरेच दिवस वास्तव्य होणार. म्हणून त्यांनी भुवनेश्‍वरीदेवींना मुलांसह तेथे बोलावून घ्यावे असे ठरवले आणि त्यांना घेऊन येण्याची जबाबदारी नरेंद्रावर सोपवली. त्या वेळी रायपूरला जाण्यास कलकत्त्याहून लोहमार्ग नव्हता. कलकत्त्याहून अलाहाबाद मार्गे जबलपूरपर्यंत लोहमार्गाने जाता येत होते. तेथून नागपूरपर्यंत आगगाडीने भुसावळमार्गे यावे लागे. अखेरच्या टप्प्यातील नागपूर ते रायपूर हा प्रवास बैलगाडीतून करावा लागे आणि त्यासाठी सुमारे पंधरा दिवस लागत असत. आई भुवनेश्‍वरीदेवी, लहान भाऊ महेंद्रनाथ (नंतर यांनीच या प्रवासाचे सुंदर वर्णन केले आहे) व बहीण योगेंद्रबाला यांना घेऊन नरेंद्र निघाला. त्यांच्यासोबत रायपूरचे त्यांच्या वडिलांचे त्यांच्याच व्यवसायातील मित्र भूतनाथ डे, त्यांची पत्नी एलोकेशीदेवी व सहा महिन्यांचा मुलगा हरिनाथसुद्धा होता. रायपूरला जायचे झाल्यास हिंस्र पशूंनी भरलेल्या किर्र जंगलामधून पंधरवड्यापेक्षाही जास्त दिवस बैलगाडीने जावे लागे. अशा रीतीने अतोनात शारीरिक त्रास सोसावा लागत असला, तरीही नरेंद्रनाथ सांगत की, वनप्रदेशाच्या अपूर्व सौंदर्याच्या दर्शनाने तो त्रास त्यांना त्रास म्हणून वाटलाच नाही, आणि न मागताही ज्याने धरणीला असे निरुपम वेशभूषेने सजवून ठेवले आहे त्याच्या असीम शक्तीची व अनंत प्रेमाची प्रत्यक्ष प्रतीती पहिल्याने येऊन त्यांचे हृदय मुग्ध झाले होते.
या प्रवासाचे वर्णन स्वामी विवेकानंदांचे गुरुबंधू स्वामी सारदानंद यांनी आपल्या ‘श्रीरामकृष्ण लीलाप्रसंग’ नामक ग्रंथात ‘रायपूरला जाण्याच्या मार्गावरील नरेंद्रांची प्रथम ध्यानतन्मयता’ या विभागात खालीलप्रमाणे केले आहे.
‘‘विवेकानंद सांगत- ‘वनामधील मार्गाने जाता जाता त्या दिवसांत जे पाहिले आहे व अनुभवले आहे ते स्मृतिपटावर कायमचे दृढअंकित होऊन गेले आहे- विशेषत: एके दिवशीची घटना. उंचच उंच शिखरांच्या विंध्याद्रीच्या पायथ्याच्या प्रदेशामधून त्या दिवशी आम्हा लोकांना जावे लागले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पर्वताची शिखरे आकाशाला स्पर्श करीत उभी होती. नाना जातींच्या झाडांनी नि वेलींनी फळा-फुलांच्या भाराने वाकून पर्वताच्या बाजूंना अपूर्व शोभा आणली होती. गोड किलबिलाटाने आसमंत भरून टाकून रंगीबेरंगी पक्षी एका कुंजातून दुसर्‍या कुंजात जात होते, किंवा खाद्याच्या शोधात कधीकधी जमिनीवर उतरत होते. या सार्‍या गोष्टी बघता बघता मनात एक अपूर्व शांती अनुभवास येऊ लागली. धिम्या गतीने चालता चालता बैलगाड्या हळूहळू अशा एका ठिकाणी येऊन पोहोचल्या की, जिथे पर्वताची दोन शिखरे जणू प्रेमाने पुढे सरसावून वनमार्गावरून ओणवून एकमेकांना मिठी मारीत होती. मग त्यांचे पृष्ठभाग नीट निरखून पाहताना दिसले की, एका बाजूच्या पर्वतदेहावर डोक्यापासून तो पायापर्यंत पसरलेली एक भली मोठी फट होती आणि ती पोकळी भरून टाकून मधमाश्यांच्या युगानुयुगींच्या श्रमांचे प्रतीक असे एक प्रचंड पोळे लोंबत होते! तेव्हा विस्मयात मग्न होऊन त्या मक्षिकाराज्याच्या आदी-अंताविषयी विचार करता करता मन त्रिभुवननियंत्या ईश्‍वराच्या अनंतशक्तीच्या प्रतीतीत अशा प्रकारे गढून गेले की, काही काळ बाह्य भान अजीबात लोप पावले. किती वेळ अशा तर्‍हेने बैलगाडीत पडून होतो ते आठवत नाही. जेव्हा पुन्हा भानावर आलो तेव्हा आढळले की, ती जागा मागे टाकून बरेच दूर येऊन पोहोचलो आहे. बैलगाडीत एकटा होतो म्हणून ही गोष्ट कुणाला कळू शकली नाही.’ प्रबळ कल्पनेच्या साहाय्याने ध्यानाच्या राज्यात आरोहण करून पूर्णतया तन्मय होऊन जाण्याची नरेंद्रनाथांच्या जीवनात बहुधा हीच पहिली वेळ.’’
सुजला, सुफला आणि सस्यश्यामला अशा त्याला परिचित असलेल्या वंगभूमीपेक्षा मध्यप्रदेशातील घनदाट अरण्यांनी भरलेला भूप्रदेश स्वरूपत:च निराळा होता. लहानपणापासून नित्य दृष्टीस पडत असलेला तो प्रदेश मागे टाकून विंध्य पर्वताच्या प्रदेशात नरेंद्र आला आणि त्याच्या डोळ्यांसमोर निसर्गाच्या भव्य सौंदर्याचे एक वेगळेच दालन उघडले गेले. लोहमार्गाचा प्रवास संपवून बैलगाडीत सामान टाकले आणि मध्यप्रदेशच्या अंतरंगात प्रवेश केल्यावर उंचउंच वृक्षांनी भरलेले अरण्य लागले. अधूनमधून डोंगरांच्या रांगा आल्या आणि अखेर तर पर्वराजीचाच प्रदेश लागला. दगडाधोंड्यांवरून फेसाळत जाणारे शुभ्र पाण्याचे अनेक प्रवाह दृष्टीसमोर आले आणि पहाडांकडे पाहावे तर त्यांच्या उतारांवरून ठायीठायी छोटे छोटे निर्झर गर्जना करीत उतरताना दिसू लागले. झाडी तर इतकी दाट होती की, पाच मिनिटांच्या अंतरावर एखादा उंच डोंगर असला तरी जवळ जाऊन पोचल्याशिवाय त्याचे अस्तित्व कळत नसे. मधेच कुठेतरी सपाट भूमीचा तुकडा आला तर पाचपंचवीस झोपड्या दिसत. मनुष्यवस्तीची चाहूल लागे. तेवढा भाग ओलांडला की पुन्हा गहन अरण्य आणि उंच उंच पर्वत. विस्तीर्ण असा सपाट प्रदेश कुठेही आढळत नसे आणि वर पाहावे तर सभोवतालच्या उंच डेरेदार वृक्षांनी दृष्टीला अडसर उत्पन्न झाल्यामुळे समग्र आकाशाचे दर्शन घडूच शकत नसे. चौदा-पंधरा वर्षांचे वय असे असते की, जाणिवांचे डोळे विस्तृत होऊ लागलेले असतात आणि जे जे म्हणून नवे रूप घेऊन समोर येईल, ते सारे उत्सुक असे डोळे जणू पिऊन घेत असतात. उमलत्या वयाचे हे लोभसवाणे वैभव असते. नरेंद्र त्या वयात येऊन पोचला होता आणि आजवर कधी न पाहिलेल्या अशा अनोख्या अशा प्रदेशातून प्रवास करीत होता. भोवतालचे नव्या नवलाईने नटलेले निसर्गाचे नयनमनोहर रूप न्याहाळत होता आणि मनोमन चकित होत होता. अशा या भव्य आणि रमणीय सृष्टीच्या दर्शनाचा परिणाम त्याच्या मनावर झाला, फार गंभीर झाला.
विंध्य पर्वताच्या प्रदेशातील त्या अरण्यामधील निसर्गाची अवर्णनीय अशी शोभा पाहात असताना, ज्या विधात्याने या सृष्टीला अशा परम रमणीय सौंदर्याचे लेणे चढवले आहे, त्याच्या अद्भुत सामर्थ्याच्या जाणिवेने आणि त्याच्याविषयी मनात उदय पावलेल्या अपार आदरभावाने नरेंद्राचे मन आधीच भरून गेले होते आणि त्या भारल्यासारख्या अवस्थेत असताना त्यांनी वरील शब्दांत वर्णन केलेला अनुभव त्याला येऊन गेला होता.
तेव्हा म्हणजे इ. स. १८७७ साली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा हयात नव्हता, त्याचे काम तेव्हा सुरू होते. म्हणून त्या काळी नागपूरहून रायपूरला जाण्यासाठी प्रचलित असलेला मिलिटरी आणि पोस्टल रोड नावाने प्रसिद्ध असलेला रस्ता जो कामठी, तारसा, भंडारा, तुमसर, परसवाडा, कामठा, आमगाव, सलेकसा, दरेकसा, घोडतलाव, डोंगरगड व राजनंदगाव या मार्गे जात असे. या रस्त्याने जाताना वैनगंगा नदी बर्‍याच ठिकाणी ओलांडावी लागत असे. या जुन्या मार्गाला ‘मिलिटरी व पोस्टल रोड’ असे म्हणत असत. या प्रवासाचे वर्णन स्वामी विवेकानंदांचे लहान भाऊ व प्रवासातील एक सदस्य महेंद्रनाथ दत्त यांनी आपल्या ग्रंथांमध्ये सुरेख केले आहे. घनदाट जंगलातील रस्त्याचा, रस्त्यात लागणार्‍या लेण्यांचा व ओढ्या-धबधब्यांचा उल्लेख त्यांनी व विवेकानंदांचे आणखी एक चरित्रलेखक स्वामी गंभीरानंद यांनी केला आहे. हे वर्णन दरेकसा व हाजरा फॉल नावाने प्रसिद्ध असलेल्या जागेशी अगदी तंतोतंत जुळते. त्या लेण्यांना कापून रेल्वेने बोगदे केले आहेत. दरेकसा येथून हे प्रवासी जवळच्या घोडतलाव या गावी आले व तेथे एका विशिष्ट मेजवानीचा उल्लेख महेंद्रनाथ दत्त यांनी आपल्या ग्रंथात केला आहे. अशा प्रकारे स्वामी विवेकानंदांना भावराज्यात सर्वप्रथम घेऊन जाणारे दरेकसा व हाजरा फॉलसारखे रम्य स्थान आज दुर्लक्षित आहे. याच भागात कुठेतरी स्वामीजींना भावसमाधी लागली होती. धन्य ही भूमी, धन्य महाराष्ट्र!

Posted by : | on : 6 Jan 2019
Filed under : आसमंत, पुरवणी.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी (122 of 885 articles)

Artificial Intelligence
राष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन | जगभरातील साडेसात कोटी ते साडेसदतीस कोटी लोकांना सन २०३० पर्यंत आपल्या कामांत नवी कौशल्ये ...

×