ads
ads
आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

•न्यायव्यवस्था बदनाम करण्याचा हा सुनियोजित कट, •सर्वोच्च न्यायालयाचा संताप,…

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

•पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्ला, दरभंगा, २५ एप्रिल – आतापर्यंत पाकिस्तानची…

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मुंबई, २४ एप्रिल – राग, नाराजी असे माणसाच्या स्वभावाचे…

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

•अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण, वॉशिंग्टन, २४ एप्रिल –…

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

•मृतांची संख्या ३२१, भारतीयांचा आकडाही वाढला, ४० जणांना अटक,…

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

•चीनने व्यक्त केली भीती, बीजिंग, २३ एप्रिल – इराणकडून…

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

•राहुल गांधी यांनी स्वीकारला •विरोधी पक्षनेतेपदही सोडले •काँग्रेसला आणखी…

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

•खोट्या जाहिरातींचे प्रकरण, मुंबई, २२ एप्रिल – शेतकर्‍यांना पाच-दहा…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 18:44
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी » दिव्यांगांचे सशक्तीकरण महत्त्वाचे!

दिव्यांगांचे सशक्तीकरण महत्त्वाचे!

॥ प्रासंगिक : राजकुमार बडोले |

Handicap

Handicap

आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन का साजरा केला जातो, असा प्रश्‍न अनेकांना पडला असेल. त्याचे उत्तर दिले पाहिजे. दिव्यांगांना ज्या समस्या आहेत, त्यांच्या प्रगतीच्या मार्गात जे अडथळे आहेत, ते इतरांना कळले पाहिजेत आणि दिव्यांगांच्या समस्यांवर मात करण्यात सर्वसामान्यांनीही सहभाग नोंदविला पाहिजे, या हेतूने हा दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा केला जातो. महाराष्ट्रात मी सामाजिक न्याय खात्याचा मंत्री आहे. त्यामुळे दिव्यांगांच्या प्रश्‍नांकडे जवळून पाहण्याची, त्यांचे प्रश्‍न सोडविण्याची संधी मला मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो. युनोने हा दिवस ३ डिसेंबर रोजी साजरा करण्याचे ठरविले असल्याने त्याचे विशेष असे महत्त्व आहेच. पण, महाराष्ट्रात सामाजिक न्याय खात्याकडून दिव्यांगांसाठी वर्षभर उपक्रम सुरू असतात, हे मला नमूद केले पाहिजे. जागतिक दिव्यांग दिनाची दरवर्षी वेगळी संकल्पना असते. यंदा ‘दिव्यांगांचे सशक्तीकरण, समग्रता आणि समानता’ अशी संकल्पना घेऊन हा दिवस जगभर साजरा केला जात आहे.
दिव्यांगांना मानसिक, शारीरिक आधार देणे, हे आपल्यापैकी प्रत्येकाचे कर्तव्य ठरते. दिव्यांग असणे हा त्यांचा दोष मानला न जाता आणि त्यांच्यातील शारीरिक व्यंगाकडे वाईट अर्थाने न बघता सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पाहिले आणि त्यांच्या सशक्तीकरणासाठी प्रयत्न केलेत, तर त्यांचे मनोबल निश्‍चितच वाढेल. कुठल्याही दिव्यांग व्यक्तीला तुमच्या सहानुभूतीची नव्हे, तर प्रेम आणि जिव्हाळ्याची गरज असते. एखादी व्यक्ती जरी दिव्यांग असली तरी ती स्वाभिमानी असते, तिलाही मानसन्मान असतो, स्वत:चे वेगळे अस्तित्व असते. त्यामुळे लाचारी पत्करून ते मदत स्वीकारण्यास तयार होत नाहीत. का म्हणून तयार व्हावे त्यांनी? शारीरिक व्यंग येण्यात त्यांचा दोष काय? म्हणूनच त्यांना केली जाणारी मदत ही उपकाराच्या भावनेने न करता आपले कर्तव्य म्हणून ती केली आणि उपकाराचा भाव न ठेवता केली, तर कुठल्याही दिव्यांग व्यक्तीला दु:ख होणार नाही.
जगात अनेक देश आहेत आणि प्रत्येक देशात विविध प्रकारचे शारीरिक व्यंग असलेल्या असंख्य व्यक्ती आहेत. आपल्या भारतातच दिव्यांग व्यक्तींची संख्या सात कोटींपेक्षा जास्त आहे. आपल्या शरीराचे जे विविध अवयव आहेत, त्यापैकी कुठला तरी अवयव स्वस्थ नसणे याचाच अर्थ ती व्यक्ती दिव्यांग असणे असा होतो. कुणी दृष्टिबाधित असतो, कुणी कर्णबधिर असतो. कुणाचा एक पाय निकामी झालेला असतो, तर कुणाचा हात. इतर लोकांप्रमाणे ज्या व्यक्तीला स्वत:चे व्यवहार स्वबळावर करता येत नाहीत, कुणाचा तरी वा उपकरणांचा आधार घ्यावा लागतो, अशा व्यक्तीस आपण दिव्यांग म्हणू शकतो. अशा व्यक्तींना आपल्यासारखेच जीवन जगता यावे यादृष्टीने आपल्यापैकी प्रत्येकाने मदतीचा हात पुढे करून दिव्यांगांच्या सशक्तीकरणासाठी पुढे आले पाहिजे, असे मला वाटते.
अनेकांना बोलताच येत नाही. जन्मापासून ते मूकबधिर असतात वा मग आयुष्यात घडलेल्या एखाद्या दुर्घटनेत त्यांची वाचा जाते, अशांना समजून घेणे आपले कर्तव्य ठरते. ते आपल्याशी हातवारे करून सांकेतिक भाषेत बोलण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांची ती भाषा समजून घेत त्यांच्याशी सामान्य व्यवहार ठेवणे, हे माणूस म्हणून आपले कर्तव्यच आहे. त्यांची चेष्टा न करता, त्यांना न चिडवता त्यांना समजून घेता आले तर उत्तम. आज आपल्या सगळ्यांच्या सुदैवाने तंत्रज्ञानात झालेल्या अफाट प्रगतीमुळे मूकबधिरांसाठी सांकेतिक भाषा विकसित करण्यात आली आहे आणि त्याचे प्रशिक्षण देणार्‍या संस्थाही सक्रियतेने काम करत आहेत. अनेक लोकांना हात नाहीत, कुणाला पाय नाहीत. ज्यांना हात नाहीत ते टायपिंग करू शकत नाहीत, पेनाने लिहू शकत नाहीत, घरची अन्य कामेही करू शकत नाहीत. ज्यांना पाय नाही त्यांना चालताना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. पण, आजकाल कृत्रिम हात आणि पाय उपलब्ध झाले असल्याने अशा दिव्यांग व्यक्तींना मोठाच दिलासा मिळाला आहे. आपल्या अपंगत्वावर मात करत अनेक दिव्यांगजन कृत्रिम अवयवांच्या मदतीने स्वत:ची कामे स्वत:च करून स्वाभिमानाने जीवन जगत आहेत, समाजापुढे आदर्श उभा करीत आहेत आणि जे धडधाकट असूनही दिव्यांग असल्यासारखे जीवन जगत आहेत, त्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालत आहेत. माझ्याकडे असलेल्या सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभागा अंतर्गत दिव्यांगजनांसाठी अनेक कार्यक्रम घेण्यात आले आहेत. त्यांना विभागाच्या वतीने मोफत कृत्रिम अवयवांचे वितरण करण्यात आले आहे. पायाने अधू असलेल्यांना तीनचाकी सायकली देण्यात आल्या आहेत. कुणाला कर्णयंत्र, कुणाला कृत्रिम हात, कृत्रिम पाय, दृष्टिबाधितांना काठी अशा अनेक प्रकारे मदत करण्यात राज्याचा सामाजिक न्याय विभाग सक्रिय आहे. दिव्यांग बांधवांसाठी काही अल्पसे करण्याची संधी मला राज्याचा मंत्री म्हणून मिळाली, हे खरोखरीच माझे भाग्य आहे. शासनाच्या पातळीवर दिव्यांगजनांसाठी अनेक प्रकारच्या योजना आहेत, सवलती आहेत. सरकारने त्यांचे जीवन सुकर करण्यासाठी खास नियम बनविले आहेत, या नियमांच्या अंमलबजावणीसाठी विशेष विभाग सुरू केले आहेत. शासनाच्या अनेक योजनांमुळे आणि सोईसवलतींमुळे दिव्यांग बांधवांचे जीवन सुखी होण्यास मदत झाली आहे.
दरवर्षी ३ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर दिव्यांग दिन साजरा केला जातो. १९९२ पासून संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय परंपरेचा प्रसार केला आहे. दिव्यांग लोकांवरील सामाजिक कलंक दूर करणे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये सुधारणा करणे, दिव्यांग लोकांमध्ये जागरूकता वाढविणे आणि त्यांच्या वास्तविक जीवनात त्यांचा प्रचार करणे तसेच त्यांना प्रोत्साहन देणे, या हेतूने दिव्यांग दिवस साजरा केला जातो, याला विशेष महत्त्व आहे. या वर्षी साजरा करण्यासाठी विशेष महत्त्व दिले जाते. १९९२ पासून, या वर्षीपर्यंत जगभरातील देशांमध्ये मोठ्या उत्साहाने सातत्याने हा दिवस साजरा केला जातो.
समाजातील समानता विकसित करण्यासाठी, सामान्य नागरिकांप्रमाणेच त्यांचे आरोग्य उत्तम करण्यासाठी आणि सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी लोकांना दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांबद्दल जागरूक करणे, पूर्ण सहभाग आणि समानता अशी जी संकल्पना यंदाच्या दिव्यांग दिनासाठी निश्‍चित करण्यात आली आहे, ती स्वागतार्ह आहे.
बहुतेक लोकांना त्यांच्या घराभोवती समाजात किती लोक दिव्यांग असतात, हेदेखील माहिती नसते. समाजात समान अधिकार मिळत असले किंवा नसले तरीही दिव्यांगांना चांगले आरोग्य आणि आदर प्राप्त व्हावा, त्यांना जीवनात पुढे जाण्यासाठी, त्यांना सामान्य लोकांकडून काही मदत आवश्यक असते. ती मदत सामान्यांनी केली तर असामान्य काम उभे होऊ शकते. परंतु, सामान्यत: समाजात लोक दिव्यांगांच्या सर्व गरजा ओळखत नाहीत. ही परिस्थिती नाहीशी व्हावी म्हणून जागतिक दिव्यांग दिवसाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
समाजात आत्महत्या होऊ नयेत, दिव्यांगांना उत्तम आरोग्य लाभावे, त्यांना त्यांचे हक्क मिळावेत आणि त्यांचे जीवन सफल व्हावे, हा या दिवसाच्या साजरीकरणाचा उद्देश आहे. म्हणूनच ‘जागतिक दिव्यांग दिवस’ या शीर्षकाने हा दिन साजरा केला जातो. जागतिक दिव्यांग दिनी दरवर्षी वेगवेगळी संकल्पना असते, हे या दिवसाचे वैशिष्ट्य सांगता येईल.
मंत्री, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य

Posted by : | on : 9 Dec 2018
Filed under : आसमंत, पुरवणी.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी (219 of 926 articles)

India Map Graphic
भाग्य विधाता : प्रशांत आर्वे | ज्या साने गुरुजींनी महाराष्ट्रात ‘साधना’ हे वैचारिक ाप्ताहिक चालू केले, त्याच महाराष्ट्रात अत्यंत दर्जेदार ...

×