ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:29 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » आसमंत, गजानन निमदेव, पुरवणी, स्तंभलेखक » नव्या भारताचा नवा संदेश!

नव्या भारताचा नवा संदेश!

॥ कटाक्ष : गजानन निमदेव |

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकीय इच्छाशक्ती दाखवत पाकिस्तानवर ‘एअर स्ट्राईक’ करण्याची अनुमती भारतीय वायुदलाला दिली आणि वायुदलाने अतिशय चोख कामगिरी करीत पाकिस्तानात घुसून साडेतीनशे अतिरेकी मारले. १९७१ च्या युद्धानंतर पहिल्यांदाच भारतीय वायुदलाने आंतरराष्ट्रीय सीमा पार केली आणि दहशतवाद्यांचे अड्डेे उद्ध्वस्त करून जगाला आपली ताकद दाखवून दिली. संपूर्ण जगात भारताचा एक धाक निर्माण झाला, पाकिस्तानची मस्तीही उतरली आणि भारताच्या मारक क्षमतेला घाबरत पाकने गुडघे टेकले. त्याच्याच परिणामी वैमानिक अभिनंदन याची सुटकाही पाकने तातडीने केली. त्यामुळे एकूणच घटनाक्रमाचे श्रेय कुणी घ्यावे, कुणाला द्यावे, याचा फैसला जनताच करेल. तो अधिकार इतर कुणालाही नाही.

Air Strike On Pakistan

Air Strike On Pakistan

अखेर सवा कोटी जनतेची इच्छा पूर्ण झाली. भारतीय वायुदलातील मिराज-२००० या लढाऊ विमानांनी पाकिस्तानी सुरक्षा दले, तिथल्या गुप्तचर संस्थांना हुलकावणी देत पाकव्याप्त काश्मीर ओलांडून खैबर पख्तुनवा भागातील बालाकोट जैशच्या अतिरेकी तळांवर एक हजार किलो वजनाचे बॉम्ब फेकले आणि जैशच्या तीन-साडेतीनशे अतिरेक्यांचा खातमा केला. पुलवामा येथे जैश-ए-मोहम्मदने केलेल्या हल्ल्याचा बदला घ्यावा, अशी देशवासीयांची तीव्र भावना होती. या भावनेचा आदर करण्याची गरजही होती. ती गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धाडसाने पूर्ण केली. भारतीय विमाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसली, अतिरेकी तळांवर हल्ला केला आणि सुरक्षित आपल्या ठिकाणी परतलीही. याचे श्रेय कुणी घ्यावे, असा प्रश्‍नच निर्माण होत नाही. देशातील सव्वाशे कोटी जनतेचे हे श्रेय आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
भारतीय वायुसेनेने केलेली कारवाई ही ऐतिहासिक आहे. १९९९ च्या कारगिल युद्धातही वायुसेनेचा सहभाग होता. पण, आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून जाण्याची अनुमती त्या वेळी वायुदलाला देण्यात आली नव्हती. १९७१ नंतर प्रथमच वायुदलाला अशी परवानगी मिळाली आणि आमच्या शूर वैमानिकांनी आपली कामगिरी फत्ते केली. या कारवाईचे परिणाम हे दीर्घकालीन असणार आहेत. भारताच्या कारवाईला प्रत्युत्तर देण्याचा केविलवाणा प्रयत्न पाकने करून पाहिला. पण, अभिनंदन वर्धमान या धाडसी भारतीय वैमानिकाने भारतीय हद्दीत घुसू पाहणारे पाकचे एफ-१६ हे लढाऊ विमान पाडण्यात यश मिळवले. १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर द्यावे, यासाठी केंद्र सरकारवर प्रचंड दबाव होता. देशातील जनमानस आक्रोशित होते. पाकबद्दल प्रचंड संतापाची भावना होती. त्याला वाट मोकळी करून देणे गरजेचेच होते. चाळीस जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला आश्‍वस्त केले होते. जे बोलले ते मोदींनी करून दाखविले. पाकमध्ये घुसून कारवाई करण्यासाठी जिगरबाज वृत्ती असावी लागते. नुसती तोंडपाटीलकी करून चालत नसते. आपले सरकार अतिरेक्यांपुढे झुकणारे नाही, जिगरबाज आहे, हे मोदींनी प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केले आहे.
पठाणकोट आणि उरी येथे झालेल्या हल्ल्यांमध्येही जैशचा सहभाग होता. सगळे पुरावे पाकिस्तानला देऊन झाले होते. पण, पाकने कोणतीही कारवाई न करता सतत रडीचा डाव खेळला. पाकची मुजोरी कायम होती. कितीही पुरावे दिले, तरी पाकिस्तानकडून कारवाई केली जात नव्हती. जैशचा म्होरक्या मसूद अझहर उजळ माथ्याने, उघडपणे मोकाट फिरत असताना, तो पाकिस्तानात नसल्याचा दावा पाककडून केला जात होता. अखेर पाकने एक ऐतिहासिक घोडचूक केली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून कधीही चाळीस एवढ्या मोठ्या संख्येत भारतीय जवान शहीद झाले नव्हते. ते पाप पाकच्या हातून घडले. त्याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्धार केला आणि गेल्या मंगळवारी पहाटे पाकिस्तान झोपला असताना मिराज विमानांनी प्रचंड गडगडाटासह बालाकोटस्थित दहशतवादी तळांवर हल्ले करून जैशच्या कंट्रोल रूमसह प्रशिक्षण केंद्रही उद्ध्वस्त केले.
एवढ्यावरच भारत थांबला असता तर नवलच होते. पण, भारताने मुत्सद्देगिरीचा परिचय संपूर्ण जगाला करवून दिला. आपण केलेल्या कारवाईबाबत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी अमेरिका, अफगाणिस्तान, बांगलादेशसह पाच देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांशी संपर्क साधून केलेल्या कारवाईबाबत त्यांना अवगत केले. त्यांचे समर्थनही प्राप्त केले. आज जगातील बहुतांश देश भारताच्या बाजूने उभे आहेत. पाकिस्तानला एकटे पाडण्यात भारताला जे यश मिळाले, ते भारताच्या मुत्सद्देगिरीचेच परिचायक आहे, यात शंका नाही.
याआधी जेव्हा जेव्हा भारतात अतिरेकी हल्ले झाले, त्या वेळी भारत सरकारने फक्त निषेध केला. पाकिस्तानला पुरावे दिले, कारवाई करा अशी मागणी केली आणि पाकने काहीही केले नाही तर भारताने गप्प राहण्याची भूमिका घेतली. पण, यावेळचा भारत हा बदललेला जगाने पाहिला. आमच्यावर वाकडी नजर ठेवाल तर डोळेच फोडून टाकू, या आविर्भावात भारताने पाकमध्ये घुसून कारवाई केली आणि पाकला त्याची जागा दाखवून दिली. बदललेल्या भारताची क्षमता काय आहे, याचा अनुभव भारताने पाकसह जगाला करवून दिला. आता पाकिस्ताननेच नव्हे, संपूर्ण जगाने एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, भारतीय सेनेकडून अशा प्रकारची कारवाई गरज पडेल तेव्हा केली जाईल. भारत आता मूक प्रेक्षक बनून राहणार नाही. भारतीय सेनेचा भीमपराक्रम अनुभवायचा नसेल, तर पाकने आता कुरापती बंद करत दहशतवाद्यांना जेरबंद केले पाहिजे, मसूद अझहर आणि हाफिझ सईद यांना आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरवत भारताच्या हवाली करायला हवे. कारण, भारतात अनेक ठिकाणी जो रक्तपात झाला, त्याला हे दोघे पापस्तानी कारणीभूत आहेत.
पाकिस्तान आपल्या कारवाईला प्रत्युत्तर देणार, याची भारताला पूर्ण जाणीव होती. भारतानेही प्रतिकार करत कारवाई हाणून पाडण्याची जय्यत तयारी केली होती. अखेर तसे झाले. क्षमता नसतानाही पाकने भारतीय हद्दीत लढाऊ विमाने घुसविण्याचा प्रयत्न केला. त्यातले एक विमान भारतीय वैमानिकांनी पाडले आणि पाकला पळ काढावा लागला. एवढेच नव्हे, तर भारताची क्षमता पाहून पाकचा पंतप्रधान इमरान खान याला शांततेची भाषाही बोलावी लागली. आता इमरान खान वाटाघाटीसाठी तयार आहेत. पण, जोपर्यंत पाकच्या भूमीतून दहशतवादी नष्ट होत नाहीत, तोपर्यंत पाकशी कुठलीही बोलणी न करण्याची भूमिका भारताने घेतली आहे, जी एकदम योग्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने सैन्याला खुली सूट दिली आहे. त्यामुळे आता पाकने दुस्साहस केलेच तर त्याला गोळीचे उत्तर तोफेने मिळणार, यात शंका राहिलेली नाही. संपूर्ण देश लष्करासोबत आहे. भारताला आता आतंकवादापासून मुक्तता हवी आहे, जनतेला शांतता हवी आहे. पाकला धडा शिकविताना काही नुकसान सहन करावे लागले, तर ते सहन करण्याची जनतेची तयारी आहे. पुलवामा हल्ल्याने देशात हा फार मोठा बदल घडवून आणला आहे.
देशात घुसणार्‍या अतिरेक्यांना मारून काम भागायचे नाही. सीमेपलीकडे जे दहशतवादी अड्डे आहेत, त्यांना पोसणारे जे स्रोत आहेत, ते नष्ट केल्याशिवाय दहशतवाद संपणार नाही, याची भारत सरकारला जाणीव आहे. आणि म्हणूनच गेल्या मंगळवारी भल्या पहाटे भारतीय वायुदलाने जी कारवाई केली ती फक्त आणि फक्त अतिरेकी तळांवरच केली. त्यात तीन-साडेतीनशे अतिरेकी मारले गेले. एकाही पाकिस्तानी नागरिकाला इजा झाली नाही. तशी काळजी वायुदलाने घेतली, भारत सरकारनेही घेतली. भारताचा उद्देश स्पष्ट आहे. जो पाकिस्तान दहशतवादाला पोसतो आहे, त्याच्याशी वार्तालाप करून उपयोग नाही, ही देशाची भूमिका मान्य करावीच लागेल. राज ठाकरे, नवज्योतसिंग सिद्धू, ममता बॅनर्जी, बरखा दत्त, राजदीप सरदेसाई यांच्यासारख्यांना पाकशी शांतता बोलणी हवी आहे. या सगळ्यांना आधी पाकच्या सीमेवर पाठविले पाहिजे, तिथे डोळ्यांत प्राण आणून देशाचे रक्षण करणार्‍या जवानांच्या काय भावना आहेत, त्या सांगितल्या पाहिजे, पुलवामा हल्ल्यातील ४० शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या भावना काय आहेत, हे त्यांना सांगितले पाहिजे. मग कळेल त्यांना शांतिवार्ता काय असते ती.
भारताने आता पाकिस्तानला पुरावे वगैरे काही देण्याच्या भानगडती पडू नये, अशी जनभावना आहे. अमेरिकेने दहशतवादाविरुद्ध जशी ठोस कारवाई केली आणि ९/११ नंतर अमेरिकेत एकही दहशतवादी हल्ला झाला नाही, तशी कारवाई आता भारताने करणे गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाचा असलेला दबाव, मानवाधिकार या अतिशय फालतू गोष्टींचा विचार न करता ‘आली अंगावर, घेतली शिंगावर’ या उक्तीप्रमाणे भारताने भूमिका घेतली पाहिजे. असे केले तरच भारताकडे कुणीही वाकड्या नजरेने पाहणार नाही. पाकच्या घरात घुसून मारण्याची जी कारवाई भारताने केली आहे, तिला जगभरातून पाठिंबा मिळाला आहे. भारताच्या प्रतिष्ठेतही भर पडली आहे. शेजारच्या चीनलाही योग्य तो इशारा मिळाला आहे. भारत आता बदलला आहे, याची जाणीव जगाला झाली आहे. सव्वाशेे कोटींचा देश पुचाट असूच शकत नाही, हे मोदी सरकारने कृतीने दाखवून दिले आहे. पाकला पुरावे देणे, निषेध करणे हा आता इतिहास झाला आहे. २००१ पासून भारताने पाकला अनेकदा पुरावे दिले आहेत आणि संपूर्ण जग त्याचे साक्षीदार आहे. पण, त्याचा उपयोग झाला नव्हता कधी. आता भारताने काळाची पावलं ओळखत धोरण आखले आहे आणि त्याची अंमलबजावणी बालाकोटपासून सुरू केली आहे. वर्तमान भारत हा विश्‍वासघाताला बळी पडणारा नाही, हे जगाने आणि विशेषत: पाकने ओळखण्याची गरज आहे. भारताने जी धाडसी कारवाई केली आहे, तिचा संदेश जगाने समजून घेतला पाहिजे. उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर बारा दिवसांनी भारताने सर्जिकल स्टाईक केला होता. त्यातून पाकने काही शिकणे आवश्यक होते. पण, दुर्दैवाने तसे झाले नाही. आताही पुलवामाच्या घटनेनंतर बारा दिवसांनीच भारतीय वायुदलाने पाकमध्ये घुसून हल्ला केला आणि दहशतवाद्यांना व पाकलाही कठोर संदेश दिला. आमच्या हद्दीत येऊन हल्ले कराल तर तुमच्या घरात घुसून मारू, असा कडक संदेश भारताने दिला आहे. पाकने अण्वस्त्रांचा धाक दाखवून पाहिला. पण, निधड्या छातीचे अन् जिगरबाज वृत्तीचे पंतप्रधान मोदी डगमगले नाहीत. त्यांनी सुरक्षा दलांना खुली सूट देत बदला घेण्याची मुभाही दिली.
मै देश झुकने नही दुंगा, मै देश मिटने नही दुंगा, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश सुरक्षित हाती असल्याची ग्वाही जनतेला दिली आहे. भारताने पाकच्या भूमीत घुसून कारवाई केली आणि अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्त केले, तरीसुद्धा पाकला त्याची हवा लागली नाही. पाकिस्तानची हवाई सुरक्षा प्रणाली किती कमकुवत आहे आणि पाकिस्तानची लढण्याची क्षमता किती आहे, हेही यानिमित्ताने दिसून आले आहे. पाकचा पंतप्रधान इमरान खान याला तर भारताकडून क्षेपणास्त्र हल्ला केला जाईल, अशी भीती वाटत होती. एक रात्रभर तर त्याला झोपही लागली नव्हती. यावरूनही पाकची क्षमता आपल्या लक्षात येईल. भारताने जी कारवाई केली आहे, त्याचे दूरगामी परिणाम होणार आहेत. अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत, त्यात भारताची भूमिका यापुढे महत्त्वाची राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला नवभारताचे जे स्वप्न दाखविले आहे ना, तो नवभारत आता आकार घेत आहे, हे जरी लक्षात घेतले तरी पुरेसे आहे!

Posted by : | on : 10 Mar 2019
Filed under : आसमंत, गजानन निमदेव, पुरवणी, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, गजानन निमदेव, पुरवणी, स्तंभलेखक (23 of 1287 articles)

Surgical Strike Air
राष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन | आज पाकव्याप्त काश्मीरमध्ये कारवाई केली आहे; पण उद्या पाकिस्तानच्या आत कुठल्याही टार्गेटवर ही विमाने ...

×