ads
ads
मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मुंबई, २४ एप्रिल – राग, नाराजी असे माणसाच्या स्वभावाचे…

पंतप्रधान मोदींचा उमेदवारी अर्ज उद्या

पंतप्रधान मोदींचा उमेदवारी अर्ज उद्या

•वाराणसीत जय्यत तयारी सुरू •आज रोड शोद्वारे करणार शक्तिप्रदर्शन,…

तीन टप्प्यात गडकरींच्या देशभरात ५० प्रचारसभा

तीन टप्प्यात गडकरींच्या देशभरात ५० प्रचारसभा

•२७ सभांनी राज्यातही कमळजागर, नागपूर, २४ एप्रिल – भारतीय…

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

•अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण, वॉशिंग्टन, २४ एप्रिल –…

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

•मृतांची संख्या ३२१, भारतीयांचा आकडाही वाढला, ४० जणांना अटक,…

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

•चीनने व्यक्त केली भीती, बीजिंग, २३ एप्रिल – इराणकडून…

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

•खोट्या जाहिरातींचे प्रकरण, मुंबई, २२ एप्रिल – शेतकर्‍यांना पाच-दहा…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 18:44
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, यमाजी मालकर, स्तंभलेखक » नागरिकांच्या प्रवासातील सकारात्मक बदल

नागरिकांच्या प्रवासातील सकारात्मक बदल

॥ अर्थपूर्ण : यमाजी मालकर |

Indian Railways

Indian Railways

सणासुदीला आपल्या देशात कोट्यवधी नागरिक प्रवास करतात आणि आपल्या देशातील प्रवासाच्या सेवासुविधांविषयी आपण बोलू लागलो की त्या कशा दर्जेदार नाहीत, यावर बहुतेकांचे एकमत होते. विकसित जगाच्या तुलनेत त्या तेवढ्या दर्जेदार नाहीत, हे खरेच आहे. पण आपल्या देशातील प्रवास करणार्‍यांची संख्या लक्षात घेतली की, आपला प्रवास असा का आहे, याचा उलगडा होण्यास मदत होते. केवळ प्रवासच नाहीतर भारतातील सर्व सेवांचे असेच आहे. कोणत्याही विकसित देशांशी तुलना करता त्या तेवढ्या चांगल्या नाहीत. त्याचे सर्वात मोठे कारण आहे, ती आपल्या देशाच्या लोकसंख्येची घनता. ती आहे तब्बल ४२५ ! म्हणजे भारतात दर चौरस किलोमीटरला ४२५ लोक राहतात. आपण तुलना करतो अशा सर्व विकसित देशांच्या लोकसंख्येची घनता जाणून घेतली की (उदा. अमेरिका – ३३, चीन १५०, ब्रिटन – २७२, जर्मनी – २३२, फ्रान्स – १२४, कॅनडा – ४, ऑस्ट्रेलिया – ३) कदाचित आपल्याला आपण या दाटीवाटीत खूपच चांगले राहतो, असे म्हणायला लागू. अर्थात, आपण तसे म्हणण्याची काही गरज नाही. पण त्या मर्यादांची जाणीव असली पाहिजे, एवढे मात्र नक्की. आपल्या देशातील साधनसंपत्तीचे वाटप इतक्या मोठ्या संख्येने राहणार्‍या नागरिकांत करणे, हे एक मोठेच आव्हान आहे. त्या आव्हानाला भिडले पाहिजे, याविषयी दुमत असूच शकत नाही. मात्र ऊठसूठ देशातील नागरिकांना आणि सेवांना बदनाम करण्यातही काही शहाणपणा नाही, एवढे नक्की.
अगदी प्रवासाचेच उदाहरण घेतले तर भारतातील प्रवासाचा दर्जा कसा बदलतो आहे, ही सेवा प्रवास करणार्‍यांच्या नव्या गरजांचा कसा विचार करू लागली आहे, हे लक्षात येते. त्याचे आपल्या जवळचे उदाहरण म्हणजे तालुक्याच्या गावांपर्यंत शिवशाहीच्या रूपाने प्रथमच पोहोचलेल्या वातानुकूलित बसगाड्या. त्या कदाचित खूप चांगल्या चालत नसतील, पण वातानुकूलित बसगाड्यांची गरज यानिमित्ताने मान्य केली गेली, हे फार महत्त्वाचे आहे. पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर ही शहरे तर शिवनेरीने फार पूर्वीच जोडली गेली असून त्यांना सध्या अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आज हे महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक सारख्या औद्योगिक विकसित राज्यांपुरते मर्यादित असेल पण त्याचा विस्तार होतो आहे, हे महत्त्वाचे.
रेल्वेसेवेत तर गेले काही वर्षे अमूलाग्र बदल होताना दिसतो आहे. दिल्ली ते आग्रा सुरू झालेली गतिमान एक्स्प्रेस असेल, मुंबई पणजी दरम्यान सुरू झालेली तेजस एक्स्पेस असेल किंवा शताब्दी गाड्यांची जागा घेणारे देशी बनावटीचे ट्रेन १८ नावाचे हे रेक प्रवाशांना वेगवान आणि सुखद प्रवासाचा अनुभव देत आहेत. शताब्दी गाड्यांचा वाढलेला वेग आणि वाढलेल्या सोयी असतील आणि इतरही काही सोयी आहेत, ज्या अपग्रेड होत आहेत. भारतीय रेल्वेचे एक वेगळेच रूप पाहायला मिळते आहे. उशीर होण्याबाबत एकेकाळी बदनाम असलेली रेल्वे आता लांबपल्ल्याच्या प्रवासातही काही मिनिटांच्या फरकाने अंतिम स्थानक गाठू लागली आहे. अनेक रेल्वे स्टेशन आणि रेल्वेगाड्यांत स्वच्छता दिसू लागली आहे. जे दोन गावांतील प्रवासाचे तेच महानगरांतील मेट्रोे सेवेचे. राजधानी दिल्लीत दररोज २७ लाख प्रवासी मेट्रोेने प्रवास करू लागले आहेत आणि मेट्रोचा या शहरातील विस्तार आता ३०० किलोमीटरपर्यंत पोहोचला आहे. गेल्या ऑक्टोबर रोजी त्यात १७.८६ किलोमीटरची भर पडली.१६ वर्षांपूर्वी दिल्लीत मेट्रोे सुरू झाली, तेव्हा (२४ डिसेंबर २००२) हे अंतर होते फक्त ८.२ किलोमीटर. केवळ कोलकताला थांबलेली ही मेट्रोे राजधानीच्या मार्गाने १६ वर्षांत १० शहरांत सुरू झाली असून येत्या तीन वर्षांत त्यात पुणे, नागपूरसह चार पाच शहरांची भर पडेल. कदाचित त्याच दरम्यान मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनची प्रवासी आतुरतेने वाट पाहत असतील. बुलेट ट्रेन आपल्या देशाची खरोखर गरज आहे का, यावर चर्चा होऊ शकते, मात्र विकसित देशातील बुलेट ट्रेनमध्ये बसून तिचे कौतुक करण्यापेक्षा आपल्या देशातही बुलेट ट्रेन सुरू झाल्याचे पाहणे, हे जास्त सुसंगत आहे.
हा प्रवास आज सर्व नागरिकांच्या वाट्याला येत नसला तरी सार्वजनिक क्षेत्रात हे होत असल्याने क्रयशक्ती असलेलाकोणीही भारतीय नागरिक त्याचा लाभ घेऊ शकणार आहे, हे महत्त्वाचे. अशा चांगल्या प्रवासाची साधने सध्या कमी असल्याने पहिल्या टप्प्यात तसे होऊ शकत नाही. त्याचे कारण पुन्हा एकदा आपली संख्या. दिवाळीपूर्वी रेल्वेने सणासुदीसाठी जादा गाड्यांचे वेळापत्रक जाहीर केले. त्यात अतिरिक्त २.२ लाख बर्थ उपलब्ध करावे लागले आणि ते कमीच आहेत! कारण रेल्वेने दररोज प्रवास करणार्‍या भारतीयांची संख्या आहे २.३ कोटी! म्हणजे सिंगापूरच्या एकूण लोकसंख्येच्या चार पट! रेल्वे प्रवासाचे बुकिंग ज्या आयआरसीटीसी पोर्टल मार्फत केले जाते, त्यासंबंधीची एक आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे. तीनुसार मार्च २०१८ ला संपलेल्या वर्षात त्या पोर्टलवरून २८ हजार ४७५ कोटी रुपयांची तिकिटे विकली गेली आणि तब्बल तीन कोटी नागरिक हे पोर्टल वापरत आहेत. दरवर्षी त्यात १४ टक्क्यांनी वाढ होते आहे. या पोर्टलवर मिनिटाला १५ हजार तिकिटे निघू शकतात. याचा अर्थ चांगल्या प्रवासाच्या अपेक्षा वाढत चालल्या असून त्याला संबंधित यंत्रणाही साद देत आहेत.
आता थोडे विमान प्रवासाविषयी. तेथेही भारतीय नागरिक मागे नाहीत. सप्टेंबर अखेरच्या महिन्यात विमान प्रवास करणार्‍यांच्या संख्येने १० कोटीचा पल्ला पार केला असून ही वाढ १९ टक्के इतकी अधिक आहे. (हा आकडा गाठण्यासाठी पूर्वी एक वर्ष लागले होते.) भारतीय विमानतळे सोयीसुविधांच्या दृष्टीने जगाशी स्पर्धा करू लागली आहेत. ही विमानतळे वाढत्या प्रवाश्यांना सुविधा देऊ शकणार नाहीत, असे आपले प्रश्‍न असल्याने त्यात काही त्रुटी राहतात, त्या आपण किती मोठ्या करायच्या, हे आता आपणच ठरविले पाहिजे. येत्या चार पाच वर्षांत अमेरिका आणि चीननंतर विमान प्रवास करणार्‍यांची संख्या भारतात सर्वाधिक असेल, याकडे केवळ संख्या म्हणून न पाहता प्रवासाविषयीच्या वाढत्या अपेक्षा आणि नव्या सुविधा म्हणून पाहिले पाहिजे.
भारतीय पर्यटक परदेशात जातात, तेव्हा त्यांना आरामदायी क्रुझचे आकर्षण असते. ती सोय आताआतापर्यंत आपल्या देशात नव्हती. पण ज्यांना परदेशी जाणे शक्य नाही, त्यांच्यासाठी मुंबई ते गोवा अलिशान अँग्रीया क्रुझ २० ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. तिच्यात एकाचवेळी ३५० प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. ही सोय चेन्नई आणि कोलकोता येथेही उपलब्ध करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
सर्वसामान्य माणसांचा प्रवास सुखकर होण्यासाठी काय करता येईल, याचा गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. पण त्याच बरोबर आपल्या साधनसंपत्तीच्या मर्यादा लक्षात घेता सतत आणि आता वेगाने त्या सेवा अपग्रेड होत आहेत, हे महत्त्वाचे आहे. तालुक्याच्या गावापर्यंत पोचलेल्या शिवशाही बस असोत की जगाशी स्पर्धा करणारी भारतीय विमानतळे असोत, त्यात येत असलेल्या व्यावसायिकेतेचे स्वागत केले पाहिजे. सुरुवातीस म्हटले तसे या सर्व अपग्रेड होण्याला वाढत्या संख्येमुळे मर्यादा आहेत आणि त्यामुळे त्यात अनेक त्रुटी राहात आहेत. म्हणून अशा भारतीय सेवांना उठसूट बदनाम करण्यापेक्षा त्यात चांगला बदल कसा होईल, असा विचार भारतीय नागरिक म्हणून केला पाहिजे. तेजस एक्सप्रेसची झालेली तोडफोड आणि चोर्‍या, ही एक घटना आहे, पण त्याच वेळी या महाकाय देशात दररोज कोट्यवधी भारतीय नागरिक एकमेकांना समजून घेऊन आनंदाने करत असलेला प्रवास त्यापेक्षा अधिक महत्त्वाचा आहे.•••

Posted by : | on : 18 Nov 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, यमाजी मालकर, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, यमाजी मालकर, स्तंभलेखक (406 of 1371 articles)


तोरसेकर | अयोध्येतील राममंदिरासाठी काही हिंदू संघटनांनी अध्यादेश काढण्याची मागणी आग्रहपूर्वक मांडल्यावर लगेच आता निवडणुकांसाठीच भाजपा हिंदुत्वाचा अजेंडा नव्याने पुढे ...

×