ads
ads
महाआघाडी म्हणजे भ्रष्ट, नकारात्मक विचारांचा मेळावा

महाआघाडी म्हणजे भ्रष्ट, नकारात्मक विचारांचा मेळावा

•पंतप्रधान मोदी यांचा घणाघाती हल्ला, नवी दिल्ली, २० जानेवारी…

आरक्षणामुळे रालोआच्या १० टक्के जागा वाढतील

आरक्षणामुळे रालोआच्या १० टक्के जागा वाढतील

•रामविलास पासवान यांचा दावा, नवी दिल्ली, २० जानेवारी –…

कुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान

कुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान

•लाखो भाविक येण्याची शक्यता, प्रयागराज, २० जानेवारी – उद्या…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

डान्सबार बंदीसाठी नवा अध्यादेश

मुंबई, १८ जानेवारी – राज्यातील डान्सबार पुन्हा सुरू करण्याचा…

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

समृद्धी महामार्गासाठी स्टेट बँक देणार ८५०० कोटींचे कर्ज

►९५ टक्के भूसंपादन पूर्ण, मुंबई, १७ जानेवारी – स्टेट…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

भारताचा पुरुषार्थ प्रकट होण्यास…

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह,…

ऑगस्टा वेस्टलँड

ऑगस्टा वेस्टलँड

॥ चतुरस्त्र : स्वाती तोरसेकर | ऑगस्टा विषयाला हात…

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

तिसरी आघाडी की तीन आघाड्या?

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपा वा…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:14
अयनांश:

नामांतर…

॥ टेहळणी : डॉ.परीक्षित स. शेवडे |

Faizabad Ayodhya

Faizabad Ayodhya

२०१७ मध्ये उत्तरप्रदेशात सत्तेत आलेल्या योगी आदित्यनाथ यांनी, मुगलसरायचे नामकरण दीनदयालनगर असे केले. या घटनेवरून जेमतेम गदारोळ सुरू होतो न होतो तोच त्यांनी, अलाहाबादला प्रयागराज ही आपली जुनी ओळख प्राप्त करून दिली. या घटनेच्या शोकातून पुरोगामी सावरतच होते तोवर त्यांनी फैजाबादचे नामांतर अयोध्या असे केले आणि एकामागोमाग एक असे नामांतराचे निर्णय घेतल्याने, नामांतराची काय आवश्यकता आहे? अशा चर्चांना सर्वत्र तोंड फुटले. नामांतराचे विरोधी असणारे लोक, जगात इतरत्र कुठेही असे नामांतराचे प्रकार होतात का? असे तावातावाने विचारत असतात. त्यांच्याकरता सर्वप्रथम उत्तर देणे आवश्यक ठरेल. हो, जगात अनेक ठिकाणी नामांतरे झालेली आहेत. अगदी आजही होत असतात. केवळ शहरेच नव्हे, तर कित्येक देशांनीही नवीन नावे धारण केली आहेत. काही प्रमुख उदाहरणे पाहू या :
१.ग्रीक साहित्यात पर्शिया असे नमूद केलेले आपले नाव इस्लामी वातावरणात नकोसे वाटल्याने इराण हे नाव धारण केले गेले.
२.१९७० साली कम्पुचिया असलेले नाव १९७१ साली खेमर रिपब्लिक, १९७५ साली डेमोक्रेटिक कम्पुचिया, १९९० साली स्टेट ऑफ कंबोडिया आणि १९९३ साली कंबोडिया असे नामांतरित झाले.
३.ब्रह्मदेश ते बर्मा ते म्यानमार असा म्यानमारचा नामांतरप्रवास आहे.
४.दुसर्‍या विश्‍वयुद्धानंतर अबिसेनियाचे नामांतर इथिओपिया असे करण्यात आले.
५.१९७२ साली सिलोनचे नामकरण रिपब्लिक ऑफ श्रीलंका असे करण्यात आले.
यांव्यतिरिक्त गोल्ड कोस्टचे घाना, फ्रेंच गिनियाचे गिनिया, मेसोपोटेमियाचे इराण, निप्पोनचे जपान, सयामचे थायलंड, मलयचे मलेशिया आणि आपल्याला परिचित असलेले ईस्ट पाकिस्तानचे बांगलादेश, अशी कित्येक उदाहरणे देता येतील. ही सर्व नामांतरे प्रामुख्याने ऐतिहासिक वा सांस्कृतिक मतभेदांमुळेच झाल्याचे आपल्याला आढळेल. शहरांच्या नावाचा विचार करता; पुरोगाम्यांच्या लाडक्या इंग्लंडमध्ये ड्युरोलिपोण्ट- ग्रांटब्रिज- केंटाब्रीजिया- केंब्रिज, एबुराक्म- युफोर्वीक- जॉर्विक- यॉर्क किंवा अमेरिकेचा विचार करता; प्रत्येक राज्यात कमी-अधिक प्रमाणात नामांतरे झालेली आढळतील.
थोडक्यात, जगभरात सर्वत्र अशी नामांतरे होत असतात, हे सत्य आहे. उत्तरप्रदेशातच मायावती सरकारने तब्बल आठ जिल्ह्यांची पूर्वापार नावे बदलून भीमनगर, प्रबुद्धनगर, पंचशीलनगर, कांशीरामनगर, महामायानगर, छत्रपती शाहूजी महाराज नगर, रमाबाईनगर आणि जेपी नगर अशी ठेवली होती. ही नावे २०१२ साली अखिलेश यादवांनी पूर्ववत करत बहजोई, शामली, हापूर, कासगंज, हाथरस, गौरीगंज, कानपूर देहात आणि अमरोहा अशी केली. आजवर मद्रासचे चेन्नई, बॉम्बेचे मुंबई, कोचीनचे कोच्ची अशी नामांतरे झाली आहेतच. २००६ साली तत्कालीन राज्य काँग्रेस शासनाने कर्नाटकातील तब्बल बारा ठिकाणांच्या नामांतराचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता. २०१४ साली त्याला मान्यता मिळाली आणि तेथील शहरांनी सुधारित नावे धारण केली. यातच बेळगावचे बेळगावी असे कन्नडनुसार योग्य नामांतर करण्यात आले. आज नामांतरावरून शिरा ताणून बोलणारे लोक या घटनेविरुद्ध मात्र चकार शब्द बोलले नव्हते.
पूर्वीची ओळख पुसून स्वतःची ओळख एखाद्या ठिकाणावर थोपण्याची मुघली मानसिकता या देशाला नवीन आहे काय? स्वतः औरंगजेबाने, ज्या पुनवडीला मांसाहेब जिजाबाई पुणे म्हणत, त्याला फैजाबाद असे नाव ठेवण्याचे, तर स्वराज्याची राजधानी असणार्‍या रायगडचे नामकरण इस्लामगड असे करण्याचे ठरवले होते. त्याने तसे केले असते, तर गडाचे नाव पूर्ववत रायगड करण्यासही कदाचित या कथित विचारवंतांनी विरोध केला असता! हीच मुघली मानसिकता सर्वाधिक पोसली ती पापस्तानने. तिथे पूर्वापार असलेली हिंदू आणि शीख नावे बदलून इस्लामी नावे थोपण्यात आली. कृष्णनगर आणि देव समाज परिसरचे इस्लामपुरा, संतनगरचे सुन्नतनगर, जैन मंदिर चौकचे बाबरी चौक, ही काही उदाहरणे. हिंदुस्थानात बाबरी प्रकरण झाल्यावर पापस्तानातील कट्टरपंथीयांनी जैन मंदिर पाडून तेथील चौकाचे नामकरणदेखील बाबरी चौक असे केले. याशिवाय क्विंस रोडचे फातिमा जिन्ना रोड, डेव्हिस रोडचे सर आगाखान रोड अशी ब्रिटिश वा ख्रिस्ती नावेही तेथे बदलण्यात आली आहेत. एखाद्या संस्कृतीची साक्ष देणारी आणि वर्षानुवर्षे चालत आलेली नावे बदलून त्यावर आपली नावे कोरण्याची ही कृती नेमकी काय असेल बरे? योगी आदित्यनाथांवर टीकेचा एककलमी कार्यक्रम राबवणारे कथित विचारवंत, यांपैकी कोणत्याही घटनेचा साधा उल्लेखही करत नाहीत, ही सोयिस्कर विस्मृती नव्हे काय?
खरेतर ही पूर्वापार असेलेली आणि परकीय आक्रमकांनी बलात्काराने बदललेली नावे पूर्ववत करण्याच्या निर्णयाचे स्वागत व्हायला हवे, त्यात आक्षेप घेण्यासारखे काय आहे? यापूर्वीही गोरखपूरमधून खासदार राहिलेल्या योगींनी उर्दू बझारचे हिंदी बझार, अलीनगरचे आर्यनगर, मियां बझारचे मायाबाजार, इस्लामपूरचे ईश्‍वरपूर, हुमायूननगरचे हनुमाननगर अशी पूर्वीची नावे परत देण्याचे कार्य केले आहे. म्हणजेच, हे कृत्य हा त्यांचा सत्तेचा तात्कालिक माज नसून अस्मितेचा सार्वकालिक हट्ट आहे आणि त्यात काहीही गैर नाही. परकीय आक्रमणाच्या खुणा खोडून काढल्या नाहीत, तर पुढील पिढीसमोर ते अत्याचारही गुळमुळीत होऊन आक्रमकांविषयीच प्रेम वाटण्याचा स्टॉकहोम सिंड्रोम वाढीला लागतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे गोवा! आजही गोव्यातील अनेक ठिकाणांची नावे पोर्तुगीज उच्चारांप्रमाणेच लिहिली जातात; उदा. पंजिम, बोरीम, सिवोलीम, बिचोलिम इ. स्वाभाविकपणे या नावांशी निर्माण होणारा आपलेपणा पोर्तुगिजांबाबतची भावनाही आधी बोथट आणि मग प्रेमळ बनवून टाकतो. मुघल, ब्रिटिश, पोर्तुगीज यांच्याबाबत द्वेष असावा, असे आमचे मुळीच मत नाही. पण, किमानपक्षी त्यांच्या अन्यायाची जाण तरी असावी? अन्यथा, ज्या बख्तियार खिल्जीने नालंदा विश्‍वविद्यालय उद्ध्वस्त केले, त्याच्याच नावाच्या बख्तियारपूर नामक रेल्वेस्थानकावर उतरून मग नालंदेचे स्थान पाहण्यास जावे लागण्याची नाचक्की आम्ही सहन करत आहोत. ज्या औरंगजेबाने स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांना क्रूरपणे ठार केले; त्याच्याच नावाचे शहर या महाराष्ट्रात पोसण्याचे दुर्दैव आमच्या भाळी लिहिले आहे. याहून मोठा विरोधाभास काय असेल बरे? ही स्थिती कमी करण्यास योगी आदित्यनाथ यांचे निर्णय स्तुत्य आहेत. त्यांच्याकडून बोध घेत महाराष्ट्र शासन पाऊल कधी उचलणार, हा खरा प्रश्‍न आहे. छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, अंबिकानगर हे औरंगाबाद, उस्मानाबाद आणि अहमदनगर या नावांपासून कायमची मुक्तता मिळवण्यास वाट पाहात आहेत! •••

Posted by : | on : 18 Nov 2018
Filed under : आसमंत, डॉ.परीक्षित स. शेवडे, पुरवणी, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, डॉ.परीक्षित स. शेवडे, पुरवणी, स्तंभलेखक (183 of 1153 articles)

A G Noorani
विश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले | याचाच साध्या भाषेतला अर्थ असा की, ते हिंदुत्वविरोधक आहेत. पण, असं म्हणायचं नाही बरं ...

×