ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी » पावलं शाश्‍वत विकासाची…

पावलं शाश्‍वत विकासाची…

॥ थोडं वेगळं : शुभांगी रथकंठीवार |

हे ‘वॉशिंग्टन अकोर्ड’ आहे तरी काय? हे आहे एक इंटरनॅशनल अ‍ॅग्रिमेंट, ज्याद्वारे जे प्रोफेशनल इंजिनीअरिंग प्रोग्रॅम्स बेसिक अ‍ॅकेडेमिक रिक्वायरमेंटस् पूर्ण करतात आणि नॅशनल बॉडीजमार्फत ‘अक्रेडिट’ होतात, त्यातून निघालेल्या इंजिनीअरिंग ग्रॅज्युएटस्ना इंटरनॅशनल रेकग्निशन मिळतं. आज भारतात फार प्रमाणावर अभियांत्रिकी महाविद्यालये निघाली आहेत. त्यातून अनेक ग्रॅज्युएटस् बाहेर पडत आहेत. त्यांच्या कौशल्याचा दर्जाविषयक ‘सर्व्हे’ केल्यानंतर आपल्या हाती येते फक्त निराशा आहे. मात्र प्रश्‍न आहे, जे इंजिनीअरिंगची डिग्री घेऊन बाहेर पडत आहेत, त्यांना आपण ‘कॅपेेबल इंजिनीअर्स’ म्हणू शकतो का? त्या सर्वांना नोकरी मिळेल का? त्यांना जगाच्या पातळीवर मान्यता मिळेल का?

Application Development

Application Development

२०१९ या नववर्षाची सुरुवात झालीये! दरवर्षी आपण नवीन संकल्प, संकल्पनांसह नव्या वर्षाचे स्वागत करतो. मात्र, वर्षाच्या शेवटी आढावा घेतला, तर असं लक्षात येतं, बरंच काही करायचं राहून गेलंय्! आमच्या प्राध्यापककक्षातील चर्चेतून निघालेला एक निष्कर्ष! काहीसा अपूर्ण वाटणारा, मात्र फार वरवरचा नाही! जे संकल्प आपण मनात ठेवले आहेत, ते पूर्णत्वास नेण्यासाठी आपला ‘अ‍ॅक्शन प्लॅन’देखील सखोल विचारान्ती बनायला हवा. तरीदेखील आपण ठरवलेलं सारंकाही पार पाडलं आहे, असं आपल्याला कधीच वाटत नाही!
एक प्राध्यापिका या नात्याने तसेच खणउएए म्हणजे अर्थात ‘इंडो-यूएस कोलॅबोरेशन फॉर इंजिनीअरिंग एज्युकेशन’ या जागतिक पातळीवर अत्यंत प्रभावी ठरलेल्या इंटरनॅशनल फोरमची ‘कन्सॉरशियम लीडर’ या नात्याने जानेवारीमध्ये मनात काही संकल्प ठेवले होते. (गृहिणी या नात्याने यासोबत रोजच संकल्पबांधणी आणि त्याविषयक ‘अ‍ॅक्शन प्लॅन’मध्ये सातत्याने बदल होत असतात! त्यामुळे नववर्षातील संकल्पात त्याचा समावेश करत नाही! ही एक सतत प्रक्रिया असते. (अर्थात, ही झाली विनोदाची बाब!) त्याआधी विभागप्रमुख या नात्याने आणखी काहींची भर होती. इतरांप्रमाणे मलादेखील दिवसाचे चोवीस तास मिळतात, त्यामुळे ‘क्वालिटी आऊटकम’ मिळण्यासाठी वेळेचं योग्य नियोजन आलंच.
माझं मन आज भूतकाळातील काही महत्त्वपूर्ण पानांवर केंद्रित होतंय्. कारण माझी आजची विचारधारा आणि माझं आजचं एकंदरीत व्यक्तिमत्त्व यावर या पानांचा आणि सुवर्णरेखित घटनांचा फार मोठा प्रभाव आहे. अनेक जबाबदार्‍या पार पाडताना मूळ शिक्षकी पेशाला मी पुरेपूर न्याय देऊन विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत विशेषत्वाने लक्ष देऊ शकते.
गेल्या दशकात आमच्या लक्षात आलं होतं, की जे देश ‘वॉशिंग्टन अकोर्ड’चे सिग्निंटरी मेम्बर्स आहेत, त्यांनी त्यांच्या शिक्षणप्रणालीत महत्त्वपूर्ण बदल घडवून आणले आहेत. हे ‘वॉशिंग्टन अकोर्ड’ आहे तरी काय? हे आहे एक इंटरनॅशनल अ‍ॅग्रिमेंट, ज्याद्वारे जे प्रोफेशनल इंजिनीअरिंग प्रोग्रॅम्स बेसिक अ‍ॅकेडेमिक रिक्वायरमेंटस् पूर्ण करतात आणि नॅशनल बॉडीजमार्फत ‘अक्रेडिट’ होतात, त्यातून निघालेल्या इंजिनीअरिंग ग्रॅज्युएटस्ना इंटरनॅशनल रेकग्निशन मिळतं.
आज भारतात फार प्रमाणावर अभियांत्रिकी महाविद्यालये निघाली आहेत. त्यातून अनेक ग्रॅज्युएटस् बाहेर पडत आहेत. त्यांच्या कौशल्याचा दर्जाविषयक ‘सर्व्हे’ केल्यानंतर आपल्या हाती येते फक्त निराशा आहे. मात्र प्रश्‍न आहे, जे इंजिनीअरिंगची डिग्री घेऊन बाहेर पडत आहेत, त्यांना आपण ‘कॅपेेबल इंजिनीअर्स’ म्हणू शकतो का? त्या सर्वांना नोकरी मिळेल का? त्यांना जगाच्या पातळीवर मान्यता मिळेल का?
सुदैवाने ऑक्टोबर २००८ ला युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कली येथे माझं संशोधन सादर करण्यासाठी मला आमंत्रित करण्यात आलं आणि त्यानिमित्ताने तिथल्या प्रोफेसर्ससोबत भेटी घेता आल्या. जागतिक क्रमवारीत ही युनिव्हर्सिटी आहे तिसर्‍या क्रमांकावर. या युनिव्हर्सिटीतील नोबेल लॉरेटस्ची संख्या तब्बल ६९. त्यातून तिथल्या प्राध्यापकांचे संशोधनपर लेख, पुस्तकं मी रेफर केलेले! ट्रॅडिशनल सायन्स आणि मॅथेमॅटिक्स क्षेत्रात ‘अनसर्टन्टी’चा कन्सेप्ट नव्याने आणणार्‍या फझी लॉजिकचे प्रणेते आणि माझ्या दृष्टीने सॉफ्ट कॉम्प्युटिंगचे ‘भीष्म पितामह’ डॉ. लोटफी जादेह यांच्यासारख्यांना मी ‘देव’ मानलेलं! माझ्या अंतर्मनाच्या गाभार्‍यात ज्यांच्या प्रतिमा वास्तव्य करून आहेत, ज्यांनी माझ्या प्राध्यापकी पेशात मला उत्तमोत्तम, दर्जेदार आणि प्रामाणिक कार्य करण्यास कायम प्रेरणा दिली, माझ्यासाठी ‘ऊर्जास्रोत’ ठरले, अशा पूजनीय व्यक्तींपैकी डॉ. लोटफी जादेह हे एक! युसी, बर्कली येथे जायचं, म्हणजे त्यांची साक्षात भेट! माझ्या आणखी काही स्वप्नांचा उगम! आणि त्यामुळे तिथे जाण्यात आणि माझं रिसर्च प्रेझेंट करण्यात मला विशेष स्वारस्य होतं. नजर सरळ ठेवून वाटचाल करताना उजळत्या क्षितिजाकडेच आपलं आयुष्याचं मार्गक्रमण आहे, याची जाणीव होणं किती सुखदायक असतं, याचा अनुभव आला.
तेथील रिसर्च कल्चर, रिसर्च फॅसिलिटीज, इंडस्ट्री कनेक्टस् बघितल्यानंतर आपल्या देशातील काही बाबींचा अभाव प्रकर्षाने जाणवला.
आमच्या विद्यार्थ्यांना आपण ग्लोबल रेलेव्हंट बनवू शकतो का? आम्हाला सक्षम अभियंते बनवायचे आहेत, मात्र आमच्या क्षमता मर्यादित तर नाहीत? आमच्याजवळ संबंधित विषयांचे पुरेसे ज्ञान आहे, मात्र त्यावर आधारलेले सोशल प्रोजेक्टस् आम्ही विद्यार्थ्यांकडून बनवून घेऊ शकतो का? आम्हा प्राध्यापक मंडळीजवळदेखील पुरेसे ‘ग्लोबल रेलेव्हंट नॉलेज’ आहे का? विद्यार्थ्यांमध्ये प्रोफेशनल स्किल्स, टेक्निकल स्किल्स, टेक्निकल स्किल्स घडवण्याचं काम आम्ही समर्थपणे करू शकतो का? त्यांच्यामध्ये ‘क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन्स’ या गोष्टींची आवड निर्माण करू शकतो का? टीचिंग लर्निंग प्रोसेसमध्ये काही परिवर्तन आणू शकतो का? आम्हाला कटिंग इज टेक्नॉलॉजीशी सहजतेने जुळवून घेता येतं का? आमच्यामध्ये सातत्याने संशोधन करण्याची भावना जागृतावस्थेत आहे का? आमच्यामध्ये पुरेशा लीडरशिप क्वालिटीज डेव्हलप झाल्या आहेत का?… प्रश्‍न अनेक होते.
माझ्यासारख्या खासगी महाविद्यालयात काम करणार्‍या प्राध्यापिकेला पडलेले हे प्रश्‍न! त्यातून हाती अधिकार नाही! वातावरण असे, की ‘या सर्व बोलण्याच्या गोष्टी! आणि इन्स्पेक्शन कमिटी आल्यावर त्यांच्यावर इम्प्रेशन पाडण्यासाठी भ्रामक डॉक्युमेंटेशनमधून शब्दांच्या बुडबुड्याला दिलेला आकार यापलीकडे काही नाही!’ असं तुच्छ वक्तव्य करून तुमच्या स्वप्नांना संपवण्याचा प्रयत्न!
तसं बघायला गेलं, तर त्यांच्या प्रत्येक शब्दामध्ये काहीसं तथ्य आहे. इंडस्ट्री कनेक्टस् बनले, तरच इंडस्ट्री प्रोजेक्टस् हाताळायला मिळणार! यासाठी पुरेसं इंडस्ट्री-इंस्टिट्यूट इंटरअ‍ॅक्शन हवं! वारंवार येणार्‍या कमिटीज, त्यांच्यासाठी लागणार्‍या डॉक्युमेंटेशनचे वैविध्य आणि यात कायम चक्रव्यूहागत गुंतला गेलेला प्राध्यापकवर्ग तसाच रिसर्च आणि टीचिंग लर्निंगपासून काहीसा दूर गेलेला! वैयक्तिक पातळीवर कसा करेल बिचारा इंडस्ट्री कनेक्टस्? कुठून आणणार इनोव्हेशन्स? दैनंदिन कामात रिसर्च इन्स्टिट्यूटस्, रिसर्च फन्डिंग एजन्सीज यांच्यासोबत संपर्क साधण्यासाठी वेळ काढू शकतो? दिवसाचे तर चोवीसच तास असतात ना! पण मग बाकी प्रगत देशात काय वेगळं घडत असेल? इंट्रोेस्पेक्टिव्ह अप्रोच सर्वांनाच घेणं आवश्यक!
नॅशनल बोर्ड ऑफ अक्रेडिटेशनने २००३ साली आमच्या विभागाला पाच वर्षांसाठी मान्यता दिली होती. पुढच्या मान्यतेसाठी आमची तयारी सुरू होती. ‘वॉशिंग्टन अकोर्ड’ केवळ ऐकून माहीत होते. आपण आजवर आऊटपुट बेस्ड काम केलं! मग हे ‘आऊटकम बेस्ड एज्युकेशन’ काय असतं? ज्यावेळेस मी युसी, बर्कलीमधील प्राध्यापकांशी २००८ साली शिक्षण प्रणालीविषयक चर्चा केली, तेव्हा असेच काही टर्म्स त्यांच्या तोंडी होते.
माझ्या कार्यक्षेत्रात आणि अधिकारक्षेत्राच्या मर्यादेत राहून, शाश्‍वत विकासाची काही पावलं टाकून मी माझी क्षितिजं उजळू शकते का? कॉन्फरन्स आटोपून भारतात आल्यावर आधी आपल्या भारतातील वाटचालीचा जमेल तितका आढावा घेतला.
युनिव्हर्सिटी ऑफ मॅसॅच्युसेटस्, लॉवेल येथे एमेरिटस प्रोफेसर म्हणून कार्यरत डॉ. कृष्णा वेदुला यांनी इंजिनीअरिंग एज्युकेशनमध्ये ज्या प्रकारे परिवर्तन आणण्याचे प्रण केलेे, त्याची उंची आणि खोली अनुभवून थक्क झाले. माननीय नारायण मूर्ती, सुधा मूर्ती, देश देशपांडे आणि जयश्री देशपांडे यांनीदेखील आपल्या स्वप्नांची जोड या परिवर्तनात्मक कार्याला दिली होतीच!
मनात विचार आला, मी त्यांच्या या वाटचालीत एक छोटा वाटा उचलू शकते का? आणि ती संधी अनायासे चालून आली.
मेघे समूहाने मला ‘इंटरनॅशनल रिलेशन्स ऑफिस’मध्ये डेप्युटी डायरेक्टर बनवलं. त्या अनुषंगाने खणउएए म्हणजे अर्थात तत्पूर्वीचे ‘इंडो-यूएस कोलॅबोरेशन फॉर इंजिनीअरिंग एज्युकेशन’ आणि आताचे ‘इंडो-युनिव्हर्सल कोलॅबोरेशन फॉर इंजिनीअरिंग एज्युकेशन’ या जगन्मान्य आणि अत्यंत प्रभावी पद्धतीने काम करणार्‍या आणि एका प्लॅटफॉर्मवर देश-विदेशातील युनिव्हर्सिटीजचे कुलगुरू, प्र-कुलगुरू, वरिष्ठ प्राध्यापक, संशोधक, विविध अक्रेडिटेशन बॉडीज, इंडस्ट्रीज, गव्हर्नमेंट बॉडीज, फन्डिंग एजन्सीजचे टॉप ऑफिशियल्स, स्टुडंटस् बॉडीज यांना एकत्र आणून अभियांत्रिकी क्षेत्रात अभिनव पद्धतीने परिवर्तन आणू इच्छिणार्‍या इंटरनॅशनल फोरमची ‘कन्सॉरशियम लीडर’ म्हणून काम करण्याची संधी मिळाली.
एक प्राध्यापक म्हणून, संशोधक म्हणून आणि लीडर म्हणून घेतलेले काही अ‍ॅकेडेमिक कोलॅबोरेटिव्ह इनिशिएटिव्हज विद्यार्थ्यांच्या कामी आले. आज जगातील अग्रक्रमावरील युनिव्हर्सिटीजमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेऊन मोठ्या पदावर ते कार्यरत आहेत!

Posted by : | on : 13 Jan 2019
Filed under : आसमंत, पुरवणी.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी (114 of 885 articles)

Vivekanand Savarkar Sahitya Samlen
विशेष : विवेक कवठेकर | मेंदूला काहीशा झिणझिण्या आणणारी शब्दयोजना म्हणजे कुठलाही ‘व्याख्या’विषय! ‘सहितस्य भाव: साहित्यम्’ अशी साहित्याची संस्कृत व्याख्या. ...

×