ads
ads
आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

•न्यायव्यवस्था बदनाम करण्याचा हा सुनियोजित कट, •सर्वोच्च न्यायालयाचा संताप,…

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

•पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्ला, दरभंगा, २५ एप्रिल – आतापर्यंत पाकिस्तानची…

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मुंबई, २४ एप्रिल – राग, नाराजी असे माणसाच्या स्वभावाचे…

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

•अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण, वॉशिंग्टन, २४ एप्रिल –…

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

•मृतांची संख्या ३२१, भारतीयांचा आकडाही वाढला, ४० जणांना अटक,…

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

•चीनने व्यक्त केली भीती, बीजिंग, २३ एप्रिल – इराणकडून…

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

•राहुल गांधी यांनी स्वीकारला •विरोधी पक्षनेतेपदही सोडले •काँग्रेसला आणखी…

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

•खोट्या जाहिरातींचे प्रकरण, मुंबई, २२ एप्रिल – शेतकर्‍यांना पाच-दहा…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 18:44
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, ल.त्र्यं. जोशी, स्तंभलेखक » प्रचार संपला, आता प्रतीक्षा निकालाची

प्रचार संपला, आता प्रतीक्षा निकालाची

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी |

लढाईची ही झाली एक आघाडी. ती जिंकून काम भागत नाही. तिचा लाभ घेणारी बुथपातळीपर्यंत सक्रिय असलेली यंत्रणा जोपर्यंत मजबूत होत नाही तोपर्यंत या मैदानी युध्दाला काहीही महत्व नाही. ती यंत्रणा मजबूत करण्याचे काम भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केले आहे. या पाच राज्यांच्या निवडणुकीतही त्यांनी ही बुथ यंत्रणा पान यंत्रणेपर्यंत नेली आहे. प्रत्येक बुथवरील मतदारयादीतील प्रत्येक पानाचे प्रमुख त्यांनी नेमले आहेत व त्यांच्या माध्यमातून आपल्या मतदारांचे शतप्रतिशत मतदान कसे होईल याची काळजी घेणारी यंत्रणा त्यांनी विकसित केली आहे. तिचा परिणाम काय होतो हे निकलाच्या दिवशी दिसेलच.

Mp Chattisgarh Rajasthan Mizoram Election

Mp Chattisgarh Rajasthan Mizoram Election

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीची उपान्त्य फेरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या पाच राज्य विधानसभांच्या निवडणुकीतील मतदान हा मजकूर प्रसिध्द होईल तेव्हा आटोपलेले असेल आणि सर्वांनाच या निवडणुकीच्या निकालांची प्रतीक्षा असेल. ११ डिसेंबर रोजी तीही पूर्ण होईल आणि सर्व राजकीय पक्ष २०१९च्या तयारीला लागले असतील. या विधानसभा निवडणुकींचे निकाल काय, लागणारच आहेत. कुणाला तरी बहुमत मिळणार, कुणाचा तरी पराभव होणार. त्रिशंकु सभागृह तयार झाले तर थोडी ओढाओढी होणार, हे ठरलेलेच आहे. पण २०१९ मध्ये काय होऊ शकते याचा संकेत मात्र या निकालांमधून अपेक्षित आहे. किंबहुना हेच त्याचे खरे महत्व आहे. तसे पाहिले तर प्रत्येक निवडणूक स्वतंत्र व तिच्यासारखी तीच असते. दोन निवडणुकींचा परस्परांशी संबंध असू शकत नाही. पण प्रत्येक निवडणूक ही प्रतिमेची (परसेप्शनची) लढाई बनल्यामुळे थोडा तरी परिणाम होतोच.
या निवडणुकीतील प्रचाराबद्दल सांगायचे झाल्यास आता भारतात प्रस्थापित झालेल्या प्रचारप्रणालीचाच या निवडणुकीतही प्रत्यय आला आणि दुसरी कोणती नवी प्रचार प्रणाली आविष्कृत होईपर्यंत तरी हीच प्रणाली आणखी काही काळ वापरली जाणार आहे. तशी ही प्रणाली २०१४ पासून अंमलात येऊ लागली आणि पुढील काही वर्षे तीच अंमलात राहणार आहे. फार दूरचा नव्हे पण एक काळ असा होता जेव्हा निवडणूक प्रचार काही व्यापक मुद्यांभोवती फिरविला जात असे. किमान तसा प्रयत्न तरी होत असे. १९७१ ची निवडणूक ‘गरिबी हटाव’ भोवती फिरत होती तर १९७७ ची निवडणूक आणिबाणीभोवती फिरत होती. ‘शायनिंग इंडिया’ भोवती फिरलेली २००४ ची निवडणूक ही त्या प्रणालीतील शेवटची निवडणूक. २००९ मध्ये ती प्रणाली चाचपडत असतांनाच २०१४ ची निवडणूक ही नवी प्रणाली घेऊन आली आणि आणखी काही काळ राजकीय पक्षांना तिचाच वापर करावा लागणार आहे.
सामान्यत: निवडणूक प्रचार म्हटला म्हणजे राजकीय पक्षांनी आपापले निवडणूक जाहीरनामे किंवा घोषणापत्र तयार करणे आणि आपण त्या जाहीरनाम्याची अंमलबजावणी कशी करणार आहोत हे लोकांना सांगण्याचा प्रयत्न करणे हे रुढ झाले होते. नेत्यांच्या जाहीर सभांमधून, पत्रकार परिषदांमधून त्यावरच लक्ष केंद्रित केले जात असे. भिंती रंगविणे, भिंतिपत्रके ठळक जागी चिटकविणे, सायकलफेर्‍या वा पायी मिरवणुकी काढणे, उमेदवारांनी वस्त्यावस्त्यांमधून मतदारांच्या भेटी घेणे आणि मतदानाच्या दिवशी आपापल्या मतदारांना मतदानकेंद्रांवर आणणे म्हणजे निवडणूक प्रचार असे मानले जात असे. पण संगणकयुग आले, संवादक्रांती झाली आणि निवडणूक प्रचाराचे स्वरुपच बदलले. त्या काळात निवडणूक हे एक आंदोलन होते. ‘शेतकर्‍यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याचे आंदोलन म्हणून आम्ही निवडणुकीकडे पाहतो’ असे शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी म्हणत असत. पण आता मात्र निवडणूक हे एक युध्द बनले आहे. त्यात शस्त्रे वापरली जात नाहीत पण तेवढे सोडले तर आजची निवडणूक एखाद्या युध्दासारखीच बनली आहे. एके काळी ‘युध्दात आणि प्रेमात काहीही वर्ज्य नसते’ असे म्हणण्याची रीत होती. त्यात ‘निवडणूक’ हा शब्द केव्हा शिरला हे आपल्याला कळलेच नाही.
नोव्हेंबर डिसेंबरमध्ये झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील प्रचारामध्येही आपल्याला तेच दिसून आले. किंबहुना २०१४ नंतर झालेल्या सर्वच विधानसभा निवडणुकींमध्ये त्याचेच प्रतिबिंब उमटत गेले. अलीकडेच झालेल्या गुजरात, हिमाचल प्रदेश, पंजाब, कर्नाटक, त्रिपुरा विधानसभांच्या निवडणूक प्रचाराचे सिंहावलोकन केले तर आपल्याला त्याचाच प्रत्यय येईल.
नव्याने प्रस्थापित झालेल्या या निवडणूक प्रचार प्रणालीतही राजकीय पक्षांचे निवडणूक जाहीरनामे प्रकाशित केले जातात. एकेकाळी ते सविस्तर असत, आता ते आक्रसले आहेत. त्यांची नावेही बदलली आहेत. कुणी त्याला घोषणापत्र म्हणतो तर कुणी संकल्पपत्र म्हणतो. कुणाला त्यांचा उल्लेख वचननामा म्हणून करावासा वाटतो. पण प्रत्यक्षात त्यांचा वापर जेवणातल्या कोशिंबिरी किंवा चटणी या पलिकडे केला जात नाही.
या प्रचारप्रणालीचे वैशिष्ट्य म्हणजे निवडणुकीचे मुद्दे प्रचार सुरु असतांनाच तयार केले जातात. घोषणापत्र, जाहीरनामा किंवा वचननाम्याशी त्यांचा काहीही संबंध नसतो आणि ते स्वाभाविकही आहे. कारण उमेदवार किंवा राजकीय पक्ष यांना प्रचारासाठी जेमतेम तीन आठवड्यांचा अवधी मिळतो. त्या काळात एखाद्या राजकीय पक्षाने जाहीरनामा समजावून सांगण्याचेच ठरविले तर एक तर तो प्रकार एकसुरी ठरेल, बेचव ठरेल. कारण कोणत्या राजकीय पक्षाचे ध्येयधोरण आणि कार्यक्रम कोणता आहे, हे लोकांना अगोदरच ठाऊक असते. त्याच्या बौध्दिक चर्चेत कुणालाही रस वाटणार नाही. शिवाय निवडणूकप्रचार हे एकप्रकारे प्रतिमेचे (परसेप्शनचे) युध्द बनले आहे. तुमची प्रतिभा किती उत्कट आहे यापेक्षा प्रतिमा कशी उत्कट आहे याला तेथे महत्व असते. त्यासाठी वैचारिक विश्‍लेषणात वेळ घालविण्यापेक्षा प्रतिस्पर्ध्यावर आक्रमण करणे महत्वाचे असते. त्यासाठी विरोधक काय बोलतात हे पाहायचे असते, त्यातील आपल्याला आक्रमणासाठी कोणते सोयीचे आहे हे हेरावे लागते, त्याचा मिळणार्‍या वेळात अभ्यास करावा लागतो व विरोधकांवर नेम धरुन आघात करावा लागतो. तो आघात विरुध्द बाजूला उत्तर देण्यास बाध्य करणारा मात्र असला पाहिजे. या प्रणालीचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे प्रतिस्पर्ध्याच्या प्रश्‍नांना उत्तरे देण्याच्या भानगडीत पडायचे नसते. तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करणे म्हणजे बचावाचा पवित्रा घेण्यासारखे ठरते आणि प्रतिमेच्या या लढाईत ते परवडणारे नसते. कारण कोणत्याही लढाईत आक्रमकालाच फायदा मिळत असतो. तीन आठवड्यांच्या या लढाईत तर तेच अपरिहार्य आहे.
कोणत्या मुद्याला वा शब्दाला धरुन आक्रमण करायचे हे मात्र कसलेल्या योध्यालाच जमते. गुजरात विधानसभा निवडणुकीत मणीशंकर अय्यर यांनी मोदींसाठी ‘नीच’ शब्द उच्चारला आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत मोदींनी त्याचा संबंध भारत पाक संबंधांशी जोडला. त्यात त्यांनी मनमोहनसिंगानाही ओढले. काँग्रेसने मणिशंकरांना बडतर्फ केले, ‘त्या’ बैठकीचा खुलासाही केला पण तोपर्यंत मोदींनी बाजी मारली होती. कारण असाच अनुभव ‘मौतका सौदागर’च्या निमित्ताने त्यांनी जुन्या निवडणुकीत घेतला होता. जवळपास तसलेच आक्रमण त्यांनी कर्नाटक निवडणुकीतही केले होते. राहुलला कागदाकडे न पाहता पंधरा मिनिटे भाषण करण्याचे आव्हान देऊन तर त्यांनी काँग्रेसची गोची करुन टाकली होती. अर्थात त्यासाठी मोदींसारखा तल्लख मेंदू नेत्याकडे असावा लागतो. येर्‍यागबाळ्याचे ते काम नाही.
या पाच राज्यांच्या निवडणूक प्रचारातही असेच घडले. ‘भारतमाताकी जय’ हा काय प्रचाराचा मुद्दा असू शकतो? पण काँग्रेसच्या एका सभेत भारत माताकी जय म्हणणार्‍याचे तोंड दाबण्यात आल्याचा व्हिडिओ उघड झाला आणि त्या मुद्याचा जन्म झाला. त्या कार्यकर्त्याचे तोंड दाबून त्याला ‘सोनियाकी जय, राहुलकी जय’ म्हणायला भाग पाडणे हा नंतरचा भाग. मोदी भारतमाताकी जय म्हणतात याला राहुलने आपल्या बुध्दीनुसार आक्षेप घेतला. पण मोदी एवढे चतुर की, त्यांनी राहुलच्या म्हणण्याचे ‘फतव्या’त रुपांतर करुन टाकले आणि काँग्रेस पक्ष भारतमातेच्या विरोधात असल्याचा आभास उत्पन्न केला. अशी किती तरी भाराभर उदाहरणे देऊन या नव्या प्रणालीची फोड करता येऊ शकेल. इथे आक्रमणासाठी योग्य आणि कमीतकमी शब्दांची निवड करावी लागते. प्रतिपक्षाच्या आक्रमणाला त्याच्यापेक्षा अधिक प्रखरतेने प्रत्याक्रमण करावे लागते. त्यासाठी फार वेळ उपलब्ध नसतो. आक्रमण वा प्रत्याक्रमणासाठी अचूक आणि चपखल शब्द निवडावा लागतो. तो क्षण आणि तो शब्द तुमच्या हातून सुटला की, मग काही केल्या तुम्हाला सूर गवसतच नाही. चालू पाच राज्यातील निवडणुकींसह गेल्या काही निवडणुकीतील प्रचारप्रणालीचा अभ्यास केला तर आपल्या हे लक्षात येईल.
या प्रणालीत सांकेतिकतेलाही अनन्यसाधारण महत्व आहे.पण ती आपल्या फायद्यासाठी वापरता यायला हवी. त्याची चेष्टा करण्याची प्रतिपक्षाला संधी मिळणार नाही याची काळजीही घ्यावी लागते. ती जर घेतली नाही तर राहुल गांधींच्या मंदिर प्रदक्षिणेसारखी स्थिती होते. आताआतापर्यंत काँग्रेस पक्ष स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवून भाजपा मुस्लिमविरोधी असल्याचा प्रचार करीत होता. त्यातून काँग्रेसची ‘मुस्लिम पार्टी’ म्हणून तयार झालेली प्रतिमा पुसून टाकण्यासाठी राहुल गांधींनी मंदिरांचे उंबरठे झिजविणे सुरु केले. पण असा प्रयोग पूर्ण तयारीनिशी करायचा असतो हे राहुलला कुणी शिकविले नाही. त्यामुळे त्यांचे हसे झाले.
या नव्या प्रचारप्रणालीला जोड मिळाली ती नव्यानेच विकसित होत असलेल्या ‘सेफालॉजी’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या निवडणूक अंदाज शास्त्राची. प्रत्येक निवडणुकीत त्याचा वापर केला जातो पण तोही केवळ प्रचारासाठीच. मतदारांची वेळोवेळी केली जाणारी सर्वेक्षणे, एक्झिट पोल आदी माध्यमातून निकालांचा अंदाज किती येतो हे सांगणे कठिण आहे पण निवडणुकींबाबत लोकांच्या मनात रुची निर्माण करण्यासाठी त्यांचा उपयोग निश्‍चितच होतो. जनमताची दिशाही त्यातून कळू शकते. एकंदरीत निवडणूक प्रचारप्रणाली हेही एक शास्त्रच बनू पाहत आहे.
अर्थात लढाईची ही झाली एक आघाडी. ती जिंकून काम भागत नाही. तिचा लाभ घेणारी बुथपातळीपर्यंत सक्रिय असलेली यंत्रणा जोपर्यंत मजबूत होत नाही तोपर्यंत या मैदानी युध्दाला काहीही महत्व नाही. ती यंत्रणा मजबूत करण्याचे काम भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केले आहे. या पाच राज्यांच्या निवडणुकीतही त्यांनी ही बुथ यंत्रणा पान यंत्रणेपर्यंत नेली आहे. प्रत्येक बुथवरील मतदारयादीतील प्रत्येक पानाचे प्रमुख त्यांनी नेमले आहेत व त्यांच्या माध्यमातून आपल्या मतदारांचे शतप्रतिशत मतदान कसे होईल याची काळजी घेणारी यंत्रणा त्यांनी विकसित केली आहे. तिचा परिणाम काय होतो हे ११ डिसेंबरला दिसेलच.

Posted by : | on : 9 Dec 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, ल.त्र्यं. जोशी, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, ल.त्र्यं. जोशी, स्तंभलेखक (345 of 1372 articles)

Handicap
प्रासंगिक : राजकुमार बडोले | आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन का साजरा केला जातो, असा प्रश्‍न अनेकांना पडला असेल. त्याचे उत्तर दिले ...

×