ads
ads
आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

•अभिनंदन प्रकरणी पाकिस्तानला इशाराच दिला होता •पंतप्रधान मोदी यांचा…

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

•११५ जागांसाठी उद्या मतदान, नवी दिल्ली, २१ एप्रिल –…

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पिंपरी चिंचवड, २१ एप्रिल – पवार कुटुंबाने शिक्षणाच्या माध्यमातून…

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

•४५० जखमी, मृतांमध्ये ३५ विदेशी •तीन चर्च पूर्ण उद्ध्वस्त,…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, भाऊ तोरसेकर, स्तंभलेखक » प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

प्रतिमा आणि प्रतिकांची लढाई

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर |

उलट मोदी व भाजपा यांनी एकमुखी नेतृत्व, एकदिलाने लढाई अशी प्रतिमा मोदींनी उभी केलेली नाही काय? कारण त्यांना निवडणूक व बहूमत जिंकायचे आहे आणि ते एका प्रभावी प्रतिमेतून शक्य असल्याची जाणिव त्यामागे आहे. आजकाल लोकांना स्थीर सरकार व एकपक्षीय खंबीर सरकारचा अर्थ उमजलेला आहे. त्यावर मात करण्यासाठी तरी विरोधकांनी आघाड्या व जागावाटपात समजूतदारपणा दिसेल याची काळजी घ्यायला हवी होती. अधिक जागा मागण्यापेक्षा वाट्याला येतील त्यातील अधिक जागा जिंकण्याला प्राध्यान्य द्यायला हवे होते. संघटनात्मक शक्ती वाढवून भाजपाशी दोन हात करायला सज्ज व्हायला हवे होते. त्याचा कुठे मागमूस दिसतो काय? प्रतिक व प्रतिमा यात मोदी मतदानापुर्वीच जिंकलेले दिसतात ना?

Modi Campaign

Modi Campaign

आजही अश्‍वारूढ शिवरायांचा पुतळा प्रत्येक मराठी माणसाला आणि भारतीयाला भुरळ घालतो. त्याच्या हातात उपसलेली तलवार असेल, तर छाती भरून येते. पण किती लोक आज तलवारीने युद्ध करण्याची कल्पना करू शकतात? मोठ्या नेत्याला सन्मानाने आजही तलवार भेट दिली जात असते. तेव्हा ती तलवार प्रतिक झालेली असते. प्रत्येक शीखधर्मिय कंबरलेला खंजीर वा तलवार लावून जगतो. वरीष्ठ सेनाधिकारीही सन्मानपुर्वक तलवार मिरवत असतात. पण ते हत्यार उरलेले नाही. त्यापेक्षा भेदक शस्त्रास्त्रे आता विकसित झालेली आहेत. पण तरीही जगात आजही त्यांचा प्रतिक म्हणून वापर होत असतो. आयसीस सारखी संघटना किंवा सौदी अरेबियासारखा देश, तलवार आपल्या मानचिन्हात सहभागी करून घेतात. मात्र त्यांचा प्रत्यक्ष युद्धात उपयोग राहिलेला नाही. त्याप्रमाणेच जगण्यातल्या व युद्धातल्या अनेक सुविधा व रणनिती बदलून गेलेली आहे. कालबाह्य ठरलेल्या अशा हत्यारे वा उपायांनी आज युद्ध जिंकता येत नाही, की लढवताही येत नाही. अगदी विविध खेळात किंवा व्यापार व्यवहारातही नियम व पद्धती पुरत्या बदलून गेल्या आहेत. त्यात नव्या कल्पना विकसित झाल्या आहेत. त्यामुळे नव्याच पद्धतीने नव्या लढाया जिंकाव्या लागत असतात. मग त्यातून लोकशाहीतल्या निवडणूका कशा सुटू शकतील? स्वातंत्र्योत्तर काळातील आरंभीच्या निवडणूका व १९७० नंतरच्या जमान्यातील निवडणूका; यात मोठा फरक पडला होता आणि १९९० नंतर आणखी बदल झाले. नवनवी साधने उपयोगात आणली जाऊ लागली आणि नवी तंत्रे विकसित होत गेली. नेतृत्वाचे नवे चेहरे व स्वभाव कार्यशैली उगम पावली. २०१४ ची निवडणूक आजवरच्या सर्व निवडणूकांच्या पद्धतीला व निकालांना पुसून टाकणारी होती. या निखळ वास्तवाकडे पाठ फिरवून किंवा त्याचीच नक्कल करून २०१९ ची लोकसभा निवडणूक लढवली जाऊ शकत नाही.
नरेंद्र मोदी हा एक मुख्यमंत्री देशव्यापी काँग्रेसला आव्हान देऊन पुढे आला आणि त्याने नुसते निकाल वदलले नाहीत, तर एकूण निवडणूक लढण्याचे तंत्रच बदलून टाकलेले आहे. पहिली गोष्ट म्हणजे मोदींनी नव्याने विकसित झालेल्या तंत्रज्ञानाचा आपल्या मोहिमेत पुरेपुर वापर करून घेतला. त्याचवेळी जुन्या काळातील संघटनेवर निवडणूक लढवण्याची पद्धती पुनरुज्जीवित केली. अशा दोन टोकाच्या बेमालूम मिश्रणातून गेली लोकसभा निवडणूक लढवली गेली होती. त्यात मोदी वा त्यांच्याच नेतत्वाखालचा भाजपा नवे प्रयोग करीत असताना, अन्य पक्ष जुन्या कालबाह्य चक्रात फसून राहिले आणि चमत्कार घडला होता. त्याला मोदीलाट किंवा करिष्मा ठरवून निकालांचे विश्‍लेषण करणे म्हणजे सत्याकडे पाठ फिरवणे आहे. सत्याकडे पाठ फिरवली म्हणून ते संपत नाही, की त्याचे परिणाम टळत नाहीत. २०१४ मध्ये मोदींनी भाजपाकडे असलेल्या संघटनेला पुर्ण शक्तीनिशी वापरले आणि नव्या तंत्रज्ञान व साधनांची त्याला जोड दिलेली होती. त्यातून युपीए वा आघाडीच्या राजकारणाला पर्याय असू शकतो, असे चित्रही निर्माण केले. त्यातून जी मोदींची प्रतिमा निर्माण झाली, तिच्याशी कसा सामना करावा, याचे उत्तर त्यांच्या विरोधकांपाशी नव्हते. त्यातूनच पहिली फेरी मोदी जिंकून गेलेले होते. एका बाजूला सोशल मीडिया व नवे डिजिटल माध्यम मोदींनी कुशलतेने वापरले. तर दुसरीकडे बुथ म्हणजे मतदान केंद्रापर्यंत जाऊन पोहोचलेल्या संघटनात्मक शक्तीचा काटेकोर वापर करून घेतला. विरोधक किंवा काँग्रेस तिथेच तोकडी पडली. त्यांना मोदी नावाचा झंझावात कळलाच नाही. किंवा समजला असेल तर त्याला सामोरे जाण्याची कुठलीही व्यवहारी कल्पना त्यांच्यापाशी नव्हती. म्हणूनच असे सर्व विरोधक १९९० च्या युगात असल्यासारखे चाचपडत राहिले आणि त्यांना निकालाच्या दिवशीचे आकडे बघून चकीत व्हायची पाळी आली.
१९९० नंतर कुठल्याच पक्षापाशी देशव्यापी संघटनेचे जाळे उरलेले नव्हते आणि काँग्रेसपाशी निदान संघटनेचा ढाचा शिल्लक होता. दुसरीकडे रा. स्व, संघाच्या सोबतीने भाजपाकडेही देशव्यापी संघटनात्मक सांगाडा सज्ज झालेला होता. त्याचा वापर करण्याची कुशलता मोदी व त्यांच्या नव्या पिढीतल्या सवंगड्यांपाशी होती. त्याचा प्रभाव काँग्रेस व अन्य पक्षांना ओळखता आला नाही, की राजकीय विश्‍लेषक म्हणून मिरवणार्‍यांनाही समजून घेता आला नाही. निवडणूक ही उमेदवार व पक्ष लढत असले, तरी त्यातले सर्वात भेदक शस्त्र सामान्य मतदाराच्या हाती असते. त्याने ते कुठल्या व कशा पद्धतीने वापरले, त्यानुसार निकाल लागत असतात. त्या सामान्य मतदाराच्या मनात ज्या प्रतिमा उभ्या रहातात किंवा उभ्या केल्या जातात, त्यानुसार मत नावाचे शस्त्र वापरले जात असते. म्हणूनच ही प्रतिमांची लढाई असते. जी प्रतिमा भावते तिच्या बाजूने मतदार लढायला मैदानात उतरत असतो आणि त्याला लढायला प्रवृत्त करणारी संघटनात्मक शिस्तबद्ध फौज निर्णायक ठरत असते. एका बाजूला मोदी अशी प्रभावशाली प्रतिमा उंचावण्यासाठी राबत राहिले आणि दुसर्‍या बाजूला अमित शहा किंवा तत्सम संघटक लढवय्यांनी गल्लीबोळात व गावखेड्यात मतदाराला घराबाहेर काढून मतदानकेंद्राच्या रणांगणात आणायची कामगिरी पार पाडलेली होती. त्याच्या उलट विरोधक मात्र रणवाद्ये वाजवूनच युद्ध जिंकण्याच्या शैलीत गुरफटून राहिले होते आणि त्यांचे कायकर्ते वा लढवय्या मतदार विखुरलेला वा निष्काळजी घरी बसलेला होता. अशी ती २०१४ ची विषम लढाई होती. एका बाजूला नरेंद्र मोदींची प्रभावी होत गेलेली प्रतिमा आणि दुसर्‍या बाजूला कुठलीही नजरेतही न भरणारी अन्य प्रतिमा, अशा लढाईला विषमच म्हणावे लागेल ना? त्यामुळे आठ लोकसभांच्या नंतर एका पक्षाला थेट बहूमत मिळण्याचा चमत्कार घडला होता. तो चमत्कार नव्हता तर बदलत्या कार्यशैली व काळाचा परिणाम होता.
मागल्या पाच वर्षात विरोधकांनी मोदींची वा भाजपाची ही कार्यशैली समजून घेण्याची व अभ्यासण्याची गरज होती. ती गरज भाजपाची नव्हेतर विरोधकांची गरज होती. पण ते करण्यापेक्षा या लोकांनी निव्वळ टिकाटिप्पणी व आरोपबाजी करण्यात वेळ वाया दवडला. पर्यायी संघटनात्मक शक्ती उभी केली नाही, की असलेल्या संघटनेची डागडुजी करण्यालाही महत्व दिले नाही. नुसता गवगवा किंवा गोंगाट करून बाजी मारण्याची १९९० पुर्व पद्धत आता निकालात निघालेली आहे. मोदींनी लोकसभेत बहूमत मिळवताना ती जुनी कार्यशैली निकालात काढलेली आहे. त्यामुळे यापुढे निवडणूका मैदानात उतरून वा जनमानसात प्रभावी प्रतिमा रुजवूनच जिंकण्याला पर्याय उरलेला नाही. प्रत्येक खात्यात पंधरा लाख रुपये किंवा दोन कोटी रोजगार असल्या आश्‍वासनांनी मोदींना बहूमत दिलेले नाही. मुळात तसे कुठलेही आश्‍वासन मोदींनी दिलेले नव्हते. तर विरोधकांनी केलेला तो अपप्रचार आहे. मोदींनी तात्कालीन युपीए सरकार लुळेपांगळे व कृतीहीन असल्याचा डांगोरा पिटून, आपली कठोर निर्णय घेणारा नेता अशी प्रतिमा उभी केली. त्यातून त्यांना बहूमतापर्यंत मजल मारता आली. पण अपप्रचाराने मोदी संपवता येईल, अशा भ्रमात विरोधक ५ वर्षे राहिले आणि आता पुढली लोकसभा दारात येऊन उभी राहिली. तरी विरोधक आपणच केलेल्या अपप्रचारात गुंतून पडलेले आहेत. त्यामुळे विशेष प्रयत्न केल्याशिवायही मोदींचे पारडे जड दिसते आहे. महागठबंधन करण्यापासून एकास एक उमेदवार देण्यापर्यंतचा विरोधकांच्या डरकाळ्या पोकळ ठरल्या असून, मोदी, भाजपा मात्र संघटनात्मक शक्तीबरोबर प्रतिमा उभारण्यातही पुढे गेलेले आहेत. आजही आपल्यासमोर विरोधकांचा कुठलाही एक चेहरा नाही, असे मोदी उघडपणे सांगतात, त्यातला आत्मविश्‍वासच बोलका आहे. तो राहुल गांधींच्या आक्रस्ताळ्या घोषणांसारखा नसून जनतेला जाऊन भिडणारा आहे.
५ वर्षे बहूमताचे सरकार चालवुनही मित्रपक्षांना गुण्यागोविंदाने निवडणूक काळात जवळ घेण्यातली भाजपाची चपळाई दुर्लक्षित करता येणार नाही. उलट मागल्या वेळी सपाटून मार खाल्लेल्या व अनेक राज्यात असलेली सत्ता गमावलेल्या काँग्रेसला मित्रपक्षांनाही जवळ राखता आलेले नाही, हा फरक नजरेत भरणारा आहे. निवडणूकीपुर्वी म्हणजे सत्ता दुर असताना काँग्रेस मित्रपक्षांना सोबत घेऊ शकत नाही, तर निकालानंतर अशा रागावलेल्या मित्रांना घेऊन काँग्रेस वा राहुल सरकार कसे चालवणार आहे? ही सामान्य जनतेच्या मनातली शंका आहे. उद्या निकालानंतर मित्र होऊ शकणारे आजच एकमेकांना शिव्याशाप देत लोकांसमोर आलेले आहेत. मोदीना हटवल्यावर एकत्रित सरकार चालवण्याची आश्‍वासने देत आहेत. हा केवढा विरोधाभास आहे? लढाईत एकत्र येण्याची इच्छा नसलेले लढाई संपल्यावरची लुट समजूतीने आपापसात वाटून घेऊ म्हणतात ना? लुटमारीपुर्वीच दरोडेखोरांमध्ये हाणामार्‍या होत असतील, तर त्यांचे भवितव्य काय असू शकते? ज्यांच्यात एकवाक्यता नाही, असे लोक चांगले खंबीर सरकार चालवू शकत नाहीत, अशीच प्रतिमा यातून तयार होते. उलट मोदी व भाजपा यांनी एकमुखी नेतृत्व आणि एकदिलाने लढाई, अशी प्रतिमा मोदींनी उभी केलेली नाही काय? कारण त्यांना निवडणूक व बहूमत जिंकायचे आहे आणि ते एका प्रभावी प्रतिमेतून शक्य असल्याची जाणिव त्यामागे आहे. आजकाल लोकांना स्थीर सरकार व एकपक्षीय खंबीर सरकारचा अर्थ उमजलेला आहे. त्यावर मात करण्यासाठी तरी विरोधकांनी आघाड्या व जागावाटपात समजूतदारपणा दिसेल याची काळजी घ्यायला हवी होती. अधिक जागा मागण्यापेक्षा वाट्याला येतील त्यातील अधिक जागा जिंकण्याला प्राध्यान्य द्यायला हवे होते. आपापली संघटनात्मक शक्ती वाढवून बूथ पातळीवर भाजपाशी दोन हात करायला सज्ज व्हायला हवे होते. त्याचा कुठे मागमूस दिसतो काय? प्रतिक व प्रतिमा यात मोदी मतदानापुर्वीच जिंकलेले दिसतात ना?

Posted by : | on : 14 Apr 2019
Filed under : आसमंत, पुरवणी, भाऊ तोरसेकर, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, भाऊ तोरसेकर, स्तंभलेखक (18 of 1368 articles)

Modi Sarkar
विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक, जेएनयु | २०१४ मध्ये स्पष्ट बहुमत घेऊन मोदींच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे ...

×