ads
ads
आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

•न्यायव्यवस्था बदनाम करण्याचा हा सुनियोजित कट, •सर्वोच्च न्यायालयाचा संताप,…

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

•पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्ला, दरभंगा, २५ एप्रिल – आतापर्यंत पाकिस्तानची…

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मुंबई, २४ एप्रिल – राग, नाराजी असे माणसाच्या स्वभावाचे…

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

•अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण, वॉशिंग्टन, २४ एप्रिल –…

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

•मृतांची संख्या ३२१, भारतीयांचा आकडाही वाढला, ४० जणांना अटक,…

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

•चीनने व्यक्त केली भीती, बीजिंग, २३ एप्रिल – इराणकडून…

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

•राहुल गांधी यांनी स्वीकारला •विरोधी पक्षनेतेपदही सोडले •काँग्रेसला आणखी…

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

•खोट्या जाहिरातींचे प्रकरण, मुंबई, २२ एप्रिल – शेतकर्‍यांना पाच-दहा…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 18:44
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, वसंत काणे, स्तंभलेखक » प्रभावी नेतृत्वाच्या अपेक्षेत युरोप…

प्रभावी नेतृत्वाच्या अपेक्षेत युरोप…

॥ परराष्ट्रकारण : वसंत गणेश काणे |

युरोप सध्या एका कणखर नेत्याच्या शोधात आहे. ही अपेक्षा पूर्ण करणार्‍या मर्केल निवृत्त झाल्यावर ती जागा मॅक्रॉन नक्कीच भरून काढू शकतात. पण, त्यांनी जागतिक राजकारणात प्रवेश केल्याला उणीपुरी दोन वर्षेच होत आहेत. ही त्यांच्यासमोरची अडचण आहे. युरोपियन युनियनमध्ये २८ देश आहेत. सध्यातरी ही बजबजपुरीच आहे. ही सर्कस सांभाळण्याचे, माणसाळविण्याचे व हाताळण्याचे अवघड काम मर्केल व मॅक्रॉन ही जोडगोळी सांभाळत होती. मर्केल यांच्या राजकीय निवृत्तीनंतर मॅक्रॉन हे एकटे पडणार आहेत.

Angela Merkel

Angela Merkel

युरोपात अनेक छोटीछोटी राष्ट्रे आहेत. या सर्वांचे मिळून एक संघटन उभारता आले, तर घटक राष्ट्रेतर अधिक समृद्ध होतीलच, शिवाय जागतिक राजकारणात युरोप अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडू शकेल, या कल्पनेने युरोपियन युनियन उभारण्याच्या कल्पनेला बळकटी प्राप्त झाली. त्या दिशेने ब्रिटन, फ्रान्स व जर्मनी यांनी विशेष पुढाकार घेतला. पण, मध्येच ब्रिटनचा विचार बदलला व त्याने युरोपियन युनियनमधून वेगळे व्हायचा निर्णय घेतला. हा प्रकार ‘ब्रेक्झिट’ या नावाने विशेष परिचित आहे.
ब्रिटनमधील लोकमत या प्रश्‍नाबाबत जवळजवळ दुभंगलेले आहे. पण, आज ना उद्या ब्रिटन युरोपियन युनियनशी पूर्णपणे संबंधविच्छेद करणार, असे आजचे चित्र निर्माण झाले असतानाच, पंतप्रधान थेरेसा मे यांच्या सहकार्‍यांनी राजीनामे देऊ केल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नजीकच्या काळातील पाश्‍चात्त्य नेतृत्व
ब्रिटनमध्ये गेल्या काही वर्षांत चार पंतप्रधान होऊन गेले आहेत. टोनी ब्लेअर (१९९७ -२००७), गॉर्डन ब्राऊन (२००७-२०१०), डेव्हिड कॅमेरॉन (२०१०-२०१६) व थेरेसा मे (२०१६ ते आजपर्यंत) अशी या चार पंतप्रधानांची कारकीर्द आहे. फ्रान्समध्ये जॅक्वस चिराक (१९७४-१९७६ व १९८६-१९८८ पंतप्रधान म्हणून आणि १९९५-२००७ अध्यक्ष या नात्याने), निकोलस सारकोझी (२००७-२०१२), फ्रँकॉइस ओलांड (२०१२-२०१७, व इमॅन्युएल मॅक्रॉन (२०१७ ते आजपर्यंत) अशी या चार नेत्यांची कारकीर्द आहे. अमेरिकेत जॉर्ज बुश (२००१-२००९), बराक ओबामा (२००९-२०१७) व डोनाल्ड ट्रम्प २०१७ ते आजपर्यंत) अशी अध्यक्षीय कारकीर्द आहे.
जर्मनीत अँजेला मर्केल (२००५ ते आजपर्यंत) अशी एकटीची प्रदीर्घ कारकीर्द आहे. त्यांनी ब्रिटनच्या मार्गारेट थॅचर (१९७५ ते१९९० अशी ११ वर्षांची कारकीर्द) यांनाही मागे टाकले आहे. तशी त्यांची कारकीर्द २०२१ पर्यंत असणार आहे. १९८२ – १९९८ या प्रदीर्घ कालखंडात हेलमट कोल यांची १६ वर्षीय अध्यक्षपदीय राजवट जर्मनीत होती. तसेच कॉनरॅड अ‍ॅडेनॉवर यांनी जर्मनीचा कारभार अध्यक्ष या नात्याने १९४२ ते १९६३ या कालखंडात पाहिला होता. मग राहतो फक्त बिसमार्क ज्याचे जवळजवळ दोन दशकांचे आधिपत्य जर्मनीवर होते.
शताब्दीच्या कार्यक्रमात मर्केल यांची निवृत्तीची घोषणा
११ नोव्हेंबर २०१८ ला पहिले महायुद्ध संपल्याला १०० वर्षे झाली. त्या ऐतिहासिक महत्त्वाच्या दिनानिमित्त जगातील सर्व बडे नेते एकत्र आले होते. या दिवशी एंजेला मर्केल यांनी एक महत्त्वाची घोषणा केली ती अशी की, २०२१ मध्ये त्यांची चान्सेलरपदाची चौथी कारकीर्द संपेल आणि यानंतर त्या अध्यक्षपदासाठीच्या (चान्सेलर) उमेदवार नसतील. त्यांच्या कार्यकाळात जर्मनीची भूमिका मवाळ प्रकारची होती. हिटलरच्या एकहाती व हुकुमशाही राजवटीच्या तुलनेत जर्मन राष्ट्राच्या मनोभूमिकेत झालेला हा बदल नजरेत भरणारा व लक्षणीय होता. हा बदल जसा जर्मनीसाठी महत्त्वाचा ठरला तसाच तो युरोपसाठीही महत्त्वाचा होता. नव्हे, जागतिक राजकारणातही जर्मनीला एक नैतिक अधिष्ठान त्यांच्या कार्यकाळात प्राप्त झाले होते. पण, जर्मनीला नेमस्तपणा मानवत नाही की काय कोण जाणे, कारण जर्मनीत पुन्हा एकदा उग्रवादी डोके वर काढताना दिसत आहेत. विशेषत: अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखा धसमुसळा गडी सत्तेवर आल्यानंतर तर जर्मनीचा मवाळपणा प्रकर्षाने जाणवू लागला होता.
मर्केल पाश्‍चात्त्य जगातील सर्वात प्रभावशाली मानल्या गेल्या आहेत. विशेषत: ट्रम्प यांचा अमेरिकेत उदय झाल्यानंतर या प्रश्‍नावर शंका उपस्थित करण्याचा प्रश्‍नच उरला नाही. जी-७ व युरोपियन युनियनमध्ये एक प्रभावी व समतोल विचार असलेली राष्ट्रप्रमुख या नात्याने त्यांची उपस्थिती सर्वात मोठ्या कालखंडाची गणली जाईल. जी-७ मध्ये कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटाली, जपान, ब्रिटन व अमेरिका ही राष्ट्रे येतात. जगातील ५८ टक्के संपत्ती या राष्ट्रात एकवटली आहे, हे लक्षात घेतले म्हणजे या मुद्याचे महत्त्व स्पष्टपणे जाणवेल. एंजेला मर्केल युरोपियन युनियनमध्येही प्रभाव राखून आहेत.
१३ वर्षांची त्यांची जर्मनीच्या चान्सेलर या नात्याने पार पडणारी कारकीर्द टक्क्याटोणप्यांची व चढउताराची राहिली आहे. या काळात २००८ मध्ये युरोपला महामंदीचा आघात सोसावा लागला, त्यांच्या कार्यकाळात अरबजगतात प्रचंड उलथापालथ झाली आणि तिथल्या निर्वासितांची त्सुनामी युरोपवर बरसली, रशियानेही क्रिमिया गिळला व युक्रेनवर चढाई केली. ही परिस्थिती युरोपियन युनियनसाठी अतिशय बिकट होती/आहे. सध्या ब्रिटन युरोपियन युनियनमधून बाहेर पडतानाची क्लिष्ट प्रक्रिया पूर्णपणे पार पाडायची आहे. युरोपियन युनियनच्या पार्लमेंटच्या निवडणुकाही जवळ येऊन ठेपल्या आहेत. या निमित्ताने कुणीही अलबते गलबते नेतृत्व निवडून आलेले चालणार नाही. या काळात युरोपियन युनियनला मर्केल यांची कधी नव्हती एवढी आवश्यकता आहे. पण, २०२१ नंतर आपण पुन्हा निवडणूक लढणार नसून निवृत्त होणार आहोत, अशी घोषणा मर्केल यांनी केली आहे. त्यामुळे मर्केल यांची जागा घेऊ शकेल असा कर्तबगार नेता युरोपियन युनियनला लवकर मिळण्याची शक्यता नाही.
मर्केल यांची जागा कोण घेणार?
मर्केल यांची जागा घेऊ शकेल, असा सौम्य प्रकृतीचा एकच नेता सध्यातरी समोर दिसतो आहे. तो आहे इमॅन्युएल मॅक्रॉन, नुकताच फ्रान्सचा अध्यक्ष म्हणून निवडून आलेला नेता. पण, त्यांनाही मर्केल यांची अनुपस्थिती चांगलीच जाणवेल. कारण तसे ते नवीन आहेत. त्यांचे नेतृत्व खुद्द फ्रान्समध्येच सिद्ध व्हायचे आहे. पण, त्यांच्या नेतृत्वाची झलक दिसू लागली आहे. एक असे की, निवडून आल्याबरोबर त्यांनी जागतिक राजकारणावर लक्ष केंद्रित केलेले जाणवते. पहिल्याच वर्षात त्यांनी २५ पेक्षा जास्त देशांना भेटी दिल्या. जवळजवळ ७० दिवस ते प्रवासात होते. आपल्या पूर्वसुरींना त्यांनी या बाबतीत चांगलेच मागे टाकले आहे. ते मागे पडतात ते फक्त भारताच्या नरेंद्र मोदींच्याच! दुसरे असे की, रोखठोक भूमिका घ्यायला ते चुकत/कचरत नाहीत. ब्रिटनचा युरोपियन युनियमधून बाहेर पडण्याचा निर्णय अनेकांना चुकीचा, दुर्दैवी व आत्मघातकी वाटतो. पण, या वाईटातून एक चांगली घटना घडली ती ही की, फ्रान्सचे मॅक्रॉन व जर्मनीच्या मर्केल हे दोन नेते अल्पावधीतच वैचारिक पातळीवर एकमेकाच्या जवळ आले ते ब्रेक्झिटमुळेच. हे दोन नेते एका भूमिकेवर आल्यामुळे युरोपियन युनियनला एक प्रभावी नेतृत्व मिळाले आहे/होते. पण, मर्केल यांच्या निवृत्तीमुळे मॅक्रॉन एकटे पडतील. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी वैचारिक पातळीवर दोन हात प्रथम कुणी केले असतील तर ते मॅक्रॉन यांनी. युरोपचे रक्षण करण्याच्या हेतूने स्थापन झालेली नाटो (नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन) ही लष्करी संघटना अमेरिकेवर आर्थिक व अन्य मदतीमुळे बहुतांशी अवलंबून आहे. या मुद्याचा आधार घेऊन डोनाल्ड ट्रम्प हडेलहप्पीपणा करू लागताच, मॅक्रॉन यांनी संरक्षणासाठी अमेरिकेवर अवलंबून न राहता युरोपियन आर्मी उभारण्याची कल्पना त्यांच्या उपस्थितीत सर्वांसमोर मांडून डोनाल्ड ट्रम्प यांची या विषयाबाबतची बोलतीच बंद केली! सुरवातीला ट्रम्प महाशय चडफडले, तणतणले व बेसुमार बडबडलेसुद्धा! पण व्यर्थ!
युरोप सध्या एका कणखर नेत्याच्या शोधात आहे. ही अपेक्षा पूर्ण करणार्‍या मर्केल निवृत्त झाल्यावर ती जागा मॅक्रॉन नक्कीच भरून काढू शकतात. पण, त्यांनी जागतिक राजकारणात प्रवेश केल्याला उणीपुरी दोन वर्षेच होत आहेत. ही त्यांच्यासमोरची अडचण आहे. युरोपियन युनियनमध्ये २८ देश आहेत. सध्यातरी ही बजबजपुरीच आहे. ही सर्कस सांभाळण्याचे, माणसाळविण्याचे व हाताळण्याचे अवघड काम मर्केल व मॅक्रॉन ही जोडगोळी सांभाळत होती. मर्केल यांच्या राजकीय निवृत्तीनंतर मॅक्रॉन हे एकटे पडणार आहेत.

Posted by : | on : 2 Dec 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, वसंत काणे, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, वसंत काणे, स्तंभलेखक (367 of 1372 articles)

Anastasia Daughter Of Zar
विश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले | १९५२ साली मर्सेल मॉरी या प्रख्यात फ्रेंच नाटककर्तीने ‘अ‍ॅनास्ताशिया’ हे नाटक लिहिलं. ते कमालीचं ...

×