ads
ads
आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

•न्यायव्यवस्था बदनाम करण्याचा हा सुनियोजित कट, •सर्वोच्च न्यायालयाचा संताप,…

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

•पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्ला, दरभंगा, २५ एप्रिल – आतापर्यंत पाकिस्तानची…

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मुंबई, २४ एप्रिल – राग, नाराजी असे माणसाच्या स्वभावाचे…

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

•अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण, वॉशिंग्टन, २४ एप्रिल –…

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

•मृतांची संख्या ३२१, भारतीयांचा आकडाही वाढला, ४० जणांना अटक,…

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

•चीनने व्यक्त केली भीती, बीजिंग, २३ एप्रिल – इराणकडून…

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

•राहुल गांधी यांनी स्वीकारला •विरोधी पक्षनेतेपदही सोडले •काँग्रेसला आणखी…

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

•खोट्या जाहिरातींचे प्रकरण, मुंबई, २२ एप्रिल – शेतकर्‍यांना पाच-दहा…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 18:44
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी » प्रश्‍न एकट्या अवनीचा नाहीच!

प्रश्‍न एकट्या अवनीचा नाहीच!

॥ विशेष : किशोर रिठे |

यवतमाळ जिल्ह्यात धुमाकूळ घालणार्‍या टी-१ किंवा अवनी वाघिणीला, हैद्राबादच्या शिकार्‍याकडून गोळी मारण्यात आली. या घटनेमुळे एकीकडे या जिल्ह्यात लोकांनी सुटकेचा नि:श्‍वास टाकला, तर दुसरीकडे संपूर्ण देशात व देशाबाहेर निषेधाचे स्वर उमटले. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या व ते अद्यापही सुरूच आहेत. एकीकडे सामान्य जनतेस हा प्रश्‍न संपला असे वाटत असतानाच, देशातील जनतेपुढे अनेक प्रश्‍न उभे झाले. वाघ व मानव संघर्ष फक्त यवतमाळ जिल्ह्यापुरताच सीमित आहे काय? या जिल्ह्याबाहेरही तो असेल, तर मग या संघर्षास फक्त एक अवनी वाघीणच जबाबदार कशी? अवनी वाघिणीस ठार मारल्याने यानंतर आता विदर्भातील मानवी मृत्युचक्र थांबेल काय? हे संपूर्ण प्रकरण चुकीच्या पद्धतीने हाताळले गेल्याने, माध्यमे आणि राजकीय पक्ष यांच्या मार्‍यापुढे मूळ प्रश्‍न व त्याच्यावरील उपाययोजना यापासून आपण दूर जाण्याची भीती जास्त आहे. म्हणून या संपूर्ण प्रकरणाची शास्त्रीय व कायदेशीर आधारावर चीरफाड करणे माणूस व वाघ या दोहोंसाठीही जास्त हिताचे राहील.

Tiger Pti

Tiger Pti

२ नोव्हेंबर २०१८ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा, राळेगाव, कळंब व केळापूर तालुक्यांमध्ये धुमाकूळ घालणार्‍या टी-१ किंवा अवनी वाघिणीला, हैद्राबादच्या शिकार्‍याकडून गोळी मारण्यात आली. या घटनेमुळे एकीकडे या जिल्ह्यात लोकांनी सुटकेचा नि:श्‍वास टाकला, तर दुसरीकडे संपूर्ण देशात व देशाबाहेर निषेधाचे स्वर उमटले. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या व ते अद्यापही सुरूच आहेत. एकीकडे सामान्य जनतेस हा प्रश्‍न संपला असे वाटत असतानाच, देशातील जनतेपुढे अनेक प्रश्‍न उभे झाले. वाघ व मानव संघर्ष फक्त विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यापुरताच सीमित आहे काय? या जिल्ह्याबाहेरही तो असेल, तर मग या संघर्षास फक्त एक अवनी वाघीणच जबाबदार कशी? अवनी वाघिणीस ठार मारल्याने यानंतर आता विदर्भातील मानवी मृत्युचक्र थांबेल काय?
हे संपूर्ण प्रकरण चुकीच्या पद्धतीने हाताळले गेल्याने, माध्यमे आणि राजकीय पक्ष यांच्या मार्‍यापुढे मूळ प्रश्‍न व त्याच्यावरील उपाययोजना यापासून आपण दूर जाण्याची भीती जास्त आहे. म्हणून या संपूर्ण प्रकरणाची शास्त्रीय व कायदेशीर आधारावर चीरफाड करणे माणूस व वाघ या दोहोंसाठीही जास्त हिताचे राहील.
हे १३ बळी पाहिले, तर त्यातील पहिला बळी ६ जानेवारी २०१६ चा बोराटी गावच्या सोनाबाई भोसले यांचा, दुसरा ९ मार्च २०१६ रोजी खैरगावच्या मारुती विठोबा नागोसे यांचा, तिसरा ९ एप्रिल २०१६ रोजी झोटिंगधराच्या सखाराम टेकाम यांचा, चौथा बळी सहा महिन्यानंतर ३० ऑक्टोबर २०१६ रोजी तेजनी गावच्या प्रवीण सोनोने यांचा, यानंतर पुन्हा तब्बल ८ महिन्याने पाचवा बळी २२ जुलै २०१७ रोजी भिरा गावच्या लक्ष्मीबाई रामपुरे यांचा, सहावा बळी २५ ऑगस्ट २०१७ रोजी सराटी गावच्या गजानन पवार यांचा, सातवा १६ सप्टेंबर २०१७ रोजी सखी गावच्या गजानन पवार यांचा, आठवा १२ सप्टेंबर २०१७ रोजी विहीरगावच्या चंडकू भोनू यांचा, नववा १५ ऑक्टोबर २०१७ रोजी सखी कृष्णापूरच्या शंकर आत्राम यांचा, यानंतर दहावा बळी तीन महिन्यांनी २७ जानेवारी २०१८ रोजी शेंदरे लोणी गावच्या रामाजी कोंडबा शेंदरे यांचा, ११ वा तब्बल ६ महिन्यांनी ५ ऑगस्ट २०१८ रोजी येडशी गावच्या गुलाब मकोसे यांचा, १२ वा ११ ऑगस्ट २०१८ रोजी विहीरगावच्या वाघुजी कंचारी राऊत यांचा व अखेरचा १३ वा २९ ऑगस्ट २०१८ रोजी येडशी गावच्या नागोसे जुनघरे यांचा. यावरून हे सर्व बळी गेल्या पावणे तीन वर्षांतील आहेत. तसेच ते सतत झालेले नाहीत. काही वेळा तर ते सहा ते आठ महिन्यांच्या अंतराने झाले आहेत. या सर्व हल्ल्यांमध्ये टी-१ म्हणजेच अवनी वाघीणच होती हे ठामपणे म्हणायचे असेल, तर तिचे या सर्व घटनांमधील कॅमेरा ट्रॅपमध्ये मिळविलेले छायाचित्र किंवा तिचा डी. एन. ए. पुरावा म्हणून मिळायला हवा होता. पण, तसे नसल्याने हे सर्व दावे दुय्यम पुरावे व अंदाजाच्या आधारे केले गेले. शास्त्रीय दृष्टिकोनातून व कायद्याच्या दृष्टीने असे चालत नाही.
त्यामुळेच राज्याच्या मुख्य वन्यजीवरक्षकांनी यापूर्वी जानेवारी २०१८ मध्ये टी-१ वाघिणीला पकडण्याचे दिलेले आदेश उच्च न्यायालयाने रद्द केले होते. या वाघिणीच्या पिलांचे वय सध्या ११ महिने असल्याचे सांगितले जाते. म्हणजेच जानेवारी २०१८ नंतर झालेले चार मृत्यू तिच्यासोबत पिले असल्याने झाल्याचे स्पष्टच दिसते. असे जर असेल तर तिला पिलांसह जेरबंद करणे (लर्रिींीीश) हाच तातडीचा उपाय होता. म्हणून शेवटचे तीन मानवी बळी व त्यातील उपलब्ध पुरावे तपासल्यानंतर, सप्टेंबर २०१८ मध्ये उच्च न्यायालयाची खात्री पटल्याने वाघिणीस पकडणे किंवा मारण्यास (कायद्याच्या भाषेत व केंद्रीय व्याघ्र प्राधिकरणाच्या भाषेत) परवानगी दिली. हा न्यायालयीन आदेश खूपच अभ्यासपूर्ण असा आहे. याचिकाकर्ते या निर्णयाविरुद्ध सर्वोच्य न्यायालयात गेल्यानंतर तेथेही उच्च न्यायालयाने ग्राह्य धरलेले पुरावे तपासण्यात येऊन उच्च न्यायालयाच्या या आदेशाचे विश्‍लेषण केले गेले. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाशी सहमती दर्शविली.
असे असले तरी वाघिणीच्या हल्ल्यात यवतमाळ जिल्ह्यात असे १३ लोकांचे बळी जाण्याने महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती व्यथित आहे. परंतु, महाराष्ट्रात किंवा विदर्भात हे पहिल्यांदाच घडले असे नाही. २००७ ते २०१८ या ११ वर्षांच्या काळात, वनमंत्र्यांच्या चंद्रपूर जिल्ह्यात (ब्रह्मपुरी वनविभाग) तब्बल १५५ लोक वाघांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडले आहेत. हे सत्र नजीकच्या गडचिरोली जिल्ह्यातील वडसा वनविभागातील गावांपर्यंत पोहोचले. एवढेच काय, अगदी काल-परवा यवतमाळ जिल्ह्यात वाघीण व तिच्या बछड्यांची शोधमोहीम सुरू असताना, अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ दस्तगीर गावातही १९ ऑक्टोबरला सायंकाळी राजेंद्र निमकर या शेतकर्‍याचा दुसर्‍या एका वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. यानंतर दोनच दिवसांनी २२ ऑक्टोबरला येथून जवळच असलेल्या अंजनसिंगी गावात मोरेश्‍वर वाळके या शेतकर्‍याचा याच वाघाच्या हल्ल्यात बळी गेला. म्हणजेच विदर्भातील व्याघ्र प्रकल्प, विशेषतः व्याघ्र प्रकल्पांचे कवच क्षेत्र (बफर), टिपेश्‍वर, उमरेड, घोडाझरी, मुक्ताई-भवानीसारखी वाघांची अभयारण्ये/संवर्धनक्षेत्रे व या सर्व क्षेत्रांना जोडणारे वनाच्छादित वन्यजीव संचारमार्गातील गावांमध्ये वाघांच्या हल्ल्यात असे मानवी मृत्यू गेल्या दहा वर्षांपासून होत आहेत (पूर्वीही होतेच). किंबहुना मागील चार-पाच वर्षांमध्ये विदर्भातील निवडक क्षेत्रांमध्ये (खान्देशचा भागसुद्धा) हा प्रश्‍न प्रामुख्याने समोर आला. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वनविभाग व आता पांढरकवडा वनविभागातील वनक्षेत्रांचा यामध्ये समावेश होतो. या सर्व घटनांचा बारकाईने अभ्यास करता काही विशिष्ट वाघ मानवावर असे हल्ले करतात, हे ध्यानात येते. अर्थात, या वाघांपुढे आपले पोट भरण्यासाठी उपलब्ध असणारी परिस्थिती त्यासाठी त्यांना बाध्य करते, असे म्हटल्यास जास्त सयुक्तिक होईल. मनुष्यावर हल्ले करण्यासाठी बाध्य झालेल्या अनेक वाघांपैकी आतापर्यंत फक्त पाच वाघांना गोळी मारून ठार करण्यात आले. यापूर्वी १९९६ साली मुधोली (जि. चंद्रपूर), २००७ साली तळोधी (जि. चंद्रपूर), २०१३ साली नवेगाव (जि. गोंदिया) या ठिकाणच्या घटनांमध्ये वाघांना ठार केले गेले. या सर्व घटनांमध्ये भूल देणारे इंजेक्शन मारून पकडण्याचा प्रयत्न झाल्यानंतरच त्यांना मारले गेले. झाडीमध्ये बंदुकीची गोळी जशी थेट घुसते तसे भूल देणार्‍या इंजेक्शनच्या रबरी डार्टचे नसते. त्यामुळे अशा वाघांना गोळी घालून मारण्यापेक्षा भूल देणारे इंजेक्शन देऊन पकडण्यात जास्त अडचणी येतात. त्यामुळे मारण्याचे आदेश दिल्यानंतर जेरबंद करण्याचा अट्‌टहास करणे योग्य नाही. या प्रकरणात हैद्राबादच्या खाजगी शिकार्‍यास यासाठी पाचारण केले आणि त्याने त्याच्या, इतर राज्यांमधील शैलीनुसार बडेजावपणा दाखविण्यासाठी प्रसिद्धिमाध्यमांचा वापर केला. त्यामुळे या प्रकरणात प्रखर टीका झाली. माझ्या मते, केंद्रीय व्याघ्र प्राधिकरणाने आता अशा कामात खाजगी शिकार्‍यांचा वापर करू नये, असे राज्यांना स्पष्टपणे सांगणे आवश्यक झाले आहे.
वाघ प्रत्यक्ष दिसणे दुर्मिळ झालेल्या विदर्भात, वाघांची संख्या कशी व कुठे वाढली, हेही पाहणे आवश्यक आहे. विदर्भात मेळघाट, पेंच व ताडोबा-अंधारी असे तीन व्याघ्र प्रकल्प होते. त्यांच्या जोडीला नव्याने नवेगाव-नागझिरा (जि. गोंदिया-भंडारा) व बोर (जि. वर्धा) हे व्याघ्र प्रकल्प घोषित झाले. परंतु, वाघांचा वावर काही फक्त या व्याघ्र प्रकल्पांपुरताच मर्यादित राहिला नाही. टिपेश्‍वर, पैनगंगा, मानसिंगदेव, उमरेड, घोडाझरी, कन्हाळगाव (प्रस्तावित), प्राणहिता या अभयारण्यामधेही वाघांनी घर केले. ताडोबा-ब्रह्मपुरी वनप्रदेशात तसेच पेंच-मानसिंगदेव वनप्रदेशात जशी जननक्षम वाघांची संख्या वाढत गेली तसे हे वाघ विदर्भाच्या नजीक असणार्‍या तेलंगाना, मध्यप्रदेश व छत्तीसगढ या सीमावर्ती राज्यातील वनक्षेत्रांमध्ये पसरायला लागले. त्यांच्या पसरण्याने माणसांवरील हल्ले, ही काळी बाजू समोर आली. परंतु, त्याच वेळी व्याघ्र पर्यटनामुळे स्थानिकांसाठी रोजगारनिर्मिती व महसूलवाढीचे फायदेही नोंदविले गेले. विदर्भातील व्याघ्रसंरक्षण मोहिमेचे हे एक मोठे यश म्हणावे लागेल.
आता अवनी ज्या क्षेत्रात वावरायची त्या क्षेत्रात झालेले बदल पाहू या. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात १४९ चौ. कि.मी. वनक्षेत्रावर टिपेश्‍वर अभयारण्य पसरले आहे. १९९७ ला टिपेश्‍वरला अभयारण्याचा दर्जा मिळाला. यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर व घाटंजी तालुक्यामध्ये हे वनक्षेत्र पसरले आहे. गेल्या १५ वर्षांमध्ये इथून वाघ गायब झाले होते. या अभयारण्यातून २०१४-१५ मध्ये टिपेश्‍वर व मारेगाव या दोन गावांचे पुनर्वसन करण्यात आले. यानंतर तण उच्चाटन, गवताची लागवड व कडक संरक्षणव्यवस्था या सर्व गोष्टींमुळे येथे तृणभक्षी प्राण्यांची संख्या वाढली. २०१५ च्या फेब्रुवारी ते जून या महिन्यांमध्ये इथे वाघांचे दर्शन अगदी सहजपणे होऊ लागले. त्या वेळी येथे पाच बछडे व चार मोठे वाघ वावरत होते. त्यामुळे या अभयारण्यात पर्यटकांची झुंबड उडाली. इथे येणार्‍या जवळपास ९० टक्के पर्यटकांना व्याघ्रदर्शन झाले. २०१० ते २०११ या वर्षी इथे फक्त २९७ पर्यटकांनी हजेरी लावली होती. परंतु, २०१६ च्या हंगामात एप्रिल महिन्यातच पर्यटकांचा आकडा १३०० वर गेला होता. यामध्ये आदिलाबाद, बंगलोर, मुंबई, पुणे, रायपूर आणि महाराष्ट्रातील अनेक शहरांमधून पर्यटकांनी इथे हजेरी लावली. इथे सहज दिसणारे वाघ पाहून खा.विजय दर्डा, खा. हंसराज अहिर आणि आर्णीचे आमदार राजू तोडसाम यांनी शासनास पत्र लिहून टिपेश्‍वरला व्याघ्र प्रकल्प घोषित करण्याची विनंती केली. इथे पर्यटकांसाठी राहण्याच्या सुविधा नसल्याने ते पांढरकवडा येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात राहायचे. त्यामुळे पर्यटकांसाठी सोयी-सुविधा पुरविण्यासाठी जिल्हा नियोजन समितीने ऑगस्ट २०१५ मध्ये ५० लाखांचा निधी मंजूर केला. पांढरकवडा-आदिलाबाद रोडवर तसेच पारवा-पांढरकवडा मार्गावर असे दोन प्रवेशद्वार उभारण्यात आले. २०१६ च्या उन्हाळ्यात टिपेश्‍वरमध्ये ७ वाघ व ५ बिबटे पर्यटकांना दिसत होते. त्यामुळे आता पर्यटनामधून २०१४-१५ मध्ये जिथे फक्त २० हजार रुपये महसूल गोळा झाला तिथे २०१५-१६ मध्ये (२३३२ पर्यटक) १ लाख ७२ हजार रुपये महसूल गोळा झाला. २०१६-१७ मध्ये हा आकडा चक्क ४ लाख ४९ हजारावर गेला. २०१७-१८ मध्ये यात पुन्हा दुपटीने वाढ होऊन तो ७.८४ लाख रुपये इतका झाला.
वाघांची संख्या व प्रजनन याबाबतीत टिपेश्‍वरसारख्याच यशोगाथा उपरोक्त सर्वच अभयारण्यांमध्ये नोंदविल्या गेल्या. वाघांच्या या यशस्वी प्रजननासोबतच नवीन जन्मास आलेल्या, आईपासून विभक्त झालेल्या तरुण वाघांनी तसेच सशक्त वाघांचा मुकाबला करू न शकणार्‍या वाघांनी मग व्याघ्र प्रकल्प व या अभयारण्यांचे कोअर क्षेत्र सोडून कवचक्षेत्र अथवा वन्यजीव संचारमार्गाचा आश्रय घेतला. फेब्रुवारी २०१६ मध्ये टिपेश्‍वरचा एक वाघ १५० कि.मी. अंतरावरील महाराष्ट्राच्या सीमेलगतच्या चक्क तेलंगाना राज्यातील कावल अभयारण्यात (व्याघ्र प्रकल्प) दिसून आला. मार्च २०१७ मध्ये टिपेश्‍वर अभयारण्यातून स्थलांतरित झालेला दुसरा एक वाघ ७० कि.मी. स्थलांतर करून पैनगंगा अभयारण्यात दिसून आला. यावेळी मध्ये येणार्‍या शेतजमिनी, नाले, नद्या व अनेक गावे त्याने यशस्वीपणे पार केले होते. यावरून या तिन्ही अभयारण्यांमध्ये वन्यजीवांचा संचारमार्ग अस्तित्वात आहे, हे सिद्ध झाले. ऑगस्ट २०१२ मध्ये बोर अभयारण्यातील एक वाघ चक्क नागपूरपासून २५ कि. मी. अंतरावरील शिरपूर येथे दिसून आला. या ठिकाणी २० वर्षांपूर्वी वाघ दिसायचे. या पूर्वी नजीकच्याच देवळी, सालई, धाबा, डेगमा, सुकळी या गावांमध्ये आढळून आला. २०१४ मध्ये बोरमध्ये नोंदविलेला बाजीराव हा वाघ कळमेश्‍वरमधून २०१२-१३ मध्ये बोर अभयारण्यात आला. नागझिरा अभयारण्यात जन्मलेल्या जय वाघाचे स्थलांतर होऊन त्याने उमरेड-कर्‍हांडला अभयारण्यात बस्तान ठोकले, हे तर सर्वांनाच माहीत आहे. विदर्भातील वाघांच्या जीन्सची होणारी अशी नैसर्गिक देवाणघेवाण खरेतर व्याघ्रसंवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. परंतु, असे असले तरी खाद्याच्या, सुरक्षित क्षेत्राच्या किंवा जोडीदाराच्या शोधात वाघांनी केलेला हा प्रवास संरक्षित वनक्षेत्रांच्या किंवा भ्रमणमार्गात लागणार्‍या गावांच्या सुरक्षेच्या दृष्टीने खूपच धोकादायक असतो. विदर्भातील गावांचे आकार, गावकार्यांचा वनक्षेत्रातील वाढता वावर व गावांच्या शहरीकरणाची प्रक्रिया वेगाने होत असताना हे आणखीनच कठीण होऊन बसले आहे. अभयारण्ये किंवा राष्ट्रीय उद्यान घोषित करण्यास लोकप्रतिनिधी व लोकांचा ठिकठिकाणी विरोध होतो. त्यामुळे केवळ राखीव वनांवर तेही कमीतकमी वनक्षेत्रावर वन्यप्राणी अभयारण्ये घोषित होतात. त्यामुळे वन्यप्राण्यांची पुरेशा जागेची (शास्त्रीयदृष्ट्या लागणारी) आवश्यकता कधीच पूर्ण होत नाही. त्यात विकासाच्या झंझावातामुळे या वाघांच्या व वन्यजीवांच्या संचारमार्गात रस्ते, रेल्वे, कालवे, वीज वाहिन्या, खाणी असे अनेक अडथळे त्यांच्या सुरक्षित वावराचा विचार न करता येत आहेत. या सर्व गोष्टी वाघांच्या तसेच स्थानिकांच्या अपघातास निमंत्रण देतात. या जगण्यासाठीच्या प्रचंड धडपड, ताण-तणावातून वाघ व माणूस यांच्यात संघर्ष निर्माण होतात.
आता खरा प्रश्‍न उभा राहतो तो अवनीसारखे माणसाची शिकार करण्यास बाध्य होणारे वाघ तयार होऊ द्यायचे नसतील तर काय केले पाहिजे? त्यासाठी हे मानवी मृत्यू कसे व कुठे झालेत, हे पाहावे लागेल. महाराष्ट्रातील आतापर्यंतच्या दीडशेच्या वर घटना पाहता, या सर्व घटनांमध्ये कुठेही वाघाने गावात घुसून माणसास मारले, असे झाले नाही. गावालगतच्या वनक्षेत्रात शौचास बसलेले, चुली पेटविण्यासाठी सरपण आणणारे, गुरांना चरायला जंगलात गेलेले गुराखी आणि तेंदूपाने, मोहफुले इत्यादी गौण वनोपज गोळा करण्यास गेलेल्या राहिवाशांचा वाघांच्या हल्ल्यात बळी गेला आहे. वनाला खेटून असणार्‍या शेतांमध्ये काम करणार्‍या शेतकरी/शेतमजूर यांचाही यात समावेश होतो. या सर्व लोकांवर ते जमिनीवर वाकलेल्या, बसलेल्या किंवा जमिनीवर लेटलेल्या अवस्थेत हल्ले झालेत. यामध्ये वनक्षेत्रात उभे असणार्‍या किंवा पायी चालणार्‍या व्यक्तींवर हल्ला झाल्याचे आजपर्यंत ऐकण्यात नाही. मग असे हल्ले या लोकांवर होणार नाहीत यासाठी काय केले पाहिजे?
विदर्भातील वनाच्छादित गावांमधील कुटुंबांना शौचालय व स्वयंपाकाचा गॅस पुरविल्यास या गावातील लोकांचे शौचास व जळाऊ लाकडासाठी (सरपण) जंगलात जाणे व वाघ-बिबट्याच्या हल्ल्यांना बळी पडणे, हे थांबविणे शक्य होऊ शकते. या गावांमधील गुरांना गोठ्यातच चारा पुरविल्यास, भाकड गुरांऐवजी दुभती गुरे दिल्यास (भाकड सांडांचे खच्चीकरण करणे) गुराखी गुरे घेऊन चराईसाठी जंगलात जाणार नाहीत. वाघाच्या दाढेतून वनोपज काढून उपजीविका करण्यापेक्षा, या गावांमधील युवकांना वन्यजीव पर्यटनासारख्या व्यवसायात रोजगार दिल्यास त्यांचे परिवार वनोपज गोळा करायला वाघाच्या जंगलात जाणार नाहीत. वाघाचे साम्राज्य निर्माण झालेल्या गावानजीकच्या जंगलात व शेतीक्षेत्रात काम करताना काय खबरदारी घ्यायची, पाळीव गुरांवर हल्ले झाल्यानंतर काय करायचे, याबद्दल या सर्व गावांची जनजागृती करणेही आवश्यक ठरते. याशिवाय मागील काही वर्षांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर जंगलांमध्ये होऊ लागला आहे. कॅमेरा ट्रॅपमध्ये वाघ आला की मोबाईलमध्ये घंटी वाजणार, अशी यंत्रणा गावांशेजारील वनक्षेत्रात लावल्यास, वनविभाग लोकांना सतर्कतेचा इशारा आगावू देऊ शकतो. अशी यंत्रणा व्याघ्र अधिवासांनजीक लावल्यास असे अपघात टाळता येऊ शकतात.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कवच (बफर) क्षेत्रातील ७९ गावांमध्ये एकूण २१,८६० कुटुंबं राहतात. एप्रिल २०१२ मध्ये महाराष्ट्र शासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील मानव-वन्यजीव संघर्ष थांबविण्यासाठी यापैकी १६ गावांमधील १३,००० कुटुंबांना स्वयंपाकाचा गॅस पुरविण्याचे काम हाती घेतले. ऑगस्ट २०१६ पर्यंत यांपैकी १६,३२८ कुटुंबांना स्वयंपाकाचा गॅस पुरविण्यात आला. यासाठी चंद्रपूर वनवृत्तांतर्गत ४३३ संयुक्त वनव्यवस्थापन समित्या स्थापन करण्यात आल्या. या समितीच्या सदस्यांना व ग्रामस्थांना सवलतीच्या दारात ७५ टक्के अनुदानावर शासनाच्या विविध योजनांमधून स्वयंपाकाचा गॅस पुरविण्यात आला. या कुटुंबांना पहिल्या वर्षी १२ सिलिंडर्सकरिता ७५ टक्के अनुदानसुद्धा देण्यात आले. २०१२-१३ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील ४००० पैकी १२०० भाकड सांडांचे खच्चीकरण करण्यात आले. या योजना प्रत्येक कुटुंबापर्यंत नेण्यासाठी या निवडक गावांनाच जास्त निधी देणे शासनाकडून शक्य होत नाही. ही गोष्ट लक्षात घेऊन सध्याच्या राज्य सरकारने मानव-वन्यजीव संघर्षाने त्रस्त अशा गावांसाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना राबविण्याचा शासन निर्णय ४ ऑगस्ट २०१५ रोजी जाहीर केला. यामध्ये व्याघ्र प्रकल्पांच्या कवचक्षेत्रात, वन्यजीव अभयारण्यांच्या सभोवती तसेच वन्यजीव संचारमार्गात (१७ जुलै २०१७ च्या शासन निर्णयानुसार) येणार्‍या गावांमध्ये वरील गोष्टी तसेच शेतांना सौर कुंपण, चार्‍याची निर्मिती, तण निर्मूलन, शेतात फळबाग लागवड, जलसंधारण यांसारख्या महत्त्वपूर्ण गोष्टी देण्याची तरतूद करण्यात आली. २०१५-१६ या आर्थिक वर्षात व्याघ्र प्रकल्पांच्या कवचक्षेत्रातील (बफर) १५० गावांमध्ये ही योजना राबविण्यात आली. यासाठी काम्पामधून २१ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले. २०१६-१७ मध्ये पुन्हा नवीन १७६ गावांमध्ये, तर २०१७-१८ मध्ये १६६ गावांमध्ये ही योजना राबविण्यात आली. खरे म्हणजे मानव-वन्यजीव संघर्षाची तीव्रता व व्याप्ती लक्षात घेता ही योजना राज्यातील ६ व्याघ्र प्रकल्पांच्या (मेळघाट, पेंच, ताडोबा, नवेगाव-नागझिरा, बोर व सह्याद्री) कवचक्षेत्रातील सर्व गावांमध्ये जरी राबवायचे म्हटले, तरी त्यात ५९१ गावांचा समावेश होतो. त्यात टिपेश्‍वर, पैनगंगा, उमरेड-कर्‍हांडला, प्राणहिता, कन्हाळगाव (प्रस्तावित), मुक्ताई भवानी व घोडाझरी या वाघ पोसणार्‍या संरक्षित वनक्षेत्रांच्या परिघातील गावांचा तसेच संचारर्मार्गातील गावांचा समावेश केल्यास या गावांची संख्या एक हजारावर जाते. म्हणजेच समस्या एक हजार गावांपर्यंत पोहोचली असताना आम्ही पुरेशा निधीअभावी उपाययोजना फक्त १५० ते २०० गावांमध्येच करीत आहोत, तरीही या योजनेसाठी राज्य सरकारचे मी कौतुक करेन. परंतु, जे केंद्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण मार्गदर्शक तत्त्वे बनवून राज्य सरकारांवर चाबूक मारण्याचे काम करताना दिसते, त्यांची स्थिती फारच दयनीय आहे. वाघांची संख्या राज्यांनी वाढविण्याचे उद्दिष्ट देतानाच, व्याघ्र अधिवासांच्या परिघात येणार्‍या गावांच्या विकासासाठी त्यांच्याकडे इको डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजेच परिस्थितीकी विकास कार्यक्रम असतो. त्या अंतर्गत हा मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी महाराष्ट्राला मागील चार वर्षांमध्ये काहीही निधी दिलेला नाही. मोदीजींनी वाघांची चिंता करताना, लोकांप्रती संवेदनाशून्य असलेल्या या प्राधिकरणाच्या नीतीला बदलविणे आवश्यक आहे. असे होत नसेल तर त्यांनी प्राधिकरणाला चाबूक म्यान करून ठेवण्यास सांगितलेले बरे!
ज्या गावांमध्ये वन्यजीवांच्या त्रासामुळे शेती करणे कठीण होऊन बसले आहे, अशा गावांसाठी या सरकारने शेती न करण्याच्या अटीवर आर्थिक मोबदला देणारी आणखी एक योजना आणली आहे. यातून शेतकर्‍यांना शेती न करता वन्यप्राणी पर्यटनातून वार्षिक आर्थिक उत्पन्न मिळू शकते. या माध्यमातून विदर्भात केनियाच्या धर्तीवर संरक्षित वनक्षेत्रांना संलग्नित असे वन्यप्राणी लोकअभय परिसर (कॉन्झर्वन्सी) अभे राहू शकतील. नोव्हेंबर २०१५ मध्ये नागपूर जिल्ह्यातील उमरेड-कार्‍हांडला अभयारण्याच्या बाजूला गावकरी व उद्योजक यांच्या सहकार्यातून ही संकल्पना प्रत्यक्षात आणणे सुरू झाले. पण, विदर्भातील वन्यप्राणी समस्याग्रस्त अशा इतर शेतकर्‍यांनी या योजनेला कवटाळावे असे परिणाम गेल्या तीन वर्षांत तरी पाहायला मिळाले नाहीत.
हे सर्व पाहता, प्रश्‍न केवळ एकट्या अवनीचा किंवा यवतमाळ जिल्ह्यात मृत्युमुखी पडलेल्या १३ ग्रामस्थांचा नाही; तर विदर्भाच्या भूमीत व्याघ्र संरक्षणाच्या प्रयत्नांना आलेल्या यशाची ही समस्या आहे. वाघही मारले जात आहेत आणि लोकही. भविष्यात उभ्या राहू पाहणार्‍या आणखी गंभीर परिणामांची कदाचित ही नांदीपण असेल. त्यामुळे प्राणिमित्रांनी तसेच प्रसिद्धिमाध्यमांनी व्याघ्रसंरक्षणाचा प्रवास व समोरची नेमकी बिकट आव्हाने समजून घेण्याची गरज आहे. राजकीय इच्छाशक्तीशिवाय व्याघ्रसंरक्षण होणार नाही. कायदा, नियम व मार्गदर्शक तत्त्वांची पायमल्ली झाली असल्यास दोषींना शिक्षा देण्यास न्यायव्यवस्था सक्षम आहे. वाघांना वाचविताना व वाढविताना एकही माणूस मारला जाणार नाही, ही जबाबदारी आपण स्वीकारल्यास, येणार्‍या काळात व्याघ्रसंरक्षण शक्य होणार आहे. वाघ वाढलेच पाहिजेत, पण माणूस मारून नव्हे! त्यासाठी केंद्र आणि राज्याने समस्येचा आवाका व गांभीर्य समजण्याची तेवढी गरज आहे!
(लेखक, ‘सातपुडा फाउंडेशन’ या मध्य भारतातील अग्रगण्य संस्थेचे संस्थापक असून, मागील ३० वर्षांपासून वाघ व आदिवासी विकास यासाठी कार्यरत आहेत. ते भारत सरकारच्या केंद्रीय वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य आहेत.) •••

Posted by : | on : 25 Nov 2018
Filed under : आसमंत, पुरवणी.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी (247 of 926 articles)

Narendra Modi23
अभिप्राय : डॉ.वाय.मोहितकुमार राव | मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयांचा भविष्यकाळात देशाला भरपूर फायदा होईल आणि देशाची अर्थव्यवस्था मजबूत होईल. देशात ...

×