ads
ads
सजा पक्की : कशी? ते लष्कर ठरवेल!

सजा पक्की : कशी? ते लष्कर ठरवेल!

•पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पांढरकवड्यात पाकला इशारा •कोलामी, बंजारा,…

पाकिस्तानातील आयातीत वस्तूंवर २०० टक्के कर

पाकिस्तानातील आयातीत वस्तूंवर २०० टक्के कर

नवी दिल्ली, १६ फेब्रुवारी – पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती…

भारताला स्वरक्षणाचा अधिकार

भारताला स्वरक्षणाचा अधिकार

•अमेरिकेच्या एनएसएचा अजित डोवाल यांना फोन, नवी दिल्ली/वॉशिंग्टन, १६…

भारताने डगमगू नये, ठोस कारवाई करावी

भारताने डगमगू नये, ठोस कारवाई करावी

•अमेरिकेतील ७० खासदारांची भूमिका, वॉशिंग्टन, १६ फेब्रुवारी – पुलवामातील…

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी

•पाकिस्तानने व्यक्त केली वचनबद्धता •कुलभूषण जाधव प्रकरण, लाहोर, १६…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:27
अयनांश:

बी टीम आणि ए टीम

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर |

मग राहुल कोणाला हातभार लावत होते? कोणाची ए टीम म्हणून दौरे करीत होते? अशा ए टीम आणि बी टीमने निकालानंतर एकत्र यायचे ठरवले, तर त्यात वावगे काय? ज्योतिरादित्य शिंदे वा सचिन पायलट यांनी मागल्या दोनतीन वर्षात आपापल्या राज्यात मेहनत घेऊन भाजपा विरोधी हवा निर्माण केली, ती राहुलनी आपल्या दौर्‍यातून काढून घेतली. तर मोदींसाठी प्रचाराला चांगले वातावरण निर्माण होते आणि भाजपाची ए टीम असेल तर तेच त्या टीमचे काम असते ना? उद्या अशा रितीने त्या तीन राज्यात भाजपाने आपले सरकार व सत्ता टिकवली, तर त्याचे श्रेय मोदींपेक्षाही भाजपाच्या ए टीमला म्हणजे राहुल गांधींनाच द्यावे लागणार ना?

Rahul Gandhi Pushkar

Rahul Gandhi Pushkar

तीन राज्यांच्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रचार रणधुमाळीत विविध पक्षांनी एकमेकांवर बेधडक आरोप करण्याला पर्याय नाही. त्यात तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी भारत ही मोदींच्या पित्याची जागिरी नसल्याचे म्हटले आहे, तर मोदींनी राव हे काँग्रेसप्रमाणेच घराणेशाही राबवित असल्याची टिका केली आहे. यात काँग्रेस हा तेलंगणातला मुख्य विरोधी पक्ष असल्याने त्या पक्षाचे मुरब्बी अध्यक्ष राहुल गांधी काय म्हणतात, याला खास महत्व आहे. राहुल नेहमी राफायल वा अनिल अंबानी यांच्यावर बोलत असतात. पण तेलंगणात त्यांनी आगामी राजकारणाचे बिगुल वाजवलेले आहे. आपल्या सोबत आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हजर असतानाही राहुलनी चंद्रशेखर राव यांच्याशी निकालानंतर युती करण्याची घोषणाच करून टाकली आहे. पण नायडूंना त्याचा किती अंदाज आलाय, हे ठाऊक नाही.
पण ही राहुल गांधी यांची शैली झालेली आहे. ते एक बोलतात आणि भलतेच करतात, हा आजवरचा अनुभव आहे. अशा राहुलनी नायडूंच्या हजेरीत राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीला भाजपाची बी टीम घोषित केलेले आहे. हा मोठा राजकीय संकेत आहे. कारण राहुल प्रचारात ज्या पक्षावर भाजपाचा हस्तक वा बी टीम म्हणून हल्ला करतात, त्यांच्याशी निकालानंतर थेट युती करतात, असा इतिहास आहे. त्यामुळे त्यांनी राव यांना भाजपाची बी टीम म्हटलेले आहे. मग ११ तारीख नंतर तेलंगणात टीआरएस व काँग्रेस यांचे संयुक्त सरकार सत्तेत आले तर नवल मानण्याचे कारण नाही. असेच कर्नाटकात झालेले आपण विसरून गेलो काय? कर्नाटक विधानसभेच्या प्रचारात अखेरच्या दिवसात राहुल यांनी कुमारस्वामी व जनता दल सेक्युलर पक्षाला भाजपाची बी टीम म्हणून घोषित करून टाकलेले नव्हते का?
आताही तेलंगणात राहुलनी राव यांच्या टीआरएस पक्षाला हरवण्यासाठी चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाशी हातमिळवणी केलेली आहे. त्यातली पहिली गंमत अशी, की तेलंगणाच्या निर्मितीला तेलगू देसम पक्षाचा कडवा विरोध होता. त्यामुळेच त्या राज्यात नायडू यांना फारसे समर्थक नाहीत. मागल्या विधानसभा व लोकसभा निवडणूकीत त्याची प्रचितीही आलेली आहे. त्यामुळेच नायडूंना स्वबळावर तिथे लढणे शक्य नव्हते. त्यांनी काँग्रेससोबत आघाडी करण्यात गैर काहीच नाही. पण तिथे हे दोन पक्ष एकमेकांना कोणती मदत करू शकणार आहेत, त्याचे उत्तर सोपे नाही. नायडू आंध्राचे मुख्यमंत्री व तेलंगणाचे शत्रू मानले जातात. त्याचा फटका काँग्रेसला कितपत बसेल वा लाभ होईल, ते आज सांगता येत नाही. पण मजेची गोष्ट अशी, की आंध्राची विभागणी करून वेगळे तेलंगणा राज्य केल्याचे श्रेय काँग्रेस मागते आहे आणि त्याचे तात्कालीन कडवे विरोधक आता त्याच काँग्रेससोबत हातात हात घालून उभे आहेत. लोकांनी तेलंगणा देणार्‍या काँग्रेसवर विश्‍वास ठेवावा, की तेलंगणाला कडवा विरोध करणार्‍या चंद्राबाबूंना नव्या राज्याचे तारणहार मानावे? एकूणच घोळ आहे ना? तर असे लोक एकत्र येऊन तेलंगणा समितीला भाजपाची बी टीम घोषित करीत आहेत. पण मग भाजपाची ए टीम कोण आहे? त्याचा खुलासा राहुलनी कधीच केलेला नाही. त्यांना भाजपाची प्रत्येक राज्यातली बी टीम नेमकी ठाऊक असते. पण एक टीम मात्र सांगता येत नाही. मग तेच व त्यांची काँग्रेस भाजपाची ए टीम आहे काय? कारण भाजपाला मागल्या चार वर्षात जितके व जिथे मोठे यश मिळाले, त्यात महत्वाची मदत खुद्द राहुल गांधी व काँग्रेस पक्षानेच केलेली आहे. मात्र जिथे ए टीम फसली तिथे भाजपाच्या बी टीमशी काँग्रेसनेच हातमिळवणी करून सत्तेवर कब्जा मिळवला आहे. आताही बहुधा निकालानंतर राहुल बहूमत हुकलेल्या चंद्रशेखर रावना पाठींबा देण्याच्या मनस्थितीत आलेले असावेत.
त्यालाही हरकत नाही. लोकशाहीत आणि निवडणूकीच्या राजकारणात संख्येला महत्व असते. सगळेच पक्ष आधी एकमेकांच्या विरोधात लढतात, दोषारोप करतात आणि नंतर गळ्यात गळे घालून सत्तेची हिस्सेदारीही करतात. तेच काँग्रेस वा राहुल गांधी यांनी केल्यास त्यात काही गैर मानायचे कारण नाही. पण ज्या भाजपाच्या विरोधात राहुल अखंड आग ओकत असतात, त्याच पक्षाची बी टीम लगेच त्यांच्यासाठी पुरोगामी कशी होते, त्याचाही एकदा खुलासा त्यांनी करावा अशी अपेक्षाही गैर मानता येत नाही. पण खुलासा गांधी खानदानाने देण्याची कुठलीही गरज नाही. सुदैवाने तशी अजून भारतीय राज्यघटनेत तरतुद झालेली नाही. बहुधा पुढल्या काळात पुन्हा युपीएचे पुरोगामी राज्य आले, तर तशीही तरतुद केली जाईल. मग असे प्रश्‍न विचारण्याची वा खुलासा मागण्याची हिंमत कोणाला होणार नाही. पण सध्या तशी तरतुद नसल्याने हे प्रश्‍न उपस्थित होणारच. अर्थात त्याचा खुलासा मिळण्याची अपेक्षा बाळगता येत नाही. म्हणूनच आपल्या बुद्धीनुसार त्याची उत्तरे शोधणे भाग आहे. जर टिआरएस व कर्नाटकातील कुमारस्वामींचा सेक्युलर जनता दल भाजपाची बी टीम असेल; तर त्याच्याशी राहुल निकालानंतर हातमिळवणी कशाला करतात? आणि ह्या अशा बी टीमवर पुरोगामी लोक भाजपाचा विरोधक असल्याचा विश्‍वास कशाला ठेवतात? त्याचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला भाजपाची ए टीम कोण याचा शोध घ्यावा लागेल आणि तो घ्यायला गेल्यास राहुल गांधी व त्यांचे निकटवर्तियच भाजपाची खरी ए टीम असल्याचे धागेदोरे सापडू शकतात. २०१३ पासून काँग्रेसच्या नेतृत्वाची सुत्रे हाती घेतल्यापासून नरेंद्र मोदींच्या काँग्रेसमुक्त भारताच्या घोषणेला वास्तवात आणण्यासाठी राहुल गांधींनी जेवढे परिश्रम घेतले तितके खुद्द मोदी शहांनी घेतले नाहीत. राहुल व अय्यर, निरूपम, बब्बर इत्यादिकांनी तशीच मेहनत घेतल नाही का? मग त्यांना भाजपाची ए टीम नाही तर काय म्हणायचे?
मागल्या दोनतीन महिन्यापासून पाच राज्याच्या विधानसभा निवडणूकांची अखंड रणधुमाळी चालू आहे आणि राज्याच्या मतदानात स्थानिक प्रश्‍नांना मोठे महत्व असते. तिथले मतदार आपल्या अडचणींवर मात करणारा सत्ताधारी शोधत असतात आणि सत्तेत असलेल्यांच्या चुकांसाठी त्याला शिक्षा करायला मत बनवित असतात. परंतु राहुल गांधी काँग्रेसचे स्टार प्रचारक म्हणून सगळ्या राज्यात राफायल विषयावर पोटतिडकीने बोलताना आपण बघितलेले आहेत. ज्या विषयाशी त्या राज्यातूल मतदार जनतेला काडीमात्र कौतुक नाही की फिकीर नाही, अशा विषयावर तोफा डागून राहुलनी भाजपाच्या स्थानिक मुख्यमंत्र्यांना किती दिलासा दिला आहे? शेतकरी संकटात अणि महागाई वा विकासाचे थांबलेले काम; यासाठी लोक उत्सुकतेने काँग्रेसची भूमिका ऐकायला व्याकुळ झालेले होते. तर त्यांना अनिल अंबानींना तीस हजार कोटी मिळाल्याचे वत्त सांगून राहुल गांधी निराश करत राहिले. हे ए टीमचे काम नाही काय? राहुल जातील व बोलतील तोच चर्चेचा विषय व्हायचा आणि त्यात कुठेही स्थानिक प्रश्‍न वा समस्यांचा मागमूस नव्हता. हे काँग्रेसला लाभदायक नव्हते आणि भाजपाला त्रासदायक नव्हते. मग राहुल कोणाला हातभार लावत होते? कोणाची ए टीम म्हणून दौरे करीत होते? अशा ए टीम आणि बी टीमने निकालानंतर एकत्र यायचे ठरवले, तर त्यात वावगे काय? ज्योतिरादित्य शिंदे वा सचिन पायलट यांनी मागल्या दोनतीन वर्षात आपापल्या राज्यात मेहनत घेऊन भाजपा विरोधी हवा निर्माण केली, ती राहुलनी आपल्या दौर्‍यातून काढून घेतली. तर मोदींसाठी प्रचाराला चांगले वातावरण निर्माण होते आणि भाजपाची ए टीम असेल तर तेच त्या टीमचे काम असते ना? उद्या अशा रितीने त्या तीन राज्यात भाजपाने आपले सरकार व सत्ता टिकवली, तर त्याचे श्रेय मोदींपेक्षाही भाजपाच्या ए टीमला म्हणजे राहुल गांधींनाच द्यावे लागणार ना? •••

Posted by : | on : 2 Dec 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, भाऊ तोरसेकर, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, भाऊ तोरसेकर, स्तंभलेखक (213 of 1220 articles)

Shri Ram1
मानसरंग : मयुरेश डंके | सर्वसामान्य रामभक्त हिंदू भारतीयाने आजही न्यायालयावर व न्यायव्यवस्थेवर विश्‍वास ठेवला आहे, हे निश्‍चितच महत्वाचे आहे. ...

×