ads
ads
आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

•अभिनंदन प्रकरणी पाकिस्तानला इशाराच दिला होता •पंतप्रधान मोदी यांचा…

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

•११५ जागांसाठी उद्या मतदान, नवी दिल्ली, २१ एप्रिल –…

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पिंपरी चिंचवड, २१ एप्रिल – पवार कुटुंबाने शिक्षणाच्या माध्यमातून…

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

•४५० जखमी, मृतांमध्ये ३५ विदेशी •तीन चर्च पूर्ण उद्ध्वस्त,…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, प्रशांत आर्वे, स्तंभलेखक » भगवान बुद्ध ते संत गाडगेबाबा…

भगवान बुद्ध ते संत गाडगेबाबा…

॥ भारत भाग्य विधाता : प्रशांत आर्वे |

बाबांनो, दगडात देव नसतो. एवढे आम्ही ध्यानात ठेवले. मात्र, तो माणसात वसतो, त्यांची ही शिकवण आम्ही सोयिस्करपणे विसरलो. आमचा उन्माद एवढा की, ज्या जातीच्या निर्मूलानाकरिता तहहयात डॉ. आंबेडकर लढले, त्याच जातींची अस्मिता आम्ही आज गोंजारत बसलोय. सांगायचा मुद्दा हा की, तथागत आम्हाला मनाच्या शुद्धतेचा विचार देतात, तर गाडगेबाबादेखील दिवसा गावातील घाण साफ करतात, तर रात्री डोक्यातील घाण साफ करतात.

Buddh Gadgebaba

Buddh Gadgebaba

तथागत गौतम बुद्ध म्हणजे या देशाला पडलेलं एक सुंदर स्वप्न आहे. डॉ. बाबसाहेब आंबेडकरांनी १९५६ मध्ये संपूर्ण दलित समाजाला धम्माच्या पायाशी नेल्यावर पुन्हा एकदा धम्माचा विचार केंद्रस्थानी आला. त्या आधी अनेक वर्षे बाबासाहेबांचा विविध धर्मांचा अभ्यास सुरू होता. तत्पूर्वी थोर विचारवंत धर्मानंद कोसंबी धम्माचा समग्र अभ्यास करीत होतेच. बाबासाहेबांचा धम्म स्वीकारण्यामागील हेतू आजही आमच्या अनेकांच्या ना ध्यानात आला, ना आम्ही त्या मार्गावर जाण्याचा प्रयत्न केला. बुद्धाचा धम्म आणि बाबासाहेबांनी मांडलेला धम्म वेगळा आहे, अशीच मांडणी बाबासाहेबांच्या पश्‍चात होऊ लागली. शील, समाधी आणि प्रज्ञेचा मार्ग वेगवेगळा कसा असेल? किंबहुना तथागत आमच्या समाजात पूर्ण रुजू शकले नाही आणि त्याचे परिणाम आज आम्ही भोगतोय. बुद्धाने जगाला दिलेली अप्रतिम अशी देणगी म्हणजे विपश्यना होय. मनाला निर्मळ करण्याच्या या वैज्ञानिक प्रक्रियेला विरोध करणारे आज बुद्धाचा वारसा सांगतात, हे दुर्दैवी आहे. आपल्याकडे दोन शब्दप्रयोग हमखास होताना दिसतात. एक म्हणजे विकारमुक्त आणि विचारमुक्त. आम्ही जेव्हा आपल्या आराध्याचे स्मरण करीत डोळे बंद करतो वा हातात माळ घेऊन नामस्मरण करतो त्या वेळी चित्त एकाग्र होते, विचारमुक्त होते पण विकारमुक्त ते होईल, याची शास्वती देता येत नाही. विकारमुक्त होण्यासाठी मनातल्या विचारांना थांबवून चालणारे नाही, तर ते जसे आहे त्या स्वरूपात स्वीकारणे गरजेचे असते. केवळ त्यामागे मनात येणारा प्रत्येक विचार हा अनित्य आहे आणि मनाच्या पटलावर उमटणारा प्रत्येक विचार हा शरीरावर संवेदना प्रकट करीत असतो. विपश्यना आपल्याला राग (या ठिकाणी आसक्ती), द्वेष या भावनेच्या पलीकडे जाऊन मनात निर्माण होणार्‍या विचारांच्या वादळाकडे सम्यक दृष्टीने बघायला शिकवते. एकदा या प्रक्रियेतून आपण जाऊ लागलो की, मन वर्तमानात स्थिर होते. कोणत्याही क्रियेला शाब्दिक वा कायिक प्रतिक्रिया देण्यापूर्वी आपण आपल्या मनाच्या अवस्थेकडे जाऊ लागतो आणि प्रतिक्रियावादी होणे टाळतो. इतका साधा, सोपा आणि सगळ्यांना साध्य होईल असा मार्ग तथागत आपल्याला देऊन गेले. ध्यानधारणेचा हा मार्ग सांगत असताना ही विद्या मी निर्माण केलीये, असा दंभ भगवान बुद्धाच्या बोलण्यात येणे शक्यच नाही. या देशातील थोर माणसांनी दिलेल्या या विद्येचे भगवान बुद्धांनी पुनर्निर्माण केले.
हा मार्ग खरेतर माणसाने माणसाशी माणुसकीने वागविण्यास सक्षम आहे, पण केहा? आम्ही त्याचा सर्व पूर्वग्रह बाजूला सारून विचार करणार असू तर. येथील बहुसंख्य समाजानेदेखील बुद्ध म्हणजे परग्रहावरील व्यक्ती नसून ते आमच्याच भारतीय परंपरेचे मुकुटमणी आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. हा शुद्ध आध्यात्मिक, वैज्ञानिक आणि मानवी कल्याणाचा मार्ग आपल्याला ते देतात. समाजाच्या स्वास्थ्याचे मार्ग जरी वेगवेगळे असले तरी हेतू मात्र एकच आहे आणि तो म्हणजे मानवी कल्याण, सौहार्द आणि सद्भावना. बुद्धाची ही परंपरा महाराष्ट्र देशी अनेक संतांनी पुढे चालवली.
आजचा महाराष्ट्रधर्म खर्‍या अर्थाने ज्यांच्या जिवावर पोसला गेलाय त्या राष्ट्रसंतांचे आणि राष्ट्रवीरांचे अनंत उपकार या महाराष्ट्र देशावर आहेत. भगवान बुद्धापासून तर संत गाडगेबाबांपर्यंत सगळ्यांचा काय प्रयत्न राहिलाय, हे वेगळे सांगायला नको.
सामान्य जनतेची मनोधारणा विकसित करत राहणे, हाच काय तो त्यांनी घेतलेला वसा. महाराष्ट्रात तथागतांचा वारसा, ज्ञानदेव, तुकारामांच्या परंपरेतील सर्व संतांनी आणि समाजसुधारकांनी पुढे नेला. त्याचे सूत्र मात्र पुन्हा शील, समाधी आणि प्रज्ञेत सापडते. उत्तर भारतात संत गुरुनानक देव, संत कबीर, संत तुलसीदास, संत रविदास; गुजरातेत नरसी मेहता, दक्षिणेत नारायण गुरू ही परंपरा फार फार मोठी आहे.
या संतपरंपरेतील विचारांचे शेवटचे फळ म्हणजे गाडगेबाबा. गाडगेबाबांच्या प्रबोधनामुळे महाराष्ट्रातील जनमानस ढवळून निघाले. त्यांच्या अत्यंत चिकित्सक मांडणीसमोर जनता निरुत्तर होत असे. आपण जे करतोय ते चूक आहे याची त्यास खात्री होत असे आणि बाबांच्या तर्काधिष्टित मांडणीसमोर भले भले उघडे पडत. बाबांच्या प्रबोधनपर्वामुळे महाराष्ट्र ढवळला गेला. समाजातील मोठा वर्ग संकुचित, जातीय मानसिकतेतून बाहेर आला. ‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदाभेद सर्व अमंगळ।’ या तुकोबारायांच्या ओळीप्रमाणे महाराष्ट्रधर्माची वाटचाल सुरू झाली. बाबांच्या प्रबोधनपर्वाचा समग्र धांडोळा घेण्यापूर्वी त्यांच्या पश्‍चात घडलेल्या घटनांचे काही संदर्भ येथे मांडणे उचित होईल. सांप्रत प्रबोधनाची दिशा त्यातून स्पष्ट होण्यास मदत होईल.
एकाच वेळी राष्ट्रीय पटलावर, अनेक वरवर गुंतागुंतीच्या वाटणार्‍या मात्र अंततोगत्वा त्याचा शेवट आणि ध्येय एकच असलेल्या घटनांची गर्दी झालेली आपण बघितली आहे. प्रश्‍न आहे तो त्या घटनांच्या चिकित्सेचा आणि त्याचा वर्तमान काळातील प्रबोधनाशी असलेला संबंध तपासण्याचा. १९९० च्या काळात भारतात जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले. त्याची फळेसुद्धा लवकरच सर्वसामान्यांच्या पदरी पडली. त्यातून नव उद्योजक, व्यावसायी, संस्थाचालक, प्राध्यापक, शिक्षक, अभियंते, तंत्रज्ञ वेगाने निर्माण होऊ लागले. सामान्यांच्या हाती पैसा दिसू लागला. आर्थिक क्षेत्रातील ही सर्वस्तरीय आघाडी भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीस कारणीभूत ठरली. १९९९ च्या सुमारास अटलबिहारी बाजपेयी यांच्या नेतृत्वातील पहिले गैरकाँग्रेसी सरकार अस्तित्वात आले. त्याच वेळी महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. त्याच वर्षी भारतात आलेल्या पोप जान पॉल द्वितीय यांनी केलेले वक्तव्य महत्त्वपूर्ण ठरते. ते म्हणतात, पहिल्या सहस्रकात आम्ही संपूर्ण युरोप आणि अमेरिकेला येशू ख्रिस्ताचा प्रकाश दिला. दुसर्‍या सहस्रकात संपूर्ण आफ्रिका आम्ही पादाक्रांत केला. एकविसावे शतक हे आशियासाठी आहे. त्यातही भारत आमच्या अजेंड्यावर अग्रस्थानी आहे. याच काळात बिहारमध्ये जातीय अस्मितेची मोट बांधून लालूप्रसाद यादव यांनी एम. वाय. समीकरण तयार केले आणि सुरू झाले एक अत्यंत भ्रष्ट असे राज्यतंत्र. तोवर महाराष्ट्राला या सोशल इंजिनीयरिंगची लागण व्हावयाची होती. २००४ मध्ये आघाडीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर बिहारी प्रयोग महाराष्ट्रात सुरू झाले. राजकारणातल्या जाणत्या राजानेदेखील एम. एम. समीकरणाची अर्थात मराठा-मुस्लिम अशी मांडणी सुरू केली. जातीय अस्मिता पुन्हा एकदा गोंजारली जाऊ लागली. जातीचे विखारी फूत्कार बाहेर पडू लागले. कुठल्या तरी एका गटाचे संघटन करायचे म्हणजे शत्रुस्थानी कुणीतरी असावा लागतो. मग निवड झाली अशा समाजाची ज्याचा राजकारणातला टक्का मुळात दोन टक्के आणि तो समाज मुळातच स्वान्तसुखाय. तरीपण दोन्ही बाजूने तलवारी परजल्या जाऊ लागल्या. त्यात घडले जेम्स लेन प्रकरण आणि महाराष्ट्राचे वातावरण प्रचंड तापले. नवइतिहासकारांची फौज उभी राहिली. त्वेषाने ती भांडू लागली. कुणाला पुरावा देण्याची गरज नव्हतीच. आले माझ्या मना, या पद्धतीने कारभार सुरू झाला. २००९ ची निवडणूक पुन्हा एकदा आघाडीने जिंकली. कट यशस्वी ठरला होता, मात्र समाजाच्या सद्भावनेला तडा गेला तो कायमचा.
सर्वत्र प्रबोधनाच्या नावावर उभ्या राहिल्या वैचारिक झुंडी आणि छावण्या. या छावण्या व्यापून टाकल्या हिंदुत्ववादी, आंबेडकरवादी, संघवादी, साम्यवादी, ब्रिगेडी, बामसेफी, गांधीवादी, पुरोगामी, प्रतिगामी अशा सार्‍या मंडळींनी. पण, गाडगेबाबांचा माणूस मात्र हरवून बसला. एखाद्याने मी निधर्मी साम्यवादी आहे म्हणून जाहीर करायचा अवकाश, त्यावर झुंडीच्या झुंडी तुटून पडू लागल्या. त्याच वेळी एखाद्याने हिंदुत्वाचा विचार मांडायचाच अवकाश; त्याच्यावर प्रतिगामित्वाचा शिक्का बसलाच म्हणून समजा. मग पुन:पुन्हा गरज वाटू लागली ती गाडगे महाराजांची, त्यांच्या विचारांची. जे जे म्हणून आपले त्या सर्वांना नकार, असे एक नवे तंत्र विकसित झाले. सण आपले नाहीत. देवी, देवता हे तर आम्हाला गुलाम करण्याकरीता लादलेले. पाडवा असो की दिवाळी, सर्वांना सरसकट नाकारताना अलीकडच्या परिवर्तनवादी चळवळी भरकटत गेल्या, हे मान्य करावेच लागते. जेष्ठ संशोधक आणि विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे नेहमी आपल्या कार्यकर्त्यांना याबाबत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देताना दिसतात. ते म्हणतात, आपल्या अशा वागण्या- बोलण्याने ना बहुजन समाजाच्या घरात जागा मिळणार आहे, ना मनात. मग डोक्यात जागा मिळविण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. किती सूचक हे विधान आहे!
आता गाडगेबाबांचा नकार बघू या. त्यांचा नकार आहे तो जातिप्रथेला, नकार आहे अंधश्रद्धेला, नकार आहे अस्वच्छतेला, नकार आहे ढोंगीपणाला, बुवाबाजीला. आणि त्यांचा धर्म काय आहे, तर- ‘पुण्य पर उपकार पाप ते परपीडा।
आणिक नाही जोडा दुजा यासी॥’
बाबांनो, दगडात देव नसतो. एवढे आम्ही ध्यानात ठेवले. मात्र, तो माणसात वसतो, त्यांची ही शिकवण आम्ही सोयिस्करपणे विसरलो. आमचा उन्माद एवढा की, ज्या जातीच्या निर्मूलानाकरिता तहहयात डॉ. आंबेडकर लढले, त्याच जातींची अस्मिता आम्ही आज गोंजारत बसलोय. सांगायचा मुद्दा हा की, तथागत आम्हाला मनाच्या शुद्धतेचा विचार देतात, तर गाडगेबाबादेखील दिवसा गावातील घाण साफ करतात, तर रात्री डोक्यातील घाण साफ करतात.
गाडगेबाबांना दांभिकपणा अजीबात चालत नसे. कुणी पाया पडायला आले की, ते पाठीत काठी घालीत. धगधगीत वैराग्य काय असते ते त्यांनीच आम्हाला शिकविले. मात्र, त्यांच्या प्रबोधनाचा वसा आम्ही आपापल्या सोयीनुसार वापरला. मुळात आज आम्ही जे करतोय ते प्रबोधन नव्हेच. तो आहे फक्त आमच्या स्वार्थाचा धंदा. रंजल्यागांजल्यांची सेवा जिथे वर्तमानपत्राच्या एका फोटोकरिता केली जाते, तिथे आम्ही बाबांना काय समजणार?
संत कबीर म्हणतात,
‘ऐसी जगह बैठ जहा कोई न बोले उठ,
ऐसी बात बोल के कोई न बोले झूठ॥’
बाबा आयुष्यभर ‘ऐसी बात’ बोलत राहिले ज्यावर प्रत्येकाने जीव ओवाळून टाकावा आणि आपल्या कार्याने अशा जागी विराजमान झाले की, त्या मार्गावर आमच्यासारख्यांनी चालणेदेखील दुस्तर वाटावे. प्रश्‍न असा आहे की, आतातरी आम्ही आपापल्या छावण्या सोडून एकत्र येणार आहोत की, पुन्हा…?

Posted by : | on : 30 Dec 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, प्रशांत आर्वे, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

1 Responses to

भगवान बुद्ध ते संत गाडगेबाबा…

 1. Prashant Birari Reply

  3 Jan 2019 at 2:19 pm

  It’s a strategi in our Indians. They can’t see another side

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

  छायाचित्रातून

 • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
 • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
 • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
 • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
 • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, प्रशांत आर्वे, स्तंभलेखक (281 of 1368 articles)

Us Navy
विश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले | आज जगभरात अमेरिकन आरमार हे मनुष्यबळ, साधनसामग्री, विज्ञान आणि तंत्रज्ञान अशा सर्वच दृष्टीने क्रमांक ...

×