ads
ads
स्वामी असीमानंद निर्दोष

स्वामी असीमानंद निर्दोष

•समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण, पंचकुला, २० मार्च – समझौता…

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

बसपा नेते चंद्रप्रकाश मिश्रा भाजपात

नवी दिल्ली, २० मार्च – उत्तरप्रदेशातील बसपाचे नेते चंद्रप्रकाश…

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

मुळांना नित्य नेमे ओंजळभर पाणी!

•उद्या जागतिक जल दिन, नागपूर, २० मार्च – झाडांना…

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

नीरवला अटक; मोदी सरकारच्या प्रयत्नांना यश

•स्कॉटलंड यार्डची कारवाई, लंडन, २० मार्च – पंजाब नॅशनल…

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनच्या मंजुरीनेच

•चिनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची माहिती, बीजिंग, १९ मार्च –…

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

नीरव मोदीविरोधात अटक वॉरंट जारी

लंडन, १८ मार्च – पंजाब नॅशनल बँकेत सुमारे १४…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

१७ व्या लोकसभेचा महाकुंभ!

॥ विशेष : सुधीर पाठक | १७ व्या लोकसभेसाठीचा…

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

निवडणुकीपूर्वीच महागठबंधनाचा बँडबाजा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | महागठबंधन याचा अर्थच…

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

जबरदस्त तडाखा कसा द्यायचा आम्ही जाणतो!

॥ रोखठोक : हितेश शंकर | पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:30 | सूर्यास्त: 18:35
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी » भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य |

तीर्थराज प्रयागमध्ये माघ महिन्यात विशेषत: कुंभाच्या काळात गंगा, यमुना व अदृश्य सरस्वतीच्या संगमात स्नानाचे फार महत्त्व सांगण्यात आले आहे. ब्रह्मपुराणानुसार संगमस्नानाचे फळ अश्‍वमेध यज्ञासमान म्हटले आहे. अग्निपुराणानुसार प्रयागात दररोज स्नानाचे फळ, दररोज कोटी गोदानाच्या समान म्हटले आहे. मत्स्यपुराणात म्हटले आहे की, दहा हजार वा त्याहूनही अधिक तीर्थयात्रांचे जे पुण्य मिळते, तितकेच माघ महिन्यात संगमस्नानाने मिळते. तसे तर प्रयाग क्षेत्र वैदिक आणि पौराणिक काळात सन्मानित राहिले आहे. परंतु, ऐतिहासिक काळातही याच्या महत्त्वाची चर्चा अनेक इतिहासकारांनी केली आहे.

Kumbh 01

Kumbh 01

आमचा देश भारताला जगाचा आत्मा आणि प्रयागला भारताचा आत्मा म्हणतो. आमच्या देशाला जीवनदायी शक्ती याच धरतीपासून प्राप्त होत आली आहे. ज्याप्रमाणे सनातन धर्म अनादी म्हटला जातो, त्याचप्रमाणे प्रयागच्या महिमेचा कुठलाही आदिअंत नाही. अरण्य आणि नदी संस्कृतीमध्ये जन्म घेऊन, ऋषी-मुनींच्या तपोभूमीच्या रूपात पंचतत्त्वांना पुष्पित-पल्लवित करणारी प्रयागची भूमी, देशाला नेहमीच ऊर्जा देत राहिली आहे.
प्रकृष्टं सर्वयागेभ्य: प्रयागमिति गीयते।
दृष्ट्वा प्रकृष्टयागेभ्य: पुष्टेभ्यो दक्षिणादिभि:।
प्रयागमिति तन्नाम कृतं हरिहरादिभि:।
उत्कृष्ट यज्ञ आणि दान-दक्षिणा आदींनी संपन्न स्थळ बघून, भगवान विष्णू तसेच भगवान शंकर आदी देवतांनी याचे नाव प्रयाग ठेवले आहे. असा उल्लेख अनेक पुराणांमध्ये आढळतो. ज्याची महिमा आमच्या सर्व धर्मग्रंथांमध्ये वर्णित आहे, असे तीर्थराज प्रयाग एक पावन स्थळ आहे. तीर्थराज प्रयागला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांचा प्रदाता म्हटले आहे.
प्रयागची महत्ता
एकदा शेषनागाला ऋषींनी प्रश्‍न विचारला की, प्रयागला तीर्थराज का म्हटले जाते? त्यावर शेषनागाने उत्तर दिले की, एक अशी वेळ आली की, सर्व तीर्थांच्या श्रेष्ठतेची तुलना होऊ लागली. त्या वेळी भारतातील समस्त तीर्थांना तराजूच्या एका पारड्यात ठेवण्यात आले आणि प्रयागला दुसर्‍या. तरीही प्रयागचे पारडे जड भरले. दुसर्‍यांदा सप्त पुरांना एका पारड्यात ठेवण्यात आले आणि प्रयागला दुसर्‍या पारड्यात, तिथेही प्रयागचे पारडे जड भरले. अशा प्रकारे प्रयागचे श्रेष्ठत्व सिद्ध झाले आणि त्याला तीर्थांचा राजा म्हणू लागले.
या पावन क्षेत्रात दान, पुण्य, तप, यज्ञादिंसोबतच त्रिवेणी संगमाचे अतिशय महत्त्व आहे. हे जगातील एकमेव स्थान आहे, जिथे तीन नद्या अर्थात् गंगा, यमुना आणि अदृश्य ‘सरस्वती’ मिळतात आणि इथेच इतर नद्यांचे अस्तित्व समाप्त होऊन पुढे केवळ एकमात्र नदी गंगेचे महत्त्व शिल्लक राहते. या भूमीवर स्वत: ब्रह्मदेवांनी यज्ञादी कार्य संपन्न केले आहेत.
श्रीरामचरितमानसमध्ये तीर्थराज प्रयागची महत्ता वर्णन केली आहे-
माघ मकरगत रवि जब होई। तीरथ पतिहिं आव सब कोई॥
देव-दनुज किन्नर नर श्रेनी। सादर मज्जहिं सकल त्रिबेनी॥
पूजहिं माधव पद जल जाता। परसि अछैवट हरषहिं गाता॥
भरद्वाज आश्रम अति पावन। परम रम्य मुनिवर मन भावन॥
तहां होइ मुनि रिसय समाजा। जाहिं जे मज्जन तीरथ राजा॥
प्रयागराज कुंभस्थानाचे प्रमुख पर्व व मुहूर्त
मकरसंक्रांती १५ जानेवारी २०१९
पौष पौर्णिमा २१ जानेवारी २०१९
मौनी अमावास्या ४ फेब्रुवारी २०१९
वसंत पंचमी १० फेब्रुवारी २०१९
माघ पौर्णिमा १९ फेब्रुवारी २०१९
महाशिवरात्री ४ मार्च २०१९
माघात संगमस्नान का?
तीर्थराज प्रयागमध्ये माघ महिन्यात विशेषत: कुंभाच्या काळात गंगा, यमुना व अदृश्य सरस्वतीच्या संगमात स्नानाचे फार महत्त्व सांगण्यात आले आहे. ब्रह्मपुराणानुसार संगमस्नानाचे फळ अश्‍वमेध यज्ञासमान म्हटले आहे. अग्निपुराणानुसार प्रयागात दररोज स्नानाचे फळ, दररोज कोटी गोदानाच्या समान म्हटले आहे. मत्स्यपुराणात म्हटले आहे की, दहा हजार वा त्याहूनही अधिक तीर्थयात्रांचे जे पुण्य मिळते, तितकेच माघ महिन्यात संगमस्नानाने मिळते.
प्रयागराज येथील इतर महत्त्वाची धर्मस्थळे
द्वादश माधव आणि विष्णुपीठ
प्रयागराजची मुख्य देवता विष्णू मानली आहे. तिला विविध नावांनी ओळखले जाते. प्रयागला स्थानिक लोक माधव क्षेत्र या नावानेही ओळखतात. द्वादश माधव खालीलप्रमाणे आहेत :
१. श्री त्रिवेणी संगम आदिवट माधव
२. श्री असि माधव (नागवासुकी मंदिर)
३. श्री संकष्ट हर माधव (प्रतिष्ठान पुरी)
४. शंख माधव (छतनाग मुंशी बगिचा)
५. श्री आदिवेणी माधव (अरैल)
६. श्री चक्र माधव (अरैल)
७. श्री गदा माधव (छिवकी गाव)
८. श्री पद्म माधव (बीकर देवरिया)
९. श्री मनोहर माधव (जानसेन गंज)
१०. श्री बिंदुमाधव (द्रौपदी घाट)
११. श्री वेणी माधव (निराला मार्ग, दारागंज)
१२. अनंत माधव (ऑर्डिनन्स डेपो फोर्ट)
शंकराचार्य मठ
विद्वत्ता आणि तपस्या यांची साक्षात् प्रतिमूर्ती स्वामी ब्रह्मानंद सरस्वती यांना कोण ओळखत नाही? ज्योतिर्मठ बदरिकाश्रमाला आपल्या तपोबलाने जागृत करणार्‍या या शंकराचार्यांनी प्रयागचे महत्त्व ओळखून येथे एका मठाची स्थापना करण्याचा संकल्प केला. त्यांनी पाहिले की अलोपशंकरी देवीच्या समोर एक शिवमंदिर आहे. स्वामी ब्रह्मानंदजींना ते स्थान उपयुक्त वाटले. तिथे ज्योतिर्मठाचे कार्यालय करण्यात आले.
शंकर विमान मंडपम्
गंगेच्या तटावर आदी शंकर विमान मंडपम् मंदिर आहे. कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य स्वामी चंद्रशेखर सरस्वती यांच्या देखरेखीत निर्मित हे मंदिर प्रयागचे माहात्म्य अधिकच उन्नत करणारे आहे. अशा प्रकारचे मंदिर या भागात हे एकमेव आहे.
जंगमबाडी मठ
प्रयागच्या दारागंज मोहल्ल्यात जंगमबाडी मठाची शाखा स्थापित आहे. वीरशैव मतावलंबीयांचे हे स्थान दशाश्‍वमेध घाटाजवळ आहे. असे म्हणतात की, वीरशैव मताचे प्रतिपादक स्वयं भगवान शिव होते.
शिवमठ आणि सिद्धेश्‍वर महादेव मंदिर
संगमाच्या निकट दारागंज मोहल्ल्यात स्थित शिवमठ, सुदूर दक्षिणेच्या एका तपस्व्याच्या भक्तिभावाचा आणि संस्कृतिप्रेमाचा परिणाम आहे. सुमारे १६० वर्षांपूर्वी दक्षिण भारतातील तिरुनलवेली जिल्ह्यातील वाहकुलम् गावाचे श्री. वेंगुशिवन्, आपली सर्व संपत्ती कुठल्या तरी शिवमंदिराला समर्पित करण्याच्या इच्छेने तीर्थाटन करीत प्रयागला आले आणि येथील धार्मिक वातावरण बघून इथेच राहण्याचा त्यांनी संकल्प केला. संस्कृतचे विद्वान असलेले श्री. वेंगुशिवन् यांनी दक्षिण भारतीय तीर्थयात्रींच्या निवासासाठी या शिवमठाची स्थापना केली आहे.
बडे हनुमानजी
त्रिवेणी बांधाच्या खाली बडे हनुमानजी मंदिर आहे. या मूर्तीबाबत एक कथा सांगितली जाते. एक निपुत्रिक व्यापारी, हनुमानाची विशाल मूर्ती तयार करून नावेने घेऊन जात होता. असे सांगितले जाते की, आज जिथे हे मंदिर आहे त्या ठिकाणी त्या व्यापार्‍याची नाव रुतून बसली. रात्री स्वप्नात त्या व्यापार्‍याला, ही मूर्ती तिथेच सोडून देण्याचा दृष्टान्त झाला. तो ती मूर्ती तिथेच सोडून परत गेला. नंतर कालांतराने त्या व्यापार्‍याला अपत्यप्राप्ती झाली. इकडे बाघंबरी बाबा यांना हनुमानाच्या मूर्तीचा आभास झाला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खोदकाम केले असता त्यांना बडे हनुमानाची मूर्ती आढळली. ही मूर्ती तिथून उचलण्याचा खूप प्रयत्न करण्यात आला, परंतु मूर्ती हलली नाही. शेवटी तिथेच हनुमानाचे मंदिर बांधण्यात आले. हेच ते बडे हनुमानचे मंदिर.
तुलसीदासांचे ठिकाण
हे स्थान वैष्णव संप्रदायाच्या उपासकांचे श्रद्धास्थान आहे. प्रयागच्या दारागंज मोहल्ल्यात दक्षिण टोकाला स्थित हे स्थान देशात प्रसिद्ध आहे. असे म्हणतात की, याची स्थापना गोस्वामी तुलसीदास यांचे समकालीन व एक सिद्ध महात्मा श्री. देवमुरारी यांनी केली. त्यांच्या गुरूचे नावदेखील तुलसीदास होते. त्यांच्याच नावाने या ठिकाणचे नाव ‘श्री तुलसीदास का बडा स्थान’ असे पडले.
रामानंदाचार्य मठ
प्राचीन भारतीय संत, आचार्य यांच्या शृंखलेत श्री शंकराचार्य, माधवाचार्य, रामानुजाचार्य तसेच निम्बार्काचार्य यांची नावे उल्लेखनीय आहेत. श्री रामानंदाचार्य यांनी रामभक्तिधारेला संपूर्ण भारतात प्रवाहित करून उत्तर भारताच्या गौरवाला जीवित ठेवले. उत्तर भारतात रामभक्तिरसधारेला प्रवाहित करणार्‍या श्री रामानंद यांनी संपूर्ण भारताला राममय बनविले. आचार्य रामानंद यांच्या स्मृतीत श्री रामानंदाचार्य मठाचे निर्माण झाले. सध्या, त्रिवेणी बांधाच्या दक्षिण तटावर किल्ल्याला लागून श्री रामानंदाचार्य मठ आहे.
नागवासुकी
प्रयागच्या अत्यंत प्राचीन आणि पौराणिक स्थळांपैकी एक म्हणजे नागवासुकी. सध्या नागवासुकी मंदिर दारागंज (बक्शी) मोहल्ल्यात स्थित आहे. इथे नागवासुकीची प्राचीन मूर्ती आहे. मूर्तीत वासुकी मध्यभागी प्रतिष्ठित असून त्यांच्या दोन्ही बाजूंना नाग-नागिणींच्या चार जोड्या कामदशेत उत्कीर्ण आहेत. मंदिराच्या पूर्वेकडील प्रवेशद्वारात शंख वाजवत असलेले दोन कीचक आहेत. मंदिराच्या गर्भगृहात फणाधारी नाग-नागिणीची पुरातन मूर्ती आहे. मंदिरात विघ्ननाशक गणेशाचीही प्रतिमा आहे.
शक्तिपीठ
अलोपशंकरी देवी : प्रयागच्या ललितापीठाच्या अलोपशंकरी देवीचे अतिशय महत्त्व आहे. अलोपी बाग मोहल्ल्यात महानिर्वाणी पंचायती आखाड्याच्या अधीन अलोपशंकरी मंदिर आहे. मंदिरात कुठलीही प्रतिमा नाही. येथे एक चौकोनी चबुतरा आहे. चबुतर्‍याच्या मधोमध पाण्याचे एक कुंड आहे. या कुंडावर मंदिराच्या छताला लटकलेला एक पाळणा आहे. मंदिरात या पाळण्याची व कुंडाची पूजा केली जाते.
माँ ललितादेवी : प्रयाग येथील ललितापीठ अत्यंत प्राचीन आहे. याचे वर्णन मत्स्यपुराण, ब्रह्मपुराण, कुब्जिका तंत्र, रुद्रयामल तंत्र, तंत्र चूडामणी, शाक्तानंद तरंगिणी, गंधर्वतंत्र, देवी भागवत इत्यादी ग्रंथांमध्ये आढळते. ५१ शक्तिपीठांमध्ये वर्णित ललितापीठासंबंधी, सतीची बोटे या ठिकाणी पडल्याची कथा आढळून येते. प्रयागच्या मीरापूर मोहल्ल्यात हे मंदिर आहे.
कल्याणी देवी : अलोपशंकरी देवीच्या कथेत ५१ पीठांच्या कथांमध्ये माँ कल्याणीचेही वर्णन आले आहे. मत्स्यपुराणाच्या १०८व्या अध्यायात कल्याणी देवीचे वर्णन आढळते. प्रयाग माहात्म्यानुसार कल्याणी आणि ललिता एकच आहेत. परंतु, इथे त्यांचे वेगळे अस्तित्व आढळून येते. ब्रह्मवैवर्तपुराणाच्या तिसर्‍या खंडात वर्णित प्रसंगानुसार महर्षी याज्ञवल्क्य यांनी प्रयागमध्ये भगवतीची आराधना करून माँ कल्याणी देवीची ३२ अंगुले प्रतिमा स्थापन केली. हे मंदिर शहराच्या कल्याणी देवी मोहल्ल्यात आहे.
भरद्वाज आश्रम
महर्षी भरद्वाज यांना कोण ओळखत नाही? ते महान तपस्वी आणि ज्ञानी आचार्य होते. प्रयागमध्ये भरद्वाज यांची चर्चा श्रीरामाच्या वनगमनाच्या वेळी आढळते. ऋषी याज्ञवल्क्य यांनी सर्वप्रथम भरद्वाज यांना रामकथा ऐकविली होती, असे सांगतात.
रामचरित मानसमध्येही गोस्वामी तुलसीदास यांनी लिहिले आहे-
‘भरद्वाज मुनि बसहिं प्रयागा।’ सध्या महर्षी भरद्वाज आश्रम कर्नलगंज मोहल्ल्यात आनंदभवनाजवळ आहे. येथे भरद्वाज यांची कुठली प्रतिमा नाही; परंतु भरद्वाजेश्‍वर शिवलिंग तसेच सहस्र फणधारी शेषनागाची मूर्ती आहे. मंदिराच्या आसपासची भौगोलिक रचना बघितल्यास असे लक्षात येते की, कधी काळी गंगा नदी या आश्रमाच्या जवळून वाहात असावी. प्रयागला आल्यावर भरद्वाज आश्रमाचे दर्शन घेतले नाही, तर त्याच्या यात्रेचे फळ कमी होते, असे मानले जाते.
कोटितीर्थ (शिवकुटी)
येथील गंगेच्या दक्षिण तटावर स्थित तीर्थाला कोटितीर्थ म्हटले जाते. आधुनिक शिवकुटीच कोटितीर्थ आहे. पद्मपुराणानुसार येथे कोटी-कोटी तीर्थांचा निवास आहे. या कोटितीर्थाची देवता कोटी तीर्थेश्‍वर भगवान शिव आहे.
श्री हनुमत् निकेतन
प्रयागच्या सिव्हिल लाइन्स क्षेत्राच्या कमला नेहरू रोड व स्टेनली रोड यांच्या मध्ये ऐतिहासिक पुरुषोत्तमदास टंडन पार्काजवळ स्थित हनुमत् निकेतन, साडेतीन एकरात सुंदर वाटिकांनी सुसज्जित आहे. तीर्थयात्रेकरू, पर्यटक तसेच नगरनिवासींचे श्रद्धाकेंद्र श्री हनुमत् निकेतनचे संस्थापक रामलोचन ब्रह्मचारी होते. इथे बल, बुद्धी, विद्या व ब्रह्मचर्याचे प्रतीक श्री हनुमानाच्या दक्षिण दिशेला श्रीराम, लक्ष्मण व जानकी तसेच उत्तरेला सिंहवाहिनी दुर्गा यांच्या मूर्ती आहेत.
सरस्वती कूप
संगम क्षेत्रात किल्ल्याच्या आत सरस्वती कूप स्थित आहे. असे मानतात की, सरस्वती नदी इथे या विहिरीत दृश्य आहे. अशाच प्रकारे गंगेच्या पूर्व तटावर प्रतिष्ठानपुरी (झूँसी) येथे हंसकूप किंवा हंसतीर्थ आहे. या पवित्र विहिरीचा उल्लेख वराह आणि मत्स्यपुराणात मिळतो. मत्स्यपुराणाच्या १०६व्या अध्यायात हंसकुपाचे वर्णन आहे. त्याला हंस प्रपतन असे नाव दिले आहे. या कुपाच्या निकट एक शिलालेख आहे. त्यात, हंसरूपी कुपात स्नान केल्याने तसेच याचे जलप्राशन केल्याने हंसगती अर्थात मोक्ष प्राप्त होतो, असे लिहिले आहे.
समुद्रकूप
हंसकुपाच्या दक्षिणेकडे जवळच एक आणखी विहीर आहे. याचे नाव समुद्रकूप आहे. लोकांची श्रद्धा आहे की, ही विहीर महाराजा समुद्रगुप्त यांनी खोदली, म्हणून याचे नाव समुद्रकूप आहे. काहींचे म्हणणे आहे की, याचा संबंध समुद्राशी आहे. ही विहीर अतिशय खोल आहे. मत्स्यपुराणात याचे वर्णन आढळते.
अक्षय वट
पद्मपुराणानुसार सृष्टीच्या प्रलयकाळातही हा वृक्ष स्थित राहतो. याचा कधीही नाश होत नाही. म्हणून याला अक्षय वट म्हटले आहे. हा वटवृक्ष प्रयागच्या अमूल्य वारशांपैकी एक आहे आणि सर्वाधिक महत्त्वाचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच या वटवृक्षाला भेट दिली होती. शेकडो वर्षांनंतर योगी आदित्यनाथ यांनी या अक्षय वटाचा जीर्णोद्धार करून भाविकांच्या दर्शनासाठी याला खुले केले आहे.
पद्मपुराणात अक्षय वटाला श्याम वट असेही नाव आहे. अक्षय वटाचे वर्णन ऋग्वेदातही आढळते. सम्राट हर्षवर्धनच्या काळात चिनी प्रवासी ह्वेंग सांग येथे आला होता, त्याच्या प्रवासवर्णनातही अक्षय वटाचे वर्णन आहे.
मनकामेश्‍वर तीर्थ
मनकामेश्‍वर प्रयागच्या प्रमुख तीर्थांपैकी एक आहे. यमुना तटावर स्थित मनकामेश्‍वर भगवान शिवाचे मंदिर आहे. यात मनकामेश्‍वर महादेव अवस्थित आहेत. मनकामेश्‍वर महादेवाचे स्मरण व पूजनाने लोकांच्या मनोकामना पूर्ण होतात, असे पुराणात वर्णन आहे.
पातालपुरी मंदिर
संगमाच्या जवळ किल्ल्याच्या पूर्व भागातील तळघरात पातालपुरी मंदिर आहे. याचे निर्माण केव्हा व कुणी केले याचा कुठे उल्लेख नाही. परंतु, ह्वेन सांगच्या एका अभिलेखात तो म्हणतो- नगरात एक देवमंदिर आहे, जे आपल्या सजावटीसाठी तसेच चमत्कारांसाठी प्रसिद्ध आहे.
सध्या हा किल्ला भारतीय लष्कराच्या अधीन आहे आणि मंदिर केवळ माघ महिन्यात लोकांसाठी उघडले जाते. मंदिराची लांबी ८४ फूट व रुंदी ४६.५ फूट आहे. खांबांवर असलेल्या छताची उंची मात्र फक्त साडेसहा फूट आहे. मंदिरात गणेश, गोरखनाथ, नरसिंह, शिवलिंग इत्यादी एकूण ४६ मूर्ती आहेत.
शृंगवेरपूर
प्रयागहून ३५ किलोमीटर पूर्वेला गंगातटावर शृंगवेरपूर आहे. या स्थानाचे पौराणिक महत्त्व आहे. महर्षी कश्यपांचे पुत्र म्हणून जन्मलेले शृंगी ऋषी यांच्यावरून या स्थानाचे नाव शृंगवेरपूर पडले. शृंगी ऋषी महान तेजस्वी, तपस्वी महात्मा होते. वाल्मीकिकृत रामायण व रामचरित मानसमध्ये यांची कथा आहे. श्रीराम वनगमनाच्या वेळी गंगा पार करण्यावरून केवट व राम यांच्यातील संवादाचा प्रसंग येथेच घडला होता. म्हणून हे स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
पंचकोसी परिक्रमा
प्रयागमध्ये सर्व देवतांचा निवास मानला जातो. असे म्हणतात की, माघ महिन्यात सर्व तीर्थदेखील प्रयागला येतात. पद्मपुराणानुसार प्रयागचे क्षेत्र पाच कोसांचे आहे. तीर्थ, कुंड, आश्रम, कूप, देवता, अष्टनायक, तिन्ही वेदी (अंतर्वेदी, मध्यवेदी, बहिर्वेदी) आणि द्वादश माधवांचे दर्शन करत पूर्ण क्षेत्राची पंचकोसी परिक्रमा केली जाते.
प्रयागचा प्राचीन इतिहास
तसे तर प्रयाग क्षेत्र वैदिक आणि पौराणिक काळात सन्मानित राहिले आहे. परंतु, ऐतिहासिक काळातही याच्या महत्त्वाची चर्चा अनेक इतिहासकारांनी केली आहे. जैन धर्माच्या श्रवण परंपरेतील तीर्थंकर आदिनाथ यांना अक्षय वटाखाली कैवल्य प्राप्त झाले होते. तसेच बौद्ध धर्माचे प्रवर्तक गौतम बुद्ध या क्षेत्री धर्मप्रचारासाठी आले होते.
प्रयाग आणि स्वातंत्र्य आंदोलन
भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनात प्रयागची अहम् भूमिका राहिली आहे. त्या काळच्या स्वातंत्र्य संग्राम सेनानींमध्ये मदनमोहन मालवीय, सर अयोध्यानाथ, सर सुंदरलाल, मोतीलाल नेहरू इत्यादींनी इंग्रजांविरुद्ध आंदोलन सुरू केले होते. हळूहळू प्रयाग स्वातंत्र्य आंदोलनाचे केंद्र झाले. साहित्य, संस्कृती आणि कलेच्या क्षेत्रातही प्रयागचे योगदान अद्वितीय आहे.

Posted by : | on : 13 Jan 2019
Filed under : आसमंत, पुरवणी.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी (97 of 875 articles)

Court Verdict Rafale
जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन खटल्याचा निकाल आलेला आहे आणि युपीए म्हणजे काँग्रेसच्या वा सोनियांच्या इशार्‍यावरच अमित ...

×