ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » आसमंत, गजानन निमदेव, पुरवणी, स्तंभलेखक » भाजपाच्या पराभवाचा मिशनर्‍यांना आनंद कशासाठी?

भाजपाच्या पराभवाचा मिशनर्‍यांना आनंद कशासाठी?

॥ कटाक्ष : गजानन निमदेव |

देशाबाहेर देशाविरुद्ध कारस्थानं रचली जात असताना, आपल्याकडची राजकारणी मंडळी आपसात कुरघोड्या करण्याचा प्रयत्न करीत आहेत. देशातील राजकारण्यांनी राजकारण अवश्य करावे, मोदीविरोधालाही कुणाची ना असण्याचे कारण नाही. पण, हिंदू समुदायातील गरीब, आदिवासींच्या धर्मांतरणाला खीळ घातली गेली म्हणून चिडून जात जाणीवपूर्वक ज्या ख्रिश्‍चन संघटना भारताची बदनामी करत आहेत, तो बदनामीचा डाव एकजूट होत संपूर्ण ताकदीने हाणून पाडायला नको?

Christian Missionary

Christian Missionary

भारतीय जनता पार्टीचा निवडणुकीत पराभव झाल्यास परदेशात सगळ्यात जास्त आनंद कुणाला होत असेल? हा काय प्रश्‍न झाला? कुणाला कशाला होईल? कुणाला काय करायचे आहे, भारतात कुणाचा पराभव झाला आणि कोण जिंकले आहे याच्याशी? होय संबंध आहे, आनंद व्यक्त करणार्‍या संघटनाही आहेत. केंद्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यापासून ख्रिश्‍चन मिशनर्‍यांचा एक धंदा मंदावला आहे. तो म्हणजे धर्मांतरणाचा. देशातील गरीब, आदिवासी जनतेला मदत करण्याच्या नावाखाली त्यांना भूलथापा देऊन त्यांचे ख्रिस्तीकरण करायचे, हा नसता उद्योग मिशनर्‍यांनी गेल्या काही शतकांपासून चालविला आहे. नोव्हेंबर महिन्यातल्या १७ तारखेची घटना आहे. अंदमान-निकोबार द्वीपसमूहातील सेंटिनल बेटावर राहणार्‍या आदिवासींनी जॉन अ‍ॅलन चाऊ या अमेरिकी नागरिकाला तीर सोडून ठार मारले होते. कोण होता हा चाऊ? हा ख्रिश्‍चन मिशनरीच होता. धर्मांतरणाच्या उद्देशानेच तिथे गेला होता. त्याच्याजवळ ज्या चिठ्ठ्या सापडल्यात ना, त्यात धर्मांतरणाशी संबंधितच नोंदी होत्या. त्यावरून त्याचा हेतू सहज स्पष्ट होतो. खरेतर त्या क्षेत्रात भारतीय नौसेनेची कमांड आहे. त्यामुळे नौदलाचे लक्ष चुकवून हा चाऊ तिथे गुपचूप गेला, हाच त्याचा गंभीर गुन्हा होता. भारत सरकारने पकडून त्याला शिक्षा देण्याऐवजी आदिवासींनीच त्याला ठार मारण्याची शिक्षा दिली.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी आपल्या हयातीत काही नोंदी लिहून ठेवल्या आहेत- राजकोटमधील आमच्या शाळेबाहेर एका कोपर्‍यावर काही ख्रिश्‍चन मिशनरी उभे राहात असत आणि हिंदू देवदेवतांबद्दल अभद्र बोलत असत. आता आपण या महात्म्यावरही विश्‍वास ठेवणार नाही? आपलाच धर्म तेवढा श्रेष्ठ आणि इतर सगळे खोटे, या मिशनर्‍यांच्या समजुतीतूनच धर्मांतरणाचा मुद्दा पुढे आला. आपण संपूर्ण जगाला ख्रिस्ती करू, या हेतूने त्यांनी जगभरातल्या अनेक देशांमध्ये जाऊन स्थानिक आदिवासी आणि गरीब लोकांना फसवून त्यांचे धर्मांतरण घडवून आणले, हे वास्तव कुणी नाकारू शकेल? मुद्दा भाजपाच्या सत्तेत असण्याचा आणि त्यामुळे धर्मांतरणाला खीळ बसल्याचा आहे. त्यामुळेच मध्यप्रदेश, छत्तीसगढ आणि राजस्थान या तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचा पराभव झाल्याचा सर्वाधिक आनंद हा परदेशातील ख्रिश्‍चन मिशनरी संघटनांनाच झाला आहे. त्याचा पुरावाही या ठिकाणी देता येईल.
अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे ख्रिश्‍चन इंटरनॅशनल कन्सर्न नावाची एक मिशनरी संघटना आहे. या संघटनेच्या वतीने १७ डिसेंबर रोजी एक ट्विट करण्यात आले. त्यात भाजपाच्या पराभवाबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला. कशासाठी हो या संस्थेने आनंद व्यक्त करायचा? काँग्रेसच्या सत्तेत येण्याने त्यांना लाभ काय? पाणी इथेच तर मुरते. देशात जेव्हा काँग्रेसची सत्ता होती, तेव्हा गरीब आदिवासींचे ख्रिश्‍चन मिशनर्‍यांकडून मोठ्या प्रमाणात धर्मांतरण होत होते. गरिबांना, आदिवासींना वेगवेगळ्या प्रकारची आमिषं दाखवून, त्यांची सेवा करत असल्याचे नाटक करत, त्यांच्या मनात भारताबद्दल विष पेरत, हिंदू समुदायाबद्दल त्यांचे मन कलुषित करत त्यांना ख्रिश्‍चन धर्मात ओढण्याचे कारस्थान यशस्वी होत होते. धर्मांतरणाच्या या कामासाठी विदेशातून मोठ्या प्रमाणात फंडिंग होत होते. पण, २०१४ साली भारतीय जनता पार्टीचा दणदणीत विजय झाला, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि ख्रिश्‍चन मिशनर्‍यांचे कंबरडे मोडण्यास प्रारंभ झाला. नोटबंदी झाली. जीएसटी लागू झाला. असंख्य बोगस एनजीओजची मान्यता रद्द करण्यात आली. बाहेरून येणार्‍या फंडिंगभोवती फास आवळला गेला. ख्रिश्‍चन मिशनर्‍यांचे काम खोळंबले. त्यामुळे चिडून जात अनेकदा चर्चमधून फतवे निघू लागले. मोदी सरकारविरुद्ध मतदान करण्याचे आदेश जारी झाले. मोदी सरकारच्या काळात देशात असहिष्णुता असल्याचा अपप्रचार सुरू झाला. पुरस्कार वापसीही झाली. मोदी सरकारला जेवढे म्हणून बदनाम करता येईल, तेवढे बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. या सगळ्यामागचे प्रमुख कारण आहे, ख्रिस्ती मिशनर्‍यांचे थांबवले गेलेले धर्मांतरणाचे कारस्थान!
देशाबाहेर देशाविरुद्ध कारस्थानं रचली जात असताना, आपल्याकडची राजकारणी मंडळी आपसात कुरघोड्या करण्याचा प्रयत्न करीत आहेत. देशातील राजकारण्यांनी राजकारण अवश्य करावे, मोदीविरोधालाही कुणाची ना असण्याचे कारण नाही. पण, हिंदू समुदायातील गरीब, आदिवासींच्या धर्मांतरणाला खीळ घातली गेली म्हणून चिडून जात जाणीवपूर्वक ज्या ख्रिश्‍चन संघटना भारताची बदनामी करत आहेत, तो बदनामीचा डाव एकजूट होत संपूर्ण ताकदीने हाणून पाडायला नको?
भारतातल्या पादर्‍यांचा हवाला देत विदेशातील आणखी एका ख्रिश्‍चन संघटनेने ट्विट केले आहे. भारतातील ख्रिश्‍चन भयभीत आहेत, येणारा नाताळचा सणही ते आनंदात साजरा करू शकणार नाहीत, अशा प्रकारे अपप्रचार या ट्विटद्वारे करण्यात आला आहे. वस्तुत: भारतातील ख्रिश्‍चनांसोबत हिंदू बांधवही मोठ्या आनंदात नाताळच्या सणात सहभागी होतात. देशातल्या शाळा-महाविद्यालयांना नाताळच्या भरपूर सुट्याही दिल्या जातात. सरकारी कर्मचार्‍यांची नाताळची सुटीही सुरूच आहे. हे वास्तव असताना अपप्रचार कशासाठी? स्पष्ट आहे. मोदी सरकारची बदनामी करायची, मनमानी करू देणार्‍या काँग्रेसला सत्तेत आणायचे आणि पुन्हा धर्मांतरणाचा आपला गोरखधंदा सुरू करायचा.
विदेशी फंडिंगचा दुरुपयोग केल्याच्या एका प्रकरणात झारखंडमध्ये ८८ एनजीओजविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान जी चौकशी सीआयडीने केली, त्यात दहा जण दोषी आढळून आले आहेत. त्यामुळे अधिक चौकशीसाठी हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्याची शिफारसही करण्यात आली आहे. या सगळ्या एनजीओज चर्चशी संबंधित आहेत, हे विचारात घेतले, तर प्रकरणाचे गांभीर्य आपल्या सहज लक्षात यावे. कोट्यवधी रुपयांची बोगस बँक खाती तयार करणे, विदेशातून येणार्‍या पैशांचा उपयोग कसा करणार यासंबंधी जी माहिती नोंदणीच्या वेळी दिली होती, त्याऐवजी भलत्याच कामांसाठी निधी खर्च करणे, सरकारला खोटी माहिती देणे, असे अनेक आरोप या एनजीओजवर करण्यात आले आहेत. या सगळ्या एनजीओजचे संबंध विदेशातील संघटनांशी असल्याने त्यांच्या सीबीआय चौकशीची शिफारस करण्यात आली आहे.
वास्तविक, भारतीय राज्यघटनेने सर्व नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्य दिले आहे. प्रत्येकाला त्याच्या धर्मानुसार आचरण करण्याचा मूलभूत अधिकार आहे. असे असतानाही ख्रिश्‍चन मिशनरी गरीब आदिवासींना आमिषं दाखवून त्यांचे धर्मांतरण करतात, हा गुन्हाच आहे. एखाद्याला स्वत:हून धर्मांतरण करण्याची इच्छा असेल, तर कुणाचा विरोध असण्याचे कारण नाही. पण, मिशनर्‍यांकडून बळजबरीने जे धर्मांतरण घडवून आणले जात आहे, ते आक्षेपार्ह आणि निषेधार्ह आहे. सेवेच्या नावाखाली केले जाणारे धर्मांतरणही निषिद्धच मानले पाहिजे. मानव सेवाच करायची आहे तर नि:स्वार्थपणे करा ना, कुणी कुणाला अडवणार नाही. पण, सेवेमागे हिंदूंच्या धर्मांतरणाचा कुटिल डाव असेल तर तो वेळीच ओळखून हाणून पाडला पाहिजे.
धर्मांतरणाच्या उद्योगात गुंतलेले बहुतांश मिशनरी हे भारतातल्या आदिवासी भागात जास्त सक्रिय आहेत. मिझोरममध्ये नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत सर्वात जास्त प्रभाव जर कुणाचा होता, तर तो होता चर्चचा. ही एक बाब ख्रिश्‍चन मिशनर्‍यांच्या कारवायांच्या पुराव्यासाठी पुरेशी आहे. मिझोरमच्या नव्या मुख्यमंत्र्यांनी ख्रिश्‍चन प्रार्थनांच्या जयघोषातच पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली, ही बाब काय दर्शविते? भाजपाशासित राज्यात एखाद्या मुख्यमंत्र्याने हिंदू धर्मगुरूंच्या उपस्थितीत शपथ घेतली तर त्याविरुद्ध गदारोळ केला जातो. हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे, सरकारी कार्यक्रमांमध्ये धार्मिक विधीला स्थान नाही, अशा बोंबा बेंबीच्या देठापासून ठोकल्या जातात. मग, मिझोरममध्ये जे झाले, त्याविरुद्ध कुणीच का ओरडत नाहीत? कारण स्पष्ट आहे. हिंदुविरोध हे त्याचे सगळ्यात मोठे कारण आहे. बहुसंख्य असलेल्या हिंदूंच्या या देशात हिंदूंनाच लक्ष्य केले जाणार असेल आणि हिंदू गप्प राहणार असतील, तर भविष्यात त्यांना कुणीही संरक्षण देऊ शकणार नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून जेव्हा धर्मांतरणाला विरोध केला जातो, तेव्हा आमच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणली जात असल्याची ओरड तथाकथित पुरोगामी मंडळींकडून केली जाते. पण, बळजबरीच्या धर्मांतरणाबाबत मात्र ही ढोंगी मंडळी चकार शब्दही काढत नाहीत. दीर्घ काळापासून मिशनर्‍यांकडून चालत आलेला हा धंदा न केवळ अब्जावधी रुपयांचा व्यापार आहे, सत्तेच्या आंतरराष्ट्रीय खेळाचे एक शस्त्रही आहे, ही एक बाब जरी आपण लक्षात घेतली आणि जागरूक झालो तरी पुरेसे आहे…

Posted by : | on : 6 Jan 2019
Filed under : आसमंत, गजानन निमदेव, पुरवणी, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, गजानन निमदेव, पुरवणी, स्तंभलेखक (188 of 1299 articles)

Vivekananda
प्रासंगिक : देवाशिष चित्तरंजन रॉय | इ. स.१८७७ मध्ये, वयाच्या चौदाव्या वर्षी आठवीत असताना नरेंद्रच्या आयुष्यात एक बदल झाला. आपल्या ...

×