ads
ads
सजा पक्की : कशी? ते लष्कर ठरवेल!

सजा पक्की : कशी? ते लष्कर ठरवेल!

•पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पांढरकवड्यात पाकला इशारा •कोलामी, बंजारा,…

पाकिस्तानातील आयातीत वस्तूंवर २०० टक्के कर

पाकिस्तानातील आयातीत वस्तूंवर २०० टक्के कर

नवी दिल्ली, १६ फेब्रुवारी – पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती…

भारताला स्वरक्षणाचा अधिकार

भारताला स्वरक्षणाचा अधिकार

•अमेरिकेच्या एनएसएचा अजित डोवाल यांना फोन, नवी दिल्ली/वॉशिंग्टन, १६…

भारताने डगमगू नये, ठोस कारवाई करावी

भारताने डगमगू नये, ठोस कारवाई करावी

•अमेरिकेतील ७० खासदारांची भूमिका, वॉशिंग्टन, १६ फेब्रुवारी – पुलवामातील…

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी

•पाकिस्तानने व्यक्त केली वचनबद्धता •कुलभूषण जाधव प्रकरण, लाहोर, १६…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:27
अयनांश:

भारत तोडो अभियान!

॥भारत भाग्य विधाता : प्रशांत आर्वे |

ज्या साने गुरुजींनी महाराष्ट्रात ‘साधना’ हे वैचारिक ाप्ताहिक चालू केले, त्याच महाराष्ट्रात अत्यंत दर्जेदार असलेल्या साधनाच्या कार्यालयासमोर ब्रिगेड आणि मूलनिवासी साहित्य विकले जाते आणि स्वतःला वैचारिकतेचे मुखंड समजले जाणारे नेते आणि विचारवंत मूग गिळून चक्क घरात बसतात! मग समाजात जातीय विद्वेष हेतुपुरस्सर पसरविणार्‍या शक्ती काम करीत असताना, जर समाजातील विचारवंत भूमिका घेत नसतील, तर त्यांना विचारवंत तरी का म्हणावे? ते तर विचारजंत!

India Map Graphic

India Map Graphic

अलीकडे काही विशिष्ट सणांना, गावातील भणंग श्‍वान जसे गळे काढून ओरडत सुटते त्याप्रमाणे भारत तोडो अभियानातील मंडळी भारतीय सण, परंपरा आणि संस्कृतीच्या नावाने सदैव गळे काढताना दिसतात. मग तो गुढीपाडवा असो की दिवाळी, गणेशोत्सव असो की दुर्गापूजा. एनकेनप्रकारेण हिंदू समाजात बुद्धिभ्रम करून भारतीय समाजाचे पुन्हा एकदा जात, धर्म, परंपरा आणि निवासस्थान यावरून विभाजन करणे, हा काय तो एकमात्र हेतू एव्हाना उघड झालेला आपल्याला दिसेल. पण, वारंवार तोंडघशी पडूनदेखील ‘फिरभी टांग उपर’ या तोर्‍यात ही मंडळी आपल्या विभाजनवादी कामात सदैव गुंतलेली असतात.
दिवाळी सणाच्या बाबतीत, बलिप्रतिपदेला अलीकडे काही महाभागांनी वामनदहन हा कार्यक्रम सुरू केलाय. यातला विरोधाभास असा की, एकीकडे ब्राह्मणी संस्कृती आम्ही नाकारतो म्हणायचे, त्यातील देव-देवता याला पाखंड मानायचे आणि त्याच वेळी वामनावतार मान्य करून त्याचे दहन करीत सुटायचे. रामायण आणि महाभारत या काल्पनिक कथा आहेत असेही म्हणायचे आणि त्याच वेळी राम आणि कृष्ण हे शोषकांचे प्रतिनिधी होते, आर्य आक्रमक होते म्हणून बोंब मारायची. यांच्या बौद्धिक कसरतीला सलामच केला पाहिजे.
मुळात बळी आणि वामनाच्या कथेला अत्यंत चुकीच्या पद्धतीने मांडले जातेय. ही कथा ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील बाविसाव्या व एकशेचौपन्नाव्या सूक्तातील ऋचेवरून घेतली आहे. वेदातील ही कथा आणि पुराणातील बळी वामनाची कथा याचा काहीही सबंध नाही. वेदातील या कथेचा संबंध असलाच तर तो सूर्याशी आहे, शेतकर्‍याशी नाही. पण ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद हा महाराष्ट्रदेशी अत्यंत लाडका असल्याने त्यात तेल ओतून समाजविश्‍व गढूळ करीत राहणे, हे सांप्रत महत्कार्य मानले गेले आहे. मूळ कथेत सूर्याला विष्णू गृहीत धरून ऋचांची रचना केली गेली आहे. ज्यात तो सूर्य अर्थात विष्णू या तीन गोष्टींना आपल्या तीन पावलांत व्यापतो. ज्यात ही तीन पावले म्हणजे दिवसाचे सकाळ, सायंकाळ व रात्र असे तीन भाग किंवा विश्‍वाचे पृथ्वी, आकाश व पाताळ असे तीन भाग या अर्थाने आहे.
सूर्यकिरणांनी व्यापिलेल्या या तीन भागांची रूपककथा ऋग्वेदामध्ये आहे. या तीन पावलांत तो सूर्य अर्थात विष्णू सर्व विश्‍व व्यापितो. वेदातील वर उल्लेखिलेल्या मंडलात कुठेही दूरदूरपर्यंत बळीराजाचा वा त्या कथेचा उल्लेख येत नाही. मात्र, ही कपोलकल्पित कथा पुराणामध्ये येते. ती कथा वेदातून घेतलेली असताना त्याचे विकृतीकरण कधी आणि कसे झाले, याचा मागमूस सापडत नाही. विष्णुसूक्तात ज्या ऋचा पृथ्वी, आकाश आणि पाताळ व्यापण्या संबंधी येतात त्याचा बळीराजाच्या कथेशी काहीही सबंध नाही. ऋग्वेदाचे श्रेष्ठ भाष्यकार सायनाचार्य आणि महर्षी दयानंद सरस्वती यांनी जे भाष्य ऋग्वेदावर केले त्यातही बळीराजाच्या कथेचा उल्लेख नाही. ऋग्वेदातच काय, इतर कोणत्याही वेदात तो उल्लेख नाही. याचा अर्थ, विश्‍वसनीय नसलेल्या पुराणातील वांग्यावरून भरीत बनविले जात आहे. स्कंदस्वामी यांनी केलेले विष्णुसूक्तावरील भाष्य अधिक समर्पक आहे. विष्णू हा सूर्य असून त्याचे प्रभात, मध्यान्ह आणि अस्त ही तीन पावले आहेत, असा अर्थ प्रकट करतात. याहीपुढे वेंकटमाधव, मुद्गल स्वामी यांच्या विवेचनातदेखील वामनावतार असा उल्लेख येत नाही. खरेतर सूर्य हाच आपला पालक आहे. पृथ्वीची उत्पत्ती, मध्य आणि विनाश याचा कारक सूर्य आहे. पृथ्वीवरील जीवन हे त्याच्याच प्रकाशमानतेचे फलित आहे. त्याचे नसणे हे आपल्याला अंधारयुगात घेऊन जाईल. म्हणून जर सूर्याला विष्णू म्हटले असेल तर त्यात कुठे चुकले?
मग वामनावतार आणि बळीराजा आलेत कुठून? तर अभ्यासकांच्या मते तैत्तरीय संहितेमध्ये पहिल्यांदा विष्णुसूक्तातील त्या ऋचांचा अर्थ वामनावताराशी जोडण्यात आला आणि पुढे पुराणकारांनी त्यात बळीराजाला आणून कथेचे विकृतीकरण केले. गुढीपाडवा या अतिप्राचीन सणाच्या बाबतीतदेखील महाराष्ट्रात काही वर्षांपूर्वी असाच बुद्धिभ्रम करणे सुरू झाले. काय तर म्हणे छत्रपती संभाजी राजांची हत्या औरंगजेबाने अतिशय क्रूरपणे केल्यानंतर महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी जल्लोश केला. औरंगजेबाने शंभू राजाचे मुंडके भाल्याच्या टोकावर लावून मिरविले त्याची आठवण म्हणून ब्राह्मणांनी गुढ्या उभारणे सुरू केले. एवढेच नाही, तर गुढीच्या काठीवर लावण्यात येणारा तांब्या म्हणजे राजांचे मुंडके आहे. असा हा खोडसाळ प्रचार सुरू करण्यात आला. जातीच्या अस्मितेपोटी अनेकांनी त्यावर विश्‍वास ठेवला. हे प्रचारित करताना कुणाला त्याचे संदर्भ वा दाखले द्यावेसेदेखील वाटले नाही. व्हाटस्अ‍ॅपच्या विद्यापीठात इतिहास शिकविला जाऊ लागला आणि नव इतिहासकार त्यात आपली पिंक टाकू लागले.
परिणामी समाजमन कलुषित! इतिहासाच्या अभ्यासकांनी आणि इतिहासकारांनी वारंवार हे सप्रमाण आणि ऐतिहासिक पुराव्यानिशी सिद्ध केलंय की, शंभू राजाच्या दुर्दैवी हत्येच्या आधीपासून महाराष्ट्र गुढीपाडवा साजरा करीत आलाय. ज्ञानेश्‍वरांच्या दीपिकेत आणि तुकोबांच्या गाथेतदेखील गुढीपाडव्याचे उलेख आढळतात. पण, एकांगी विचार आणि ‘मेरे मुर्गी की एक टांग’ हीच भूमिका असणार्‍यांसोबत काय चर्चा करणार? ऐन दुर्गापूजेच्या काळात दुर्गा कशी चारित्र्यहीन होती, याच्या कथा प्रसारित कारायच्या आणि या सार्‍या प्रकारावर महाराष्ट्रातील पुरोगामी झुंडीनी सोयिस्कर मौन बाळगायचे. महिषासुर कसा आमचा राजा होता, हे सिद्ध करण्यासाठी आपली बौद्धिक शक्ती पणाला लावायची. महाराष्ट्राचे भावविश्‍व अत्यंत गढूळ आणि जातीय द्वेषाने ग्रस्त करण्यामागे मूलनिवासी गँंग आणि सोबत ब्रिगेडसारख्या संघटनांनी हातभार लावलाय. यांच्या संकुचित राजकीय स्वार्थापायी समाजावर होणार्‍या दूरगामी परिणामांची चिंता यांना नाही. जे जे म्हणून आमच्या संस्कृतीने आम्हाला दिले; ते सर्व त्याज्य ठरवत ही मंडळी सारेकाही नाकारत सुटली आहे आणि काय काय नाकारणार आहोत आम्ही? तुळशीविवाहाच्या निमित्तानेदेखील अशीच पुराणातील कल्पित कथा सांगून बुद्धिभेद केला जातो. जर या सार्‍या गोष्टी आम्ही मिथक मानतोय, तर पुन:पुन्हा तोच राग का आळवला जातोय? हेतू स्पष्ट आहे. हा भारत तोडो कार्यक्रमाचा एक भाग आहे!
बहुसंख्यकांच्या श्रद्धास्थानांवर वारंवार आघात करणे हे कशाचे द्योतक आहे? मुंबईतील डान्सबार सुरू असावे की असू नये? त्यात बारबालांनी गिर्‍हाईकाला दारू देऊ करावी की करू नये, यावर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयाला वेळ असतो आणि दुर्दैवाने राममंदिर सुनावणीसाठी वेळ नसतो.
आता जनता मूर्ख राहिलेली नाही आणि फार काळ तिला मूर्ख बनवता येत नाही, हेही तेवढेच खरे! ज्या साने गुरुजींनी महाराष्ट्रात ‘साधना’ हे वैचारिक साप्ताहिक चालू केले, त्याच महाराष्ट्रात अत्यंत दर्जेदार असलेल्या साधनाच्या कार्यालयासमोर ब्रिगेड आणि मूलनिवासी साहित्य विकले जाते आणि स्वतःला वैचारिकतेचे मुखंड समजले जाणारे नेते आणि विचारवंत मूग गिळून चक्क घरात बसतात! मग समाजात जातीय विद्वेष हेतुपुरस्सर पसरविणार्‍या शक्ती काम करीत असताना, जर समाजातील विचारवंत भूमिका घेत नसतील, तर त्यांना विचारवंत तरी का म्हणावे? ते तर विचारजंत!
संत तुकारामांच्या बाबतीतदेखील असाच खोडसाळ प्रचार केला जातो. संत तुकारामांचा खून झाला असल्याची मांडणी डॉ. आ. ह. साळुंखे या विद्वान माणसाने केली. संत तुकाराम सदेह वैकुंठास गेले हे जितके धादांत खोटे आहे, तितकेच त्यांचा खून झाला हेदेखील खोटे आहे. जर खरंच तत्कालीन धर्माच्या ठेकेदारांनी संत तुकारामांचा खून केला असता; तर अगदी हाकेच्या अंतरावर असलेले महाराज आणि त्यांच्या हेर खात्याला त्याची खबरबात लागली नसती? हे कसे शक्य आहे? अफजल खानाला संपविण्याची योजना महाराज आखत असताना, मुघलांची जहाजे आता कुठे आहेत आणि त्यांना कसे लुटता येईल, याची पूर्ण कल्पना असणारा राजा म्हणजे महाराज! बहिर्जी आणि त्यांचे हेरखाते म्हणजे जागतिक कौतुकाचा विषय. असे असताना, ज्या तुकारामांना त्यांनी गुरुस्थानी मानले त्यांची हत्या अगदी बेमालून होते, याचेच आश्‍चर्य आहे. महाराजांचे हेरखाते गाफील होते, की मंबाजी राजांच्या हेरखात्याला पुरून उरला? आम्ही कसली मांडणी करतोय? मंबाजी ही प्रवृत्ती आहे आणि ती कालसापेक्ष आहे.
प्रत्येक काळात आपल्याला कुठल्या ना कुठल्या नावाने मंबाजी भेटत राहणारच आहे. असल्या प्रवृतीचा वापर आपल्या पोळ्यांवर तूप ओढण्यासाठी करणारी माणसे आज सर्वत्र आढळतात. नव्हे, त्याची बजबजपुरी झालेली आहे. ज्येष्ठ विचारवंत आणि संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरेदेखील संत तुकारामांचा खून झाल्याच्या मांडणीला विरोध करतात. जिथे ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित नेमाडे इतिहासाची तोडमोड करून आपला देशीवाद सिद्ध करतात, तिथे तुमच्या-माझ्यासारख्या सामान्य वकुबाच्या माणसांचे काय घेऊन बसलात! डॉ. सुधीर ढवळे यांनी नेमाडेंच्या या ऐतिहासिक दोषांचा पंचनामा अतिशय समर्पक शब्दांत केलेला आहेच. एकंदर, देशाच्या मुख्य प्रवाहाचे द्वेषाच्या आधारावर विभिन्न पाटनिर्माण, समाजाच्या आणि पर्यायाने देशाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक ऐक्याला बाधा पोचेल, असे प्रयत्न आताशा संघटित स्वरूपात होताना दिसताय.
या सर्व परिस्थितीत आशेचा किरण काय असेल; तर नुकत्याच एका ट्रकच्या मागे लिहिलेले वाक्य विचार करायला भाग पाडून गेले. त्या ट्रकच्या मागे लिहिले होते, ‘इमानदारी और सद्भाव से रहो, भगवान सब ठीक करेगा!’ एकवेळ आम्हाला हे वाक्य दैववादी वाटू शकेल. पण, या देशातील सामान्य माणसाचा प्रामाणिकपणा आणि सद्भाव, या दोन गोष्टींवर असलेला विलक्षण विश्‍वास आपल्याला या देशाची ताकद सांगून जातो. या देशाच्या ऐक्याला बाधा पोचवणार्‍या शक्तींना भारतात फारसे यश अजूनही मिळालेले नाही, यामागचे कारणदेखील या देशातील सामान्य माणूसच आहे. त्याला शहरी माणसांच्या व्याख्या कळणार नाही, कळणार नाही त्याला संसदीय आणि अध्यक्षीय लोकशाहीतील फार.त्याला माहीत नसतो मार्क्स आणि माओ. पण, त्याला कळत असते जगण्याचे साधे तत्त्वज्ञान. ही भूमी माझी आहे, यावरचा त्याचा दृढ विश्‍वास. या भूमीच्या विरुद्धचे आणि बाजूचे यातला फरकदेखील त्याला कळत असतो आणि म्हणून भारत हा वर्षानुवर्षे भारत राहिलेला असतो. भारत तोडण्याची स्वप्ने अनेकांनी पाहिली, पण या देशातील माणसांनी ती धुळीस मिळवली. या सामान्य माणसांच्या सशक्तीकरणाची गरज यावेळी अधोरेखित होते… (लेखक हे इतिहासाचे अभ्यासक आहेत)

Posted by : | on : 9 Dec 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, प्रशांत आर्वे, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, प्रशांत आर्वे, स्तंभलेखक (195 of 1220 articles)


विश्‍वसंचार : मल्हार कृष्ण गोखले | इतिहासाने असंख्य क्रूरकर्मे पाहिले आहेत. शत्रूच्या सैनिकांची, नागरिकांची, स्त्रियांची, मुलांची आणि वृद्धांची कत्तल करण्यात ...

×