ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, स्तंभलेखक, हितेश शंकर » भीती तर हवीच; पण कुणापासून?

भीती तर हवीच; पण कुणापासून?

॥ रोखठोक : हितेश शंकर |

कट्टर पीएफआयला कुरवाळणार्‍या काँग्रेसला, जानवे दाखविण्याचे आणि केरळमध्ये सडकेवर बछडा कापून खाण्याचे नाटक येत असेल, नसिरुद्दीनसारख्या कलाकारांनाही भीती ‘खपविण्या’ची कला येत असेल, परंतु या देशाचे लोक भोळे आहेत. खरेतर, या भोळ्या लोकांनी दोगल्या-दुतोंड्या राजकीय पक्षांपासून आणि त्यातील नाटकबाजांपासून घाबरायला हवे. ही भीती उचित आहे आणि आवश्यकही आहे.

Naseeruddin Shah

Naseeruddin Shah

डर करनी, डर परम गुरु, डर पारस, डर सार।
डरत रहे सो ऊबरे, गाफिल खाये मार॥ -संत कबीर
भारतात आजही दारू पिणार्‍यांपेक्षा दारूला स्पर्शही न करणार्‍यांची संख्या जास्त आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील दारूच्या खपाचे आकडे या गोष्टीला प्रमाणित करतात. याची कारणमीमांसा करणार्‍यांना हे स्पष्ट माहीत आहे की, या देशाची परंपरा, नैतिकता, भावनात्मकता आणि श्रद्धा यांचा संगम, लोकांना या ‘कॉकटेल’पासून दूर ठेवतो. या वास्तवाने कुणी अस्वस्थ होत असतील; परंतु आम्हा भारतीयांना या गोष्टीचे काहीएक आश्‍चर्य वाटत नाही. भावना तर प्रकट होत असतात. परंपरा असतात, त्यांचे पालनही होत असते. श्रद्धा आहे तर ती अगाधच आहे. आम्ही आहोतच असे. कारण, शतकानुशतकांपासून आम्ही भारतीय असेच आहोत.
अशात, जेव्हा चित्रपट कलावंत नसिरुद्दीन शहा यांनी ‘गायी’च्या हत्येची ‘पोलिस कर्मचार्‍याच्या’ हत्येशी तुलना करून, कुत्सित हेतूंनी गुंडाळलेला चेंडू फेकला, तेव्हा सोशल मीडियाच्या प्रतिक्रियांमध्ये त्या चेंडूची जी पिटाई झाली, त्याने कुणालाच आश्‍चर्य वाटले नाही. कुठल्याही मुद्यावरून कायदा हातात घेणे चूक आहे. आणि त्यात पुन्हा हत्या! हा तर राक्षसीपणाच आहे. परंतु काय हो, गाय या समाजाचे श्रद्धाकेंद्र आजच झाले का? भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि त्यातही केंद्रात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतरच भारताचे लोक गो-ग्रास काढून ठेवू लागले का?
नसिरुद्दीन शहांना माहिती हवे की, १८५७ साली ब्रिटिशांच्या काळात गोहत्यार्‍यांना धडा शिकविणारे ‘कूका’ आंदोलक कोण होते? ते कोण होते, जे या देशाच्या स्वातंत्र्याच्या आणि श्रद्धेच्या लढाईत स्वत:चा जीव धोक्यात टाकून लढत होते आणि इंग्रजांनी तोफेच्या तोंडावर बांधून उडवून दिल्यानंतरही ज्यांच्या आंदोलनाची धग थंडावली नाही? तोफा आणि बंदुकीच्या बळावर दमन करणारे इंग्रज तर बाहेरून आले होते; परंतु तोफ-तलवारीने न दबणारे लोक काही मंगळ ग्रहावरून आले नव्हते. ते इथलेच होते, याच मातीतले लोक होते.
गायींचे रक्षण करताना हिंसा होऊ नये, याची चिंता करण्यासोबतच, गोहत्याच होऊ नये, हे निश्‍चित केल्याविना, या भावुक-श्रद्धाळू समाजाच्या आक्रोशाला थांबविणे कसे शक्य आहे? जगात कुठे असो की नसो; परंतु दारूचे ठेके लिलावात निघाल्यावरही या देशातील लोक भडकून उठतात. गाय कापल्यावर तर त्यांचा क्रोध मस्तकातच जातो. बुलंदशहरसारख्या घटनांना केवळ हिंसाचाराच्या दृष्टीने बघणे अज्ञानच म्हणावे लागेल. इथे केवळ जनतेचा आक्रोशच नाही, तर उन्मादी तत्त्वांच्या, मर्यादा ओलांडणार्‍या खोडसाळपणाची आणि लोकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणार्‍या प्रशासनाचीदेखील कहाणी आहे. अशात नसिरुद्दीनसारखे कलाकार, एका घटनेच्या अर्धकच्च्या माहितीला ‘वास्तव’ म्हणून स्थापित करण्याची भूमिका घेऊ लागतात. गोष्ट केवळ नसिरुद्दीनची नाही, गोष्ट केवळ गायीची नाही, कुठल्या हत्येला योग्य ठरविण्याचाही प्रश्‍न नाही… जो भारतीय समाज स्वभावाने शांत, भावुक, संवेदनशील आणि नैतिकतेचे पालन करणारा आहे, त्या समाजाची चुकीची प्रतिमा स्थापित करण्यासाठी अशा प्रकारे संघटित प्रयत्नांची ही गोष्ट आहे. या अशा समाजापासून कुणाला भीती वाटू शकते? सेक्युलर जपमाळ ओढणार्‍या ‘भारत तोडो ब्रिगेड’ला या समाजाच्या शांतीची आणि एकतेची भीती वाटत असते.
महदाश्‍चर्य म्हणजे, ‘भीती’ आणि ‘असहिष्णुते’चा बागुलबुवा उभा करणारे चेहरे, इसिससारख्या क्रूर इस्लामी संघटनांच्या भारतात वाढत चाललेल्या हालचालींना, त्यातील तरुणांच्या भरतीला, दहशतवाद्यांच्या धरपकडीला जराही घाबरत नाहीत. यांना ‘भारत तोडो’च्या नार्‍यांपासून भीती वाटत नाही, उलट तिथे यांना भविष्यातील राजकारणासाठी उपयोगी निष्पाप चेहरे दिसतात. एखादे दिवशी प्रगतिशील राजकारणाचा कुणी प्यादा म्हणेल की, त्याला ‘गायीच्या बछड्यापेक्षा जिहादी दहशतवादी अधिक निष्पाप वाटतो,’ तर आश्‍चर्य वाटायला नको. कट्टर पीएफआयला कुरवाळणार्‍या काँग्रेसला जानवे दाखविण्याचे आणि केरळमध्ये सडकेवर बछडा कापून खाण्याचे नाटक येत असेल, नसिरुद्दीनसारख्या कलाकारांनाही भीती ‘खपविण्या’ची कला येत असेल, परंतु या देशाचे लोक भोळे आहेत. खरेतर, या भोळ्या लोकांनी दोगल्या-दुतोंड्या राजकीय पक्षांपासून आणि त्यातील नाटकबाजांपासून घाबरायला हवे. ही भीती उचित आहे, आवश्यकही आहे.

Posted by : | on : 13 Jan 2019
Filed under : आसमंत, पुरवणी, स्तंभलेखक, हितेश शंकर.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, स्तंभलेखक, हितेश शंकर (17 of 1137 articles)


तोरसेकर | राहुल गांधी यांना बोफोर्सच्या भुताने इतके छळलेले आहे, की त्यावर रामनाम जपावे तसा त्यांनी राफेलचा जप चालविलेला आहे. ...

×