ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी » मराठा आरक्षणाची क्रांती आणि राजकारणाची कसोटी

मराठा आरक्षणाची क्रांती आणि राजकारणाची कसोटी

॥ विशेष : विजयकुमार पिसे |कार्यकारी संपादक |

महाराष्ट्र विधीमंडळात मराठा आरक्षण एकमताने आवाजी मतदानाने पारित झाले. आता पुढे काय, याचीही उत्सुकता आहेच. केवळ राजकारण म्हणून आणि तोंडदेखलेपण न करता भाजपा सरकार विनाविलंब राज्यपालांकडून अध्यादेश काढणार, आणि न्यायालयात कोणी हरकत घेतली, तर तिथे मराठा आरक्षण टिकेल, असाच युक्तिवाद करणार, यात तीळमात्र शंका नाही. कारण यात राजकारण करणार्‍यांना नामोहरम करायचे आहे. आता तर अशा मंडळींचे पंखही छाटले तर आहेच. काळाच्या कसोटीवर केवळ मागास समाजच पिछडा राहिलेला नाही. तर अन्य समाजघटक आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेला राहिलेला आहे, पिछाडला आहे. त्यांनाही समान पातळीवर आणून खर्‍या अर्थाने सामाजिक सन्मान, समरसता आणि सद्भाव राखण्याची आवश्यकता आहे. जी फडणवीस सरकार, भाजपा सरकारच्या पूर्वसूरींच्या धुरिणांनी वेळोवेळी प्रतिपादित केली आहे.

Maratha Arakshan Devendra Fadanvis

Maratha Arakshan Devendra Fadanvis

छत्रपती शाहू महाराजांपासून आग्रहाचा विषय असलेल्या मराठा आरक्षणावर अखेर महाराष्ट्राच्या विधीमंडळात सर्व पक्षांनी सामाजिक ऐक्याची मोहोर उमटवत विधेयक मंजूर केले. पुरोगामी महाराष्ट्रासाठी कृतीशीलतेच्या दृष्टिकोनातून ही घटना तशी ऐतिसासिक मानावी लागेल. कारण केवळ एका जातीसाठी अशा प्रकारची संधी देताना राजकारणाचे अनेक कंगोरे असतात, अभिनिवेष असतात. तो बाजूला ठेवला गेला. म्हणून त्यासाठी विरोधी पक्षांचेही अभिनंदन. राज्याचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत संवेदनशील असा हा ज्वलंत विषय कौशल्याने हाताळला. विरोधकांनी अवाक्षर न काढता विधीमंडळात तत्क्षणी मान्यता दिली. यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचे विशेष अभिनंदन. त्याचे मुख्य कारण म्हणजे फडणवीस यांची मुत्सद्देगिरी. राज्यातील ३० टक्के मराठा समाजासाठी १६ टक्के आरक्षण देण्याविषयीचा ठराव पारित झाला. आता या आरक्षणाच्या कसोटीचा कस लागणार आहे. न्यायालयात तो टिकला आणि प्रत्यक्ष व्यवहारात आरक्षणाची कार्यवाही अर्थात अंमलबजावणी कशी झाली, यावर खर्‍या अर्थाने मराठा समाजातील तरुण आणि सुशिक्षितांना न्याय मिळेल तेव्हा याची विश्‍वासार्हताही वाढीस लागेल. त्यामुळे आरक्षणाची कसोटी ही पुढील भविष्याचा वेध घेणारी आहे.
गत ६०, ६५ वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी भूमिका छत्रपती शाहू महाराजांनी मांडली होती. स्वातंत्र्यानंतर आणि १९६० मध्ये महाराष्ट्र निर्मितीनंतर जी सरकारे आली, ती काँग्रेसीच होती. सर्वधर्म समभाव, धर्मनिरपेक्षतेचा टेंभा मिरवणारे हे सत्ताधीश केवळ आपण आणि आपलेपणाचा कारभार केला. विशेषत: राज्यातील मराठा समाजातील काही परिवारांचाच विकास या काळात झाला, तसेच ही मंडळी कायमच सत्तेत राहिली. पण त्यांनी मराठा समाजातील आर्थिक मागासलेल्या घटकाचा कधी विचारच केला नाही. त्यामुळे सामाजिक मागासलेपण वाढतच गेले. तसेच पाच वर्षापूर्वी म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या अखेरच्या काळात निवडणुकांच्या तोंडावर मराठा आरक्षण विधेयक मंजूर केले. पण न्यायालयात टिकले नाही. त्यातील फोलपणा आणि राजकारणही कळाले. त्यामुळे पुढील येणार्‍या सरकारसमोर तो अधिक उग्रपणे पुढे आला. देशात आणि महाराष्ट्रात २०१४ नंतर झालेले परिवर्तन आणि मोदी, फडणवीस सरकारच्या कारभारामुळे निर्माण झालेले आश्‍वासक चित्र पाहता आता आपली गय नाही. या भयग्रस्तेने आणि चिंतेतून २०१५ पासून आरक्षण या भोवती वातावरण तापविण्याचे पध्दतशीर प्रयत्न सुरू झाले. यामागचा ‘जाणता’ कोण हे देखील एव्हाना कळून चुकले. त्यामुळे फडणवीस सरकारने संयमाने आणि कौशल्याने आरक्षणाची मांडणी केली. एक मराठा लाख मराठा या भूमिकेतून राज्यभरात ५८ ठिकाणी मोर्चे निघाले. निमित्त मिळाले कोपर्डी अत्याचाराचे. पण यामुळे मराठवाडा विद्यापीठ (१९७८/७९) नामांतरावरून दोन समाजात निर्माण झालेली तेढ आता या निमित्ताने पुन:प्रत्ययास येईल, ही साधार भीतीही निर्माण झाली. मग राज्यात प्रतिमोर्चे, आंदोलने, धरणे यांचे पीकच जोमाने वाढीस लागले. नेमकी संधी गतवर्षी भीमा कोरेगाव एल्गार परिषदेने साधली ती देशविघातक शक्तींनी. त्यामुळे सामजिक ऐक्य साधणे, विधातक शक्तींचा दुष्ट हेतू धुळीस मिळवणे या भूमिकेतून सरकारपुढे मुत्सद्दीपणाने, संवेदनशीलरित्या आणि आणि संयमाने आव्हान हाताळणे हा राज्य सरकारचा अजेंडा पुढील काळात राहिला.
आषाढी एकादशीच्या पार्श्‍वभूमीवर पंढरीची वारी उधळण्याचा डाव उघडकीस आला, त्याचबरोबर आत्महत्यांचे सत्रही सुरू झाले. मूक मोर्चाची जागा ठोक मोर्चाने घेतली. यावेळी मात्र विरोधकांनी सरकारची कोंडी करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. आणि तेव्हापासून या मंडळींनी (त्यांच्यासाठी) फडणवीस सरकारची उलटगणतीही सुरू केली. मुख्यमंत्र्याच्या हस्ते महापूजा झाली नाही, त्यावर विरोधक भलतेच खुषीत होते, आम्ही जिंकलो, ही भावना बळावली. पण फडणवीस यांनी अधिक वेळ न दडवता मराठा आरक्षण लागू करण्यासाठी टाईमबॉण्ड स्वत:साठी असा निश्‍चित केला. मागासवर्ग आयोगाची निर्मिती, त्याची वैधानिकता, आयोगाला दिलेला अधिकार आणि कालमर्यादा. कारण यात राजकारण करायचे नाही. शाहू महाराजांपासूनचा प्रलंबित असलेला आरक्षणाचा आधिकार देण्यास आपली प्राथमिकता, प्रतिबध्दता आणि प्रामाणिकता याविषयीची तळमळ प्रत्येक कृतीत आणि भूमिकेतून प्रकट केली. तरीही फडणवीस सरकारची कोंडी कशी करता येईल, विरोधकांकडून याचे आडाखेही सुरूच होते. मागासवर्ग आयोग स्वीकारार्ह आहे का? त्याचा कृती अहवाल मान्य करणार का? आणि त्यामध्ये नेमके आरक्षण किती देणार? हे कळीचे मुद्दे होते. या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी गत अधिवेशनात नोव्हेंबरअखेरची कालमर्यादा घालून मराठा समाजाला आश्‍वस्त केलेच होते. मुंबई आणि परळी येथील प्रदीर्घ आंदोलन मागे घेण्यास बाध्य केले. ह्या सर्व घडामोडी निर्णायक वळणावर येत असतानाच विरोधकांनी पुन्हा उचल खाल्ली. मग इतर मागास, ओबीसी, धनगर, मुस्लिम आरक्षण ऐरणीवर आणताना या घटकातही असंतोष निर्माण करण्यासाठी खटपटी, लटपटी सुरू केल्या.
मराठा समाजाला कोणत्या निकषावर आणि किती टक्के आरक्षण देणार, ओबीसी समाजाच्या आरक्षणावर अतिक्रमण करणार, अशी दिशाभूल सुरू करून पुन्हा सामाजिक ऐक्य दूषित करण्याचे डावपेच सुरू झाले, जेणेकरून मराठा समाजाला दिलेला शब्द तडीस जाऊ नये, हा दुष्ट हेतू आहेच. मागास आयोगाचा अहवाल जेव्हा शासनाला सादर झाला, तेव्हा एक गोष्ट जवळपास नक्की झाली, नोव्हेंबर अखेरीस त्यावर निर्णय अंतिमत: लागेलच. तरीही विरोधकांची अस्वस्थता लपून राहिली नाही. अन्य समाजघटक रस्त्यावर कसे येतील, याचे नापाक इरादे चालू होतेच. छगनराव भुजबळांसारखे ओबीसी नेत्याचे अस्त्र परजून पाहिले. पण ओबीसींच्या ५२ टक्के आरक्षणाला तसूभरही धक्का बसणार नाही, मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण दिले जाईल, त्यासाठी कोणतीही घटनात्मक पेच राहणार नाही. कोणावरही अन्याय होणार नाही, याची खबरदारी घेत फडणवीस सरकारने विधीमंडळात प्रारंभीच्या टप्यात विरोधकांना गोंधळ घालण्यासाठी पुरेपूर संधी दिली. कारण विरोधक राजकारण करू शकतात, तर त्यांना आपणही मुँहतोड जबाब देऊ शकतो, हे कसब अनुभवातून फडणवीस सरकार या साडेचार वर्षात खूप काही शिकले आहे. म्हणजे समोरचा शत्रू आपल्याविरोधात डावपेच आखतो, तेव्हा त्याला नामोहरम करण्याची व्यूहरचनाही सुरू होती. फडणवीस सरकारने ती उघड केली नाही. आणि अशी व्यूहरचना करताना सरकारमधील सहकारी पक्ष विशेषत: शिवसेनेलाही विश्‍वासात घेतले. रामजन्मभूमी आंदोलन, ठाकरेंची अयोध्यावारी, विधानसभेत आणि विधानपरिषदेतील गत चार वर्षांपासूनची रिक्त उपसभापतीपदे सेनेला बहाल करताना त्यांना कुठेही दुखावले जाणार नाही. पर्यायाने शिवसेना विरोधकांच्या कच्छपी लागणार नाही. यासाठी गेल्या काही दिवसांत सेनेच्या रोखठोक भूमिकेवर क्रिया/प्रतिक्रिया दिल्या नाहीत. त्यांना रामाने सुबुध्दी द्यावी या भाषेत हळूच चिमटा मात्र काढला. अशी सर्व प्रकारची आयुधे वापरत मुख्यमंत्री गत आठवड्यात मराठा आंदोलकांना उद्देशून म्हणाले, आता आंदोलनं नको, १ डिसेंबरला जल्लोषच करा! तरीही हे कसं शक्य आहे, हा विरोधकांसमोरचा रोखठोक पण अस्वस्थ करणारा प्रश्‍न. त्यापार्श्‍वभूमीवर विधीमंडळ अधिवेशनात सोमवारपासून तापलेले वातावरण, आक्रमक विरोधी पक्ष, आरक्षणाचे काय होणार याची बाहेर सार्वत्रिक उत्सुकता होतीच. एका बाजूला काँग्रेस आरक्षणासाठी अनुकूल होत असतानाच अजीतदादांची वेगळीच भूमिका सभागृहात दिसत होती. अचूक टायमिंग म्हणतात ते फडणवीस यांनी आदल्या दिवशी साधले. अजीत पवार यांच्या सिंचन घोटाळ्याची चौकशी, इकडे लोकमंगलच्या दूध प्रकल्प घोटाळ्यावरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया. यात कसलीही हयगय केली नाही. हातचे काही राखूनही ठेवले नाही. श्रेय घेण्यासाठी काही संधीसाधू विरोधकात असतात, तसे सत्ताधारीतही आहेत. त्यांना झटापट करण्याची कसलीच संधी न देता अशावेळी विधेयक मांडले, तेव्हा सगळेच दोर कापून झाले होते. समस्त मराठा समाजाला जे सर्वमान्य आहे, न्याय्य आहे, आणि देणे क्रमप्राप्त आहे. ते १६ टक्के आरक्षण यापूर्वीच्या ५२ टक्के आरक्षणाला कसलाही धक्का न लावता विधेयक सभागृहात मांडले. तेव्हा काँग्रेस, राष्ट्रवादी अन्य कोणीही, त्यांना ते निमूटपणे मान्य करण्याशिवाय गत्यंतरच होते. त्यामुळे जसे आरक्षणाचे विधेयक मुख्यमंत्र्यांनी सभागृहाच्या पटलावर मांडले, तत्क्षणी विरोधकांनीही मान्यतेचा आवाज सत्ताधारी भाजपा, सेना सदस्यांंच्या हुंकारात दिला. क्षणात सारे डावपेच संपले. १ डिसेंबरचा जल्लोष तीन दिवस आधीच साजरा झाला. मराठा समाजाने जी मूक क्रांती २०१५ मध्ये ५८ मूक मोर्चानी केली, त्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी तितक्याच नम्रपणाने त्या क्रांतीला फुंकर घालत जे गेल्या ५०, ६० वर्षात झाले नाही, कोणाला जमले नाही. त्याची महाराष्ट्राच्या राजकारणात आणि कारभारात ऐतिहासिक अशी नोंद केली.
महाराष्ट्र विधीमंडळात मराठा आरक्षण एकमताने आवाजी मतदानाने पारित झाले. आता पुढे काय, याचीही उत्सुकता आहेच. केवळ राजकारण म्हणून आणि तोंडदेखलेपण न करता भाजपा सरकार विनाविलंब राज्यपालांकडून अध्यादेश काढणार, आणि न्यायालयात कोणी हरकत घेतली, तर तिथे मराठा आरक्षण टिकेल, असाच युक्तिवाद करणार, यात तीळमात्र शंका नाही. कारण यात राजकारण करणार्‍यांना नामोहरम करायचे आहे. आता तर अशा मंडळींचे पंखही छाटले तर आहेच. यानंतर धनगर समाज, मुस्लिम समाज आणि लिंगायत यांनाही आरक्षणाचे वेध लागले आहेत. काळाच्या कसोटीवर केवळ मागास समाजच पिछडा राहिलेला नाही. तर अन्य समाजघटक आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेला राहिलेला आहे, पिछाडला आहे. त्यांनाही समान पातळीवर आणून खर्‍या अर्थाने सामाजिक सन्मान, समरसता आणि सद्भाव राखण्याची आवश्यकता आहे. जी फडणवीस सरकार, भाजपा सरकारच्या पूर्वसूरींच्या धुरिणांनी वेळोवेळी प्रतिपादित केली आहे.
सामाजिक सन्मान निवारा, समान सवार्ं लाभावा,
हीच एकता, समता, ममता, पथ ऐक्याचा चालू या!
कारण ही कसोटी होती, त्यामध्ये फडणवीस सरकार तळपून तेजाने निघाले आहे. त्यामुळे तेव्हाच राज्य घटनेला अनुसरून सर्वांचाच सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्तर उंचावणार आहे. आणि तेच सार्‍यांना अपेक्षितही आहे.

Posted by : | on : 2 Dec 2018
Filed under : आसमंत, पुरवणी.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी (136 of 835 articles)

Vasudhaiva Kutumbakam Hindu
विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह, रा.स्व. संघ | परंतु, भारतातील सर्व मुसलमान आणि ख्रिश्‍चनदेखील मुळात हिंदूच होते. ...

×