ads
ads
भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

भाजपाच्या यादीत महाराष्ट्रातील सहा

•पुण्यासाठी गिरीश बापटांचे नाव जाहीर, नवी दिल्ली, २३ मार्च…

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

शहीदांच्या अपमानासाठी राहुल गांधी यांनी माफी मागावी

•अमित शाह यांची मागणी •सॅम पित्रोदांच्या विधानांवर भूमिका स्पष्ट…

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

करमबीरसिंह होणार नवे नौदल प्रमुख

नवी दिल्ली, २३ मार्च – पुढील नौदल प्रमुख म्हणून…

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

इसिसवर विजय मिळवल्याची सीरियाची औपचारिक घोषणा

बॅगहोझ, २३ मार्च – अमेरिकेचे पाठबळ असलेल्या सीरियन फौजांनी…

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

भारतावर पुन्हा हल्ला केला तर महागात पडेल

•अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा, वॉशिंग्टन, २२ मार्च – पुलवामा हल्ला…

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

सहा महिन्यांत नीरवचे प्रत्यार्पण

•भारतीय तपास यंत्रणांना विश्‍वास, लंडन, २२ मार्च – पंजाब…

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

रणजितसिंह मोहिते पाटील भाजपात

•रणाआधीच भाजपाची जीत, मुंबई, २० मार्च – सोलापूर जिल्ह्यातील…

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

दाऊद शरण यायला तयार होता, पवारांनी दुर्लक्ष केले

•प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, मुंबई, १९ मार्च – कुख्यात…

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

शेतकर्‍यांना सर्वाधिक मदत युती सरकारच्या काळात

•मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती, औरंगाबाद, १७ मार्च – काँगे्रसप्रणित…

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

योद्धामंत्री: मनोहर पर्रीकर

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | तशी पर्रीकरांची…

सत्य शिवाहून सुंदर हे…!

सत्य शिवाहून सुंदर हे…!

॥ मानसरंग : मयुरेश डंके | सामान्य माणसाला आपण…

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

पर्रीकर: गोयंच्या संस्काराचा ‘मनोहर’ आविष्कार

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | त्यांच्या आजाराच्या गांभीर्याच्या…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:28 | सूर्यास्त: 18:36
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी » माळावरलं साहित्य संमेलन…

माळावरलं साहित्य संमेलन…

॥ विशेष : विवेक कवठेकर |

मेंदूला काहीशा झिणझिण्या आणणारी शब्दयोजना म्हणजे कुठलाही ‘व्याख्या’विषय! ‘सहितस्य भाव: साहित्यम्’ अशी साहित्याची संस्कृत व्याख्या. मानवी जीवनविषयक चित्रण, विवरण, अर्थनिर्णयन, भाष्य अशा स्वरूपाची भाषिक अभिव्यक्ती म्हणजे साहित्य, ही स्थूलमानाने केलेली व्याख्या. वाड़्मयामध्ये बोलल्या, लिहिल्या गेलेल्या सर्वच अक्षररचनांचा समावेश होतो. ललित वाड़्मय या अर्थी ‘सारस्वत’ हा शब्द राजशेखर नावाच्या संस्कृत साहित्यशास्त्रकाराने काव्यमीमांसेत वापरला आहे. विद्या व कला यांची देवता सरस्वती, तिचे उपासक ते सारस्वत व तिच्या कृपेने निर्माण झालेले वाड्मय या अर्थाने सारस्वत शब्द वापरला जातो. ज्ञानेश्‍वरांनीही ‘हे सारस्वताचे गोड तुम्हीच लावले जी झाड’ यासारख्या ओव्यांमध्ये सारस्वत शब्द योजला आहे.

Vivekanand Savarkar Sahitya Samlen

Vivekanand Savarkar Sahitya Samlen

विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक, कळंबचा श्रीचिंतामणी ज्या जिल्ह्यात आराध्य मानला जातो, गौतमऋषींच्या शापामुळे सत्त्व हरवलेला देवराज इंद्र पापक्षालनासाठी ज्या जिल्ह्यात येतो, कळंबला चिंतामणी गणेशाची स्थापना करून तप:श्‍चर्येने पापमुक्त झाल्याची पौराणिक कथा जिथे श्रद्धेने सांगितली जाते, कापसाची पहिल्यांदा लागवड करून त्यापासून धागा आणि वस्त्र तयार करणारे पौराणिक काळातील गृत्समद ऋषी, भूगर्भशास्त्रज्ञ वामन बापूजी मेत्रे, उमरखेड परिसरातील संतश्रेष्ठ दयार्णवाचे शिष्य उत्तमश्‍लोक, ‘तिलक्यशोर्णव’चे लेखक तथा साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविले गेलेले लो. टिळकांचे शिष्य लोकनायक बापूजी अणे आणि मराठीचे आद्य शायर असा बहुमान प्राप्त केलेले भाऊसाहेब पाटणकर ज्या जिल्ह्याचे वैभव आहे त्या ‘पांढर्‍या सोन्याच्या’ यवतमाळात यंदा ९२ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन ११, १२ व १३ जानेवारी २०१९ रोजी सुरु आहे.
‘चहुबाजूंनी गर्द हिरवाईने वेढलेला चढणीचा घाट, अशी यवतमाळची वळणावळणाची वाट’ हे वर्णन रस्तेविकासाच्या तुफान गतीपुढे फार काळ टिकणार नाही. मात्र साहित्य म्हणजे काय रे भाऊ? असा प्रश्‍न विचारला जाणार नाही, इतकी साहित्य संमेलने यवतमाळने निश्‍चितच पाहिली आहेत. पहिल्या वर्‍हाडी साहित्य संमेलनापासून पहिल्या ‘अक्षर’ विद्यार्थी साहित्य संमेलनापर्यंत. विवेकानंद साहित्य संमेलन, अस्मितादर्श साहित्य संमेलन, आंबेडकरी साहित्य संमेलन, ग्रामीण साहित्य संमेलन, सावरकर साहित्य संमेलन, किती नावं सांगावीत? तरीदेखील साहित्य म्हणजे नेमकं काय, त्याचे प्रयोजन कोणते आणि संमेलनातून नेमके काय साधले जाणार आहे, अशा आशयाचे प्रश्‍न यापूर्वीही विचारले गेले आहेत. अख्खा जिल्हा दुष्काळाच्या झळांनी त्रस्त असताना साहित्य संमेलनावर खर्च (पक्षी, उधळपट्टी) कशाला म्हणून थेट १९७३ सालीदेखील आंदोलने झाली आहेत. संमेलनाचा उत्सव, आयोजकांचा उत्साह नि रसिकांच्या प्रतिसादात अंतर मात्र पडले नाही.
साहित्य म्हणजे नेमकं काय?
मेंदूला काहीशा झिणझिण्या आणणारी शब्दयोजना म्हणजे कुठलाही ‘व्याख्या’विषय! ‘सहितस्य भाव: साहित्यम्’ अशी साहित्याची संस्कृत व्याख्या. मानवी जीवनव्यवहारविषयक चित्रण, विवरण, अर्थनिर्णयन, भाष्य अशा स्वरूपाची भाषिक अभिव्यक्ती म्हणजे साहित्य, ही स्थूलमानाने केलेली व्याख्या. ‘लिटेरा’ या मूळ लॅटिन शब्दापासून ‘लिटरेचर’ हा इंग्रजी शब्द तयार झाला. लिटरेचरला मराठीत ‘साहित्य’ किंवा ‘वाड्मय’ हे समानार्थी शब्द वापरले जाऊ लागले. वाड़्मयामध्ये बोलल्या गेलेल्या व लिहिल्या गेलेल्या सर्वच अक्षररचनांचा समावेश होतो. ललित वाड़्मय या अर्थी ‘सारस्वत’ हा शब्द राजशेखर नावाच्या संस्कृत साहित्यशास्त्रकाराने काव्यमीमांसेत वापरला आहे. विद्या व कला यांची देवता सरस्वती, तिचे उपासक ते सारस्वत व तिच्या कृपेने निर्माण झालेले वाड्मय या अर्थाने सारस्वत शब्द वापरला जातो. ज्ञानेश्‍वरांनीही ‘हे सारस्वताचे गोड तुम्हीच लावले जी झाड’ यासारख्या ओव्यांमध्ये सारस्वत शब्द योजला आहे.
‘सहित’ या विशेषणापासून साहित्य हे भाववाचक नाम बनलेले आहे. एकत्र असणे, बरोबर असणे असा त्याचा शब्दश: अर्थ. शब्द आणि अर्थ यांचे एकत्र अस्तित्व साहित्य शब्दामध्ये मानले गेले आहे. त्यांचे अभिन्नत्व वा एकजीवत्व हे साहित्याचे प्रधान लक्षण मानले जाते. ए. सी. ब्रॅडली या इंग्रज टीकाकारानेही ‘व्हेअर साऊंड अँड मिनिंग आर वन’ अशी साहित्याची व्याख्या करून शब्द व अर्थाचे एकजीवत्व अधोरेखित केले आहे. शब्द म्हणजे ध्वनी, अक्षरसमूह किंवा वर्णसमूह. अनेक शब्दसमूहांचे बनणारे वाक्य आणि वाक्यसमूहांतून व्यक्त होणारा आशय असा व्यापक अर्थ शब्द या संज्ञेत सामावलेला आहे. सहवेदनांची, विचारांची, कल्पनांची संघटना, असाही अर्थ ही संज्ञा वापरताना अभिप्रेत असतो. तर अर्थ या संज्ञेमध्ये चातुर्य, रमणीयत्व, सहेतुकत्व अशा अनेक छटा सामावलेल्या आहेत. व्यापक अर्थाने शब्द व अर्थ यांचे सहअस्तित्व हे साहित्याचे मुख्य लक्षण!
साहित्याचे प्रयोजन
साहित्याचे प्रयोजन काय, या प्रश्‍नाची चर्चा प्राचीन काळापासून आजतागायत सातत्याने होत आली आहे. लेखक आणि वाचक अशा दोन अंगांनी ती केली जाते. राष्ट्रभक्ती, देवभक्तीपासून मानसन्मान, धनप्राप्ती, मतप्रचार, सामाजिक सुधारणा आणि हितोपदेशापर्यंत नानाविध प्रयोजने मनाशी बाळगून लेखकांनी साहित्यनिर्मिती केली आहे. या प्रयोजनांवर त्या त्या काळाचा प्रभावही पडत आला आहे. पारतंत्र्यात स्वातंत्र्यप्राप्ती हेच जीवनध्येय असणार्‍या साहित्यिकांनी त्यासाठीच लेखणी आणि वाणी झिजविल्याचे प्रकर्षाने जाणवते.
‘हे मातृभूमि तुजला मन वाहियेले,
वक्तृत्व वाग्विभवही तुज अर्पियेले।
तू तेचि अर्पिली नवी कविता रसाला,
लेखाप्रति विषय तूचि अनन्य झाला॥’
या ओळींतून आपल्या साहित्याचे प्रयोजन सुस्पष्टपणे मांडणारे स्वातंत्र्यवीर सावरकर असोत किंवा त्यांच्याही आधी ‘निबंधमाला’कार विष्णुशास्त्री चिपळूणकर, ‘काळ’कर्ते शि. म. परांजपे, लो. टिळक, गो. ग. आगरकर, साने गुरुजी, सेनापती बापट यांच्यासह ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा’ म्हणणार्‍या कुसुमाग्रजांपर्यंत अनेकांच्या लेखण्यांनी देशप्रेमाचे स्फुल्लिंग चेतविण्याचे कार्य केले.
परिस्थितिनिरपेक्ष विचार करावयाचा झाल्यास, उच्च कोटीच्या अलौकिक आनंदाची प्राप्ती हेच साहित्याचे सार्वकालीन, सर्वत्र आढळणारे प्रयोजन असल्याचे दिसून येते. असा सर्जनशील आनंद लेखकाला निर्मितीसाठी तर वाचकाला आस्वादासाठी प्रवृत्त करतो. आत्माविष्कार आणि आत्मशोध या प्रेरणा असणार्‍या लेखकासाठी सर्जनशीलतेच्या पातळीवरील उच्च दर्जाची कलात्मक निर्मिती साधणे हेच त्याच्या आनंदाचे निधान होय!
वाचक कशासाठी वाचतो, या प्रश्‍नाचे उत्तरही वेगवेगळ्या पद्धतीने अनेकांनी दिले आहे. चार घटका मनोरंजन, विरंगुळा, दैनंदिन जीवनातील ताणताणावापासून सुटका, स्वप्नरंजन, उद्बोधन, जिज्ञासातृप्ती, ज्ञानप्राप्ती, दैनंदिन समस्यांवर तोडगा शोधणे अशा अनेकविध कारणांनी वाचक साहित्याकडे वळत असतो. काही प्रमाणात त्याच्या अपेक्षा पूर्णही होतात, तथापि, वाचकाच्या ठायी साहित्याचा आस्वाद घेण्यासाठी सहृदयता असेल व त्याची वाड़्मयीन अभिरुची विकसित, संपन्न व प्रगल्भ झालेली असेल, तरच त्याला दर्जेदार व श्रेष्ठ प्रतीच्या साहित्याच्या आस्वादातून उच्च कोटीचा अलौकिक आनंद मिळू शकतो, लौकिक व्यवहारनिरपेक्ष सौंंदर्याची प्रचीती येते. त्याच्या जीवनविषयक जाणिवा समृद्ध होऊन आयुष्याचा नवा अर्थ प्रत्ययास येतो.
साहित्यात मानवी जीवनाचे प्रतिबिंब उमटत असते. व्यक्तिगत रीत्या प्रत्येकाचे अनुभव तसे मर्यादितच असतात, पण श्रेष्ठ साहित्यिकाने निर्मिलेल्या उच्च दर्जाच्या साहित्यकृतीतून मानवी मनाचे व जीवनाचे विस्तृत, वैविध्यपूर्ण, सर्वांगीण व परिपूर्ण दर्शन घडत असते. अशा साहित्याच्या परिशीलनातून वाचकाच्या अनुभूतीच्या कक्षा रुंदावत असतात. त्याला कल्पनेच्या पातळीवरही अनेक प्रकारचे अनुभव घेता येऊ शकतात. पूर्वपरिचित साहित्यदर्शनातून पुन:प्रत्ययाचा आनंद तर सर्वस्वी अपरिचित असलेल्या नावीन्यपूर्ण साहित्यदर्शनातून नवप्रत्ययाचा अद्भुत आनंद घेता येऊ शकतो. मानवतेचे अधिष्ठान असलेल्या नैतिक, सामाजिक, सांस्कृतिक मूल्याची नव्याने जाणीव होऊन एकूणच मानवी जीवनाविषयीची जाण समृद्ध व प्रगल्भ बनते.
साहित्य संमेलन नावाचा उत्सव
शब्द आणि अर्थाचं सहअस्तित्व हे ज्याप्रमाणे साहित्यात अभिप्रेत आहे, त्याचप्रमाणे साहित्याचं संमेलन म्हणताना लेखक आणि वाचक यांचा योग जुळणे अपेक्षित असणारच! विभिन्न साहित्यप्रकारांमध्ये लेखन करणार्‍या साहित्यिकांच्या परस्परभेटी व्हाव्यात, रसिकांनाही त्यात सामावून घेता यावं, ‘लेखक हा प्रकट वाचक आणि वाचक हा मूक लेखक’ न उरता प्रत्यक्षातही एकमेकांशी विचारांचं, भावनांचं आदानप्रदान करता यावं, या उद्देशाने साहित्य संमेलनांचा घाट घातला जातो. साहित्याचा हा उत्सव प्रारंभ झाला विद्येचं माहेरघर समजल्या जाणार्‍या पुण्यनगरीत. मराठीचं पहिलं अखिल भारतीय साहित्य संमेलन १८७८ साली पुण्याला भरलं आणि अध्यक्ष होते, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. मायबोलीचा बोलबाला महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता अ. भा. संमेलनांच्या रूपाने अगदी पंजाबातील घुमानपर्यंत विस्तारला.
यवतमाळचं वेगळेपण
तब्बल ४५ वर्षांपूर्वी, २०, २१ व २२ ऑक्टोबर १९७३ असे तीन दिवस यवतमाळातील शासकीय शाळेच्या परिसरात ४९ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं होतं. त्या संमेलनात पहिल्यांदाच ग्रंथदिंडी काढण्यात आली. यवतमाळच्या ४९ व्या संमेलनापासून प्रारंभ झालेल्या ग्रंथदिंडीला मिळालेला प्रतिसाद आणि उत्सवी स्वरूप पाहता पुढे प्रत्येकच संमेलनात अशी दिंडी काढली जाऊ लागली. आज ज्यांची जन्मशताब्दी साजरी केली जातेय ते ग. दि. माडगूळकर हेच संमेलनाध्यक्ष होते. महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ सलग नेतृत्व करणारे याच जिल्ह्यातील पुसदचे वसंतराव नाईक हे त्या वेळी राज्याचे मुख्यमंत्री आणि पुढच्या काळात महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे सुधाकरराव नाईक हे तेव्हा यवतमाळ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. संमेलनाचे उद्घाटक होते, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण. संमेलनाचे स्वागताध्यक्ष असलेले सुधाकरराव नि वसंतराव दोघेही यवतमाळ जिल्ह्याचेच. साहित्यप्रांतातील रसिकत्व सिद्ध केलेल्या महाराष्ट्राच्या विद्यमान व भावी असे दोन आणि यशवंतरावांच्या रूपाने माजी अशा तीन मुख्यमंत्र्यांची संमेलनाच्या मंचावरील उपस्थिती हे त्यावेळच्या संमेलनाचे आगळे वैशिष्ट्य!
सुधाकरराव नाईकांनी यवतमाळात संमेलन घ्यायचं ठरवून विविध राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी जोडली होती. अगोदरच्याच वर्षात दुष्काळ पडल्याने विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांनी संमेलनाच्या विरोधात आवाज उठविला होता. ‘इकडे गोरगरिबांना खायला नाही, संमेलन काय करता?’ असा त्यांचा सवाल होता. वैचारिक अभिसरणाला विरोध नाही, परंतु संमेलन साधेपणाने व्हावं, अशी त्यांची भूमिका. आयोजकांना प्रश्‍न पडला. सुधाकररावांना मुख्यमंत्री वसंतराव नाईकांचा भक्कम आधार होता. जांबुवंतरांवांनी आझाद मैदानात सभा घेऊन संमेलनाच्या पदाधिकार्‍यांनी पदांचे राजीनामे द्यावेत, असा नारा दिला. त्यांना अटक करण्यात आली आणि संमेलनात भव्यता असली तरी ते साधेपणाने म्हणजे केवळ सदुसष्ट हजार रुपयांत पार पडले.
यवतमाळच्या शासकीय शाळेसमोरील प्रांगणात उत्साहाचा सागर उचंबळला होता. ‘आपल्याच गावची यात्रा’ या भावनेने सर्वत्र चैतन्य पसरले होते. संमेलनाध्यक्ष, ‘गीतरामायणकार’ ग. दि. माडगूळकरांच्या मुखमंडलावरील आनंद ओसंडून वाहत होता. गीतकाराला कवी अशी मान्यता नसण्याच्या त्या काळात सुधाकरराव नाईकांनी गदिमांच्या नावाचा आग्रह धरला होता. संमेलनाच्या दिवशी सकाळी सुधाकरराव नाईक आणि ग. दि. माडगूळकर कळंबच्या श्रीचिंतामणीच्या दर्शनाला जाऊन आले. संमेलनाचे उद्घाटक होते, अखंड महाराष्ट्राचा मंगलकलश आणणारे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण. त्यांच्या भाषणातील साहित्याचा व्यासंग, विचारांतील व्यापकता मंडपातील भरगच्च संख्येतील श्रोत्यांना प्रभावित करून गेली.
संमेलनातील कथाकथन, कविसंमेलन, परिसंवाद, नाटक या सार्‍याच कार्यक़्रमांना यवतमाळकर रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला होता. त्यात सहभागी झालेले साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपले अधिराज्य गाजवणारे असेच होते. नरहर कुरुंदकर, कवी अनिल, कवी यशवंत, पां. श्रा. गोरे, मधुकर केचे, लक्ष्मणशास्त्री जोशी, गंगाधर गाडगीळ, राम शेवाळकर, वि. भि. कोलते, वा. रा. ढवळे, वा. कृ. चोरघडे, पु. भा. भावे, व्यंकटेश माडगूळकर, द. मा. मिरासदार आदींनी संमेलनात हजेरी लावली होती. कवी अनिल, कवी यशवंत, पु. शि. रेगे, सुरेश भट, भाऊसाहेब पाटणकर, उषा लिमये, देविदास सोटे या नामवंतांनी कविता सादर करून संमेलनात रंगत आणली होती. वर्‍हाडी कवी देविदास सोटे म्हणजे विनोदाचे बादशहाच! त्यांच्या कवितेनं अख्खा मंडप हास्यफवार्‍यांनी फुलून गेला होता.
पां. श्रा. गोरे यांची ‘मेल्यावर मला का रे लाजवता’ ही कविता आणि मराठवाड्यातील दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर लक्ष्मीकांत तांबोळी यांनी म्हटलेल्या ‘मराठवाड्याचं पाणी कुठे गेलं, ते ज्याच्या त्याच्या डोळ्या आलं’ या ओळींनी रसिकांना व्याकुळ केलं. या संमेलनात प्रसिद्ध गायिका शोभा गुर्टू यांच्या गायनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. स्थानिक कलावंतांचे ‘खोटे बाई आता जा’ हे नाटकही सादर झाले. त्यात अशोक एकबोटे, रोहिणी टोंगो, प्रा. ताराबाई गंधे, छाया बर्वे, माधव दामले, जयंत चौधरी आदींनी धमाल उडवून दिली होती.
यवतमाळनेच राखली वर्‍हाडीची बूज
मराठीचे आद्य शायर असा लौकिक प्राप्त केलेले वा. वा. उपाख्य भाऊसाहेब पाटणकर पेशाने वकील तसे एक जिंदादिल शायर आणि जिगरबाज शिकारी म्हणूनही प्रसिद्ध होते. महाराष्ट्र आणि बाहेरही मराठी शेरोशायरीचे कार्यक्रम करणारे भाऊसाहेब पाटणकर वर्‍हाडी बोलीभाषेचे तितकेच चाहते होते. राजा गोसावींच्या हस्ते नगर वाचनालय सभागृहात त्यांचा सत्कार झाला तेव्हा त्यांनी मराठी नव्हे, तर वर्‍हाडीतून शेर सादर करून धमाल उडवून दिली होती. भाऊसाहेबांना वर्‍हाडी साहित्यिक मानतात ते त्यांनी ४ डिसेंबर १९७६ रोजी यवतमाळात भरवलेल्या पहिल्या वर्‍हाडी साहित्य संमेलनामुळे. या संमेलनासाठी भाऊसाहेबांनी स्वत: अनेक ठिकाणी शेरोशायरीचे कार्यक्रम घेऊन पैसा जमवल्याचा कृतज्ञतापूर्ण उल्लेख वर्‍हाडी साहित्यिक कृष्णा लाडसे आणि कविवर्य शंकर बडे सांगत.
‘माह्या वर्‍हाडी मायेले शेव पदराचं भान
मरेपावेतो करते शील कुयाचं रक्षण’
या कवितेतून व्यक्त होणारी भावना स्पष्ट करताना भाऊसाहेब म्हणत, वर्‍हाडी ही संस्कृती जपणारी भाषा असल्याने तिचे लाड केले पाहिजे. यंदा यवतमाळात होत असलेल्या साहित्य संमेलनात प्रथमच वर्‍हाडी काव्यसंमेलन आयोजिले आहे. नवोदित लेखकांसाठी चार कार्यशाळा, कविकट्ट्यासाठी १५०० हून अधिक कवितांचा पाऊस, पुस्तकांची २२० दालने, नामवंत कलाकारांच्या कलाकृतींची प्रदर्शनी आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा असल्याचे भान राखून अशा पंचवीस शेतकरी महिलांना साडीचोळी, उपयुक्त वस्तू देऊन त्यांना ‘आधार’ देण्याचे कार्यही होणार आहे.
अरुणा ढेरे पाचव्या महिला अध्यक्ष
यवतमाळात ११ ते १३ जानेवारी २०१९ रोजी होत असलेल्या ९२ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अरुणा ढेरे यांची निवड करण्यात आली. ही निवड पहिल्यांदाच निवडणुका न घेता करण्यात आली आहे. साहित्य महामंडळाने त्यासाठी आपल्या घटनेत दुरुस्ती करून निवडप्रक्रिया राबविली. यापुढे प्रत्येक वेळी निवडणुकीशिवाय संमेलनाध्यक्षांची निवड केली जाणार आहे. यवतमाळचे संमेलन या अर्थानेही ‘ट्रेंड सेटर’ ठरणार आहे.
अरुणाताईंच्या रूपाने एका महिलेची झालेली निवड ‘आधी आबादी’ला सुखावणारी असली, तरी त्या आजवरच्या महिला म्हणून त्या केवळ पाचव्या अध्यक्ष आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. या यादीतील पहिल्या अध्यक्ष होत्या, कुसुमावती देशपांडे. १९६१ साली ग्वाल्हेर येथे झालेल्या संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. त्यानंतर तब्बल १४ वर्षांनी १९७५ ला कराड येथे झालेल्या संमेलनात हा मान मिळाला दुर्गा भागवत यांना. त्यानंतर मध्ये २१ वर्षे जाऊ द्यावी लागली. १९९६ साली आळंदीला झालेल्या संमेलनाध्यक्ष होत्या शांता शेळके. पुढे पाचच वर्षांनी २००१ मध्ये इंदूर संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. विजया राजाध्यक्ष होत्या. आणि आता पुन्हा १८ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर २०१९ सालच्या यवतमाळातील संमेलनाच्या अध्यक्षपदी एक महिला डॉ. अरुणा ढेरे यांच्या रूपाने विराजमान होत आहेत.
सहजसुंदर ओघवती भाषा हे लेखनवैशिष्ट्य असणार्‍या डॉ. अरुणा ढेरे ‘महाराष्ट्राला लाभलेली मोठी ज्ञानपरंपरा पुढे नेणारी प्रतिनिधी’ म्हणून स्वत:च्या निवडीकडे बघतात, तेव्हा या ९२ व्या संमेलनाध्यक्षाविषयी विशेष आपुलकी आणि उत्सुकता निर्माण होते. कविता, कथा, ललित, कादंबरी, अनुवादित कथा, स्त्री आणि लोकसंस्कृती, समीक्षा अशा जवळपास प्रत्येक प्रकारचं त्यांनी लेखन केलं आहे. प्रसिद्ध साहित्यिक रा. चिं. ढेरे यांच्या कन्या असलेल्या अरुणाताईंना साहित्याचं बाळकडू घरूनच प्राप्त झालं असणार. अर्थात् ते पचवून पुस्तकांच्या जगात वावरायला आवडणं हे त्यांचं स्वत:चं वैशिष्ट्य म्हटलं पाहिजे. ‘देता यावे शब्द अम्लान नि:संशय आयुष्याच्या पायाशी जगणारे निरहंकार’ या अरुणाताईंच्याच शब्दांत व्यक्त झालेली अपेक्षा मराठमोळ्या नि साध्याभोळ्या रसिकांनी मराठी सारस्वतांकडून केली तर ती रास्तच असणार!

Posted by : | on : 13 Jan 2019
Filed under : आसमंत, पुरवणी.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी (115 of 885 articles)

Jobs Shifts
अर्थपूर्ण : यमाजी मालकर | आपले आणि जपानसारख्या किंवा पाश्‍चिमात्य देशांचे प्रश्‍न वेगळे आहेत. पण आपण त्यांचे अनुकरण करून नवी ...

×