ads
ads
सजा पक्की : कशी? ते लष्कर ठरवेल!

सजा पक्की : कशी? ते लष्कर ठरवेल!

•पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पांढरकवड्यात पाकला इशारा •कोलामी, बंजारा,…

पाकिस्तानातील आयातीत वस्तूंवर २०० टक्के कर

पाकिस्तानातील आयातीत वस्तूंवर २०० टक्के कर

नवी दिल्ली, १६ फेब्रुवारी – पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती…

भारताला स्वरक्षणाचा अधिकार

भारताला स्वरक्षणाचा अधिकार

•अमेरिकेच्या एनएसएचा अजित डोवाल यांना फोन, नवी दिल्ली/वॉशिंग्टन, १६…

भारताने डगमगू नये, ठोस कारवाई करावी

भारताने डगमगू नये, ठोस कारवाई करावी

•अमेरिकेतील ७० खासदारांची भूमिका, वॉशिंग्टन, १६ फेब्रुवारी – पुलवामातील…

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी

•पाकिस्तानने व्यक्त केली वचनबद्धता •कुलभूषण जाधव प्रकरण, लाहोर, १६…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:27
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी » मी, पुलंची भाचेसून…

मी, पुलंची भाचेसून…

॥ विशेष : ज्योती ठाकूर |

भाईकाका असे हसरे होते म्हणूनच आजची पिढीही त्यांना जाणून घेऊ इच्छिते. त्यांच्या साहित्याचा आनंद घेऊ इच्छिते. आजही त्यांच्या जयंती-पुण्यतिथीला भाईकाकांच्या घरात कोणी आहे का, हे पाहण्यासाठी लोक येतात. घराचे पडदे उघडे दिसले की लोकांची ये-जा सुरू होते. भाईकाकांच्या फोटोबरोबर फोटो काढण्याची त्यांची इच्छा असते. हे सगळं पाहिलं की ऊर भरून येतो…

Pu La Deshpande1

Pu La Deshpande1

पीएल, भाई, पुल… ही नावं उच्चारली तरी एक हरहुन्नरी, हसतमुख, मिस्कील चेहरा समोर येतो. या नावाचं गारूड किती आणि कसं आहे, हे नव्यानं सांगण्याची आवश्यकता नाही. गंभीर वृत्ती, प्रवृत्ती आणि चेहर्‍याची दैवी देणगी मिळालेल्या मराठी माणसाला हसायला शिकवणार्‍या हास्यगुरूंमध्ये अग्रक्रमाने घ्यावं असं नाव म्हणजे पुल! भाईकाका हयात असते तर आता शंभर वर्षांचे असते. मला खात्री आहे, याही वयात त्यांनी आपल्या वयसामर्थ्यावर कोटी करणं सोडलं नसतं. वाढत्या वयाची पुटं त्यांच्या जन्मजात विनोदबुद्धीला झाकोळून टाकू शकली नसती. पण, कदाचित स्वर्गस्थांनाही एकसुरी सुखोपभोगाचा कंटाळा आला असावा, म्हणूनच त्यांनी हास्यनिर्मितीचा हा झरा आपल्याकडे वळवून घेतला, आपला गाव हसता केला! मात्र, भाईकाका गेल्याने त्यांचा विनोद हरवला नाही. आजही त्यांनी उभ्या केलेल्या व्यक्ती आणि वल्ली घराघरांत जिवंत आहेत. कोणा ना कोणात तरी त्या दिसतात आणि अरे, हेच तर पुलंचं ते व्यक्तिचित्र, याची खूणगाठ पटते. गावखेड्याचे रस्ते तुडवताना आजही एखादी म्हैस भाईकाकांच्या म्हशीची आठवण करून देते.
एखाद्या घरात प्रवेश करताना भस्‌कन एखादा पाळीव कुत्रा अंगावर आला, तर हमखास पुलंच्या शत्रुपक्षांची आठवण होते. घर बांधत असलेला एखादा अतिउत्साही प्राणी आपल्याला पुलंनी साकारलेल्या त्या व्यक्तिरेखेची आठवण करून देतो. भाईकाका असे जागोजाग भेटतात, जागोजागी दिसतात. मी भाईकाकांची भाचेसून. माझ्या पतीला भाईकाकांचा अगदी लहानपणापासून निकटचा सहवास मिळाला. समोरासमोर राहात असल्याने तो, भाईकाका आणि सुनीताबाईंकडेच वाढला. त्यांच्या अंगाखांद्यावर खेळला. त्यामुळेच दिनेशच्या बोलण्यात सतत या दोघांचा उल्लेख येतो. मलाही त्यांचा बराच सहवास लाभला. आम्ही परदेशात होतो तरी वर्षातले दोन महिने भारतात यायचो तेव्हा बराच काळ एकत्र घालवायचो. लग्न झाल्यानंतरचा काही काळ आम्ही टीआयएफआर (टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च)मध्ये होतो. तिथे भाईकाकांचं बरचं येणं-जाणं होतं.
भाईकाकांचा सत्तरावा वाढदिवस खूप मोठ्या प्रमाणावर साजरा झाला होता. असंख्य लोक त्यांना भेटायला आले होते. खरंतर त्या वयात ते आधीच खूप थकले होते. त्यामुळे ही दगदग त्यांना नकोशी वाटत होती. वाढदिवसाच्या दिवशीच नव्हे, पण एरवीही त्यांच्याकडे येणार्‍यांची संख्या बरीच जास्त असे. अर्थात भाईकाका माणसांना कधीच कंटाळत नसत, पण त्यांना थकवा येत असे. मग आम्ही त्यांना टीआयएफआरला आमच्याकडे येण्याचा आग्रह धरला. तिथे आमचं छानसं स्टुडिओ अपार्टमेंट होतं. हाताशी सगळ्या सुविधा होत्या. आग्रहाला मान देऊन भाईकाका आमच्याकडे आले. त्यांचा तो मुक्काम आजही माझ्या स्मरणात आहे. खूप धमाल केली होती आम्ही. त्यावेळीच नव्हे, तर त्यानंतरही भाईकाका वारंवार घरी यायचे. कधी सुनीताबाई बरोबर असायच्या तर कधी ते एकटेच असायचे. एकदा आम्ही त्यांना घरी घेऊन गेलो. तीन-चार तास मनमुराद गप्पा झाल्या, जेवणं झाली. थोड्या वेळात त्यांची निघायची वेळ झाली. त्यांना निरोप देण्यासाठी आम्ही लिफ्टने खाली आलो. पाहतो तो लिफ्टच्या दाराशी बरीच गर्दी जमली होती. या लोकांनी भाईकाकांना लिफ्टमध्ये प्रवेश करताना पाहिलं होतं. त्यामुळे ते खाली येण्याची वाट पाहात सगळे जण तिष्ठत थांबले होते. ते पाहून माझ्या आश्‍चर्याला पारावार राहिला नाही. तब्बल तीन-चार तास अजीबात गडबडगोंधळ न करता ते पुलंची वाट पाहात होते. भाईकाकांप्रती त्यांच्या मनातील ते प्रेम पाहून मला गहिवरून आलं.
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चचा खाजगी समुद्रकिनारा आहे. एकदा भाईकाकांबरोबर आम्ही त्या किनार्‍यावर भटकत होतो. तेव्हा एक गृहस्थ तिथे आले आणि भाईकाकांकडे पाहू लागले. कदाचित त्यांचा स्वत:च्या डोळ्यांवर विश्‍वास बसत नव्हता. मग भाईकाकाच पुढे झाले आणि मिस्कील स्वरात म्हणाले, ‘‘तुमची हरकत नसेल तर मीच पु. ल. देशपांडे आहे.’’ त्यावर आनंदाने ओसंडून वाहणारा त्या गृहस्थांचा चेहरा आजही माझ्या डोळ्यांसमोर आहे. त्या व्यक्तीने लगोलग थोड्या दूरवर असणार्‍या आपल्या कुटुंबाला बोलावून घेतलं. आपण सार्वजनिक स्थळी आहोत याचं भानही त्यांना नव्हतं. कोणी त्यांच्या पाया पडत होतं, कोणी काही बोलत होतं, कोणी सही मागत होतं. आम्ही थोडं बाजूला होऊन हे सगळं बघत होतो. भाईकाकांवर जिवापाड प्रेम करणार्‍यांचा तो सोहळा अनुभवत होतो. माझ्या मते, समाजाचं इतकं निस्सीम, अपार प्रेम मोजक्या भाग्यवंतांना मिळतं. भाईकाका त्यातले एक होते. पण बाहेर इतकं लोकप्रिय, रसिकांच्या गळ्यातील ताईत असणारं हे व्यक्तिमत्त्व घरात अगदी साधं होतं. ते अतिशय शांत आणि सभ्य गृहस्थ होते. घरातल्या सर्वांवर त्यांचं विलक्षण प्रेम होतं. विशेषत: माझ्या मुलावर त्यांनी खूप माया केली. त्या दोघांमधलं नातं खूप छान होतं. भाईकाका आपल्या या नऊ-दहा वर्षांच्या नातवाला छान गाऊन दाखवायचे, बालगप्पांमध्ये रमायचे. आमचं लग्न जमलं तेव्हाची गोष्ट. मी पहिल्यांदाच भाईकाकांना भेटायला जात होते. मनावर प्रचंड दडपण होतं. एक तर तो काळही तीस वर्षांपूर्वीचा होता. शिवाय इतक्या मोठ्या व्यक्तीला भेटायचं म्हणून मन धास्तावलं होतं. त्यांना कसं सामोरं जायचं असा विचार करतच मी घरात प्रवेश केला. दोन-पाच मिनिटं गेल्यावर भाईकाकांनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, ‘‘तुला माशाची आमटी करता येते का गं?’’ त्यांच्या या एका प्रश्‍नानं माझ्यावरचा ताण क्षणात नाहीसा झाला. नंतर अशाच घरगुती गप्पा मारत त्यांनी मला बोलतं केलं. मोठेपणाची, लोकप्रियतेची झूल उतरवून ठेवण्यास त्यांना सेकंदभराचा कालावधीही लागत नसे. कारण त्यांनी ती स्वत:हून पांघरलीच नव्हती. म्हणूनच त्याखाली त्यांच्यातला माणूस हरपण्याचा धोका कधीच जाणवला नाही.
भाईकाका उत्साहाचं मूर्तिमंत उदाहरण होते. त्यांना माणसांचं प्रचंड वेड होतं. बरेचदा असं व्हायचं की, पाहुण्यांशी गप्पा मारून ते विश्रांती घेण्यासाठी आतल्या खोलीत जायचे, आणि हलकीशी झोप लागत असतानाच पुन्हा दारावरची बेल वाजायची. दुसरं कोणी तरी त्यांना भेटायला आलेलं असायचं. खरंतर भाईकाकांना उठवायचं माझ्या जिवावर यायचं. पण, नाइलाजाने मी त्यांच्या खोलीत जायचे. माझी चाहूल लागताच ते जागे व्हायचे आणि कोण आलंय, असं विचारतच उठून बाहेर यायचे. त्यांना कधीच लोकांना भेटायचा कंटाळा यायचा नाही. अगदी शेवटपर्यंत त्यांनी भेटीगाठीतून आनंद मिळवण्याचं हे व्रत पाळलं. टीव्हीवरच्या सातच्या बातम्या ऐकणं, हा भाईकाका आणि सुनीताबाई या दोघांचाही छंद होता, नव्हे, ती त्यांची सवय होती. बातम्यांमध्ये एखादी अप्रिय घटना कानी पडली की दोघेही कमालीचे दु:खी व्हायचे. ती वेदना त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसायची. समाजाशी नाळ जुळलेली असल्यामुळेच ते दु:ख त्यांचं वैयक्तिक होऊन जायचं. लोकांमध्ये, समाजामध्ये रस असल्यामुळेच ही भावना त्यांच्यामध्ये प्रबळ होती.
भाईकाकांवर सरस्वतीचा वरदहस्त होता. त्यामुळेच शब्द त्यांच्या जिभेवर असायचे. घरात दिवसभर कुठल्या ना कुठल्या विषयावर कोटी करणं हे त्यांच्या स्वभावातच होतं. त्यामुळे ते आजूबाजूला असताना सगळे हसत असायचे. ताण नावालाही उरायचा नाही. कोणी तणावात असला तरी ते एखादं वाक्य असं काही बोलायचे की त्याची गंभीर मुद्रा क्षणात हसरी व्हायची. भाईकाका असे हसरे होते म्हणूनच आजची पिढीही त्यांना जाणून घेऊ इच्छिते. त्यांच्या साहित्याचा आनंद घेऊ इच्छिते. आजही त्यांच्या जयंती-पुण्यतिथीला भाईकाकांच्या घरात कोणी आहे का, हे पाहण्यासाठी लोक येतात. घराचे पडदे उघडे दिसले की, लोकांची ये-जा सुरू होते.
भाईकाकांच्या फोटोबरोबर फोटो काढण्याची त्यांची इच्छा असते. हे सगळं पाहिलं की ऊर भरून येतो. भाईकाकांचं सामाजिक कार्यासाठीचं योगदानही नोंद घेण्याजोगं होतं. अर्थात, त्यामागे सुनीताबाईंची मोठी प्रेरणा आणि आग्रह असायचा. भाईकाका काही गर्भश्रीमंत नव्हते. त्या काळी आजच्याइतका पैसाही मिळायचा नाही. पण, त्यांनी अतिशय साधी राहणी ठेवून समाजकार्यासाठी सढळ हस्ते पैसा दिला. त्यांनी प्रपंचात काटकसर केली आणि तब्बल दोन कोटी रुपये सामाजिक कार्यांसाठी देऊ केले. मुख्य म्हणजे कुठेही आपलं नाव येऊ नये याची दखल त्यांनी घेतली.
असे आमचे भाईकाका आजही आमच्या अमेरिकेतल्या घराच्या भिंतीवरील मोठ्या फोटोमधून हसत आमच्याकडे बघत असतात. घरी येणारे अनेक दिग्गज कलावंत प्रथमदर्शनी दृष्टीस पडणारा तो फोटो पाहतात तेव्हा त्यांच्या चेहर्‍यावर हास्याची लकेर उमटल्याशिवाय राहात नाही. राज्य, देशच नव्हे, तर जगाच्या पातळीवर कीर्ती मिळवलेल्या या व्यक्तिमत्त्वाला सादर वंदन करताना त्यांना होणारा आनंद आम्ही नजरेने टिपतो आणि अशा महान व्यक्तीचे कुटुंबीय असल्याची भावना वेगळाच संतोष देऊन जाते.
आमचे पीएलकाका
भारती आचरेकर, ज्येष्ठ अभिनेत्री |
पु.ल. देशपांडे हे जगासाठी खूप मोठं व्यक्तिमत्त्व. पण, त्या नकळत्या वयात मला ते अगदी घरचेच वाटायचे. त्या काळात कुमारजी, भीमसेनजी, माडगूळकर, पुल अशा सगळ्यांची घरी सतत ये-जा असल्यामुळे हे सगळे कोणी खूप मोठे आहेत, असं कधीच वाटायचं नाही. तेव्हा त्यांचं महत्त्व ठाऊकच नव्हतं. माझे आई- वडील याच क्षेत्रात असल्यामुळे दोघांशीही सगळ्यांची मैत्री होती. पुलंना आम्ही बहिणी पीएलकाका म्हणायचो. मला अजूनही आठवतंय, एका मैफिलीत आई सोहनी नावाचा राग गात होती. पीएलकाकाही त्या मैफिलीत होते. आई इतकं सुंदर गात होती की, ते ऐकताना पीएलकाकांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. त्या दिवशी मी, आई आणि पीएलकाका एकाच गाडीतून मुंबईला परतत होतो. तेव्हा त्यांनी केलेलं आईचं कौतुक आजही माझ्या कानात आहे. त्यांच्या शब्दांमधून स्नेह ठिबकत होता. मोठं होत गेल्यानंतर हळूहळू आम्हाला त्यांचं मोठेपण उमगत गेलं. पीएलकाकांनी आपल्या सिद्धहस्त लेखणीद्वारे सर्वसामान्यांच्या अगदी साध्यासुध्या प्रश्‍नांना हात घातला. त्यामुळेच साहित्यात रुची असणारा कुठलाही सामान्य माणूस त्यांचा चाहता असतोच. त्यांचं सर्व प्रकारचं लेखन कमालीचं गाजलं. अर्थातच यामागे त्यांची अफाट निरीक्षणशक्ती कारणीभूत होती. हा प्रसंग माझ्या डोळ्यांसमोरचा आहे. दामूअण्णा मालवणकर तिरळे होते, पण त्यांची मुलगी खूप सुंदर होती. तिचं एक नाटक पाहात असताना पीएलकाका हसत हसत म्हणाले होते, ‘‘अरे वा, दामूअण्णांचा डोळा चुकवून आलीये मुलगी.’’ त्यांचं हे ऐकून सगळे लोटपोट हसले होते. माझ्या आई-बाबांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता तेव्हाही वडिलांच्या अमर वर्मा या नावावर कोटी करत म्हटलं होतं, ‘‘अरे अरे… वर्मावरच घाला घातला…’’ •••

Posted by : | on : 25 Nov 2018
Filed under : आसमंत, पुरवणी.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी (155 of 835 articles)

Tiger Pti
विशेष : किशोर रिठे | यवतमाळ जिल्ह्यात धुमाकूळ घालणार्‍या टी-१ किंवा अवनी वाघिणीला, हैद्राबादच्या शिकार्‍याकडून गोळी मारण्यात आली. या घटनेमुळे ...

×