ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » आसमंत, डॉ. मनमोहन वैद्य, पुरवणी, स्तंभलेखक » मुसलमान, ख्रिश्‍चनही हिंदू समाजाचे अंग!

मुसलमान, ख्रिश्‍चनही हिंदू समाजाचे अंग!

॥ विशेष : डॉ. मनमोहन वैद्य | सह सरकार्यवाह, रा.स्व. संघ |

परंतु, भारतातील सर्व मुसलमान आणि ख्रिश्‍चनदेखील मुळात हिंदूच होते. कुण्या कारणामुळे, हिंदू समाज दुर्बळ असल्यामुळे त्यांना आपली उपासनापद्धती सोडावी लागली अथवा बदलावी लागली; परंतु ते या भारताचे हिंदूंप्रमाणेच अभिन्न अंग आहेत. मुसलमान हे विसरू शकतात, परंतु हिंदूंना हे विसरता येणार नाही. त्यांच्या हिंदुविरोधामुळे हिंदू समाजाचे कुठले नुकसान होणार नाही, याची परिपूर्ण तजवीज आणि सावधगिरी ठेवूनही, ते एकेकाळी हिंदू समाजाचेच अंग होते, हे आम्हाला विसरून चालणार नाही. त्यांना वगळून भारताच्या भविष्याचा विचार करणे, हे सेमेटिक शुलर्श्रीीर्ळींळीीं विचाराचे लक्षण आहे, जे भारताच्या परंपरेच्या विपरीत आहे. भारताचा विचार हिंदुत्वावर आधारित असल्यामुळे, तो सर्वसमावेशी आहे, हे भारताने विसरायला नको. म्हणून कुठे प्रतिक्रियेत मुसलमानांचा विरोध दिसत असला, तरीही भारताच्या मुसलमानांमध्ये भारतीयतेचे म्हणजेच हिंदुत्वाचे जागरण करीत त्यांना भारताचे भविष्य घडविण्यात सोबत घेणे, हीच हिंदुत्वाची ओळख आहे.

Vasudhaiva Kutumbakam Hindu

Vasudhaiva Kutumbakam Hindu

‘भविष्यातील भारत’ या विषयावर नुकत्याच झालेल्या व्याख्यानमालेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी जेव्हा प्रतिपादन केले की- ‘‘संघ ज्या बंधुभावाने कार्य करतो, त्या बंधुभावाचा एकच आधार आहे- विविधतेत एकता. परंपरेने चालत आलेल्या या चिंतनालाच जग हिंदुत्व म्हणते. म्हणून आम्ही म्हणतो की, आमचे हिंदू राष्ट्र आहे. याचा अर्थ यात मुसलमान नकोत, असा अजीबात होत नाही. ज्या दिवशी असे म्हटले जाईल की, मुसलमान नकोत, त्या दिवशी हे हिंदुत्व राहणार नाही. हिंदुत्व तर विश्‍वकुटुंबाचा विचार मांडतो.’’ तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. संघाच्या काही समर्थकांमध्येही काही प्रश्‍न निर्माण झालेत.
बरेचदा कालप्रवाहात, विशिष्ट परिस्थितीत एखादी भूमिका स्वीकारल्यामुळे मूळ भावाचे विस्मरण होत असते आणि त्याचा आपल्या स्वभावावरही प्रभाव दिसू लागतो. भारताचा आत्मा, भारताची ओळख, भारताचे वैशिष्ट्य अर्थात् हिंदुत्वाचेही असेच आहे. हिंदुत्व ही भारताची अध्यात्मावर आधारित, एकात्म आणि समग्र जीवनदृष्टी आहे. ती सर्वसमावेशक आहे. ही दृष्टी वैश्‍विक आणि केवळ मानवप्राण्यांचीच नाही, तर समस्त चराचर सृष्टीच्याही कल्याणाची, समन्वयाची आणि शांतीची इच्छा बाळगणारी आहे. म्हणूनच हिंदूंनी स्वत:ला हिंदू नावदेखील दिले नाही. हिंदूंच्या सर्व प्रार्थनांमध्ये नेहमीच संपूर्ण मानव आणि चराचर सृष्टीच्या कल्याणाचीच इच्छा समाहित असते. व्यापार किंवा इतर कारणांमुळे भारताच्या बाहेर जाणार्‍या लोकांना, बाहेरच्या लोकांनी स्वत:पेक्षा वेगळी ओळख दाखविण्यासाठी, सिंधू नदीपलीकडे राहणारे म्हणून त्यांना हिंदू नाव दिले. बाहेरून भारतात आलेल्या आक्रमकांनीही आमच्यासाठी हिंदू शब्दाचाच वापर केला. म्हणून हिंदू हे आपल्या सर्वांचे, या भूमीवर राहणार्‍यांचे नाव झाले. या सर्वांचा समान आधार होता, ‘एकं सत् विप्रा: बहुधा वदन्ति’- विविधतेत एकता आणि जीवनाचे अध्यात्मावर आधारित चिंतन.
ब्रिटिश शासनाविरुद्धच्या स्वातंत्र्य आंदोलनात, मग ते १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध असो वा १९०५ सालचे बंगालच्या फाळणीविरोधात झालेले यशस्वी जनआंदोलन असो, हिंदू-मुसलमान सर्व एकजूट होऊन सहभागी झाले होते. नंतर हिंदू-मुसलमानांमध्ये विरोध आणि द्वेषाचे बी पेरून राजकारण सुरू झाले. याचा परिणाम भारताच्या फाळणीत झाला. देशाच्या फाळणीचा आधारच हिंदू-मुसलमानांचे विभाजन होता. त्या काळच्या सामाजिक चर्चा, वादविवादात मुसलमानांची बाजू म्हणजे हिंदुविरोध आणि भारतविरोधच होता. परंतु, त्या चर्चेत, प्रतिक्रिया म्हणून हिंदूंच्या चिंतनातही फाळणीचा विरोध करता करता मुसलमानविरोध येणे स्वाभाविक होते, जो हिंदू चिंतनाच्या विपरीत होता. त्या काळच्या अनेक हिंदू नेत्यांच्या भाषणात, प्रतिपादनात मुसलमानविरोध दिसत असला, तरी त्याचे कारण त्या वेळची परिस्थिती होती. ती परिस्थितिजन्य तात्कालिक प्रतिक्रिया होती, सार्वकालिक धारणा नव्हती.
परंतु, हे ध्यानात ठेवले पाहिजे की, मुळात हिंदू विचार हा exclusivist म्हणजे कुणाला वगळून केवळ स्वत:चाच विचार करणारा नाही आहे. म्हणून स्वामी विवेकानंदांनी आपल्या सुप्रसिद्ध शिकागो व्याख्यानात अभिमानाने सांगितले होते की, ‘‘मला तुम्हाला हे सांगताना अभिमान वाटतो की, मी अशा धर्माचा अनुयायी आहे, ज्याच्या पवित्र अशा संस्कृत भाषेत शुलर्श्रीीळेप या इंग्रजी शब्दाला कुठलाच पर्यायवाची शब्द नाही.’’
सेमेटिक मूळ असलेल्या विचारांचे हे वैशिष्ट्य आहे की, त्यांनी मानवी समाजाला दोन भागात विभागले. एक, जो आमच्यासोबत आहे तो चांगला, निष्ठावान, लशश्रळर्शींशीी आहे आणि जो आमच्यासोबत नाही तो वाईट, शैतानाच्या पक्षाचा, काफिर आहे आणि म्हणून निषिद्ध, भर्त्सनीय आहे अथवा जगण्याच्याच लायकीचा नाही. कम्युनिस्ट विचारांचे मूळदेखील सेमेटिक असल्यामुळे, त्यांच्यातही अशा शुलर्श्रीीर्ळींळीीं विचारांचा प्रभाव दिसतो. तुम्ही वामपंथी विचारांशी सहमत नाहीत, म्हणजे तुम्ही दक्षिणपंथी आहात आणि म्हणून निषेधाच्याच लायकीचे आहात. अशा लोकांनी हिंदू विचारालाही त्यांच्या अशा द्वंद्वात्मक दृष्टीने प्रस्तुत केले आणि त्यांचा विरोध सहन करत करत, त्यांच्याशी सामना करत करत आमचेही म्हणजे हिंदूंचेदेखील परिस्थितिजन्य विचार करणे तसेच होत गेले. यात अस्वाभाविक असे काही नाही.
स्वातंत्र्याच्या वेळी भारताची फाळणी केवळ ब्रिटिशांच्या अखत्यारितील भूभागाचे विभाजन होते; लोकसंख्येचे स्थानांतरण यात निहित नव्हते. हजारो वर्षांपासून समाज एकच होता. एका भागात म्हणजे भारतात, मुसलमान अल्पसंख्य होते, तर दुसर्‍या भागात म्हणजे पाकिस्तानात हिंदू. दोघांना समान अधिकारांचे आश्‍वासन होते. दोन्ही देशांचे संविधान एकसाथ तयार झाले. परंतु, मुस्लिमबहुल क्षेत्राच्या म्हणजे पाकिस्तानच्या संविधानात सेमेटिक विचारांच्या परंपरेनुसार गैरमुसलमानांना मुसलमानांप्रमाणे अधिकार देण्यात आले नाहीत. भारताच्या संविधानात मात्र हिंदू परंपरेनुसार सर्व रिलीजन्सना समान अधिकार देण्यात आले. हे भारताच्या संविधानाचे हिंदुत्व आहे. आधी सर्व एकच होते. जो भाग मुस्लिमबहुलतेच्या आधारावर पाकिस्तान झाला, तिथे सेमेटिक विचारांच्या प्रभावामुळे अल्पसंख्य ही संकल्पना संविधानात घेतली गेली. खरेतर, भारताच्या परंपरेत हिंदुत्वामुळे, रिलीजनच्या नावावर कधीही भेदभाव ठेवण्यात आला नाही. सर्वांनाच आपापल्या रिलीजनचे पालन करण्याचे स्वातंत्र्य आणि अधिकार स्वभावत:च हिंदू समाजाने देऊन ठेवले आहे. असे भारताचे चिंतन आणि असा इतिहासदेखील राहिला आहे. म्हणून मुळात, भारताच्या संदर्भात अल्पसंख्य ही संकल्पनाच अप्रस्तुत आहे.
दुर्दैवाने स्वतंत्र भारतातही स्वार्थी राजकारणासाठी हिंदुत्वाचा विरोध आणि मुस्लिम-ख्रिश्‍चनांचे तुष्टीकरण चालू राहिले. कुठेकुठे मुस्लिम आक्रमणाचा विरोध करण्यासाठी हिंदू समाजालाही कट्टरपंथी, हिंसक मुसलमानांविरुद्ध लढावे लागले. यामुळे मुस्लिमविरोधाची भावना मनात राहू लागली. परंतु, भारतातील सर्व मुसलमान आणि ख्रिश्‍चनदेखील मुळात हिंदूच होते. कुणा कारणामुळे, हिंदू समाज दुर्बळ असल्यामुळे त्यांना आपली उपासनापद्धती सोडावी लागली अथवा बदलावी लागली; परंतु ते या भारताचे हिंदूंप्रमाणेच अभिन्न अंग आहेत. मुसलमान हे विसरू शकतात, परंतु हिंदूंना हे विसरता येणार नाही. त्यांच्या हिंदुविरोधामुळे हिंदू समाजाचे कुठलेही नुकसान होणार नाही, याची सावधगिरी बाळगून, ते एकेकाळी हिंदू समाजाचेच अंग होते, हे आम्हाला विसरून चालणार नाही. त्यांना वगळून भारताच्या भविष्याचा विचार करणे, हे सेमेटिक exclusivist विचाराचे लक्षण आहे, जे भारताच्या परंपरेच्या विपरीत आहे. भारताचा विचार हिंदुत्वावर आधारित असल्यामुळे, तो सर्वसमावेशी आहे, हे भारताने विसरायला नको. म्हणून, कुठेकुठे प्रतिक्रियेत मुसलमानांचा विरोध दिसत असला, तरीही भारताच्या मुसलमानांमध्ये भारतीयतेचे म्हणजेच हिंदुत्वाचे जागरण करीत त्यांना भारताचे भविष्य घडविण्यास सोबत घेणे, हीच हिंदुत्वाची ओळख आहे. संघाचे द्वितीय सरसंघचालक पूजनीय श्री गुरुजी यांनी, प्रसिद्ध पत्रकार डॉ. सैफुद्दीन जिलानी यांना दिलेल्या मुलाखतीत याला स्पष्ट केले आहे.
डॉ. जिलानी : भारतीयीकरणावर खूप चर्चा झाली, भ्रमदेखील खूप निर्माण झालेत. हे भ्रम कसे दूर होऊ शकतील, हे तुम्ही सांगू शकाल काय?
श्री गुरुजी : भारतीयीकरणाचा अर्थ सर्वांना हिंदू करणे तर नाहीच आहे. आम्हा सर्वांना हे सत्य मानावे लागेल की, आम्ही सर्व या भूमीचे पुत्र आहोत. म्हणून या संदर्भात आपली निष्ठा अविचल राहणे अनिवार्य आहे. आम्ही सर्व एकाच मानवसमूहाचे अंग आहोत, आमच्या सर्वांचे पूर्वज एकच आहेत, म्हणून आम्हा सर्वांच्या आकांक्षाही एकसमान आहेत- याला जाणणेच खर्‍या अर्थाने भारतीयीकरण आहे.
भारतीयीकरणाचा हा अर्थ नाही की, कुणी आपली पूजापद्धती सोडावी. हे आम्ही कधीही म्हटले नाही आणि म्हणणारही नाही. आमचे तर म्हणणे आहे की, उपासनेची एकच पद्धती संपूर्ण मानवसमाजाला सोयीची नाही.
सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी आपल्या व्याख्यानात म्हटले, ‘‘राष्ट्राच्या नाते आम्हा सर्वांची ओळख हिंदू आहे. काही लोक हिंदू म्हणवून घेण्यात गौरव मानतात आणि काहींच्या मनात तितकी गौरवाची भावना नाही आहे; काही हरकत नाही. काही ारींशीळरश्र लेपीळवशीरींळेपी किंवा ‘पोलिटिकल करेक्टनेस’मुळे जाहीर रीत्या कधी म्हणणार नाहीत; परंतु खाजगीत मात्र म्हणत असतात. आणि काही लोक असे आहेत की ते हे विसरून गेले आहेत. हे सर्व लोक आमचे आपले आहेत, भारताचे आहेत. जसे, परीक्षेत प्रश्‍नपत्रिका हाती आली की आपण आधी सोप्या प्रश्‍नांना सोडवितो आणि नंतर कठण प्रश्‍नांना हात घालतो. त्याचप्रमाणे आम्ही, आधी जे स्वत:ला हिंदू मानतात त्यांचे संघटन करतो. कारण, या जगात वा या देशात आमचा कुणी शत्रू नाही. आमच्याशी वैर ठेवणारे लोक असतील, त्यांच्यापासून स्वत:चा बचाव करत असतानाही त्यांना समाप्त करण्याची आमची आकांक्षा नाही; त्यांना सोबत घेण्याची, त्यांना जोडण्याचीच आकांक्षा आहे. खरेतर हे हिंदुत्व आहे.’’
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी म्हटले होते, ‘‘तुम्ही मुसलमान आहात म्हणून मी हिंदू आहे. अन्यथा मी तर विश्‍वमानव आहे.’’
भारताचा अर्थात् हिंदुत्वाचा सर्वसमावेशी विचार तसेच संस्कार कसा ळपलर्श्रीीर्ळींश आहे, हे स्पष्ट करणारी एक इंग्रजी कविता आठवली-
He drew a circle and kept me out.
A heretic, a rebel and somebody to flout
But love and I had a wit to win
We drew a circle and took him in.
mmohanngp@gmail.com

Posted by : | on : 2 Dec 2018
Filed under : आसमंत, डॉ. मनमोहन वैद्य, पुरवणी, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, डॉ. मनमोहन वैद्य, पुरवणी, स्तंभलेखक (214 of 1224 articles)

Congress President Rahul Gandhi
सारांश : ल.त्र्यं. जोशी | राहुलच्या नेतृत्वाचा आलेख पाहता आतापर्यंतच्या एकाही विधानसभा निवडणुकीत ते स्वत:चे जिंकून देणारे नेतृत्व सिध्द करु ...

×