ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी » मेंदूविकाराबाबत महत्त्वाचे संशोधन

मेंदूविकाराबाबत महत्त्वाचे संशोधन

॥ विज्ञान : ओंकार काळे |

Brain Barrier

Brain Barrier

मेंदूला होणारे आजार अनेक वेळा व्यक्तीला दर्जेदार आयुष्य घालवण्यास अपात्र ठरवतात, कारण मेंदूवरच शरीराची हालचाल, तोल सांभाळणं आणि सर्वच प्रकारचे शारीरिक आणि मानसिक निर्णय अवलंबून असतात. म्हणूनच मेंदू मृत झाला की व्यक्तीला मृत घोषित केलं जातं.
याचा अर्थ, मेंदूला हृदयाएवढंच किंवा त्याहूनही अधिक महत्त्व असतं. अलीकडे हेल्मेटसक्ती डावलून आणि वाहतुकीचे नियम मोडून वाहनं बेधडकपणे चालवणार्‍यांची संख्या भरमसाट वाढली आहे. अशा वेळी अपघात झाले की डोक्याला दुखापती होण्याचं आणि त्या मेंदूंपर्यंत पोहोचण्याचं प्रमाणही वाढत चाललं आहे. या दुखापतींमुळे मेंदूवर शस्त्रक्रिया करावी लागणं ही गोष्ट खर्चीक आणि त्रासदायकही असते. परंतु, अलीकडे यावर लेझरचे उपचार करून रुग्णांना बर्‍यापैकी दिलासा देण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मेंदूच्या दुखापतींमध्ये प्रामुख्यानं मेंदूला सूज येण्याचं प्रमाण मोठं असतं. लेझरद्वारे ही सूज कमी केली जाते. लेझरद्वारे रक्तावर आणि पर्यायानं रक्तातील घटकांवर केले जाणारे उपचार लोकप्रिय ठरत आहेत. परंतु, याविषयी काही गैरसमज व भीतीही असल्याचं दिसतं. त्यापैकी लेझरचे काही परिणाम होतात का, ही भीती अधिक महत्त्वाची असते. कारण त्यामुळे अनेक रुग्ण या वरदायिनी उपचारपद्धतीकडे वळत नाहीत.
मात्र, या संदर्भात गेल्या १० ते १२ वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात संशोधन झालं असून अद्याप तरी यापैकी एकाही संशोधनातून या पद्धतीचे काही दुष्परिणाम असल्याचं समोर आलेलं नाही. रुग्णाच्या मनातल्या शंकेचा हा मोठा भाग असल्यानं तो तितकाच महत्त्वाचाही आहे आणि म्हणूनच या उपचारांची माहिती घेण्यापूर्वी याविषयीच्या संशोधनावर नजर टाकणं क्रमप्राप्त आहे.
सुमारे दहा वर्षांपूर्वीपासून मेंदूवर थेट सोडलेल्या लेझर किरणांचा काय परिणाम होतो, हे शोधून काढण्यासाठी संशोधन करण्यास सुरुवात झाली. आतापर्यंतच्या संशोधनातून असं स्पष्ट झालं आहे की, कवटीवर लेझर किरण सोडून मेंदूच्या पेशींची पुनर्निर्मिती करता येते. मेंदूच्या भागांची गुंतागुंतीची लक्षणं, नैराश्य आणि व्यसनाधीनता कमी करण्यासाठी कमी पातळीच्या लेझर किरणांचे उपचार लाभदायक असल्याचं या संशोधनातून सिद्ध झालं आहे.
२००६ मध्ये मेंदूचा झटका आलेल्या उंदरांवर करण्यात आलेल्या प्रयोगांमध्ये उंदरांच्या मेंदूवर कमी क्षमतेच्या लेझर किरणांचा मारा करण्यात आला. त्या वेळी त्यांच्या मेंदूच्या कार्यात लक्षणीय सुधारणा आणि वाढ झाल्याचं आणि नवीन मेंदू पेशींची निर्मिती झाल्याचं दिसून आलं. दुसर्‍या एका अभ्यासात इतर औषधोपचारांच्या तुलनेत लेझर उपचारांचा परिणाम अधिक झटपट आणि परिणामकारक असल्याचं स्पष्ट झालं. मेंदूच्या पेशी मारणार्‍या आणि सर्वसामान्यपणे ‘एएलएस’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या मेंदूच्या आजारात मोटर न्यूरॉन्सचा वाढत्या प्रमाणात नाश होत जातो आणि मृत्यू ओढवतो. या आजारातही कवटीवर सोडलेल्या लेझरमुळे संशोधकांना ज्ञानतंतूंच्या कार्यात सुधारणा झाल्याचं आढळलं.
लेझर उपचार कशा प्रकारे कार्य करतात, हे समजून घेण्यासाठी मुळातच जखमा कशा भरून येतात हे समजून घेतलं पाहिजे. पेशीच्या बाह्य आवरणाला एक्झोथेलियम आणि त्याआतील आवरणाला एंडोथेलियम म्हणतात. एंडोथेलियम नायट्रिक ऑक्साईड तयार करतं. जखमा भरून येण्यासाठी आवश्यक असलेले घटक तयार करण्यासाठी या नायट्रिक ऑक्साईडची नितांत आवश्यकता असते.
नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वाढलं की, शरीर जखमा भरून येण्यासाठी आवश्यक असलेले घटक तयार करून त्यांना जखमी अवयवांपर्यंत पोहोचतं करतं आणि जखमा भरून येऊ लागतात. लेझरच्या उपचारांमुळे नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वाढतं. लेझरद्वारे रक्तावर उपचार करण्याच्या पद्धतीला ‘लेझर हिमोथेरपी’ असं म्हणतात. लेझरमधील फोटॉन ऊर्जाभारित असतात. रक्तातील मायटोकाँड्रिया या फोटॉन्समधील ऊर्जा शोषून घेतात आणि त्यामुळे पेशींची स्थिती सुधारते. त्या ऊर्जाभारित बनतात. यातील महत्त्वाचा भाग म्हणजे खराब न झालेल्या पेशींबरोबरच अपघातांमुळे, धक्का बसल्यामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे दुखावलेल्या, फाटलेल्या किंवा विस्कटलेल्या पेशींनाही ऊर्जा मिळते आणि त्या एकदम ताज्यातवान्या बनतात. त्यांची कार्यपद्धती सुधारते आणि सुरळीत होते. फोटॉनच्या ऊर्जेमुळे अगदी मृत्युपंथाला लागलेल्या पेशीही पुन्हा पहिल्याएवढ्याच पूर्ण क्षमतेने कार्यरत होतात.
लेझरच्या उपचारांमुळे आणखीही एक उपकारक परिणाम झाल्याचं दिसून येतं. तो म्हणजे लेझरमुळे शरीराला होणार्‍या प्राणवायूच्या पुरवठ्यात वाढ होते. तांबड्या रक्तपेशींद्वारे शरीराला केल्या जाणार्‍या प्राणवायूच्या पुरवठ्यात सुमारे २४ ते ३६ टक्के वाढ होत असल्याचं याविषयीच्या संशोधनातून आढळलं आहे. साहजिकच पक्षाघातामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे दुखावलेल्या मेंदूच्या पेशी पूर्ववत होण्यास मदत होते. रक्तातल्या पांढर्‍या पेशींवर शरीराची रोगप्रतिकारशक्ती अवलंबून असते. कोणत्याही रोगजंतूंवर आणि परक्या गोष्टींवर तुटून पडणार्‍या या सैनिक पेशींना फोटॉनची ऊर्जा मिळाली की त्याही झपाट्यानं कामाला लागतात. त्यामुळे रक्ताचं झपाट्यानं शुद्धीकरण होतं. रक्ताच्या गुठळ्या, रक्तात शिरलेले बॅक्टेरिया आणि व्हायरस यांचा नायनाट होतो. शिवाय रक्तात साचलेली फ्री रॅडिकल्स बाहेर टाकली जातात. साहजिकच रक्तप्रवाह सुरळीतपणे प्रवाहित होतो. त्यामुळे मेंदूच्या पेशींना रक्तातून पोषक द्रव्यांचा पुरवठा होण्यातले अडथळे दूर होतात आणि त्यांच्या दुखापतीही बर्‍या होतात. लेझर थेरपीची जमेची बाजू म्हणजे यामध्ये इंजेक्शन किंवा गोळ्यांचा वापर केला जात नाही. रुग्णाला हालचाली करण्याची गरज नसते किंवा शस्त्रक्रियाही करावी लागत नाही. आजार, त्याचं स्वरूप, आणि जुनाटपणा विचारात घेऊन
ठरावीक ठिकाणी लेझर सोडण्याचं प्रमाण निश्‍चित केलं जातं. मनगटाजवळच्या नाडीतून, नाकाच्या त्वचेखाली असलेल्या केशवाहिन्यांच्या जाळ्यावर, कवटीवर, पाठीच्या कण्यावर अशा प्रकारे आजारानुसार लेझर किरण सोडले जातात. रक्ताभिसरणाची संपूर्ण क्रिया पूर्ण होण्यास आठ मिनिटं लागतात. याचा अर्थ मनगटावर किरण सोडले असतील तर आठ मिनिटांमध्ये लेझरभारित रक्त शरीरभर फिरून पुन्हा मनगटाजवळ येतं. म्हणजेच एका तासात सुमारे आठ वेळा शरीरावर लेझरचे उपचार केले जातात. मेंदूच्या आजारांसाठी सहसा कवटीवर थेट लेझर सोडले जातात. काही ठिकाणी रुग्णाच्या संपूर्ण शरीरावर लेझर सोडून शरीरातील विषद्रव्यं दूर करण्याचे प्रयोगही केले जातात. अर्थातच, उपचार करणार्‍याची तज्ज्ञता आणि लेझरची पातळी या दोन गोष्टी यात महत्त्वाच्या असतात, हे सातत्यानं लक्षात ठेवलं पाहिजे.
सध्या जगातील अनेक भागांमध्ये कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी, रक्तवाहिन्यांमधले अडथळे दूर करण्यासाठी आणि त्यांना रुंदावण्यासाठी लेझर किरणांचा उपयोग केला जातो. त्यामुळे मेंदूच्या पेशींना होणार्‍या रक्तपुरवठ्यात वाढ होऊन त्यांची कार्यक्षमता वाढते. रक्तवाहिन्यांमध्ये अगदी ९० ते १०० टक्के ब्लॉकेजेस असले तरीही या उपचारपद्धतीद्वारे ते दूर करणं शक्य असतं, असा दावा या उपचारपद्धतीचे समर्थक तज्ज्ञ करतात. उच्च रक्तदाबात आणि इतर ठिकाणचे ब्लॉकेजेस दूर करण्यासाठीही या उपचारांचा फायदा होत असल्याचं दिसून आलं आहे. मेंदूच्या पेशी एकदा मरण पावल्या की पुन्हा तयार होत नाहीत असं म्हटलं जातं. परंतु, या उपचारांमुळे अशा मरणासन्न पेशींना वाचवता येतंच; शिवाय नवीन पेशीही तयार होतात, असं अनेक संशोधनांतून सिद्ध झालं आहे. पेशींमधील मायटोकाँड्रियांचं, लाल रक्तपेशींचं, पांढर्‍या रक्तपेशींचं आणि पेशी आवरणाचं कार्य सुरळीत झाल्यामुळे पेशी ताकदवान बनतात आणि शरीराची प्रतिकारशक्ती वाढते.
रक्तात साचलेली विषद्रव्यं दूर झाल्यामुळे हातापाय ांमध्ये आलेला ताठरपणा, हाता-पायांना मुंग्या येणं, पाय जाड होणं किंवा त्यांच्यातली संवेदना कमी होणं, चालताना दम लागणं, दृष्टी मंदावणं, चेहरा किंवा हातापाय ांवर सूज येणं, थकवा जाणवणं, त्वचेवर काळपट- लालसर चट्टे पडणं, इत्यादी अनेक आजारांवर या उपचारांचा फायदा होतो. निर्णयक्षमता, तोल सांभाळणं यासारख्या क्रियांवर सकारात्मक परिणाम होतो. म्हणूनच पक्षाघात किंवा लकवा मारणं, पार्किन्सन, वृद्धावस्थेमुळे होणारे मेंदूचे आजार, ऑटिझम, फिट किंवा फेफरं येणं यांसारख्या मेंदूच्या आजारांमध्ये या उपचारपद्धतीचा उपयोग होतो.
संशोधनाचा भक्कम आधार
लेझरवरील संशोधनादरम्यात करण्यात आलेल्या सर्व प्रयोगांमध्ये २००९ मध्ये हार्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये मानवी रुग्णावर करण्यात आलेल्या प्रयोगाला महत्त्वपूर्ण मानलं जातं. या प्रयोगात नैराश्य आणि चिंताग्रस्तता या आजारांच्या दहा मनोरुग्णांवर ८१० नॅनोमीटर प्रकाशाचा
वापर करून उपचार करण्यात आले. यात लेझरचा प्रकाशझोत कपाळावर सोडण्यात आला. सुमारे चार आठवड्यांच्या कालावधीत नैराश्यात आणि चिंताग्रस्ततेत लक्षणीय घट झाल्याचं आढळून आलं. या पाठोपाठ या संदर्भातील अनेक अभ्यास करण्यात आले. यूसी सँडियागो येथील न्यूरोसायन्स विभागात तसंच स्टॅनफोर्ड स्कूल ऑफ मेडिसीन, स्क्रिप्स हॉस्पिटल, युनिव्हर्सिटी ऑफ मॅसॅच्युसेट्स आणि बोस्टन युनिव्हर्सिटी मेडिकल स्कूल यांनीही या संदर्भात प्रयोग केले. एकूण ६६० रुग्णांवरच्या एका प्रयोगातून रुग्णांच्या कवटीवर सोडण्यात आलेले लेझर तीन महिन्यांत कवटीत पाच इंचांपर्यंत आत पोहोचत असल्याचं दिसून आलं. तसंच मेंदूच्या पेशींची नवनिर्मिती झाल्याचा निष्कर्षही या अभ्यासातून समोर आला. लेझर प्रकाशामुळे एटीपी, डीएनए, आरएनए यांची निर्मिती, प्राणवायूत आणि पेशींच्या चयापचयातही वाढ होत असल्याचं स्पष्ट झालं आहे. पार्किन्सनच्या रुग्णांमध्येही अशीच प्रगती झाल्याचं संशोधकांनी दाखवून दिलं आहे. पाठीच्या कण्यावर लेझरचा थेट झोत सोडला तर तिथल्या पेशींच्या निर्मितीतही वाढ होते आणि पाठीच्या कण्याला झालेल्या दुखापतीमुळे त्रस्त रुग्णांना दिलासा मिळू शकतो, असंही संशोधनातून स्पष्ट झालं आहे. •••

Posted by : | on : 13 Jan 2019
Filed under : आसमंत, पुरवणी.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी (8 of 780 articles)

Application Development
थोडं वेगळं : शुभांगी रथकंठीवार | हे ‘वॉशिंग्टन अकोर्ड’ आहे तरी काय? हे आहे एक इंटरनॅशनल अ‍ॅग्रिमेंट, ज्याद्वारे जे प्रोफेशनल ...

×