ads
ads
जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

जो बंदूक उचलेल, त्याचा खातमाच!

•भारतीय लष्कराचा कठोर संदेश •पुलवामा हल्ल्यामागे पाक लष्कर, आयएसआयच,…

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे कठीण : मोदी

नवी दिल्ली, १९ फेब्रुवारी – महाराष्ट्राच्या कडे-कपारीत ज्यांच्या नावाचा…

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

सूर्यकिरण विमानांची आकाशात धडक

•एका वैमानिकाचा मृत्यू, दोन सुरक्षित •एअर शो सरावादरम्यान दुर्दैवी…

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर

•इम्रान खानची धमकी, इस्लामाबाद, १९ फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी…

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

अमेरिकेतील १६ राज्यांचा ट्रम्प प्रशासनावर खटला

सॅन फ्रान्सिस्को, १९ फेब्रुवारी – मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी…

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

कुलभूषणवरील खटला बेकायदेशीर ठरवा

•सर्व आरोप काल्पनिक, आंतरराष्ट्रीय तत्त्वांचीही पायमल्ली •हरीश साळवे यांचा…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

पाकी कलाकार, गायकांना भारताचे दार बंद

मुंबई, १७ फेब्रुवारी – यापुढे पाकिस्तानी कलाकार आणि गायकांसोबत…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:51 | सूर्यास्त: 18:28
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी » मेरा परिचय : अटलजींच्या काव्यप्रतिभेतून प्रकटलेले हिंदुसूक्त!

मेरा परिचय : अटलजींच्या काव्यप्रतिभेतून प्रकटलेले हिंदुसूक्त!

॥ आदरांजली : दि. भा. घुमरे |

पंतप्रधानपदाच्या सर्वोच्च अधिकारांचे वजन लपेटून एका पारड्यात बसलेले वयोवृद्ध, तपोवृद्ध आणि अनुभवसमृद्ध अटलजी आणि दुसर्‍या पारड्यात नुकत्याच दाढीमिशा फुटलेले, सळसळत्या रक्ताचे, नित्यतत्पर बैठका घेतलेले आणि ‘मेरा परिचय’ आत्मविश्‍वासाने कीर्तिमान करणारे अटलबिहारी अशा या दोन पारड्यातील दुसरे पारडे अजूनही जड आहे. पहिल्या पारड्यात त्यांच्या एकावन्न कविता ओतल्या, तरीही ते पारडे दुसर्‍या पारड्याला पासंगाच्या जवळपासही आणू शकणार नाही. ते कालही जड होते, आजही जड आहे आणि पुढेही जडच राहणार आहे. स्वत: वाजपेयी एखाद् वेळेस ‘मेरा परिचय’ विसरले असतील, कदाचित तो त्यांना आणि त्यांच्या सहकार्‍यांना आजच्या राजकारणात सोयीचा ठरत नसेल, पण त्या परिचयातील हिंदूंची अस्मिता, हिंदू संस्कृतीचे शील आणि या पुण्यपावन भूमीचे चिरवांछित हे ज्या प्रतिभासंपन्न काव्यातून हिंदूंच्या हाती आले आहे, ते काव्य ‘हिंदुसूक्ता’च्या कोटीला कधीचेच जाऊन बसलेले आहे.

Atal Bihari Vajpayee Hd

Atal Bihari Vajpayee Hd

पंतप्रधानपदाच्या सर्वोच्च अधिकारांचे वजन लपेटून एका पारड्यात बसलेले वयोवृद्ध, तपोवृद्ध आणि अनुभवसमृद्ध अटलजी आणि दुसर्‍या पारड्यात नुकत्याच दाढीमिशा फुटलेले, सळसळत्या रक्ताचे, नित्यतत्पर बैठका घेतलेले आणि ‘मेरा परिचय’ आत्मविश्‍वासाने कीर्तिमान करणारे अटलबिहारी अशा या दोन पारड्यातील दुसरे पारडे अजूनही जड आहे. पहिल्या पारड्यात त्यांच्या एकावन्न कविता ओतल्या, तरीही ते पारडे दुसर्‍या पारड्याला पासंगाच्या जवळपासही आणू शकणार नाही. ते कालही जड होते, आजही जड आहे आणि पुढेही जडच राहणार आहे. स्वत: वाजपेयी एखाद् वेळेस ‘मेरा परिचय’ विसरले असतील, कदाचित तो त्यांना आणि त्यांच्या सहकार्‍यांना आजच्या राजकारणात सोयीचा ठरत नसेल, पण त्या परिचयातील हिंदूंची अस्मिता, हिंदू संस्कृतीचे शील आणि या पुण्यपावन भूमीचे चिरवांछित हे ज्या प्रतिभासंपन्न काव्यातून हिंदूंच्या हाती आले आहे, ते काव्य ‘हिंदुसूक्ता’च्या कोटीला कधीचेच जाऊन बसलेले आहे.
रौद्ररसाचा आविष्कार
क्रुद्ध हिंदू, निर्भय हिंदू, पराक्रमी हिंदू, क्षमाशील हिंदू, करुणाकर हिंदू, मार्गदर्शक हिंदू, उपकारी हिंदू आणि सर्व कल्याणवादी हिंदू… अशा हिंदूचा दाहक, तळपता आणि संजीवक परिचय करवून देणारे ‘मेरा परिचय’ हे अटलजींचे उमलत्या तारुण्यातील काव्य हे त्या काळच्या आम्हा तरुणांना नित्य पाठातील सूक्त होते.
हिंदु तनमन हिंदु जीवन,
रगरग हिदु मेरा परिचय॥धृ॥
मै शंकर का वह क्रोधानल
कर सकता जगती क्षार-क्षार
डमरू की वह प्रलयध्वनि हूं
जिसमे बजता भीषण संहार
रणचण्डी की अतृप्त प्यास
मै दुर्गा का उन्मत हास
यम की प्रलयंकर पुकार
जलते मरघट का धुवाँधार
फिर अंतरतम की ज्वालासे
जती मे आग लगा दूं मै
यदि धदक उठे जलथल अंबर
जडचेतन फिर कैसा विस्मय?
स्वातंत्र्य संगराच्या काळात तयार झालेल्या अतिमानसाच्या अनेक आविष्कारातील, हा सर्वसामान्यांना थेट जाऊन भिडणारा आविष्कार! परदास्यविमोचन, समाजपरिवर्तन आणि लोकोद्वार यासाठी इतिहासाने चोखाळलेला हा पहिला मार्ग- क्रोधाचा! अन्याय, अत्याचार आणि दास्य याविरुद्धचे गांधीयुगापूर्वीचे सर्व संघर्ष याच क्रोधातून उफाळले. क्रांती! सशस्त्र क्रांती! हाच सर्वमान्य मार्ग होता. या मार्गाची भारतीय परंपरा शंकराचे तांडव आणि रणचण्डी दुर्गेचे संकटनिवारक रूप अशा पौराण संचितापर्यंत जाऊन भिडते. ‘मेरा परिचय’च्या पहिल्या कडव्यातील रौद्ररसाचा हा जगड्व्याळ आविष्कार अजोड आहे.
निर्भयतेचे वरदान
पण हा क्रोध कसा हवा? तर निर्भयतेचे वरदान लाभलेला. शंकराने वस्तुपाठ दिलेला, निर्भयतेच्या आदी पुरुषाने हलाहल पचवून प्रशस्त केलेला…
मै आदिपुरुष निर्भयता का
वरदान लिये आया भू पर
पय पीकर सब मरते आये
मै अमर हुआ लो विष पी कर
अधरों की प्यास बुझाई है
मैने पीकर वह आग प्रखर
हो जाती दुनिया भस्मसात
जिसको क्षणभर भी छू कर
भय से व्याकुल फिर दुनिया ने
प्रारंभ किया मेरा पूजन
मै नर नारायण नीलकंठ बन गया
न इसमे कुछ संशय-२-
निर्भयतेचे वरदान घेऊन आलेल्या मला हिंदुत्व, हलाहल पचवून नीलकंठ बनलेल्या शंकराचा वारसा लाभला असल्याने या भूमीत पिढी दरपिढी मृत्युंजय महावीरांची शृंखला अखंड सुरू आहे. राजपुतांचा, मराठ्यांचा, शिखांचा आणि अगदी अलीकडील काळातील कारगील लढाईपर्यंतचा इतिहास याला साक्षी आहे.
जगाचे गुरुस्थान
पण क्रोध, पराक्रम, बलिदान, त्याग हा एवढाच ‘मेरा परिचय’ नाही. या भूमीत शस्त्र आणि शास्त्र बरोबरीने चालतात. जगात काही केवळ शस्त्रे परजण्यासाठीच माझा जन्म नाही तर ‘सर्वेऽपि सुखिन: सन्तु’ हे माझे चिरवांछित असल्याने जगाच्या गुरुस्थानी मी प्रतिष्ठित झालो आहे.
मै अखिल विश्‍व का गुरू महान
देता विद्या का अमर दान
मैने दिखलाया मुक्ति मार्ग
मैने सिखलाया ब्रह्मज्ञान
मेरे वेदों का ज्ञान अमर
मेरे वेदों की ज्योति प्रखर
जगती के मन का अंधकार
कब क्षण भर को भी सका ठहर
मेरा स्वर नभ में घहर घहर
सागर के जलमे छहर छहर
इस कोने से उस कोने तक
कर सकता जगती सौरभ मय-३
नालंदा, तक्षशिला, विदिशा इत्यादी प्राचीन विद्यापीठांत अध्ययन करण्यासाठी परदेशातून विद्यार्थी येत. अलेक्झांडर जग जिंकण्यासाठी निघाला तेव्हा त्याने आपल्या गुरूचे दर्शन घेतले आणि ‘‘गुरुजी, मी आपणासाठी काय आणू?’’ असे त्याने गुरुला विचारले. गुरू म्हणाले, ‘‘तू जर भारतात गेलास तर माझ्यासाठी तेथून ज्ञान आण.’’ या आख्यायिकेतच, वरील कडव्यात जो दावा करण्यात आला आहे तो सार्थ ठरतो. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी सांगतात- ‘‘भारतातील वेदान्ताने जगाला ज्ञानाची देणगी दिली, सांख्य आणि लोकायत यांनी बुद्धिप्रामाण्यवाद दिला, शैव आणि वैष्णवांनी भक्ती दिली, तर जैन आणि बौद्ध दर्शनांनी नीती दिली.’’ वाजपेयी म्हणतात, ‘मेरा स्वर नभ मे घहर घहर। सागर के जल मे छहर छहर’- शब्दब्रह्माचा- ओंकाराचा- घनगंभीर आद्यस्वर ही या भूमीची संपूर्ण विश्‍वाला केवढी मोठी देण आहे! चेन्नईनजीकच्या महाबलिपुरम्च्या समुद्राचे संगीत ऐकायला कितीतरी पर्यटक तेथे तासन्तास बसलेले असतात. काय असते त्या संगीतात? त्या संगीतात असते हिंदू विश्‍वात्म्याला केलेली प्रार्थना, त्या संगीतात असते सागराने केलेले ‘अयि भुवन मनमोहिनी, सुजलाम्, सुफलाम् भारतमातेचे स्तोत्रगान! विशीतल्या अटलजींच्या काव्यप्रतिभेचा ‘इस कोने से उस कोने तक’ संपूर्ण जगाला सौरभमय करण्याचा हा किती भव्यदिव्य आविष्कार होय!
आणि याची प्रचीती इतिहासात जागोजागी सापडते. म्हणूनच तरुण अटलजी त्याचे स्मरण करून देतात-
दुनिया के वीराने पथ पर
जब जब नर ने खायी ठोकर
दो आँसू शेष बचा पाया
जब जब मानव सब कुछ खो कर
मै आया तभी द्रवित हो कर
मै आया ज्ञानदीप ले कर
भूला भटका मानव पथ पर
चल निकला सोते से जग कर
जगे आवर्तोमे फस कर
जो बैठ गया आधे पथ पर
उस नर को राह दिखाना ही
मेरा सदैव का दृढ निश्‍चय ॥४॥
विसाव्या शतकातलाच या विषयीचा इतिहास पाहिला तर स्वामी विवेकानंद, योगी अरविंद यांच्यापासून तो गांधी-नेहरू-विनोबा यांच्यापर्यंत जगाला आध्यात्मिक ज्ञानाबरोबरच सत्य, अहिंसा, शांती, कांचनमुक्ती आणि स्वामित्वविसर्जन यासारख्या मार्गांचा संदेश देणारा हिंदू व्यतिरिक्त दुसरा कोण आहे?
रक्षणकर्ता, आश्रयदाता
याचबरोबर ‘रक्षणकर्ता हिंदू’ हासुद्धा हिंदूचा एक मोठा परिचय आहे. तो अटलजी सांगतात-
मै तेज:पुंज तमलीन जगत में
फैलाया मैने प्रकाश
मैने जग का विनाश रच कर
कब कब चाहा है निज का विकास?
शरणागत की रक्षा की है
मैने अपना जीवन दे कर
विश्‍वास यदी नही आता हो
तो साक्षी है इतिहास अमर
जगाचा विनाश करून आपला विकास केल्याचे एकतरी उदाहरण दाखविता येईल का? उलट या भूमीकडे आशेने आलेल्या शरणागतांचे प्रत्येक वेळी तिने रक्षणच केले आहे. सूफी आले, पारशी आले, ज्यू आले, शिया-अहमदीया आले, अगदी अलीकडे दलाई लामा आले आणि आज तर प्रचंड संख्येने बांगलादेशी येत आहेत. या सर्वांचे येथे रक्षण झाले. त्यामुळे काही आपत्तीही ओढवल्या. पण, शरणागतांच्या रक्षणाचे ब्रीद सोडले नाही म्हणूनच आज जर-
यदि आज देहली के खंडहर
सदियों की निद्रा से जग कर
गुंजार उठे ऊंचे स्वर से
हिंदू की जय तो क्या विस्मय?
या भूमीचे शील आणि हे सर्व जगावेगळे वर्तन का? तर तेच या भूमीचे शील आहे म्हणून. कसे शील?
होकर स्वतंत्र कब चाहा है मैने
करलू जग को गुलाम?
मैने तो सदा सिखाया है
करना अपने मन को गुलाम
गोपाल राम के नामों पर
कब मैने अत्याचार किया?
कब दुनिया को हिंदू करने
घर घर मे नरसंहार किया
कोई बतलाये काबूल में
जाकर कितनी मस्जिद तोडी?
भूभाग नही शतशत मानव के
हृदय जीतनेका निश्‍चय ॥६॥
प्रश्‍न रोखठोक आहेत, आणि हिंदूंचे शीलही स्पष्ट आणि सरळ, सोप्या भाषेत व्यक्त झाले आहे. पण हे इतके सरळपणे सांगून त्याचा कितीसा प्रभाव पडणार? म्हणून पुढील दोन कडवे. आपल्या मनाला सदैव ताब्यात ठेवून इतरांची हृदये जिंकणार्‍या हिंदूला काय सोसावे, भोगावे लागले ते या दोन कडव्यांत अटलजी सांगतात-
मैने छाती का रक्त पिला
पाले विदेश के क्षुधित लाल
मुझ को मानव मे भेद नही
मेरा अंत:स्थल वर विशाल
जग के ठुकराये लोगों को
लो मेरे घर का द्वार खुला
अपना सब कुछ मै लुटा चुका
फिर भी अक्षय है धनागार
मेरा हीरा पाकर ज्योतित
उन लोगों का वह राजमुकुट
फिर इन चरणोंपर झुक जाये
कल वह किरिट तो क्या विस्मय? ॥७॥
मी आपल्या छातीचे रक्त पाजून आक्रमकांना पोसले, सोन्याचा धूर निघत असे अशी ही भूमी त्यांनी लुटली, तरी मी माझ्यात आणि त्यांच्यात म्हणजेच मानवा-मानवात भेद केला नाही. जगाने ज्यांना ठोकरून लावले, त्यांना जवळ केले, आश्रय दिला. माझा कोहिनूर हिरा पळविला आणि आपल्या राजमुकुटात जडविला (इंग्लंडचा राजमुकुट) पण आज? आज तोच राजमुकुट भारतापुढे झुकणार आहे.
मै वीरपुत्र मेरी जननी के
जती मे जौहर अपार
अकबर के पुत्रोंसे पूछो
क्या याद उन्हे चित्तौड दुर्ग में
जलनेवाली आग प्रखर
जब हाय सहस्रों माताएं
तिल तिल जलकर हो गई अमर
वह बुझनेवाली आग नही
रग रग मे उसे संजोये हूं
यदि कभी अचानक फूट पडे
विप्लव लेकर तो क्या विस्मय?-८-
आम्ही क्षमाशील आहोत, मानवतेचे पुजारी आहोत, पण ही क्षमाशीलता दुबळ्यांची नाही. रजपूत माता-भगिनींचे जोहार आम्ही विसरलो नाही, अकबराने भरविलेले कपटी मीनाबाजार आणि त्यात छद्मवेषधारी अकबरपुत्रांचे अनाचार, चितौडमधील कल्लेआम आणि अग्निकांडे ही सारी आमच्या स्मरणात आहेत. आक्रमकांच्या अन्याय-अत्याचाराचे स्मरण तरुण अटलजी हिंदूच्या सहिष्णू, क्षमाशील, रक्षणकर्ता, मानवतावादी आणि विश्‍वमांगल्यकारी स्वभावाच्या जोडीनेच करून देतात ते, हिंदूंना जगाने दुबळे आणि पुचाट समजू नये, याची जाणीव करून देण्यासाठीच होय. आणि याचा प्रत्यय त्यांनी एकदा देशिक संदर्भात, ‘अब हिंदू मार नही खायेगा’ या आपल्या संसदेतील भाषणातून आणि दुसर्‍यांदा वैश्‍विक संदर्भात पोखरण स्फोट करून घडविला.
ही अपराधभावना का?
म्हणजेच प्रारंभी उल्लेख केलेल्या दुसर्‍या तागड्यातील तरुण अटलजींच्या सोबत असलेल्या ‘मेरा परिचय’चे वजन पहिल्या तागड्यातील पंतप्रधान अटलजींकडे जाताच ते पारडे जड झाले. तसे ते आणखी दोन तीन प्रसंगी जड होऊ शकले असते. पण, त्या प्रत्येक वेळी त्यांच्यातील मुत्सद्याने त्यांच्या मुत्सद्देगिरीऐवजी त्यांच्या ठिकणी अपराधभावनेचा तर शिरकाव झालेला नाही, या शंकेला जागा करून दिली. बाबरी ढाचा ध्वस्तप्रकरणी काय किंवा सांप्रदायिकतेचा सवंग आरोप होत असताना काय, सार्‍या संसदेला त्यांनी ‘मेरा परिचय’ची चुणूक एकदा तरी दाखवावयास हवी होती. ती न दाखविल्यामुळे त्यांच्याबरोबरच हिंदू समाजातील बर्‍याच मोठ्या वर्गाला ती अपराधभावना टोचते आहे आणि छद्म धर्मनिरपेक्षतावाद्यांना हिंदूंचा तेजोभंग करण्यासाठी आयती संधी मिळते आहे. काबूलमध्ये जाऊन आम्ही कुणाच्या मशिदी तोडल्या नाहीत, तर आमचेच राममंदिर तोडून त्यावर उभा केलेला मशिदीसारखा ढाचा क्रुद्ध हिंदूंनी तोंडला. कोंडल्या भावनांचा तो विप्लव होता, ही वस्तुस्थिती प्रभावीपणे समोर यावयास हवी होती. विरोधी पक्षात असताना ‘आता हिंदू मार खाणार नाही’ असे ठणकावून सांगणारे अटलजी त्या वेळी ‘मेरा परिचय’च्या वजनासह संसदेत उभे होते आणि त्या वाक्याने संसद क्षणभर स्तब्ध आणि अंतर्मुख झाली. तर, ‘मेरा परिचय’विना उभ्या झालेल्या अटलजींवर आणि सर्वाधिक संख्या असलेल्या भाजपावर आरोपांच्या फैरी झडल्या. आजही अधूनमधून त्या झडतातच.
मै तो समाज की थाती हूं
म्हणून पुष्कळदा असे वाटते की, अंगलट येणार नाही अशा खुबीने हा ‘मेरा परिचय’ एकदा तरी पूर्ण देशालाच नव्हे, तर जगाला त्यांच्या वाणीतून त्यांना ऐकवावा. ‘मेरा परिचय’ ही अन्य कवितांसारखी, ‘अखेर काव्य ते काव्यच,’ या सदरात मोडणारी कविता नव्हे. पिढ्यांमागून पिढ्यांना भारावून, स्फुरण देऊन राष्ट्रकर्म करण्यास प्रवृत्त करणार्‍या ज्या मंतरलेल्या, अवतरित झालेल्या कविता असतात त्यातली ही एक कविता आहे. गेल्या अर्ध शतकातील तुष्टीकरणवादी राजकारणात सदैव धुत्कारला जाणारा, अवमानित होणारा हिंदू हा अल्पसंख्यक आणि त्यांचे पाठीराखे सेक्युलरवादी यांच्या प्रभावामुळे अपराधभावनेने जगतो. त्याला जणू कुणी त्राताच उरला नाही. प्रत्येक हिंदू हाच अशावेळी संपूर्ण समाजाचा त्राता होऊ शकतो. तरुण अटलजींनी हिंदूंचे हे शील ‘मेरा परिचय’च्या शेवटच्या कडव्यात सांगितले आहे-
मै एक बिन्दू परिपूर्ण सिन्धू है
यह मेरा हिन्दु समाज
मेरा इसका संबंध अमर
मै व्यक्ति और यह है समाज
इसमे मैने पाया तनमन
इसमे मैने पाया जीवन
मुझको केवल अधिकार यही
कर दूर सबकुछ इसको अर्पण
मै तो समाज की थाती हूं
मै तो समाज का हूं गुलाम
मै तो समष्टि के लिये व्यष्टि का
कर सकता बलिदान अभय
हिंदु तनमन हिंदु जीवन
रग रग हिंदु मेरा परिचय। -९-
अटलजींनी त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षात त्यांनीच त्यांच्या तरुणपणी मंथन करून काव्यबद्ध केलेल्या हिंदू अस्मितेच्या आणि परिचयाच्या अमृताचे सिंचन अपराधभावनेच्या पदोपदी आहारी जाणार्‍या हिंदू समाजावर करावे. हिंदू समाजानेही ‘मेरा परिचय’ काव्याच्या सुवर्णाने त्यांची अमृततुला करावी, हीच एक अल्पशी कामना!

Posted by : | on : 19 Aug 2018
Filed under : आसमंत, पुरवणी.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी (339 of 835 articles)

Hindus Fleeing To India
राष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन | अवामी लीग आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी यांच्या सुंदोपसुंदीत असे दिसते की, बहुसंख्यकांत सहजीवन शक्य ...

×