ads
ads
सजा पक्की : कशी? ते लष्कर ठरवेल!

सजा पक्की : कशी? ते लष्कर ठरवेल!

•पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पांढरकवड्यात पाकला इशारा •कोलामी, बंजारा,…

पाकिस्तानातील आयातीत वस्तूंवर २०० टक्के कर

पाकिस्तानातील आयातीत वस्तूंवर २०० टक्के कर

नवी दिल्ली, १६ फेब्रुवारी – पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती…

भारताला स्वरक्षणाचा अधिकार

भारताला स्वरक्षणाचा अधिकार

•अमेरिकेच्या एनएसएचा अजित डोवाल यांना फोन, नवी दिल्ली/वॉशिंग्टन, १६…

भारताने डगमगू नये, ठोस कारवाई करावी

भारताने डगमगू नये, ठोस कारवाई करावी

•अमेरिकेतील ७० खासदारांची भूमिका, वॉशिंग्टन, १६ फेब्रुवारी – पुलवामातील…

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी

•पाकिस्तानने व्यक्त केली वचनबद्धता •कुलभूषण जाधव प्रकरण, लाहोर, १६…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:27
अयनांश:
Home » आसमंत, डॉ.वाय.मोहितकुमार राव, पुरवणी, स्तंभलेखक » मोदीच पंतप्रधान व्हावेत ही तर लोकेच्छा!

मोदीच पंतप्रधान व्हावेत ही तर लोकेच्छा!

॥ अभिप्राय : डॉ.वाय.मोहितकुमार राव |

मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयांचा भविष्यकाळात देशाला भरपूर फायदा होईल आणि देशाची अर्थव्यवस्था मजबूत होईल. देशात राबविण्यात आलेले स्वच्छता अभियान, उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री आवास योजना आदी सगळ्या योजनांचा जनतेला फायदाच झालेला आहे. त्याचे परिणाम निवडणुकीत दिसून येतील आणि पुन्हा एकदा मोदीच पंतप्रधान होतील, असे मानणाराही मोठी वर्ग आहे.

Narendra Modi23

Narendra Modi23

२०१९ सालच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी म्हणजेच लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झालेलीदिसते आहे. ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी दोन व्यक्तिमत्त्वांमध्ये, कदाचित मोदी विरुद्ध राहुल, ममता आणि मायावती अशीही होण्याची शक्यता आहे. तसे तर सगळेच विरोधी पक्ष एकत्र येऊन मोदींविरुद्ध निवडणूक लढत आहेत. काहीही करून नरेंद्र मोदींना सत्तेत येऊ द्यायचे नाही, असा चंग बांधलेले विरोधक प्रत्यक्ष निवडणुकीत खरोखरीच एकत्र येतात का, हे लवकरच दिसून येईल. काही महिन्यांपूर्वी कॉंग्रेसने घोषणा केली होती की मोदींच्या विरोधात राहुल गांधी हेच पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील. पण, नंतर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांचीही नावे पुढे आली आहेत. इकडे महाराष्ट्रातून शरद पवार हेही सुप्त इच्छा ठेवून आहेत. पंतप्रधान होण्याची अनेकांना इच्छा आहे. त्यामुळे विरोधी ऐक्य टिकेल का, हा प्रश्‍नच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आजही कायम आहे. पंतप्रधानपदासाठी सर्वाधिक पसंती त्यांच्याच नावाला असताना विरोधी पक्षांचे लोक दिवसा स्वप्ने का पाहात आहेत, हे त्यांचे त्यांनाच ठाऊक. सगळ्या विरोधी पक्षांचे नेते जेव्हा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी एकत्र जमले होते, तेव्हा पंतप्रधानपदाचा उमेदवार हा निवडणुका जिंकल्यानंतर ठरवायचा असे ठरले होते. पण, प्रत्यक्षात निवडणुकीच्या फार आधीच कॉंग्रेसने राहुल गांधी यांचे नाव पुढे केल्याने आधी झालेली सहमती संपुष्टात आल्याचे चित्र होते. पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी राहुल गांधी यांच्या नावाला विरोधी पक्षांकडून फारसे समर्थन मिळताना दिसले नाही म्हणून कॉंग्रेसनेही दोन पावलं मागे जाणं पसंत केलं. आम्हाला पंतप्रधानपदासाठी कोणताही चेहरा चालेल, तो फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा समर्थक नसावा, अशी अट कॉंग्रेसने घातली. याचा अर्थ राहुल गांधींना समर्थन मिळेल याची खात्री कॉंग्रेसला राहिलेली नाही. राहुल गांधी यांना भारताच्या राजकारणातला फारसा अनुभवच नाही. पण, आता ते भारतभर फिरून अनुभव घेत आहेत. दोष यांचा नाही. त्यांना बरीच वर्षे राजकारणापासून दूर ठेवणार्‍यांचा आणि आणि चुकीचे सल्ले देणार्‍यांचा आहे. राहुल गांधी यांना जर भारताच्या राजकारणात यशस्वी व्हायचे असेल तर पंतप्रधान मोदी यांनी जसे सहकारी आजूबाजूला ठेवले आहेत, तसे त्यांना ठेवावे लागतील. शिवाय, कॉंग्रेसमध्ये त्यांच्यापेक्षा कैक पटींनी अनुभवी असलेले आणि जुनेजाणते नेते तसेच अन्य विरोधी पक्षांमधील नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काम करतील याची कुठलीही शक्यता दिसत नाही. आणखी एक बाब, परस्परविरोधी विचार असलेले विरोधकही केवळ मोदीविरोध या एकाच मुद्यावर एकत्र येत आहेत. त्यांच्या एकत्र येण्याला कुठलाही नैतिक आधार नाही. असा आधार नसलेले ऐक्य फार काळ टिकत नसते, हा अनुभव आहे. त्यामुळे ऐक्य झालेही तरी ते अभद्र सिद्ध होईल आणि तुटेल व जनतेने यांना निवडून दिले तर जनतेचाच भ्रमनिरास होईल, यात शंका नाही. लोकसभेत तेलुगू देशम पक्षाने मोदी सरकारविरुद्ध अविश्‍वास प्रस्ताव आणला होता. त्यावर बोलताना राहुल गांधी दोन पावलं पुढे सरकलेले दिसले होते. पण, भाषणानंतर त्यांनी जे काही केले, त्यामुळे ते तीन पावलं मागे गेलेले दिसले. राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या गळ्यात जबरदस्तीने पडणे ही कृती भाजपाने गैर ठरविली. भाजपाने राहुल गांधींवर जोरदार टीकाही केली. विरोधी पक्ष म्हणून भाजपाची टीका स्वाभाविकही म्हणता येईल. पण, राहुल गांधींच्या कृतीवर दस्तुरखुद्द कॉंग्रेस पक्षातूनही नापसंती व्यक्त करण्यात आली. राहुल गांधी यांचा त्यादिवशीचा व्यवहार राजशिष्टाचाराला धरून नसल्याने कॉंग्रेस पक्षातूनच त्यांच्याविरुद्ध आवाज उठला होता. ही कॉंग्रेससाठी आणि विरोधी ऐक्यासाठीही चिंतेची बाब म्हटली पाहिजे. गतकाळातला घटनाक्रमही लक्षात घेतला पाहिजे. लोकसभेत तुलुगू देशमने आणलेला अविश्‍वास प्रस्ताव १२५ विरुद्ध ३२५ असा बहुमताने फेटाळला गेला. अविश्‍वास प्रस्ताव फेटाळला गेला होता, त्याच्या दुसर्‍याच दिवशी ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथे जाहीर केले होते की येत्या जानेवारी महिन्यात आपण कोलकाता येथे पन्नास लाख लोकांच्या उपस्थितीत राजकीय मेळावा भरवू आणि त्यासाठी सोनिया गांधींसह सगळ्या प्रमुख विरोधी नेत्यांना बोलावू. ममता बॅनर्जी यांचा इरादा कॉंग्रेसच्या लक्षात आला. ममतांना पंतप्रधान व्हायचे आहे ही बाब लक्षात येताच कॉंग्रेस पक्ष सावध झाला. लागलीच नवगठित कॉंग्रेस कार्यसमितीची बैठक बोलावण्यात आली आणि त्यात असे ठरवण्यात आले की पंतप्रधानपदाचे उमेदवार राहुल गांधी हेच राहतील. मोदींना हरवायचे असेल तर सगळ्यांनी आपापली महत्त्वाकांक्षा नियंत्रणात ठेवून राहुल गांधी यांचे हात मजबूत करायला हवे, असा सल्लाही इतर विरोधी नेत्यांना कॉंग्रेसकडून देण्यात आला. विरोधी पक्षांनी कितीही ऐक्य दाखविले, काहीही झाले तरी लोकसभेच्या निवडणुकीत नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी असा मुकाबला पाहायला मिळणारच! असा मुकाबला झालाच तर त्यात नरेंद्र मोदी बाजी मारतील असे राजकीय जाणकारांचे मत आहे आणि तसे चित्रही दिसत आहे. कॉंग्रेसला हेही माहिती आहे की ममता बॅनर्जी राहुल गांधींना मानत नाहीत, त्यांचे नेतृत्व स्वीकारण्याचा तर प्रश्‍नच नाही. त्यामुळे ममता बॅनर्जी यांना इशारा देण्याचाही प्रयत्न कॉंग्रेसने कार्यसमितीच्या बैठकीतून केला होता. आपल्याच नेतृत्वात सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्र मोट बांधावी असा कॉंग्रेसचा प्रयत्न पंतप्रधानपद स्वत:कडे ठेवण्यासाठीच आहे आणि तो असलाही पाहिजे. कॉंग्रेस हा देशातील सगळ्यात जुना राजकीय पक्ष आहे. त्या पक्षाला एक दीर्घ परंपरा आहे. त्यामुळे निवडणुकीत यश मिळालेच तर सरकारचे नेतृत्व हे कॉंग्रेसनेच करायला हवे, असे त्या पक्षाच्या नेत्यांना वाटण्यात गैर काहीच नाही. बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनीही पंतप्रधानपदासाठी आपली दावेदारी सादर केलेलीच आहे. तसे पाहिले तर त्यांची अस्तित्वासाठीची लढाई आहे. पण, पंतप्रधानपद भूषविण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा कुणापासूनही लपून राहिलेली नाही. २०१२ साली मायावती सत्तेतून बाहेर झाल्या, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला एकही जागा मिळाली नाही, २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत केवळ १९ जागाच मिळाल्या. त्यामुळे मायावतींच्या पक्षाची राष्ट्रीय मान्यता धोक्यात आली होती. त्यांच्या पक्षात मोठ्या प्रमाणात खळबळ माजली होती. पक्षातून बाहेर पडणार्‍यांची संख्या वाढली होती. पण, धडपड करीत त्यांनी पक्ष जास्त फुटू दिला नाही. उत्तरप्रदेशात झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी समाजवादी पार्टीला पाठिंबा दिला आणि भविष्यात युती करण्याचे संकेत देत पक्षाला लागलेली ओहोटी थांबवली. आता त्या अस्तित्वाची लढाई लढत आहेत. या लढाईत त्यांनी पंतप्रधानपदासाठी स्वत:ला सज्ज केल्याने कॉंग्रेसपुढची डोकेदुखी वाढली आहे. कर्नाटकात कॉंग्रेसने जेडीएसशी युती केली आहे. पण अल्पावधीतच मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी कंटाळले होते. कॉंग्रेससोबत आघाडी चालवणे म्हणजे विष पचवण्यासारखे असल्याची त्यांची प्रतिक़्रिया बोलकी होती. पण, आता त्यांचेकॉंग्रेसशी पटते आहे, असे दिसते आहे. प्रत्यक्षात काय चित्र आहे हे कुमारस्वामींनाच माहिती असेल. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीतही जेडीएस-कॉंग्रेस आघाडीनेच बाजी मारली, ही बाब लक्षात घ्यावी लागेल. पण, हे चित्र येणार्‍या लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळेल काय, हे आताच सांगता यायचे नाही. या आणि पुढच्या महिन्यात मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. तेलंगणा आणि मिझोरममध्येही मतदान होत आहे. डिसेंबर महिन्यात निकाल हाती येतील. एकूणच सगळी परिस्थिती लक्षात घेता पुढली लोकसभा निवडणूक कॉंग्रेसला आणि विरोधी पक्षांना कठीणच जाणार, हे निश्‍चित! राजकीय जाणकार म्हणतात की, २०१९ च्या निवडणुकीत भाजपाला स्वबळावरचे बहुमत मिळणार नाही. भाजपाची गाडी २१०-२२० वर अडेल. पण, मला असे वाटते की, अजूनही लोकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आदरभाव आहे. मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयांचा भविष्यकाळात देशाला भरपूर फायदा होईल आणि देशाची अर्थव्यवस्था मजबूत होईल. देशात राबविण्यात आलेले स्वच्छता अभियान, उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री आवास योजना आदी सगळ्या योजनांचा जनतेला फायदाच झालेला आहे. त्याचे परिणाम निवडणुकीत दिसून येतील आणि पुन्हा एकदा मोदीच पंतप्रधान होतील, असे मानणाराही मोठी वर्ग आहे. •••

Posted by : | on : 25 Nov 2018
Filed under : आसमंत, डॉ.वाय.मोहितकुमार राव, पुरवणी, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, डॉ.वाय.मोहितकुमार राव, पुरवणी, स्तंभलेखक (235 of 1220 articles)

Rupay Card
अर्थपूर्ण : यमाजी मालकर | जनहिताच्या एखाद्या योजनेमागे सरकार ठामपणे उभे राहिले तर काय होऊ शकते, याची चुणूक रुपे कार्डच्या ...

×