ads
ads
आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

•अभिनंदन प्रकरणी पाकिस्तानला इशाराच दिला होता •पंतप्रधान मोदी यांचा…

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

•११५ जागांसाठी उद्या मतदान, नवी दिल्ली, २१ एप्रिल –…

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पिंपरी चिंचवड, २१ एप्रिल – पवार कुटुंबाने शिक्षणाच्या माध्यमातून…

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

•४५० जखमी, मृतांमध्ये ३५ विदेशी •तीन चर्च पूर्ण उद्ध्वस्त,…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी » मोदी सरकारला श्रेय का नको?

मोदी सरकारला श्रेय का नको?

॥ प्रासंगिक : विजय चौथाईवाले |

भारत हा परंपरेने शांतताप्रिय देश आहे. पाकिस्तानसह कुठल्याही इतर देशांशी मैत्रीपूर्ण आणि शांततेच्या संबंधांविरुद्ध एकही भारतीय बोलणार नाही. असे असले, तरी आतापर्यंत आमची ही वृत्ती आमचा कमकुवतपणा समजण्यात आला. सर्जिकल स्ट्राईक आणि बालाकोटनंतर आता आम्ही सामर्थ्याच्या बळावर, नाइलाज म्हणून नाही, शांततेच्या गोष्टी करू शकतो. हा खरेतर भारतीय धोरणात अगदी टोकाचा बदल आहे. यासाठी मोदी सरकारला निश्‍चितच श्रेय दिले पाहिजे. संकटाच्या क्षणी कुणाजवळ किती शक्ती आहे, हे महत्त्वाचे नसते. ती वापरण्याची क्षमताच उपयोगाची असते. शांततादेखील शूर आणि सामर्थ्यवानांचाच विशेष हक्क असतो; कमकुवत आणि पराभूत मानसिकतेवाल्यांचा विलास नसतो, हेच खरे!

Modi Sitharam Nehru Manmohan Antony

Modi Sitharam Nehru Manmohan Antony

राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षणसिद्धता (किंवा त्याचा अभाव) यांचा विचार केला, तर भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि १३ वे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यात बरेच साम्य दिसून येते. शांतता आणि स्थिरतेच्या संदर्भात नेहरूंच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकारच्या काही रोमँटिक कल्पना वस्तुस्थितीहून फार दूर होत्या. अगदी सुरवातीला म्हणजे १९५० साली तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी चीनच्या संदर्भात नेहरूंना लिहिले होते- चिनी महत्त्वाकांक्षेचा परीघ केवळ आपल्या बाजूच्या हिमालयाच्या उतार-रांगांपर्यंतच मर्यादित नसून त्यात आसाममधील काही महत्त्वाच्या भागांचाही समावेश आहे. तरीही, चीन भारतावर आक्रमण करणारच नाही. एवढेच नाही तर ते त्याच्या मनातही नाही, यावर नेहरूंचा कायम ठाम विश्‍वास राहिला. १९५९ साली नेहरूंनी देशातील मुख्यमंत्र्यांना लिहिले की, आपल्या ईशान्य सीमेवर कुठल्याही आक्रमणाची किंचितही शक्यता नाही. इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी दस्तावेजांवरून स्पष्टपणे नोंदविले आहे की, (जवाहरलाल नेहरू अ‍ॅण्ड चायना : ए स्टडी इन फेल्युअर? २०११, हॉर्वर्ड-येनचिंग इन्स्टिट्यूट) १९५० ते १९६२ या काळात चीनशी व्यवहार करताना नेहरूंनी चुकीच्या समीकरणाची व चुकांची मालिकाच केली.
पहिले म्हणजे, त्यांना चुकीचा व मूर्खपणाचा सल्ला देणार्‍या किंवा दिलेली जबाबदारी निष्काळजीपणे पार पाडणार्‍या किंवा दूरदृष्टीचा अभाव असणार्‍या अधिकार्‍यांवर त्यांचा असलेला अवाजवी विश्‍वास. यात त्यांचे गुप्तचर विभाग प्रमुख बी. एन. मलिक आणि संरक्षणमंत्री कृष्ण मेनन यांचाही समावेश होतो. दुसरे चुकलेले समीकरण म्हणजे, चिनी कम्युनिझमच्या आड असलेल्या राष्ट्रवादी वृत्तीला गांभीर्याने न घेणे आणि तिसरे म्हणजे भारतीय लष्कराचे आधुनिकीकरण न करण्याच्या कृष्ण मेनन यांच्या धोरणाची री ओढून चुकत गेलेली रणनीती.
आता १९५० ते १९६२ च्या काळाऐवजी २००४ ते २०१४ चा काळ घ्या. नेहरूंऐवजी डॉ. मनमोहनसिंग आणि कृष्ण मेनन यांच्याऐवजी ए. के. अ‍ॅण्टोनी. वागण्याची जवळपास समान पद्धत तुमच्या लक्षात येईल. पाकिस्तानी लष्कर, आयएसआय आणि दहशतवादी यांच्या संगनमताने झालेला २६/११ चा मुंबईवरील हल्ला, भारतीय भूमीवरील आक्रमणाहून कमी नव्हता. २६/११ च्या मुंबईवरील हल्ल्यानंतर आपल्या सुरक्षा दलांनी आणि विशेषत: आपल्या हवाई दलाने तत्कालीन सरकारला, आम्ही पाकिस्तानच्या भूमीत घुसून सर्जिकल स्ट्राईक करण्यास पुरते सक्षम आहोत, असा स्पष्ट पर्याय दिला होता. परंतु, तो पर्याय डॉ. मनमोहन सिंग यांनी फेटाळून लावला. याचे आता पुरावेही समोर आले आहेत. ‘‘सर्जिकल स्ट्राईकची एक संधी होती जी आम्ही गमविली,’’ असे निवृत्त एअर चीफ मार्शल फली होमी मेजर यांनी म्हटले आहे. हे त्या वेळी वायुदल प्रमुख होते. याच्या उलट, भारतीय भूमीत झालेल्या या अत्यंत निर्घृण हल्ल्याच्या आठ महिन्यांच्या आत डॉ. मनमोहन सिंग यांनी शर्म अल-शेख येथे आणखी एक घोडचूक केली. पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान युसुफ गिलानी यांच्यासोबत एक संयुक्त निवेदन जाहीर करून, सिंग यांनी पाकिस्तानशी चर्चा आणि दहशतवादी कृत्ये सोबत चालू शकतात, हे मान्य केले. या अधिकृत निवेदनात म्हटले होते- ‘‘दोन्ही पंतप्रधानांनी मान्य केले आहे की, पुढे जाण्याचा बातचित हाच एकमेव मार्ग आहे… दहशतवादावरील कारवाईला संयुक्त चर्चेच्या प्रक्रियेशी जोडायला नको आणि बातचितीसाठी दारे बंद करायला नको. पंतप्रधान म्हणाले होते- बलुचिस्तानसह सर्व प्रलंबित मुद्यांवर भारत पाकिस्तानशी चर्चा करण्यास तयार आहे,’’
आता एवढ्यातच पंतप्रधान मोदींनी, भारताने ‘उपग्रहविरोधी मिसाईल परीक्षण’ यशस्वी रीत्या केल्याचे घोषित करताच, अगदी हीच विचार-प्रतिक्रिया आढळून आली. काँग्रेसच्या दाव्यांना फोल ठरवीत, तत्कालीन डीआरडीओ प्रमुख डॉ. सारस्वत यांनी स्पष्ट प्रतिपादन केले की, भारताने ही क्षमता २०१२ पासूनच विकसित केली असली, तरी संपुआ सरकारने त्याचे परीक्षण करण्याची हिंमत दाखविली नाही.
दुर्दैवाने, डॉ. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात सरदार पटेलांच्या तोडीचा कुणीही सहकारी नव्हता. उलट, डॉ. सिंग यांच्या कार्यकाळातील गृहमंत्री पी. चिदम्बरम् आणि सुशीलकुमार शिंदे हे, जिहादी तत्त्वज्ञानाने प्रभावित सीमापार दहशतवादाच्या वास्तव धोक्याला सोयिस्करपणे दृष्टिआड करून, ‘हिंदू दहशतवाद’ आणि ‘भगवा दहशतवाद’सारख्या भ्रामक संकल्पना जनमानसात रुजविण्यात गुंग होते.
संरक्षणसिद्धतेबाबत बोलायचे झाले, तर याकडे दुर्लक्ष करण्याची जी वृत्ती नेहरू-कृष्ण मेनन या जोडगोळीने दाखविली, तीच वृत्ती मनमोहन-अ‍ॅण्टोनी या जोडीनेही दाखविली. डॉ. मनमोहन सिंग यांचा दहा वर्षांचा कार्यकाळ अकार्यक्षमता आणि अनिर्णयक्षमतेने गाजला. लष्कराच्या बुलेटप्रूफ जॅकेट्ससारख्या मूलभूत गरजाही पूर्ण न करणे, अत्याधुनिक लढाऊ विमानांची अनेक वर्षांपासूनची हवाई दलाची मागणी पूर्ण न करणे, तसेच अगस्तावेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर्स खरेदीत भ्रष्टाचार करणे, यावरून हे आता सिद्ध होत आहे. तत्कालीन संरक्षणमंत्री ए. के. अ‍ॅण्टोनी स्वत: खूप स्वच्छ राहिले असले, तरी त्यांनादेखील निर्णय-लकवा मारला होता. त्यामुळे संरक्षण साहित्य खरेदीबाबतचे अत्यंत आवश्यक असे निर्णय प्रलंबित ठेवण्यात आले. अगदी राफेल करारदेखील ते १० वर्षांत पूर्णत्वास नेऊ शकले नाहीत. हे तर एक उदाहरण झाले. संरक्षण दलाल ख्रिश्‍चियन मिशेलने नुकतेच उघड केले की, युरोफायटर विमान कंपनीच्या हितार्थ एक अत्यंत सामर्थ्यवान लॉबी संरक्षण खात्यावर दबाब आणत होती आणि त्यामुळेच मनमोहनसिंग सरकारला राफेल करार पूर्ण करता आला नाही.
गेल्या पाच वर्षांत मात्र, नरेंद्र मोदी सरकारने आमच्या संरक्षणसिद्धतेमधील त्रुटी आणि कमतरता यशस्वीपणे भरून काढल्या आहेत. जयदीप मजुमदार (स्वराजमॅगडॉटकॉम, २८ जानेवारी २०१९) यांनी तपशीलवार मांडलेले दस्तावेज सिद्ध करतात की, भारतीय सशस्त्र दले आता अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सिद्ध झाले आहेत. त्यातील काही शस्त्रास्त्रे तर विद्यमान सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ धोरणानुसार भारतात तयार झाली आहेत किंवा त्यांची जुळणी तरी झाली आहे.
या संदर्भात उरीनंतर झालेला सर्जिकल स्ट्राईक आणि पुलवामा हल्ल्यानंतर झालेली बालाकोटची हवाई कारवाई यांचे मूल्यमापन करणे गरजेचे आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे पावित्र्य कायम ठेवणे, हा आमच्या संरक्षण धोरणाचा एक (अलिखित असला तरी) अत्यंत आवश्यक असा भाग होता. या धोरणाला समोरून प्रतिसाद नव्हता. शस्त्रसज्ज दहशतवादी आणि अगदी पाक लष्कराकडूनही सातत्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे धडधडीत उल्लंघन होत होते. काही बाबतीत तर, स्थानिक जिहादींना भरती करण्यासाठी आणि आमच्या नागरी व लष्करी ठिकाणांवर प्राणघातक हल्ले करण्यासाठी, अनेक निरपराध लोकांना ठार मारण्यासाठीही हे उल्लंघन झाले आहे. परंतु, आम्ही मात्र आमच्या ‘रणनीतिक संयमा’च्या धोरणालाच चिटकून राहिलो.
आमच्या लष्कराची सिद्धता असतानादेखील, आमच्या राजकीय नेतृत्वाने मुळावर घाव घालण्याचे धाडस दाखविले नाही. उलट, आम्ही आमच्या या कमकुवतपणाला सद्गुण म्हणून प्रचारित केले. नरेंद्र मोदी सरकारने एकदा नाही तर दोनदा, दाखवून दिले आहे की, भारत केवळ नियंत्रण रेषाच ओलांडण्यास समर्थ नाही, तर पाकिस्तानचीही सीमा ओलांडून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यास समर्थ आहे.
इथे हे लक्षात ठेवावे की, सर्जिकल स्ट्राईक आणि बालाकोट हवाई कारवाई या दोन्हीही, दहशतवाद्यांचे मूळ अड्डे नष्ट करण्याची खबरदारीची कारवाई होती आणि तीही कुठल्याही नागरिकाचे नुकसान न होऊ देता. भारत हा परंपरेने शांतताप्रिय देश आहे. आमच्या संस्कृतीतच शांततेचे आणि विश्‍वबंधुत्वाचे मूल्य खोलवर रुजले आहे. पाकिस्तानसह कुठल्याही इतर देशांशी मैत्रीपूर्ण आणि शांततेच्या संबंधांविरुद्ध एकही भारतीय बोलणार नाही. असे असले, तरी आतापर्यंत आमची ही वृत्ती आमचा कमकुवतपणा समजण्यात आला. सर्जिकल स्ट्राईक आणि बालाकोटनंतर आता आम्ही सामर्थ्याच्या बळावर, नाइलाज म्हणून नाही, शांततेच्या गोष्टी करू शकतो. हा खरेतर भारतीय धोरणात अगदी टोकाचा बदल आहे. यासाठी मोदी सरकारला निश्‍चितच श्रेय दिले पाहिजे. संकटाच्या क्षणी कुणाजवळ किती शक्ती आहे, हे महत्त्वाचे नसते. ती वापरण्याची क्षमताच शेवटी उपयोगाची असते. त्याचप्रमाणे, शांततादेखील शूर आणि सामर्थ्यवानांचाच विशेष हक्क असतो; कमकुवत आणि पराभूत मानसिकतेवाल्यांचा विलास नसतो, हेच खरे!
(लेखक भाजपाच्या परराष्ट्र व्यवहार प्रकोष्ठाचे प्रभारी आहेत)

Posted by : | on : 14 Apr 2019
Filed under : आसमंत, पुरवणी.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी (10 of 926 articles)

Modi Campaign
जागता पहारा : भाऊ तोरसेकर | उलट मोदी व भाजपा यांनी एकमुखी नेतृत्व, एकदिलाने लढाई अशी प्रतिमा मोदींनी उभी केलेली ...

×