ads
ads
आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

•न्यायव्यवस्था बदनाम करण्याचा हा सुनियोजित कट, •सर्वोच्च न्यायालयाचा संताप,…

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

•पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्ला, दरभंगा, २५ एप्रिल – आतापर्यंत पाकिस्तानची…

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मुंबई, २४ एप्रिल – राग, नाराजी असे माणसाच्या स्वभावाचे…

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

•अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण, वॉशिंग्टन, २४ एप्रिल –…

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

•मृतांची संख्या ३२१, भारतीयांचा आकडाही वाढला, ४० जणांना अटक,…

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

•चीनने व्यक्त केली भीती, बीजिंग, २३ एप्रिल – इराणकडून…

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

•राहुल गांधी यांनी स्वीकारला •विरोधी पक्षनेतेपदही सोडले •काँग्रेसला आणखी…

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

•खोट्या जाहिरातींचे प्रकरण, मुंबई, २२ एप्रिल – शेतकर्‍यांना पाच-दहा…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 18:44
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी » ‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

‘युगद्रष्टा’: नानाजी देशमुख!

॥ प्रासंगिक : विनय बन्सल |

नानाजी देशमुख यांच्यासारख्या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाला भारत सरकारने ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन पुरस्कृत केले, हे अतिशय उचित आहे. भारत सरकारच्या माध्यमातून संपूर्ण भारतवासींनी नानाजींच्या अफाट कर्तृत्वाला दिलेली ही एक कृतज्ञ पावतीच आहे, असे मी मानतो. मुळात नानाजी असे ‘युगद्रष्टा’ होते, ज्यांना स्वत: कुठल्याही राजकीय आकांक्षेचे प्रलोभन नव्हते. उलट, जनसेवा हीच त्यांची मूळ प्रकृती होती. ते ‘भारतरत्न’ पुरस्कारासाठी खरोखरच ‘भारतरत्नच’ होते!

Nanaji Deshmukh

Nanaji Deshmukh

जगाच्या इतिहासाकडे बघितले तर असे लक्षात येईल की, नानाजींचे प्रयोग जितके सफल राहिलेत तितके कुणा अर्थशास्त्रज्ञाचेही राहिले नसतील. नानाजींच्या नेतृत्वात दीनदयाल शोध संस्थानने एक असे मॉडेल तयार केले की, ज्याच्या परिणामस्वरूप चित्रकूटच्या आसपास ८० गावांमध्ये आज शून्य बेरोजगारी, शून्य गरिबी, शून्य कुपोषण, शून्य खटलेबाजी आहे. ही सर्व गावे हिरवीगार झाली आहेत. ही पृष्ठभूमी लक्षात घेता त्यांना मरणोत्तर भारतरत्न देऊन भारत सरकारने गौरविले, हे योग्यच झाले.
नानाजींचा जन्म महाराष्ट्राच्या हिंगोली जिल्ह्याच्या कडोली नावाच्या एका लहानशा खेड्यात झाला. घरी त्यांना नाना म्हणत असत. म्हणून त्यांचे नाव नानाजी देशमुख पडले. लहानपणीच त्यांच्या आईवडिलांचे निधन झाल्यामुळे, त्यांच्या मामांनी त्यांचे पालनपोषण केले. मॅट्रिकचे शिक्षण झाल्यावर पुढील शिक्षणासाठी, संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांनी त्यांना पिलानीला जाण्याचा सल्ला दिला. त्यासाठी काही आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव ठेवला; परंतु नानाजींनी आर्थिक मदत घेण्यास नकार दिला. म्हणून दीड वर्ष पडेल ते काम करून त्यांनी पैसे गोळा केले आणि १९३७ साली पिलानीला गेले. तिथे अभ्यासासोबत संघकार्य सुरूच ठेवले. १९४० साली त्यांनी नागपूरहून संघ शिक्षा वर्गाचे प्रथम वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केले. त्याच वर्षी डॉ. हेडगेवार यांचे निधन झाले. नंतर बाबासाहेब आपटे यांच्या मार्गदर्शनात नानाजी आग्रा येथे संघकार्य बघू लागले. नानाजींचे संघटनकौशल्य वाखाणण्यासारखे होते. गोरखपूर भागात केवळ तीन वर्षांत त्यांनी २०० संघ शाखांचे जाळे उभे केले होते.
राजकीय जीवन
नानाजींच्या पायाभरणीमुळे उत्तरप्रदेशात जनसंघाचे काम सुरू होऊ शकले. १९४७ पर्यंत नानाजींच्या अथक प्रयत्नांमुळे उत्तरप्रदेशाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये जनसंघाच्या शाखा स्थापन झाल्या होत्या. नानाजींच्या विवेकपूर्ण कार्यामुळेच, जनसंघ उत्तरप्रदेशात एक प्रमुख राजकीय शक्ती म्हणून पुढे आला.
नानाजींचे, चौधरी चरणसिंह आणि डॉ. राममनोहर लोहिया यांच्याशी अतिशय चांगले संबंध होते. म्हणूनच जनसंघ आणि समाजवादी पक्षाच्या युतीत नानाजींची अत्यंत महत्त्वाची भूमिका होती. विनोबा भावे यांच्या भूदान आंदोलनातही नानाजी सक्रिय होते. दोन महिने ते विनोबाजींसोबत प्रवासातही होते.
जेपी आंदोलनात ज्या वेळी जयप्रकाश नारायण यांच्यावर पोलिसांनी लाठीमार केला, त्या वेळी नानाजींनीच जयप्रकाशजींना तिथून सुरक्षित बाहेर काढले. या धडपडीत नानाजींना चांगलाच मार बसला आणि त्यांच्या एका हाताला फ्रॅक्चरही झाले होते. जयप्रकाश नारायण यांच्या आवाहनावर त्यांनी संपूर्ण क्रांतीला पूर्ण समर्थन दिले होते. एवढेच नाही, तर जनता पार्टीच्या संस्थापकांपैकी नानाजी प्रमुख होते. आणिबाणी उठल्यानंतर झालेल्या निवडणुकीत नानाजी बलरामपूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यांना मोरारजी देसाई यांच्या मंत्रिमंडळात उद्योग मंत्री होण्याचा रीतसर प्रस्तावही देण्यात आला होता. परंतु, नानाजींनी तो प्रस्ताव नाकारला आणि जनता पार्टीच्या संघटनात्मक कामातच राहण्याचा निर्णय घेतला.
१९८० साली वयाची ६० वर्षे पूर्ण झाली म्हणून त्यांनी सक्रिय राजकारणातून संन्यास घेऊन, राजकीय क्षेत्रात एक आदर्श प्रस्थापित केला. नंतर त्यांनी चित्रकूट येथे चित्रकूट विद्यापीठाची स्थापना केली. हे भारतातील पहिले ग्रामीण विद्यापीठ आहे. १९९९ साली अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने त्यांना राज्यसभेवर नियुक्त केले. भारत सरकारने त्यांना शिक्षण, आरोग्य तसेच ग्रामीण स्वावलंबनाच्या क्षेत्रातील त्यांच्या अनुकरणीय योगदानासाठी ‘पद्मविभूषण’ पुरस्कारही दिला होता.
पंडित दीनदयाल उपाध्याय यांची हत्या, नानाजींसाठी कधीही भरून न येणारी हानी होती. त्यांनी नवी दिल्ली येथे स्वत:च्या हिमतीवर दीनदयाल शोध संस्थानची स्थापना केली. या संस्थेतर्फे त्यांनी ‘मंथन’ नावाचे एक नियतकालिकही सुरू केले. नानाजींनी उत्तरप्रदेशातील सर्वात मागासलेल्या जिल्ह्यांत, गावांमध्ये सामाजिक कार्य केले. हेच कार्य महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातही त्यांनी सुरू केले. त्यांच्या या योजनेचा उद्देश होता- हर हाथ को काम और हर खेत को पानी. (प्रत्येक हाताला काम आणि प्रत्येक शेतीला पाणी)
१९८९ साली ते चित्रकूटला आले आणि जीवनाच्या शेवटपर्यंत तिथेच राहिले. ते नेहमी म्हणायचे की, त्यांना राजा रामाऐवजी वनवासी राम अधिक प्रिय आहे. आपल्या वनवासाच्या काळात रामाने दलित लोकांच्या उत्थानाचे कार्य, चित्रकूट येथे राहूनच गेले होते, म्हणून त्यापासून प्रेरणा घेत, नानाजींनी चित्रकूटलाच आपल्या सामाजिक कार्यांचे केंद्र केले. त्यांचे निधनही चित्रकूट येथेच २७ जानेवारी २०१० रोजी झाले.
‘युगद्रष्टा’ नानाजी
आम्ही स्वत:साठी नाही, तर आपल्यांसाठी आहोत. आपले कोण? तर जे शतकानुशतके पीडित व उपेक्षित आहेत ते. ‘युगद्रष्टा’ नानाजींची ही मनोभूमिका होती. नानाजी प्रयोगशील होते. त्यांच्या प्रयोगशील रचनात्मक कार्याचे साकार रूप म्हणजे सरस्वती शिशू मंदिर. तसे तर नानाजी मानवी गुणांचे भांडार होते. परंतु, मला मुख्यत: त्यांचे काही गुण आकर्षित करतात :
१. त्यांच्यात खोलवर दडलेली रचनात्मकता. २. इंजिनीअरिंग दृष्टिकोन.
३. सखोल राजकीय जाण. ४. एखाद्या अर्थशास्त्रज्ञासारखे अर्थशास्त्री. ५. देशातील लोकांप्रती मनापासून आपलेपणा.
नानाजींना वाटायचे की, भारताच्या मागासलेपणाचे कारण, मुख्यत: तांत्रिक ज्ञान तसेच अर्थशास्त्राच्या ज्ञानाचा अभाव. यासोबतच राजकीय लोकांचा स्वार्थी दृष्टिकोनही याला कारणीभूत आहे. आमचे एकतृतीयांश देशवासी अत्यंत गरिबीत खितपत आहेत. ते आपल्या मूलभूत अधिकारांपासूनही वंचित आहेत. दुसरीकडे, आमचे राजकीय नेते अधिकाधिक धनवान बनत जात आहेत. याची त्यांना अतिशय वेदना होती. याचा उल्लेख त्यांनी युवकांच्या नावे लिहिलेल्या एका पत्रात केला आहे.
जगाच्या इतिहासाकडे बघितले तर असे लक्षात येईल की, नानाजींचे प्रयोग जितके सफल राहिलेत तितके कुणा अर्थशास्त्रज्ञाचेही राहिले नसतील. नानाजींच्या नेतृत्वात दीनदयाल शोध संस्थानने एक असे मॉडेल तयार केले की, ज्याच्या परिणामस्वरूप चित्रकूटच्या आसपास ८० गावांमध्ये आज शून्य बेरोजगारी, शून्य गरिबी, शून्य कुपोषण, शून्य खटलेबाजी आहे. ही सर्व गावे हिरवीगार झाली आहेत. खरेतर, इतके यश जगातील कुणाही अर्थशास्त्रज्ञांना मिळालेले नाही, जितके नानाजींच्या प्रयोगांमुळे या गावांमध्ये मिळाले आहे. अतिशय कमी खर्चात उजाड गावांचा कायापालटच नाही, तर लोकांचे आयुष्यच बदलून गेले आहे. खरेच, नानाजींमध्ये एक ईश्‍वरप्रदत्त अर्थशास्त्रज्ञाची प्रतिभा दडलेली होती. यासोबतच चित्रकूटमध्ये पाणी अडविण्याची व्यवस्था करून त्यांनी चित्रकूटचा विकास केला. त्यांच्यात एक सखोल राजकीय जाण असण्यासोबतच, इंजिनीअर तसेच अर्थशास्त्राचे गहन ज्ञान होते, असे लक्षात येते.
आज आपला देश अर्थशास्त्र आणि तांत्रिक ज्ञानाच्या अभावी वेगाने विकास करण्यास असमर्थ ठरत आहे. नानाजींचे म्हणणे होते की, पश्‍चिमेकडील भांडवलशाही आणि रशिया व चीनचा साम्यवाद एकसारखेच लोकशाहीच्या प्रतिकूल आहे. भारतातील सरकारे याच विचारांच्या झुल्यावर झुलत असतात. लोकशाहीच्या मूलभूत आधाराला समजण्याचा आमच्या शासकांनी कधी प्रयत्नच केला नाही. केवळ सत्तासंघर्षातच गुंतले आहेत. पश्‍चिमेच्या प्रभावात येऊन औद्योगिकीकरणाच्या नादात आमच्या सरकारांना, शेतीचेही अधिकाधिक मशिनीकरण करणे आवश्यक वाटले. मोठमोठ्या शेतकर्‍यांना मशिनींच्या मदतीने शेती करणे अधिक सोयीचे असते. म्हणून भारत सरकारचे हेच कृषिधोरण बनले. त्यामुळे भारताच्या शेतीचे मशिनीकरण वेगाने होत गेले. परंतु, या मशिनीकरणाचे भयावह परिणाम नानाजी जाणून होते. त्यांनी या परिसरातील लोकांना स्वावलंबी बनविण्यासाठी एक वेगळाच मार्ग निवडला आणि तो यशस्वीही करून दाखविला. शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आवश्यक तेथे पाणलोट क्षेत्र विकास आणि मृदा व्यवस्थापन तंत्र, नवीन व सुधारित शेतीतंत्र वापरले. यासाठी त्यांनी दोन ते अडीच एकराचे मॉडेल्स तयार केलेत आणि नंतरच शेतकर्‍यांना त्याचे प्रात्यक्षिक दाखविले. आपल्या देशात ८० टक्के शेतकरी हे अल्प व अत्यल्पभूधारक आहेत. त्यांना केंद्रस्थानी ठेवून नानाजींचे हे प्रयोग होते. यासोबतच शेतकर्‍यांना शेतीबाह्य उत्पन्नही मिळावे म्हणून, उद्योजक प्रशिक्षण, स्वयं सहायता गट इत्यादींच्या मार्फत शेतकर्‍यांचे उत्पन्न पुरेशा पातळीपर्यंत वाढविले. या परिसरातील लोकांच्या आरोग्याचाही प्रश्‍न नानाजींनी अभिनव असे प्रयोग करून सोडविला. या सर्वांचा एकत्रित परिणाम चित्रकूटच्या आसपासचा परिसर आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यात झाला. हाच प्रयोग त्यांनी नंतर महाराष्ट्राच्या बीड व उत्तरप्रदेशच्या गोंडा या अत्यंत मागास जिल्ह्यांतही केला.
नानाजींचे ठाम मत होते की, जयप्रकाश नारायण यांच्या समग्र क्रांतीच्या आंदोलनाला पुढे नेल्याशिवाय भारताचे भविष्य उज्ज्वल बनणे संभव नाही. ज्या समग्र क्रांतीच्या आंदोलनात त्यांनी स्वत:ला झोकून दिले होते, त्याच समग्र क्रांतीला वास्तवात उतरविण्यासाठी त्यांनी आपल्या आयुष्याचा उत्तरार्ध खर्च केला. त्यासाठी त्यांनी राजकारणसंन्यास घेतला. याच्या उलट समग्र क्रांतीच्या आंदोलनात जयप्रकाश नारायण यांच्या खांद्याला खांदा लावून जे सहभागी होते, त्यांनी स्वत:ला राजकारणापुरतेच मर्यादित करून घेतले. जयप्रकाशजींचे स्वप्न साकार करण्याचे त्यांनी प्रयत्नच केले नाहीत. या पृष्ठभूमीवर नानाजींचे व्यक्तिमत्त्व खरेच उठून दिसते.
आज ग्रामीण विकासाचे एक आदर्श मॉडेल म्हणून चित्रकूट प्रकल्पाकडे बघितले जाते. नानाजींना ‘युगद्रष्टा’ म्हणायचे ते यासाठी. अशा या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाला भारत सरकारने ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन पुरस्कृत केले, हे अतिशय उचित आहे. भारत सरकारच्या माध्यमातून संपूर्ण भारतवासींनी नानाजींच्या अफाट कर्तृत्वाला दिलेली ही एक कृतज्ञ पावतीच आहे, असे मी मानतो. मुळात नानाजी असे ‘युगद्रष्टा’ होते, ज्यांना स्वत: कुठल्याही राजकीय आकांक्षेचे प्रलोभन नव्हते. उलट, जनसेवा हीच त्यांची मूळ प्रकृती होती. ते ‘भारतरत्न’ पुरस्कारासाठी खरोखरच ‘भारतरत्नच’ होते!

Posted by : | on : 10 Feb 2019
Filed under : आसमंत, पुरवणी.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी (105 of 926 articles)

Mamata Banarjee Rajiv Kumar
जागता पहारा : भाऊ तोरसेकर | राजीव कुमारपाशी महत्वाचे पुरावे असून, त्याने तोंड उघडले तर ममता दिदीचा मुखवटा गळून पडायला ...

×