ads
ads
आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

•न्यायव्यवस्था बदनाम करण्याचा हा सुनियोजित कट, •सर्वोच्च न्यायालयाचा संताप,…

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

•पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्ला, दरभंगा, २५ एप्रिल – आतापर्यंत पाकिस्तानची…

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मुंबई, २४ एप्रिल – राग, नाराजी असे माणसाच्या स्वभावाचे…

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

•अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण, वॉशिंग्टन, २४ एप्रिल –…

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

•मृतांची संख्या ३२१, भारतीयांचा आकडाही वाढला, ४० जणांना अटक,…

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

•चीनने व्यक्त केली भीती, बीजिंग, २३ एप्रिल – इराणकडून…

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

•राहुल गांधी यांनी स्वीकारला •विरोधी पक्षनेतेपदही सोडले •काँग्रेसला आणखी…

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

•खोट्या जाहिरातींचे प्रकरण, मुंबई, २२ एप्रिल – शेतकर्‍यांना पाच-दहा…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 18:44
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, ल.त्र्यं. जोशी, स्तंभलेखक » राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

राफेल सुनावणी : अर्धे नुकसान, अर्धा फायदा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी |

एक बाब मात्र मान्य केलीच पाहिजे की, देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असलेला हा विषय न्यायालय व सरकार अतिशय प्रगल्भतेने हाताळत आहेत व हीच समाधानाची बाब आहे. मुळात हा विषय एवढा ताणण्याचीच गरज नव्हती. कारण न्यायालयासमोर आलेली तथ्ये तत्पूर्वीच फिर्यादी पक्षाला माहिती होती. देशाच्या संरक्षणाचा गंभीर मुद्दा या विवादाशी जोडला जाऊ शकतो याचीही त्याला जाणीव असायलाच हवी होती. तरीही केवळ राजकीय स्वार्थ आणि मोदीद्वेष उगाळण्यासाठी त्यांनी हा विषय इथपर्यंत आणला. आता त्यालाही हरकत घेण्याचे कारण नाही. कारण तो विषय न्यायालयासमोर आला आहे आणि न्यायालयानेही त्यावर विचार करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

Rafale Fighter Supreme Court

Rafale Fighter Supreme Court

शस्त्रास्त्रयुक्त छत्तीस राफेल विमाने खरेदी करण्याच्या प्रश्‍नावरुन उडालेल्या धुराळ्याचा निकाल सर्वोच्च न्यायालय केव्हा आणि कसा देईल हे कुणालाही सांगता येणार नाही व त्याबद्दल कोणताही अंदाज बांधता येणार नाही. बांधूही नये. पण या प्रकरणात बुधवार दि. १४ नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीतून दोन बाबी अधिकृतपणे समोर आल्या आहेत. त्यातील एक बाब भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने हानी करणारी आहे तर एक बाब केंद्र सरकारला दिलासा देणारी आहे. अर्थात पूर्ण निकाल जाहीर झाल्याशिवाय त्या सुनावणीचे अंतिम विश्‍लेषण करताच यायचे नाही हेही नमूद केलेले बरे.
भारताच्या संरक्षणासाठी हानिकारक बाब म्हणजे या सुनावणीच्या निमित्ताने भारताच्या वायुदलाची कमकुवत बाजू अधिकृतपणे जगाच्या समोर आली आहे. भारताच्या प्रतिस्पर्धी राष्ट्रांसाठी तर ती एक देणगीच आहे. कारण या सुनावणीत वायुदलाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी जगासमोर मान्य केले आहे की, प्रतिस्पर्धी देशांपेक्षा भारतीय वायुदल कमकुवत आहे. किती कमकुवत आहे हेही सांगितले. कारण त्यांच्याजवळ ज्या क्षमतेची लढाऊ विमाने आहेत, त्या क्षमतेची लढाऊ विमाने भारताजवळ नाहीत. त्यांच्याकडे पाचव्या जनरेशनची विमाने असतील तर भारताकडे साडेतिसर्‍या ते चौथ्या जनरेशनची विमाने आहेत. त्यामुळेच भारतासाठी राफेल विमाने खरेदी करणे आवश्यक होते. वायुसेना अधिकार्‍यांनी दिलेल्या या माहितीच्या आधारे जेव्हा सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई यांनी ‘म्हणजे १९८० पासून वायुदलात अत्याधुनिक विमाने दाखलच झाली नाहीत तर’ असा प्रश्‍न विचारला तेव्हा अधिकार्‍यांना त्यांच्याशी सहमती दर्शवावी लागली. त्यातून आपल्या संरक्षणसज्जतेविषयीची खरी परिस्थिती उघडकीस आली. अभिप्राय व्यक्त करण्यात किंवा माहिती देण्यात कुणाचीच चूक झाली नाही. त्यांनी त्यांचे विहित कर्तव्यच केले. पण प्रतिस्पर्धी देशांनी ही बाब नजरेआड केली नसेल ही वस्तुस्थिती त्यामुळे बदलत नाही. अर्थात त्या देशांना ही माहिती त्यांच्या गुप्त सूत्रांकडून आधीही मिळालेली असू शकते पण त्यावर शिक्कामोर्तब झाले हे कुणालाही नाकारता येणार नाही. शिवाय त्यांचे खबरेही या सुनावणीच्या वेळी हजर असू शकतात किंवा तसे नसेल तर सुनावणीचे वृत्तपत्रीय वृत्त त्यांच्यासाठी उपलब्धच आहे. या स्थितीत भारताला शस्त्रसज्ज व्हायला किती काळ लागू शकतो याचे गणित करुन आपली शस्त्रसज्जता अधिक मजबूत करण्यासाठी वा भारतावर हल्ला करण्याची योजना करण्यासाठी ते या माहितीचा उपयोग करु शकतातच. राफेल प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेणार्‍यांना हेच अपेक्षित आहे काय?
कुणी या प्रतिपादनावर प्रश्‍नचिन्हही उभे करु शकतो. कुणी असेही म्हणू शकतो की, प्रतिस्पर्धी देश या माहितीची वाट कशाला पाहतील? ते या अगोदरही हल्ला करु शकले असते. त्यामुळे हा मुद्दा जरतरचा ठरतो. सुनावणीतही महाधिवक्ता म्हणाले की, कारगील युध्दाच्या वेळी राफेल विमाने उपलब्ध असती तर आपल्या सैनिकांची कमी प्राणहानी झाली असती. त्यावर न्यायालय म्हणाले की, त्यावेळी राफेल विमानांचा प्रस्तावही तयार झाला नव्हतो. तेव्हाही महाधिवक्त्यांना जरतरवर वेळ निभावून न्यावी लागली. पण युध्दसज्जता प्रतिस्पर्ध्याच्या लहरीवर अवलंबून ठेवायची नसते. कोणत्याही क्षणी हल्ल्याला तोंड देण्याची तयारी ठेवणे हाच युध्दसज्जतेचा अर्थ आहे व आपण तसे नव्हतो, या क्षणीही नाही, हे यानिमित्ताने अधोरेखित झाले आहेच. फिर्यादींनी या प्रश्‍नाचा देशहिताच्या अंगाने विचार केला होता काय, हा प्रश्‍न यानिमित्ताने निश्‍चितच निर्माण होतो.
दुसरी महत्वाची बाब म्हणजे राफेल विमानांच्या शस्त्रसज्जतेवर किती खर्च आला हे उघड करण्यास न्यायालयाने मनाई केली आहे. फिर्यादी पक्षाचे वकील जेव्हा अशा विमानांच्या किंमतीची चर्चा करण्याचा प्रयत्न करीत होते तेव्हा न्यायमूर्तींनी त्यांना तसे करण्यास स्पष्टपणे मनाई केली. या विषयावर न्यायालय जोपर्यंत अनुमती देणार नाही तोपर्यंत कुणालाही चर्चा करता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका न्यायमूर्तींनी घेतली, जी केंद्र सरकारसाठी दिलासा देणारी बाब आहे. खरे तर निव्वळ विमानांची किंमत तर सरकारनेच अधिकृतपणे संसदेतही जाहीर केली आहे. तिचाच आधार घेऊन राहुल गांधी अपप्रचार करीत आहेत. अद्वातद्वा बरळत आहेत. न्यायालयात निव्वळ विमाने व शस्त्रसज्ज विमाने हा फरक अधिकृतपणे स्पष्ट झाला आहे. सरकारनेही स्पष्ट केले आहे की, निव्वळ विमानांची किंमत गोपनीय नाहीच. गोपनीय आहे ती शस्त्रसज्जतेची किंमत. कारण ती कळल्यानंतर प्रतिस्पर्धी देश विमानात कोणकोणती शस्त्रास्त्रे जोडलेली राहू शकतात, याचा अंदाज करु शकतात व त्या आधारावर ते आपली रणनीती बदलवूही शकतात. त्यामुळेच न्यायमूर्तींनी शस्त्रास्त्र सज्जतेच्या किंमतीवर चर्चा करण्यास नकार दिला असेल तर ते देशहिताचेच आहे असे म्हणावे लागेल. तरीही जर फिर्यादी पक्ष त्याबाबत आग्रहच धरत असेल तर त्याला ती किंमत प्रतिस्पर्धी देशांना कळावी असे प्रकर्षाने वाटते काय, असा प्रश्‍न निर्माण होतो.
एक बाब मात्र मान्य केलीच पाहिजे की, देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असलेला हा विषय न्यायालय व सरकार अतिशय प्रगल्भतेने हाताळत आहेत व हीच समाधानाची बाब आहे. मुळात हा विषय एवढा ताणण्याचीच गरज नव्हती. कारण न्यायालयासमोर आलेली तथ्ये तत्पूर्वीच फिर्यादी पक्षाला माहिती होती. देशाच्या संरक्षणाचा गंभीर मुद्दा या विवादाशी जोडला जाऊ शकतो याचीही त्याला जाणीव असायलाच हवी होती. तरीही केवळ राजकीय स्वार्थ आणि मोदीद्वेष उगाळण्यासाठी त्यांनी हा विषय इथपर्यंत आणला. आता त्यालाही हरकत घेण्याचे कारण नाही. कारण तो विषय न्यायालयासमोर आला आहे आणि न्यायालयानेही त्यावर विचार करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.
मुळात न्यायालयाने सावध भूमिका घेऊन राफेल विमानांच्या निवडीची प्रक्रिया सरकारकडे मागितली होती व ती देण्यास सरकारने संमतीही दिली होती एवढेच नव्हे तर ती सादरही केली होती. तेव्हा किंमतीचा प्रश्‍न उपस्थित झाला असता सरकारपक्षाने गोपनीयतेचे कारण देऊन कदाचित ती माहिती देता येणार नाही अशी भूमिका घेतली होती. पण ‘न्यायालयालाही तुम्ही ती देणार नाही कां, व तसेच असेल तर तसे प्रतिज्ञापत्राद्वारे सांगा असा निर्देश न्यायालयाने दिला. तेव्हा सरकारला गंभीर विचार करावा लागला. सरकारने जर खरोखरच नकार दिला असता तर त्याला काही तरी दडवायचे आहे किंवा त्याचा न्यायालयावरही विश्‍वास नाही असे संदेश गेले असते आणि फिर्यादी पक्षाला त्या संदेशाचा अपप्रचरासाठी वापरही करता आला असता. पण समाधानाची बाब म्हणजे सरकारनेही प्रगल्भतेने विचार केला आणि विमानाच्या किंमतीची माहिती बंद लिफाप्यातून केवळ पीठासीन न्यायमूर्तींनाच दिली आणि प्रक्रियेची माहिती फिर्यादी पक्षालाही दिली. न्यायालयाला माहिती देतांना ‘फॉर द आईज ऑफ सीजेआय अँड जजेस ऑन बेंच’ असा शब्दप्रयोग करण्यात आला आहे. कारण ‘किंमतीसंबंधीचा विषय अतिशय तांत्रिक आहे व त्याबाबत निवाडा करणे न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात येत नाही’ अशी सरकारची भूमिका आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘फॉर द आईज’ ही शब्दयोजना महत्वपूर्ण ठरते. म्हणूनच किंमतीची माहिती न्यायालयाला बंद लिफाप्यातून देण्याचा सरकारचा निर्णय लक्षणीय ठरतो. अर्थात त्यासाठी सरकारला संभाव्य परिणामांचा सखोल विचार करावा लागला. न्यायालयावर अविश्‍वास व्यक्त होणार नाही आणि गोपनीयतेशी तडजोड केली असा ठपकाही येणार नाही, याची काळजी घ्यावी लागली. हा सरकारच्या प्रगल्भतेचाच पुरावा म्हणावा लागेल. समाधानाची बाब म्हणजे किंमतीवर चर्चा करण्यास मनाई करुन न्यायालयानेही आपल्या प्रगल्भतेचे दर्शन घडविले आहे.

Posted by : | on : 18 Nov 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, ल.त्र्यं. जोशी, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, ल.त्र्यं. जोशी, स्तंभलेखक (398 of 1372 articles)

Indian Army Soldiers Ap
राष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन | मोठ्या हेडक्वार्टरवर कारवाई करण्याची ताकद भारताकडे आहे, हेही यातून भारतीय लष्कराने ध्वनित केले आहे. ...

×