ads
ads
सजा पक्की : कशी? ते लष्कर ठरवेल!

सजा पक्की : कशी? ते लष्कर ठरवेल!

•पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पांढरकवड्यात पाकला इशारा •कोलामी, बंजारा,…

पाकिस्तानातील आयातीत वस्तूंवर २०० टक्के कर

पाकिस्तानातील आयातीत वस्तूंवर २०० टक्के कर

नवी दिल्ली, १६ फेब्रुवारी – पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती…

भारताला स्वरक्षणाचा अधिकार

भारताला स्वरक्षणाचा अधिकार

•अमेरिकेच्या एनएसएचा अजित डोवाल यांना फोन, नवी दिल्ली/वॉशिंग्टन, १६…

भारताने डगमगू नये, ठोस कारवाई करावी

भारताने डगमगू नये, ठोस कारवाई करावी

•अमेरिकेतील ७० खासदारांची भूमिका, वॉशिंग्टन, १६ फेब्रुवारी – पुलवामातील…

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी

•पाकिस्तानने व्यक्त केली वचनबद्धता •कुलभूषण जाधव प्रकरण, लाहोर, १६…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:27
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, प्रशांत आर्वे, स्तंभलेखक » राष्ट्र, राष्ट्रीयता आणि राष्ट्रवाद…

राष्ट्र, राष्ट्रीयता आणि राष्ट्रवाद…

॥ भारत भाग्य विधाता : प्रशांत आर्वे |

राष्ट्र आणि राष्ट्रवाद या विषयावर सर्वाधिक तर्कपूर्ण मांडणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आपल्याला दिसते. त्यांनी १९४१ मध्ये लिहिलेल्या पाकिस्तानसंबंधी पुस्तकात राष्ट्र या शब्दाची केलेली व्याख्या कालोचित अशीच आहे. हिंदू व मुसलमान ही दोन स्वतंत्र राष्ट्रे आहेत. हे स्पष्ट करतानाच ते, अर्नेस्ट रेनेन यांची राष्ट्र या शब्दाची व्याख्या उद्धृृत करतात. राष्ट्र म्हणजे जिवंत आत्मा, एक आध्यात्मिक तत्त्व. ज्या आध्यात्मिक तत्त्वाचा उल्लेेख अर्नेस्ट करतो आणि बाबासाहेब ज्याचा दाखला देतात; ते तत्त्व हे सांस्कृतिक आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

India Nation

India Nation

फार पूर्वी मा. गो. वैद्यांच्या एका लेखात राष्ट्र, देश आणि राज्य या तीनही शब्दांच्या अतिशय व्यवहार्य आणि समर्पक अशा व्याख्या वाचण्यात आल्या होत्या. त्यांच्या मते, देश ही भौगोलिक संकल्पना आहे. राज्य ही राजकीय संकल्पना आहे, तर राष्ट्र ही सांस्कृतिक संकल्पना आहे. विशिष्ट भूमी, नद्या, डोंगर, सरोवर, जल, वायू यांनी घडतो तो देश. तुमच्या देशात अध्यक्षीय प्रणाली आहे की संसदीय? राजेशाही आहे की हुकूमशाही? यावरून ठरते ते राज्य आणि त्या देशातील माणसे, त्यांच्या समान परंपरा, संस्कृती, धर्म आणि या सर्वांना जोडणारा सामायिक दुवा म्हणजे अध्यात्म, यावरून ठरते ते राष्ट्र. राष्ट्र, राष्ट्रीयता आणि राष्ट्रवाद या विषयाच्या अनुषंगाने चर्चा करण्याचे कारण असे की, अलीकडे नव्याने राष्ट्रवाद हा विषय ऐरणीवर आला आहे. सामाजिक शास्त्राच्या अभ्यासकांनी राष्ट्र या शब्दाचा इतिहास, त्याची मांडणी ही वर्तमानाच्या अंगाने तपासणे अगत्याचे ठरते.
राष्ट्र आणि राष्ट्रवाद या विषयावर सर्वाधिक तर्कपूर्ण मांडणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आपल्याला दिसते. त्यांनी १९४१ मध्ये लिहिलेल्या पाकिस्तानसंबंधी पुस्तकात राष्ट्र या शब्दाची केलेली व्याख्या कालोचित अशीच आहे. हिंदू व मुसलमान ही दोन स्वतंत्र राष्ट्रे आहेत. हे स्पष्ट करतानाच ते, अर्नेस्ट रेनेन यांची राष्ट्र या शब्दाची व्याख्या उद्धृृत करतात. राष्ट्र म्हणजे जिवंत आत्मा, एक आध्यात्मिक तत्त्व. ज्या आध्यात्मिक तत्त्वाचा उल्लेेख अर्नेस्ट करतो आणि बाबासाहेब ज्याचा दाखला देतात; ते तत्त्व हे सांस्कृतिक आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. बाबासाहेब पुढे सांगतात की, धर्म, भाषा आणि संस्कृती हे राष्ट्राच्या आत्म्याचे घटक होत. दोन हजार वर्षे स्वतःची भूमी नसलेला यहुदी समाज जगभरात ठोकरा खात टिकून राहिला, त्याच्यामागे काय प्रेरणा असावी बरे? त्यामागे राष्ट्र ही प्रेरणा असली, तरी त्याची सांस्कृतिक वीण घट्ट होती, हे विसरता येत नाही.
अमेरिका, युरोप आणि चीनमध्ये राजकारणावरून मतभेद असतील, पण राष्ट्रवादावर सर्वांचे एकमत आहे. राष्ट्र या तत्त्वाशी तिथे तडजोड नाही. याउलट भारतात राष्ट्र हा आमुचा देव नसून देह आमुचा देव आहे, असे म्हणणारे महाभाग सापडतात! ‘भारतमाता की जय’ म्हणायचे की नाही, यावरून वाद होताना दिसतात. आम्ही ते म्हणणार नाही, असे बेंबीच्या देठापासून ओरडणारेदेखील आहेत. इथे ‘राष्ट्र देवो भव:’ या संकल्पनेलाच सुरुंग लागलेला दिसतो. आपल्या देशात काही मंडळी, १५ ऑगस्ट १९४७ नंतर भारत या राष्ट्राचा उदय झाला, असे मानणारी आहे. त्यांना आपला राष्ट्र म्हणून प्रवास फार अलीकडचा वाटतो. इतक्या जाती, धर्म, भाषा आणि श्रद्धा यात विभागलेला समाज एक राष्ट्र कसे काय असू शकते? हा प्रश्‍न विचारणे स्वाभाविक आहे. वास्तविक, या मांडणीची सुरुवात ब्रिटिशांनी केली. १८५७ च्या उद्रेकानंतर ब्रिटिशांनी ज्या कूटनीतीचा अवलंब केला, त्याचा परिपाक म्हणून विभाजनवादी मतांचा हेतुपुरस्सर प्रसार आणि प्रचार केला गेला, हे उघड आहे. उत्तरेतला रामलाल आणि दक्षिणेतला रामस्वामी हे कोडं ज्याला उलगडतं, त्याला भारत हे एक प्राचीन राष्ट्र आहे, याचा उलगडा होईल. आधुनिक राष्ट्रवादाचे पुरस्कर्ते पंडित नेहरूदेखील ‘भारताचा शोध’ या ग्रंथात जो भारत मांडू पाहतात; तो दुसरे, तिसरे काही नसून सांस्कृतिक राष्ट्रवाद आहे. परकीय आक्रमकांना आपल्या कुशीत सामावून घेणारी ही भूमी आणि तिची अमर्याद क्षमता भारताकडे असल्याची ग्वाही ते देतात. पुढे ते म्हणतात, विविध गटांना एकत्र बांधून ठेवणारे जे राष्ट्रीय सूत्र आहे ते इथे प्रयत्नपूर्वक निर्माण केले गेले. ते राष्ट्रीय सूत्र म्हणजे समान संस्कृती, समान परंपरा, समान वीर व संतपुरुष, समान भूमी की जिच्या चारी दिशांना हे लोक तीर्थयात्रा करतात हे होत. हे राष्ट्रीय सूत्र राजकीय दृष्टीने कमकुवत असेल, पण सामाजिक व सांस्कृतिक दृष्टीने बळकट होते. भारतीय राष्ट्रवादाच्या संबंधाने नेहरू सांगतात, भूतकाळाचा आंधळा अभिमान जसा वाईट तसा त्याचा तिरस्कारही वाईटच. कारण यापैकी कशावरही भविष्यकाळ उभारता येत नाही. वर्तमान व भविष्य हे अनिवार्यपणे भूतकाळातून त्याचा ठसा धारण करून उदय पावते. त्यास विसरणे म्हणजे पायाशिवाय घर उभारण्यासारखे आहे व राष्ट्रीय भावनेच्या वाढीची मुळे कापून टाकल्यासारखे आहे. राष्ट्रवाद म्हणजे पूर्वजांच्या पूर्वी केलेल्या कार्याची, परंपरांची व अनुभवाची सामूहिक स्मृती होय. राष्ट्रवाद नाकारणार्‍या पुरोगामी मंडळींनी पंडित नेहरूंचे हे विधान तेवढे लक्षात घ्यावे. महर्षी कणादांपासून तर महर्षी कलामपर्यंत आणि राजा राम मोहन रायपासून तर स्वा. सावकरांपर्यंत सगळ्यांनी भारतीय जनमानसात असलेल्या सांकृतिक सूत्राला घट्ट करण्याचा प्रयत्न केला. नव्हे, त्या सूत्राच्या साहाय्याने या देशातील राष्ट्रवादी भावनेचे पुनरुज्जीवन केले. एकंदर काय, तर भारताच्या प्राचीनत्वाचा अभिमान सर्वांना होता, मात्र संस्कृती कोणती यावरून वाद आहेत. कुणाला द्रविड संस्कृतीचा अभिमान, तर कुणाला आर्य भारतात येण्यापूर्वी आमची संस्कृती समृद्ध होती याचा अभिमान. अर्थात, आर्य-अनार्य या मिथकाला बाजूला ठेवून, हे राष्ट्र प्राचीन आहे, यावर सगळ्यांचे एकमत आहे. फक्त संस्कृतीच्या संदर्भातील वाद आजही कायम असल्याचे आपल्याला दिसेल.
दुर्दैवाने, या देशातील डाव्या विचारवंतांना भारत हे एक राष्ट्र आहे आणि ते १९४७ पर्यंत राजकीयदृष्ट्या एकसंध नसले, तरी सांस्कृतिकदृष्ट्या ते अस्तित्वात होते, हे मान्य नाही. त्याचमुळे कदाचित अजूनही डाव्यांना भारतीय जनमानसाची नाडी गवसलेली नाही. देशात केवळ एका राज्यापुरता उरलेल्या या विचाराला फार मनावर घेण्याचे कारण नाही. राष्ट्रवादाला विरोध करण्यात अलीकडे दलित चळवळ आघाडीवर असल्याचे आपल्याला दिसेल. त्यासोबत मुस्लिमांचादेखील राष्ट्रवादाच्या कल्पनेला विरोध आहे. या ठिकाणी संघ वा भाजपापुरस्कृत राष्ट्रवाद अपेक्षित नाही. कारण, १८८५ मध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेनंतर लगेच, सर सय्यद अहमद यांनी भारतात दोन राष्ट्रे असल्याचा प्रचार व प्रसार सुरू केला. मुस्लिमांनी काँग्रेसमध्ये जाऊ नये, असा स्पष्ट आदेशच त्यांनी दिला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बहुसंख्य असलेल्या हिंदूंच्या खाली दुय्यम नागरिक म्हणून राहणे तत्कालीन मुस्लिम नेत्यांना मान्य नव्हते. त्याचीच परिणती भारताच्या फाळणीत झाली, हे स्पष्ट आहे. आज असदुद्दीन ओवैसी जी भाषा करतो, त्याचे मूळ वरील इतिहास बघितल्यावर आपल्या लक्षात येईल.
त्याच वेळी महाराष्ट्रात फुल्यांच्या नेतृत्वात बहुजन समाजदेखील ब्राह्मणेतर चळवळीत सामील झाला. ब्राह्मणांनी आमच्यावर वर्षानुवर्षे अन्याय केल्याने टिळक मागत असलेले स्वातंत्र्य आम्हास नको. कारण त्यात पुन्हा ब्राह्मणांचे वर्चस्व राहील आणि ब्राह्मणी संस्कृतीचे गुलाम म्हणून आम्हाला राहावे लागेल, अशी ती मांडणी होती. गांधींच्या उदयानंतर ब्राह्मणेतर चळवळ जरी काँग्रेसमधे सामील झाली असली, तरी त्यांचा सांस्कृतिक राष्ट्रवादाला विरोध कायम राहिला. वेदांच्या आधारावर राष्ट्रवादाची मांडणी करू पाहणारे महर्षी दयानंद सरस्वती यांच्या आर्य समाजाला विरोध म्हणून आधी हिंदू परिषदेची स्थापना करण्यात आली. वेदांचे प्रामाण्य आम्हाला मान्य नाही, अशी ती चळवळ होती. तरीसुद्धा आर्य समाजाने सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या आधारे समाजाच्या एका मोठ्या घटकावर प्रभाव टाकला आणि राष्ट्रवादी भावना निर्माण करण्यास ते कारणीभूत ठरले. दक्षिणेत रामास्वामी पेरियार यांनी काँग्रेसला विरोध करीत, बहुजन समाजाची मोट बांधली आणि आर्य विरुद्ध द्रविड असा सामना तेथे उभा ठाकला. अर्थात, त्यांच्या मांडणीतदेखील सांस्कृतिक राष्ट्रवादाला प्रखर विरोध होता. राम हे आमचे दैवत नसून रावण आमचा आदर्श आहे, अशी मांडणी करण्यात ते यशस्वी झाले.
या विरोधानंतरदेखील देशात राष्ट्रीय भावनेचा उदय झाला. ही राष्ट्रवादी भावना देशातून ब्रिटिशांना घालवायला उपयोगी पडली. मात्र, राष्ट्रवाद जेव्हा पराकोटीचा वाढतो तेव्हा तो हिंसक होत गेल्याची इतिहासात उदाहरणे आहेत. या देशातील बहुसंख्य हिंदू नेहमीच सहिष्णू राहिला आहे. त्याला अनेकदा या सौम्यपणाचा फटकादेखील बसला आहे. तरीसुद्धा आक्रमक राष्ट्रवादाचे समर्थन करता येत नाही. आक्रमक राष्ट्रवाद आम्हाला हिटलरच्या मार्गाने घेऊन जाईल. संपूर्ण जगाला खुणावणारी अमेरिका अन्य राष्ट्रासाठी आपली कवाडे बंद करू पाहते, अन्य देशांच्या मालावर प्रचंड कर लादते, याला काय म्हणावे? राष्ट्रवादी भावना जशी अनेकांच्या मुक्तीला कारणीभूत ठरली, तशी तिची आक्रमकता विनाशाचे कारणदेखील ठरू शकते. सर्व प्रवाहांना आपल्यात सामावून घेणारा राष्ट्रवाद आधुनिक काळात संकुचित होत गेलेला दिसतो. कोणत्याही राष्ट्राला आपले बल वाढविण्यासाठी व समाज एकसंध बांधण्यासाठी राष्ट्रवादाची भलामण करावीच लागते. मात्र, राजकीय पटलावर असलेल्या लोकांना ते कुठवर ताणायचे याचे भान असले पाहिजे. अन्यथा विकास की राष्ट्रवाद, असा गंभीर प्रश्‍न निर्माण झाल्याशिवाय राहात नाही. आधुनिक समाज आता राष्ट्रवादाच्या अभिमानापेक्षा देशाच्या प्रगतीला महत्त्व देतो. म्हणून येत्या काळात तोच देश टिकणार आहे जेथे संयमित राष्ट्रवाद आणि वेगवान प्रगती एकत्र नांदतील. राष्ट्रीय भावनेचा उपयोग केवळ निवडणुकीपुरता न करता, त्याचा देशाच्या विकासात उपयोग करून घेण्याचे कसब यापुढे राज्यकर्त्यांना अंगी बाणवावे लागेल.
वर्तमानात राष्ट्रवादाची मांडणी करावयाची असेल, तर आपल्या सगळ्यात समान धागा आहे तो म्हणजे हा देश प्राचीन आहे आणि या प्रचीनत्वाला आधुनिक मूल्यांची जोड देऊन एक प्रगल्भ समाज म्हणून सामोरे जाण्याची गरज आहे आणि राष्ट्रवादातून त्याची मांडणी होऊ शकते.
भारताच्या प्राचीन वाङ्मयातदेखील राष्ट्र राज्य असा उल्लेख आढळतो.

Posted by : | on : 18 Nov 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, प्रशांत आर्वे, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, प्रशांत आर्वे, स्तंभलेखक (252 of 1220 articles)

Researchindia
विशेष : डॉ. संजय पुजारी | आपलं रोजचं जगणं विज्ञानाशी निगडित आहे. त्या अर्थानं रोजच विज्ञान दिन असतो, असं म्हटल्यास ...

×