ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, ल.त्र्यं. जोशी, स्तंभलेखक » राहुल गांधींची शेवटची परीक्षा

राहुल गांधींची शेवटची परीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी |

राहुलच्या नेतृत्वाचा आलेख पाहता आतापर्यंतच्या एकाही विधानसभा निवडणुकीत ते स्वत:चे जिंकून देणारे नेतृत्व सिध्द करु शकले नाहीत. गुजरातमध्ये त्यांनी काँग्रेसच्या जागा वाढवून दिल्या हे खरे पण तेथे ते सरकार आणू शकले नाहीत. कर्नाटकमध्ये जदसे अध्यक्ष देवेगौडा यांच्या कृपेने त्यांचा पक्ष सत्तेत असला तरी विधानसभा निवडणुकीत पक्ष म्हणून त्यांचा पराभवच झाला आहे. कारण असलेले सरकार हातातून गेले आहे. हिमाचल, उत्तराखंड या राज्यांमध्ये असलेली त्यांची सरकारे जमीनदोस्त झाली आहेत तर उत्तरप्रदेशातील पराभव हा त्यांच्यासाठी लाजिरवाणा पराभवच समजावा लागेल.

Congress President Rahul Gandhi

Congress President Rahul Gandhi

सात डिसेंबर रोजी संपणार्‍या पाच राज्य विधानसभांच्या निवडणुकींचा ११ डिसेंबर रोजी निकाल लागणार आहे. ही निवडणूक भाजपाशासित राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगड ही राज्ये आपल्याकडे कायम ठेवण्याच्या दृष्टीने जेवढी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा, त्या तीन राज्यांचे मुख्यमंत्री यांच्यासाठी महत्वाची आहे त्यापेक्षा काँग्रेसाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासाठी अधिक महत्वाची आहे. नव्हे त्यांच्या नेतृत्वाची ही अंतिम परीक्षाच आहे असे म्हटले तर ते अधिक योग्य ठरेल. भाजपासाठी ही निवडणूक २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाची असेल पण २०१९ ची उपान्त्य फेरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या या निवडणुकीमुळे काँग्रेस पक्षाच्या अस्तित्वाचाच निर्णय होणार आहे. राहुलच्या नेतृत्वाचा तर नक्कीच. निवडणूक होणार्‍या पाचही राज्यात काँग्रेसला मित्र पक्षांच्या मदतीने कां होईना बहुमत मिळवावेच लागणार आहे. त्यात दोन तीन राज्ये कमी पडून चालणार नाही. कारण राहुल गांधी हे पक्षाला जिंकून देणारे नेते आहेत काय, हे या निवडणुकींमधून अंतिमरीत्या स्पष्ट होणार आहे. राहुल गांधी राजकारणात येऊन आता उणीपुरी दहा वर्षे होऊन गेली आहेत. त्यांचे वय, शिक्षण आणि अनुभव यामुळे त्यांच्या नेतृत्वाला आकार घेण्यासाठी काही वेळ लागणे अपरिहार्यच होते. तो वेळ त्यांनी घेतला. पण त्यांचे पक्षाला जिंकून देणार्‍या नेत्यात काही अद्यापही रुपांतर झालेले नाही. त्यांच्यात सुधारणा निश्‍चितच झाली आहे. पण ती जिंकून देणार्‍या नेत्याला साजेसी निश्‍चितच नाही. राजकारणत ‘सेल्फगोल’ करण्याचा विक्रम मात्र त्यांच्या नावावर नोंदवावा लागेल. त्यामुळे राहुलला ते स्थान प्राप्त करण्यासाठी आणखी किती वेळ द्यायचा हा प्रश्‍न पक्षासमोर निर्माण झाला तर ते स्वाभाविकच म्हणावे लागेल.
राहुलच्या नेतृत्वाचा आलेख पाहता आतापर्यंतच्या एकाही विधानसभा निवडणुकीत ते स्वत:चे जिंकून देणारे नेतृत्व सिध्द करु शकले नाहीत. गुजरातमध्ये त्यांनी काँग्रेसच्या जागा वाढवून दिल्या हे खरे पण तेथे ते सरकार आणू शकले नाहीत. कर्नाटकमध्ये जदसे अध्यक्ष देवेगौडा यांच्या कृपेने त्यांचा पक्ष सत्तेत असला तरी विधानसभा निवडणुकीत पक्ष म्हणून त्यांचा पराभवच झाला आहे. कारण असलेले सरकार हातातून गेले आहे. हिमाचल, उत्तराखंड या राज्यांमध्ये असलेली त्यांची सरकारे जमीनदोस्त झाली आहेत तर उत्तरप्रदेशातील पराभव हा त्यांच्यासाठी लाजिरवाणा पराभवच समजावा लागेल. पंजाबमध्ये काँग्रेसचा विजय जरुर झाला पण त्याचे श्रेय राहुलपेक्षा कॅ. अमरिंदर सिंगांकडे अधिक जाते. कारण तेथे राहुलचा नव्हे तर कॅप्टनसाहेबांचा चेहराच काँग्रेसने धारण केला होता. आसाम, अरुणाचल, मेघालय आदी राज्येही राहुलचे नेतृत्व असतांनाच काँग्रेसच्या हातातून निसटली. पराभवाची एवढी प्रचंड मालिका पाठीशी असतांना आता या पाच राज्यांच्या निवडणुकीत राहुलला केवळ जागा वाढवून भागणार नाही. त्यांना जर २०१९ चे यशस्वी नेतृत्व म्हणून समोर यायचे असेल तर ह्या पाचही विधानसभा जिंकाव्याच लागतील. कारण आता काँग्रेसला हवे आहे जिंकून देणारे नेतृत्व. बहुमतात आणणारे नेतृत्व. त्यादृष्टीने राहुलसाठी ही अक्षरश: शेवटची संधी आहे.
तसे पाहिले तर काँग्रेस पक्षाला लोकसभेत बहुमत मिळवून देणारे यापूर्वीचे शेवटचे नेतृत्व होते राजीव गांधींचे आणि ती निवडणूक होती १९८४ ची. त्यानंतर केंद्रात संमिश्र सरकारे स्थापन करण्यात त्या पक्षाने यश मिळविले असले तरी बहुमताचे शेवटचे सरकार राजीव गांधींचेच होते. त्यांच्यानंतर लोकसभेत बहुमत मिळवून देणारा नेता अद्याप काँग्रेसला मिळाला नाही. म्हणजे गेल्या पस्तीस वर्षात काँग्रेसला एकदाही लोकसभेत बहुमत मिळविता आले नाही, ही वस्तुस्थिती कुणीही नाकारु शकत नाही. नरसिंहरावांच्या काळात काँग्रेसचे सरकार स्थापन झाले असले तरी ते अल्पमताचेच सरकार होते आणि अविश्‍वास ठराव फेटाळण्यासाठी रावांना झामुमोची मते विकत घ्यावी लागली होती हा इतिहास आहे. १९९६ मध्ये तो विरोधी बाकांवर होता तर १९९८ मध्ये सरकारला पाठिंबा देणारा पक्ष असला तरी सत्तेबाहेर होता. २००४ व २००९ मध्ये त्या पक्षाकडे सरकारचे नेतृत्व होते पण त्याच्या किल्ल्या मात्र अन्य पक्षांच्या हातातच होत्या. या पार्श्‍वभूमीवर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकी जिंकण्याची म्हणजे बहुमत मिळविण्याची किती प्रचंड जबाबदारी राहुलवर आहे हे स्पष्ट होते. म्हणजेच आपल्या पिताश्रींनंतर काँग्रेसला बहुमत मिळवून देण्याची जवळपास अशक्य वाटणारी जबाबदारी राहुलला पेलायची आहे. त्यांना तिचे गांभीर्य कळते काय, हा मात्र कोटीमोलाचा प्रश्‍न आहे.
राजकारणात लोक त्याच नेत्याच्या मागे जातात ज्याच्यात पक्षाला किंवा उमेदवाराला निवडून आणण्याची धमक असते. आज मोदींचे कार्यकर्ते वा नेते यांना आकर्षण एवढ्याचसाठी वाटते की, त्यांच्यात निवडून आणण्याची धमक आहे. २०१४ मध्ये चंद्राबाबू त्यांच्याकडे आले ते केवळ याच कारणासाठी आणि नितीशकुमारांनी लालूंची संगत सोडण्यासाठी जी अनेक कारणे होती त्यातील मोदींची जिंकण्याची क्षमता हेही एक महत्वाचे कारण होते. बिहारमधील त्यांच्या मित्र पक्षाचे नेते उपेंद्र कुशवाह गेल्या कित्येक दिवसांपासून एनडीए सोडण्याचे इशारे देत आहेत पण अजून त्यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला नाही. महाराष्ट्रात शिवसेनेच्या मंत्र्यांचे राजीनामे खिशातून काही बाहेर पडत नाहीत. त्याचे एकमेव कारण म्हणजे मोदींच्या लोकप्रियतेचा धसका. त्यामुळेच बहुधा रामबिलास पासवान यांनीही आपला पवित्रा बदलला असावा. राहुलकडे येण्यासाठी असे कोणतेही आकर्षण नाही. अन्यथा भाजपाविरोधी कथित महागठबंधन एव्हाना तयार होऊन गेले असते. पण होत आहे ते उलटेच. इतर विरोधी पक्षांना काँग्रेस वा राहुल ही लायब्लिटी वाटत असल्यामुळे गठबंधनाचे घोडे पुढे सरकेनासे झाले आहे. काँग्रेसला तिचे स्थान दाखविण्याचे प्रयत्न मात्र जोरात सुरु आहेत. अन्यथा अखिलेश आणि मायावती यांनी उत्तरप्रदेशात काँग्रेसपुढे दोन जागा देण्याचे गाजर धरण्याचा प्रयत्न केलाच नसता.
कथित महागठबंधन तयार करण्याच्या बाबतीतही देशातील सर्वात मोठ्या काँग्रेस पक्षाला दुय्यम स्थान देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. प्रारंभी काँग्रेसने आपले पंतप्रधानपदाचे उमेदवार राहुल गांधीच असतील असे सूचित केले. कदाचित त्यामागो नेहरु घराण्याशिवाय पर्याय नाही ही भावनाही असेल. विरोधी पक्षांमध्ये सर्वात जास्त जागा काँग्रेसलाच मिळणे अपरिहार्य आहे या वस्तुस्थितीचे भानही असेल. पण आज त्याच काँग्रेस पक्षाला राहुलची उमेदवारी मागे घ्यावी लागली आहे. त्यासाठी ‘राहुल गांधी यांना आम्ही पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित केलेले नाही’ असा अधिकृत खुलासा काँग्रेसला करावा लागला. आता तर गठबंधनाचे नेतृत्व निवडणुकीनंतर सर्वसंमतीने निवडले जाईल अशी भाषा वापरली जाऊ लागली आहे. याचाच अर्थ, जास्त जागा मिळविणार्‍या पक्षाचा नेताच आटोमॅटिक गठबंधनाचा नेता राहील असे नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. गुणवत्तेच्या बळावर शरद पवार, मायावती, ममता वा चंद्रबाबू नायडू यांच्या तुलनेत राहुल डावेच ठरतात. त्यांना जर पंतप्रधानपदाचे नि:संशय नेतृत्व हवे असेल तर त्याची एकच पूर्वअट असू शकते व ती म्हणजे पाचच्या पाच राज्यात काँग्रेसची सरकारे स्थापन करणे. ते त्यांच्यासाठी कितपत शक्य आहे, हे या निवडणुकीचे सर्वात कठिण कोडे आहे.
राहुल गांधींचे नेतृत्व अपेक्षेप्रमाणे साकार न होण्याचे महत्वाचे कारण म्हणजे त्यांच्यातील दूर आणि अचूक दृष्टीचा अभाव. ती मिळावी म्हणून त्यांचा आटोकाट प्रयत्न सुरु आहे. पण शेवटी माणसाच्या मूलभूत क्षमतेचाही प्रश्‍न असतो. सोनिया गांधींजवळ तर काहीच नव्हते. त्यांना राजकारणात रुची नव्हती. त्यामुळे त्यांनी या क्षेत्रात चबढबही केली नाही. पण राजीव गांधींच्या मृत्युनंतर त्यांच्यावर जबाबदारी येऊन पडताच त्यांनी परीश्रमपूर्वक नेतृत्वगुण आत्मसात केले. गांधी नेहरु परिवाराचा वारसा त्यांच्या कामी आला हे खरेच पण तोच वारसा राहुलसाठीही उपलब्ध असला तरी ते ती पातळी आतापर्यंत तरी गाठू शकले नाहीत हे आपण सर्व पाहतच आहोत. इथेच त्यांच्या क्षमतेच्या मर्यादा स्पष्ट होतात. अशा स्थितीत त्यांनी ही पाच राज्ये निर्णायकपणे जिंकली तरच त्यांच्यासाठी पुढची संधी उपलब्ध असेल. पण दुर्दैवाने तसे घडले नाही तरी त्यांच्या काँग्रेसच्या नेतृत्वाला पर्याय नाही. त्यांच्यापेक्षा अधिक सक्षम नेते काँग्रेसमध्ये नाहीत असे नाही पण त्यांच्यापैकी कुणाचाही गांधीनेहरु घराण्यात जन्म झालेला नाही. •••

Posted by : | on : 2 Dec 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, ल.त्र्यं. जोशी, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, ल.त्र्यं. जोशी, स्तंभलेखक (215 of 1224 articles)

Costal Security
राष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन | भारतीय समाजातील निरनिराळ्या उणिवांचा गैरफायदा घेण्यासाठी आय.एस.आय. आणि पाक लष्कर सक्रिय आहे. काळाची गरज ...

×