ads
ads
आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

•न्यायव्यवस्था बदनाम करण्याचा हा सुनियोजित कट, •सर्वोच्च न्यायालयाचा संताप,…

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

•पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्ला, दरभंगा, २५ एप्रिल – आतापर्यंत पाकिस्तानची…

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मुंबई, २४ एप्रिल – राग, नाराजी असे माणसाच्या स्वभावाचे…

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

•अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण, वॉशिंग्टन, २४ एप्रिल –…

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

•मृतांची संख्या ३२१, भारतीयांचा आकडाही वाढला, ४० जणांना अटक,…

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

•चीनने व्यक्त केली भीती, बीजिंग, २३ एप्रिल – इराणकडून…

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

•राहुल गांधी यांनी स्वीकारला •विरोधी पक्षनेतेपदही सोडले •काँग्रेसला आणखी…

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

•खोट्या जाहिरातींचे प्रकरण, मुंबई, २२ एप्रिल – शेतकर्‍यांना पाच-दहा…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 18:44
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, यमाजी मालकर, स्तंभलेखक » रुपे कार्ड : पॉवर ऑफ कॉमन मॅन!

रुपे कार्ड : पॉवर ऑफ कॉमन मॅन!

॥ अर्थपूर्ण : यमाजी मालकर |

Rupay Card

Rupay Card

जनहिताच्या एखाद्या योजनेमागे सरकार ठामपणे उभे राहिले तर काय होऊ शकते, याची चुणूक रुपे कार्डच्या वेगवान प्रसारातदिसून आली आहे. डेबिट आणि क्रेडीट कार्डच्या तंत्रज्ञानातमक्तेदारी असलेल्या व्हिसा आणि मास्टरकार्ड या कंपन्यांनी त्याबद्दल भारत सरकारची अमेरिकी प्रशासनाकडे तक्रार करण्यापर्यंतमजल गेली आहे, हा एक भाग झाला, पण रुपे कार्डच्या प्रसारात भारतातील सर्वसामान्य माणसाची ताकद ठळकपणे दिसली आहे. भारताने लोकसंख्येचा बोनस घेतला पाहिजे, असे जे नेहमी म्हटले जाते, तो बोनस घेतला गेला तर किती चांगला बदल होऊ शकतो, हेही रूपे कार्डच्या या प्रसाराच्या निमित्ताने समोर आले आहे. नोटबंदीसारखे देशाच्या स्वभावातील बदल सर्वसामान्य नागरिक किती चांगल्या पद्धतीने स्वीकारत आहेत, हेही रूपे कार्ड वापरणार्‍यांची वाढती संख्या अधोरेखित करते.
जागतिकीकरणाला आपल्या हितासाठी खतपाणी घालणार्‍या अमेरिकेने ते आपल्या हिताच्या विरोधात जाते, असे लक्षात आल्यावर जशी बचावात्मक भूमिका घेतली आहे, तशी भूमिका घेण्याचा अधिकार भारताला आहे. त्यामुळे व्हिसा आणि मास्टरकार्डच्या तक्रारीला अमेरिकी प्रशासन फार भीक घालणार नाही, अशी अपेक्षा आहे. पण जो खुलेपणा अमेरिका जगाला शिकविते, तो तिला काही बाबतीत मान्य नसतो, हे अनेकदा दिसून आले आहे. त्यामुळे अमेरिका आडमार्गाने व्हिसा आणि मास्टरकार्ड या कंपन्यांच्या मागे उभे राहण्याचा प्रयत्न करेल. पण यानिमित्ताने भारतात ज्या गोष्टी घडल्या आहेत, त्या फार महत्त्वाच्या आहेत.
रुपे कार्ड वापरात येऊन केवळ सहा वर्षे झाली आहेत. विशेषतः २०१५ च्या दिल्लीत झालेल्या आर्थिकपरिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुपे कार्डच्या वापरावर जोर दिला आणि रुपे कार्डच्या प्रसाराच्या अनेक योजना जाहीर केल्या, तेव्हापासून रुपे कार्डने आंतरराष्ट्रीय कार्ड कंपन्यांच्या नाकात दम आणला आहे. त्याच्या प्रसाराचा वेग पुढील आकडेवारीवर स्पष्ट होतो. रिझर्व बँकेच्या आकडेवारीनुसार डेबिट कार्डची देशातील एकूण संख्या ९२.५ कोटी एवढी आहे. यात ५० कोटी म्हणजे निम्म्यापेक्षा अधिक हिस्सा रूपे कार्डने अतिशय कमी काळात काबीज केला आहे. तब्बल अकराशे भारतीय बँका रुपे कार्डचे वितरण करतात. रुपे कार्डच्या मागे सरकारठामपणे उभे राहिल्यानेच हे शक्य झाले. उदा. २००९ ला रिझर्व बँकेने इंडियन बँक्स असोसिएशनला असे एखादे कार्ड काढण्यास सांगितले आणि तसे इंडिया कार्ड २०१२ ला अस्तित्वातही आले. पण २०१३ ला रुपे कार्डचा बाजारातील हिस्सा होता फक्त ०.६ टक्के. पण जेव्हा आर्थिक सामिलीकरणासाठी जनधन योजना लागू करण्यात आली (२००४), तेव्हा अशा सर्व खातेधारकांना रुपे कार्ड देण्याच्या सूचना सरकारने दिल्या आणि रुपे कार्डची दमदार वाटचाल सुरू झाली. २०१७-१८ या वर्षात ‘पॉईंट ऑफ सेल मशीन’वर रुपे कार्डचा होणारा वापर गेल्या वर्षाच्या तुलनेत १३५ टक्के वाढला आणि तो ४५.९ कोटी व्यवहारांपर्यंत पोचला. जो गेल्या वर्षी फक्त १९.५ कोटी होता. याच काळात वापरातील रुपे कार्डची संख्याही वेगाने वाढली, असे दिसते. ती आता ४९.४ कोटींच्या घरात गेली आहे. गेल्या वर्षी ती ३६ कोटी होती. म्हणजे एका वर्षांत ती ३५ टक्के वाढली.केवळ पॉईंट ऑफ सेल मशीनवरच नव्हे तर ई-कॉमर्स साईटवरही हा वापर वाढल्याचे दिसते आहे. २०१७ मध्ये केवळ ८.७५ कोटी कार्ड अशा साईटवर वापरली जात होती, ती संख्या २०१८ मध्ये २०.८ कोटी झाली, म्हणजे त्यात १३७ टक्के वाढ नोंदविली गेली. जनधन खातेधारकांकडेच रुपे कार्ड जास्त आहेत, त्यामुळे त्यावर असे किती व्यवहार होणार, अशी शंका घेतली जाऊ शकते. पण आकडेवारी असे सांगते की २०१७ ला रुपे कार्डच्या माध्यमातून केवळ पाच हजार ९३४ कोटी रुपयांचे व्यवहार झाले होते, ते २०१८ मध्ये १६ हजार ६०० कोटींवर पोचले आहेत. ही वाढ १८० टक्के इतकी आहे.
नोटबंदीपूर्वी रूपे कार्डच्या माध्यमातून होणारे व्यवहार एक हजार १०० कोटी रुपयांचे होते, त्यात आता मोठी वाढ झाली आहे. याचा अर्थ ती सेवा सामान्य माणसांपर्यंत पोचल्याने त्यांनी तिचा पुरेपूर वापर केला आहे. आंतरराष्ट्रीय कार्डांच्या तोडीस तोड कार्ड बाजारात उतरवून ते सरकारच्या मदतीने यशस्वी केल्याबद्दल ‘नॅशनल पेमेंटस कार्पोरेशन ऑफ इंडिया’ला (एनपीसीए) धन्यवाद दिले पाहिजेत. त्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप आसबे असून ते रुपे कार्डच्या अधिक वापराविषयी नव्या नव्या योजना आणत आहेत. उदा. रुपे कार्डच्या माध्यमातून जीएसटीचा भरणा केल्यासत्यासाठी कॅशबॅक देण्याची योजना गेल्या ऑगस्टपासून सुरू करण्यात आली आहे. व्हिसा आणि मास्टरकार्डसारख्या कंपन्या कार्ड वापरल्याबद्दल अधिक सेवाशुल्क आकारतात, पण रुपे कार्डने हे शुल्क खूप कमी ठेवल्याने त्याचा वापर वाढला. नॅशनल पेमेंटस कार्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीए) केवळ साठ पैसे शुल्क आकारते, जीव्हिसा आणि मास्टरकार्डपेक्षा खूपच कमी आहे. सर्वसामान्य माणसाने ते वापरण्यासाठी हे शुल्क कमी ठेवणे ही गरज होतीच.
रुपे कार्डसमोरजी दोन आव्हाने आहेत, त्यातील पहिले म्हणजे जे अधिक रकमेचे व्यवहार कार्डने करणारे श्रीमंत भारतीय आहेत, त्यांच्यात अजून रुपे कार्डचा वापर कमी आहे. त्यामुळे रुपे कार्डचा वापर वाढला असला तरी त्याच्या एकूण व्यवहाराचे मूल्य कमी आहे. जनधन खाती असणार्‍या ३० कोटी गरिबांना ती देण्यात आलेली असल्याने त्यांचा वापर साहजिकच ग्रामीण भागात अधिक आहे. दुसरे आव्हान आहे, ते इतर देशात रुपे कार्डला अजून तेवढा स्वीकार नाही. यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, मात्र त्याला वेळ लागेल असे दिसते. अर्थात, या आव्हानांमुळे रुपे कार्डचे महत्त्व अजिबात कमी होत नाही. ज्यांचा बँकिंग आणि डिजिटल व्यवहारांशी कधी सबंधच आला नव्हता, त्यांच्यासाठीचा हा पुढाकार असल्याने तो उद्देश्य सफल होतो आहे, हे महत्त्वाचे.
सुरुवातीला म्हटल्यानुसार भारताने अशा अनेक बाबतीत लोकसंख्येच्या बोनसचा पुरेपूर फायदा घेण्याची गरज आहे. ही लोकसंख्या चांगला ग्राहक होण्याची गरज आहे आणि ती प्रक्रिया निरंतर राहणार आहे. एका रुपे कार्डच्या प्रसारात लोकसंख्येचा हा बोनस घेतला गेला, तरी आंतरराष्ट्रीय कंपन्या खडबडून जाग्या झाल्या. असेच प्रयत्न इतर क्षेत्रातही केले गेले तर आपली खरी ताकद आपल्याला कळेल. व्हिसा आणि मास्टरकार्डच्या तक्रारीला सरकार भीक घालणार नाही, मात्र त्यासाठी भारतीय नागरिक म्हणून रुपे कार्डचा वापर असाच वाढत राहिला पाहिजे. कारण ती आपलीच जबाबदारी आहे.

Posted by : | on : 25 Nov 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, यमाजी मालकर, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, यमाजी मालकर, स्तंभलेखक (388 of 1372 articles)


तोरसेकर | गोव्यातील सत्ता मागील विधानसभा निवडणुकीत गमावण्याची पाळी भाजपावर आली, तेव्हा त्या छोट्या राज्यातील आजचा सर्वाधिक लोकप्रिय नेता दिल्लीतून ...

×