ads
ads
सजा पक्की : कशी? ते लष्कर ठरवेल!

सजा पक्की : कशी? ते लष्कर ठरवेल!

•पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पांढरकवड्यात पाकला इशारा •कोलामी, बंजारा,…

पाकिस्तानातील आयातीत वस्तूंवर २०० टक्के कर

पाकिस्तानातील आयातीत वस्तूंवर २०० टक्के कर

नवी दिल्ली, १६ फेब्रुवारी – पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती…

भारताला स्वरक्षणाचा अधिकार

भारताला स्वरक्षणाचा अधिकार

•अमेरिकेच्या एनएसएचा अजित डोवाल यांना फोन, नवी दिल्ली/वॉशिंग्टन, १६…

भारताने डगमगू नये, ठोस कारवाई करावी

भारताने डगमगू नये, ठोस कारवाई करावी

•अमेरिकेतील ७० खासदारांची भूमिका, वॉशिंग्टन, १६ फेब्रुवारी – पुलवामातील…

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी

•पाकिस्तानने व्यक्त केली वचनबद्धता •कुलभूषण जाधव प्रकरण, लाहोर, १६…

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

पुलवामा हल्ल्यात आयएसआयचा हात

वॉशिंग्टन, १५ फेब्रुवारी – ४० जवानांचे बळी घेणार्‍या पुलवामा…

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

१५१ दुष्काळी तालुक्यात १,४५४ कोटी वितरित

•निधी वितरणाचा दुसरा टप्पा, तभा वृत्तसेवा मुंबई, १५ फेब्रुवारी…

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

मातृतीर्थ विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस

•विकास कामांचे भूमिपूजन •दुष्काळी परिस्थितीत शेतकर्‍यांच्या पाठीशी, बुलढाणा, १४…

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

वरवरा राव, गडलिंग येरवाडा कारागृहात

पुणे, १२ फेब्रुवारी – शहरी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:53 | सूर्यास्त: 18:27
अयनांश:
Home » आसमंत, डॉ.परीक्षित स. शेवडे, पुरवणी, स्तंभलेखक » वाघ वाचवा; नक्षलवाद घटवा!

वाघ वाचवा; नक्षलवाद घटवा!

॥ टेहळणी : डॉ.परीक्षित स. शेवडे |

स्थानिकांना असलेली भीती वा त्यांचे झालेले नुकसान याबाबत पूर्ण सहानुभूती राखत वाघिणीला पकडून अन्यत्र हलवायला हवे होते, असे माझेही मत आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, तिच्यावर अवलंबून असलेले तिचे दोन बछडे होय. काही महिन्यांच्या या बछड्यांना जिवंत राहायचे असल्यास आपल्या आईकडून शिकार शिकणे महत्त्वाचे होते. एकीकडे ‘वाघ वाचवा’ मोहीम सुरू असताना एखाद्या वाघिणीला ठार करून तिच्यावर अवलंबून असलेल्या दोन बछड्यांचाही जीव धोक्यात घालणे, हे अयोग्यच होते.

Tiger Pti

Tiger Pti

नोव्हेंबर २०१८ च्या सुरुवातीस विदर्भातील पांढरकवडा परिसरातील वाघीण अवनी/टी-१ हिला ठार करण्यात आले आणि प्रसिद्धी माध्यमांतील चर्चेला उत आला. या प्रकरणातदेखील दोन टोकाच्या भूमिका घेतल्या गेल्याचे आपल्या नजरेस पडले असेल. प्राणीप्रेमी गट हा ‘अवनीला मारायला नको होते,’ या मताचा होता. कित्येकांनी तर ‘सेव्ह अवनी’ अशी ऑनलाईन मोहीमदेखील सुरू केली होती. दुसरीकडे पीडितांचे मत मात्र अगदी याविरुद्ध होते. सदर वाघीण नरभक्षक असल्याने आणि तिने १४ जीव घेतल्याने तिला ठार करणेच योग्य, असे संबंधितांचे म्हणणे होते. महाराष्ट्राच्या वनविभागाने खास या वाघिणीला मारण्यासाठी हैदराबादहून शिकार्‍याला बोलावून घेतले होते. वास्तविक पाहता न्यायालयानेदेखील वाघिणीला ठार करणे हा शेवटचा पर्याय असावा, असे मत नोंदवले होते. वनविभागही तसेच बोलत होता, असे म्हणण्यास बंधन नसावे! स्थानिकांना असलेली भीती वा त्यांचे झालेले नुकसान याबाबत पूर्ण सहानुभूती राखत वाघिणीला पकडून अन्यत्र हलवायला हवे होते, असे आमचेही मत आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, तिच्यावर अवलंबून असलेले तिचे दोन बछडे होय. काही महिन्यांच्या या बछड्यांना जिवंत राहायचे असल्यास आपल्या आईकडून शिकार शिकणे महत्त्वाचे होते. एकीकडे ‘वाघ वाचवा’ मोहीम सुरू असताना एखाद्या वाघिणीला ठार करून तिच्यावर अवलंबून असलेल्या दोन बछड्यांचाही जीव धोक्यात घालणे हे अयोग्यच होते. मात्र; प्राप्त परिस्थितीनुसार अवनीला ठार करण्यात आले आणि एक प्रकरण संपले.
भारत, रशिया, इंडोनेशिया, मलेशिया, बांग्लादेश, भूतान इत्यादी देशांत वाघ हा डौलदार प्राणी आढळतो. कित्येक वर्षे या प्राण्याची नखे, दात, कातडी इत्यादी मिळवण्यासाठी शिकार होत आली आहे. पारंपरिक चिनी औषधांत वाघाच्या जननेंद्रियाचा उपयोग होत असल्याने हे शिकारीचे प्रमाण अधिकच वाढले. अखेरीस ही प्रजात धोक्यात येण्याची चिन्हे लक्षात येताच १९७३ साली हिंदुस्थानात ‘प्रोजेक्ट टायगर’ची सुरुवात झाली. आपल्या देशाचा विचार करता; वाघांच्या शिकारीला कारणीभूत असलेला फार मोठा गट म्हणजे नक्षलवादी! वाघाच्या अवयवांची तस्करी करून मिळणारा पैसा आणि वाघमुक्त घनदाट जंगलात वावरण्याचे अभय या दोन्ही बाबींमुळे नक्षलवाद्यांनी मोठ्या प्रमाणात वाघांच्या कत्तली केल्या किंवा तसे करण्यास इतरांना प्रोत्साहन दिले. मात्र जसजसे ‘प्रोजेक्ट टायगर’ यशस्वी होऊ लागले, तसतसे या कारवायांना चाप बसू लागला. शिवालिक-तराई, ईशान्य घाट, सुंदरबन, पूर्व घाट, पश्‍चिम घाट, सारिस्का आणि काझीरंगा असे उपविभाग करून हे अभियान राबवण्यास सुरुवात झाली. हे अभियान राबवताना सुमारे अडीच लाख नोकर्‍या निर्माण झाल्या. पैकी १५,००० नोकर्‍या या संबंधित क्षेत्रातील वनवासी बांधवांना देण्यात आल्या. त्यांना वनसंरक्षक, वाहन चालक, जीपीएस गाईड, वणव्याची वर्दी देण्यास, खबरी इत्यादी विविध कामांसाठी ५००० ते २०,००० रुपये मासिक पगाराच्या नोकर्‍या देण्यात आल्या. याच्या जोडीला हे वनवासी जंगलातून मध, औषधी वनस्पती गोळा करून शहरांत विकू शकत होते; त्यानेही त्यांचे उत्पन्न वाढले. छत्तीसगडसारख्या राज्यांत सुरू झालेल्या वन-धन योजनासारख्या योजनेने याला अधिक व्यापक स्वरूप आणि सरकारमान्यताही मिळवून दिली. या सार्‍याचा परिणाम म्हणजे, स्थानिक वनवासींनी नक्षल्यांच्या वाघशिकारीच्या प्रयत्नांना विरोध करण्यास सुरुवात केली. हे सारे कागदी गृहीतक नसून प्रत्यक्ष आकडेवारीच्या आधारे ही बाब समोर आली आहे. ज्या ज्या राष्ट्रीय उद्यानांमध्ये ‘प्रोजेक्ट टायगर’ यशस्वीपणे राबवला गेला, त्या त्या ठिकाणी नक्षलवादात लक्षणीय घट झालेली दिसून येत आहे.
छत्तीसगडमध्ये २०१० साली २४ वाघ होते. २०१४ साली ही संख्या वाढून २६ तर आजमितीला ४६ वाघ इतकी झाली आहे. राज्यातील बिजापूर परिसरात ‘इंद्रावती व्याघ्र प्रकल्प’ मोडतो. आकडेवारी पाहता, छत्तीसगढमध्ये २०१० साली ५२१ नक्षली हल्ले, वर्ष २०१६ मध्ये ३९५ नक्षली हल्ले झाले. तर हीच संख्या वर्ष २०१७ मध्ये २२१ हल्ल्यांवर येऊन ठेपली. ओडिशामधील व्याघ्रप्रकल्पाने २०१० सालानंतर जोर पकडला. तिथे गेल्या आठ वर्षांत सुमारे १२०० स्थानिकांना या प्रकल्पात नोकरी मिळाली आहे. वाघांची संख्या जसजशी वाढली, तसतसे इंद्रावतीसारखेच परिणाम इथेही दिसून आले आहेत. ओडिशामध्ये २०१० साली २१८ नक्षली हल्ले नोंदले. वर्ष २०१६ मध्ये ही संख्या ८६ इतकी तर वर्ष २०१६ मध्ये ४१, वर्ष २०१७ मध्ये २० इतकी कमी झाली. आंध्रातील नागार्जुन- श्रीशैलम व्याघ्रप्रकल्पात स्थानिक चेनू वनजमातीच्या नागरिकांना नोकरी देण्यात आली. २०१० साली इथे १०० नक्षली हल्ले झाले होते; जे २०१६ पर्यंत केवळ १७ वर येऊन थांबले होते. थोडक्यात काय, तर वाघ वाढले तसे नक्षली हल्ले कमी झाले, हे थेट गुणोत्तर आहे.
एकीकडे वाघांची संख्या वाढत असली, तरी दुसरीकडे प्रचंड जंगलतोडीमुळे त्यांचा नैसर्गिक आश्रय नष्ट होत असल्याचेही चित्र आहे. जंगले नष्ट झाली तर वाघ आपला परिसर वाढवण्यास तिथून बाहेर पडणार, हा निसर्गनियम आहे. अशा स्थितीत आसपासच्या माणसांवर हल्ले करणे, त्यांना ठार करणे इत्यादी धोके वाढतात. वाघ सहसा माणसावर हल्ला करत नाही, मात्र एकदा शिकारीस अत्यंत सोपे असलेले हे सावज सापडले की; त्याला थोपवणेदेखील अवघड होते. अवनीच्या बाबतीत हाच प्रकार घडला असावा. दुर्दैव म्हणजे, ही घटना घडल्यानंतर लवकरच आणखी दोन वाघाचे बछडे ट्रेनचा धक्का लागून मृत्युमुखी पडले. व्याघ्रप्रकल्प असलेल्या परिसरातून जाताना ट्रेन्सचा वेग मर्यादेत ठेवा अशा सूचना देऊनही हे प्रकार घडणे, चीड आणणारे आहे. आजच्या घडीला देशात चार हजारांहून अधिक वाघ असतील. नेमका आकडा पुढील वर्षीच्या व्याघ्र जणगणनेत कळेल. मात्र; ही वाढ ‘प्रोजेक्ट टायगर’च्या यशाची साक्ष आहे; तसेच नक्षल्यांच्या पोटात गोळा आणणारीदेखील आहे. आपण निसर्गाला ओरबाडून खाण्याचा हव्यास आवरला तरच निसर्ग आपल्याला जगवेल. अन्यथा शेकरू, चित्ता इत्यादी प्राणी जसे आपण महाराष्ट्रातून कायमचे घालवून बसलो आहोत; तीच वेळ स्वतः निसर्ग आपल्यावर आणू शकतो, याची जाणीव हवी!

Posted by : | on : 9 Dec 2018
Filed under : आसमंत, डॉ.परीक्षित स. शेवडे, पुरवणी, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, डॉ.परीक्षित स. शेवडे, पुरवणी, स्तंभलेखक (200 of 1220 articles)

Coastal Security
राष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन | सागरी सुरक्षेच्या उपायांचे यश किनारी राज्यांच्या सहभागपातळीवर अवलंबून असते. सागरी सुरक्षेबाबतच्या शिफारसी त्यामुळेच किनारी ...

×