ads
ads
आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

•न्यायव्यवस्था बदनाम करण्याचा हा सुनियोजित कट, •सर्वोच्च न्यायालयाचा संताप,…

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

•पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्ला, दरभंगा, २५ एप्रिल – आतापर्यंत पाकिस्तानची…

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मुंबई, २४ एप्रिल – राग, नाराजी असे माणसाच्या स्वभावाचे…

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

•अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण, वॉशिंग्टन, २४ एप्रिल –…

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

•मृतांची संख्या ३२१, भारतीयांचा आकडाही वाढला, ४० जणांना अटक,…

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

•चीनने व्यक्त केली भीती, बीजिंग, २३ एप्रिल – इराणकडून…

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

•राहुल गांधी यांनी स्वीकारला •विरोधी पक्षनेतेपदही सोडले •काँग्रेसला आणखी…

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

•खोट्या जाहिरातींचे प्रकरण, मुंबई, २२ एप्रिल – शेतकर्‍यांना पाच-दहा…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 18:44
अयनांश:
Home » आसमंत, डॉ.वाय.मोहितकुमार राव, पुरवणी, स्तंभलेखक » विचलित होण्यासाठीच आहे आपला जन्म?

विचलित होण्यासाठीच आहे आपला जन्म?

॥ अभिप्राय : डॉ.वाय.मोहितकुमार राव |

आम्ही कोणत्याही घटनेवर तत्काळ प्रतिक्रिया देतो. समाजमन भडकविण्याचा प्रयत्न करतो. अराजकता निर्माण होण्यास हातभार लावतो. अव्यवस्था निर्माण करण्यासही आम्हीच कारणीभूत असतो. आम्हीच उन्मादही माजवतो. आम्हीच गोंधळही करतो. गदारोळही आम्हीच माजवितो. जेवढे म्हणून नियमांचे उल्लंघन करता येईल, तेवढे आम्हीच करतो. मरणशीलता आम्हीच ओढवून घेतो. आमची समाजव्यवस्था आम्हीच बिघडविली आहे. सगळीकडे अस्तित्वासाठी संघर्ष चालला आहे. जिवंत राहण्यासाठी लढाई चालली आहे.

Train Accident

Train Accident

एखादी दुर्दैवी घटना घडली की आम्ही विचलित होतो. दु:खी होतो. अस्वस्थही होतो. त्यावर तत्काळ प्रतिक्रिया देतो. प्रतिक्रिया वैयक्तिकही असते अन् सामूहिकही. अनेकांना संतापही अनावर होतो. संतापाच्या भरात काही जण काहीबाही बोलतात. नंतर त्यांना आपल्या बोलण्याचा पश्‍चात्तापही होतो. कधी अपघात घडून असंख्य लोक मृत्युमुखी पडतात, तर कधी नदीत बोट उलटून अनेकांना जलसमाधी मिळते. कधी एखाद्या मंदिरात चेंगराचेंगरी होते, तर कधी सार्वजनिक कार्यक्रमात ढकलाढकली होऊन जीव गुदमरतो अन् मृत्यू येतो. कधी विषारी वायूमुळे जीव गुदमरल्याने अनेकांना प्राण गमवावे लागतात, तर कधी एखाद्या इमारतीत लागलेल्या आगीत आमचे बांधव होरपळून मरतात. या व अशा प्रकारच्या घटना घडल्या की आम्ही हळहळ व्यक्त करतो. वर्तमानपत्रात बातम्या प्रकाशित होतात. कधी सरकारच्या बेजबाबदारपणावर आसूड ओढले जातात, तर प्रसंगी ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या चुकांवर बोट ठेवले जाते. पण, सगळ्यात दुर्दैवी बाब ही की, या सगळ्यातून आम्ही काहीच धडा शिकत नाही. पुढची घटना घडेपर्यंत आम्ही बेसावध राहतो. हे कुठेतरी थांबले पाहिजे.
माणसाला मन असते, मनात भावना असतात, या भावना कधी आनंद देणार्‍या असतात, तर कधी विचलित करणार्‍या. माणसाचं मन तसंही अस्थिर असतं. या अस्थिर मनाला आणखी अस्थिर करणार्‍या घटना घडल्यात की, मग समाजापुढे एक नवे संकट उभे ठाकते. विचलित होणं, अस्वस्थ होणं हा माणसाचा स्वभावच आहे. आपण कधी आनंदी असतो, कधी दु:खी होतो, तर कधी आपल्या मनात संमिश्र भावना असतात. एकाच दिवसात आपण वेगवेगळे अनुभव घेत असतो. असे असले तरी व्यक्तिश: प्रत्येकाने आणि संपूर्ण समाजाने एक निर्धार केला पाहिजे. जी घटना घडते, त्यातून बोध घेत त्या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. नव्या प्रकारची घटना घडू शकते. तिला तोंड देण्याची आपली तयारी असली पाहिजे. आपत्ती व्यवस्थापनाचे धडे तर आम्ही घेतलेच पाहिजे, घडलेल्या घटनेतून बोध घेऊन पुढची वाटचाल करायला शिकले पाहिजे.
आपल्याकडे कचरा जाळण्यास मनाई आहे. कचरा जाळू नये असा निर्णय कोर्टानेच दिला आहे. कचरा जाळल्याने धूर होतो, त्यामुळे प्रदूषण होते, श्‍वास घेण्यास त्रास होतो, श्‍वसनाचे आजार होतात, त्यातूनच मग फुफ्फुस निकामी व्हायला सुरुवात होते. हे सगळे माहिती असतानाही आम्ही कचरा जाळतो, नियमांचे उल्लंघन करतो, धूर तयार करतो अन् प्रदूषण वाढवतो. राजधानी दिल्लीत सगळ्यात जास्त धुके असते. हे धुके हरयाणा आणि पंजाबमध्ये पिकांना पाणी दिले जात असल्याने निर्माण होते असे सांगितले जाते. पण, त्याचबरोबर तिथल्या शेतांमध्ये जो कचरा जाळला जातो, त्याचा धूर दिल्लीपर्यंत येतो. दिल्लीच्या आकाशात प्रदूषण फैलते. या प्रदूषणाचा फटका सरतेशेवटी आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांनाच बसतो. गेल्या मोसमात आपण पाहिलेच होते की, धुके आणि धुरामुळे दृश्यता कमी होती. त्याचा परिणाम रेल्वे, रस्ते आणि हवाई वाहतुकीवरही झाला होता. दररोज अनेक रेल्वेगाड्या रद्द झाल्या होत्या. विमानांची उड्डाणं रद्द झाली होती. रस्त्यांवर अपघात घडून त्यात निष्पाप लोकांचे जीव गेले. ज्या वेळी पंजाब-हरयाणातले शेतकरी पिकांचे अवशेष जाळत होते, त्या वेळी निर्माण झालेल्या परिस्थितीवर आम्ही तत्कालिक चिंता व्यक्त केली. पण, जसे धुराचे आणि धुक्याचे साम्राज्य दूर झाले, आम्ही पुन्हा निश्‍चिंत झालो. आमची बेचैनीही दूर झाली. आमची अस्वस्थताही संपली. आमची चिंताही मिटली. आमच्या चिंतेच्या सगळ्या भावना अनंतात विलीन झाल्या.
दोन वर्षांपूर्वी पाटणा येथे नदीत बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत २० लोकांचा मृत्यू झाला होता. या २० लोकांच्या आत्म्याला शांती मिळण्याआधीच ही घटना आमच्या विस्मरणातही गेली. पण, बोटीची जेवढी क्षमता आहे, त्यापेक्षा जास्त लोकांनी त्यात बसू नये, हा धडा आम्ही यातून शिकत नाही. देशाच्या कुठल्यातरी भागात पुन्हा अशी एखादी बोट दुर्घटना होईपर्यंत आम्ही निश्िंचत असतो. झालेही तसेच. मुंबईजवळच्या समुद्रात शिवस्मारकाच्या निमित्ताने गेलेली बोट बुडाली. त्यात सरकारी अधिकारी होते. पण, सुदैवाने सगळे वाचले अन् एक तरुण मात्र दुर्दैवाने बुडाला. एखाद्या ठिकाणी एखादी दुर्दैवी घटना घडू शकते, याचा अंदाज आम्हाला कधीच येत नाही. कारणही नाही. अशा ज्या दुर्घटना घडतात, त्या जर आम्ही स्मरणात ठेवल्या अन् त्यातून काही धडा घेतला, तर अशा घटनांची पुनरुक्ती टाळता येऊ शकते. कधी वर्षभरापूर्वी बांधलेला पूल वाहून जातो, तर कधी वेगात धावणारी रेल्वे गाडी रुळावरून घसरते, तर कधी दुसर्‍या गाडीवर जाऊन आदळते. देशात अशी असंख्य गावे आहेत, जिथे दरवर्षी नद्यांना पूर येतो आणि ही गावे पाण्याखाली जातात. पुराची दृश्ये आम्ही टीव्ही वाहिन्यांवर बघत असतो. बघताना आमच्या काळजाचा ठोकाही चुकतो. काही क्षण आम्ही आमच्या सुरक्षित असलेल्या घरात जीव मुठीत घेऊन बसतो. पूरग्रस्तांविषयी चिंता व्यक्त करतो. पण, चार दिवसांनी सगळे काही विसरून जातो. पुन्हा पुढची घटना होऊन मन विचलित व्हावे याची वाट तर आम्ही पाहात नाही ना, याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.
घटना घडल्यानंतर विचलित होणे आणि पुन्हा सर्वकाही विसरून पुढली वाटचाल करीत नवी घटना घडल्यानंतर विचलित होणे, ही आमची सामूहिक ओळख झाली आहे जणू. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर अपघाताच्या अनेक घटना घडतात. एक प्रश्‍न उपस्थित होतो तो असा- या रस्त्यावर अपघात होतात, याला फक्त हा रस्ताच जबाबदार आहे काय? गाडी चालविणार्‍यांची काहीच जबाबदारी नाही? आधी जे अपघात घडलेत, त्यावरून कोणीच काही धडा घ्यायचा नाही? गाडीचा वेग नियंत्रित करता येईल अन् गाडी सुरक्षित थांबविता येईल, एवढाच वेग असायला नको? गाडी चालवीत असताना आपण पूर्णपणे तंदुरुस्त असायला हवे, मदिरेच्या आहारी गेलेलो नसावे, आपण जे वाहन चालवीत आहोत, त्या वाहनाचा ब्रेक उत्तम आहे, टायर्स चांगले आहेत, इंजिनात कोणत्याही प्रकारचा बिघाड नाही, रात्रीच्या वेळेस वाहन चालवायचे असल्याने वाहनाला लागलेले लाईटस् ठीक आहेत काय, बॅटरी काम करते आहे का, या सगळ्या बाबी तपासून घेण्याची जबाबदारी कोणाची?
दसर्‍याच्या दिवशी अमृतसर येथे घडलेली घटना आपल्या सगळ्यांच्याच लक्षात आहे. रावणदहनाचा कार्यक्रम सुरू होता. अगदी रेल्वे ट्रॅकच्या बाजूला सुरू होता. त्यामुळे लोकही ट्रॅकवर उभे राहून रावणदहन बघत होते. नुसतेच बघत नव्हते, तर मोबाईलवर चित्रीकरण करत होते. त्यामुळे रेल्वे गाडीने दिलेला हॉर्न त्यांना ऐकू आला नाही. जी दुर्घटना घडली त्यात पन्नासपेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले. आता या घटनेसाठी आपण रेल्वेलाच जबाबदार धरायचे काय? ट्रॅकवर उभे राहणे गुन्हा आहे हे माहिती असतानाही आपण तसे करणार असू, तर रेल्वेची जबाबदारी काय? ज्यांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबीयांप्रती संपूर्ण सहानुभूती बाळगूनही दोष रेल्वेला देता येईल काय? आता यातून एकच धडा घेतला पाहिजे आणि तो म्हणजे ट्रॅकच्या बाजूला असले कार्यक्रम घेऊ नयेत आणि ट्रॅकवर चुकूनही उभे राहू नये.
अनेकांचा मृत्यू अकाली असल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा पहाड कोसळला. जग पाहण्याआधीच काही मुलं आपल्यातून निघून गेली. कुटुंबीयांसोबतच संपूर्ण समाजमनही हळहळलं. या घटनेमुळे प्रत्येकाला दु:ख झालं. समाजमन विलचित झालं. आता ही घटनाही आपल्या विस्मरणात जाईल. कारण, तोपर्यंत एखादी नवीन घटना घडलेली असेल. आपला जन्म फक्त विचलित होण्यासाठीच आहे काय, याचा विचार आता गांभीर्याने करावा लागणार आहे. विचलित होऊन आपण त्यातून काहीच शिकणार नसू, तर सतत विचलित होत राहू आणि निष्पाप जीव गमावत राहू, दुसरे काय? अमृतसरला घडली, तशा अनेक घटना यापूर्वी वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या आहेत. त्यावरून जरी बोध घेतला असता, तरी अमृतसरची घटना टाळता आली असती. पण, बोध घ्यायचाच नाही असा निर्धार आम्ही केला असेल, तर ईश्‍वरही आम्हाला वाचवू शकत नाही!
आम्ही कोणत्याही घटनेवर तत्काळ प्रतिक्रिया देतो. समाजमन भडकविण्याचा प्रयत्न करतो. अराजकता निर्माण होण्यास हातभार लावतो. अव्यवस्था निर्माण करण्यासही आम्हीच कारणीभूत असतो. आम्हीच उन्मादही माजवतो. आम्हीच गोंधळही करतो. गदारोळही आम्हीच माजवितो. जेवढे म्हणून नियमांचे उल्लंघन करता येईल, तेवढे आम्हीच करतो. मरणशीलता आम्हीच ओढवून घेतो. आमची समाजव्यवस्था आम्हीच बिघडविली आहे. सगळीकडे अस्तित्वासाठी संघर्ष चालला आहे. जिवंत राहण्यासाठी लढाई चालली आहे. जे दुर्बल आहेत, ते या लढाईत पराभूत होणार नसले, तरी त्यांचे जीवनमान निश्‍चितपणे कमी गुणवत्तेचे असणार. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. योग्य निर्णय घेतला. काळा पैसा आणि भ्रष्टाचार संपुष्टात आणण्यासाठी पंतप्रधानांनी हा निर्णय घेतला. पण, काही नतद्रष्टांनी या निर्णयाला विरोध करून देशभर गदारोळ माजविला. अव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सरकारने घेतलेल्या चांगल्या निर्णयाला पाठिंबा देण्याऐवजी त्यांनी विरोध केला. त्यांनी असे करण्यामागे काय हेतू होता, हे लपून राहिलेले नाही. त्यामुळे प्रगतिपथावर वाटचाल करायची की स्वत:ला अधोगतीच्या खाईत लोटायचे, हे आता आपल्यालाच ठरवायचे आहे.

Posted by : | on : 9 Dec 2018
Filed under : आसमंत, डॉ.वाय.मोहितकुमार राव, पुरवणी, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, डॉ.वाय.मोहितकुमार राव, पुरवणी, स्तंभलेखक (350 of 1372 articles)

Currency1 500rs New Note Bundle
अर्थपूर्ण : यमाजी मालकर | आपल्या देशातील नागरिकांच्या वृत्तीवर बोलायला आपल्यापैकी अनेकांना खूप आवडते. त्यातील बहुतेकांना आपण सोडून बाकी नागरिक ...

×