ads
ads
दोन टप्प्यानंतर ममता झोपल्याच नाहीत

दोन टप्प्यानंतर ममता झोपल्याच नाहीत

•पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, बुनियादपूर, २० एप्रिल –…

दहशतवाद, पाकला प्रत्युत्तर देण्यासाठी मोदीच पंतप्रधान हवेत : अमित शाह

दहशतवाद, पाकला प्रत्युत्तर देण्यासाठी मोदीच पंतप्रधान हवेत : अमित शाह

बंगरूळु, २० एप्रिल – देश सुरक्षित राहण्यासाठी आणि दहशतवाद…

राज्यांमध्ये लवकरच सायबर न्यायवैद्यक प्रयोगशाळा

राज्यांमध्ये लवकरच सायबर न्यायवैद्यक प्रयोगशाळा

•महिलाविरोधी गुन्ह्यांतील डीएनए चाचणी होईल शक्य, नवी दिल्ली, २०…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

कराची, १८ एप्रिल – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात एका महामार्गावर…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

सोलापूर, १४ एप्रिल – काँग्रेस हा गाढवांचा पक्ष असल्याची…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » आसमंत, डॉ.वाय.मोहितकुमार राव, पुरवणी, स्तंभलेखक » विज्ञान, तंत्रज्ञान आणि आपण

विज्ञान, तंत्रज्ञान आणि आपण

॥ अभिप्राय : डॉ.वाय.मोहितकुमार राव |

विज्ञानाचे शिक्षण तसे सोपे नाही. सगळ्यांनाच त्यात रुची असत नाही. पण, प्रत्येकाला त्यात रुची वाटावी यादृष्टीने जर विज्ञानाच्या अभ्यासक्रमाची रचना केली, प्रत्येकाला त्याच्या मातृभाषेत विज्ञान शिकविता आले तर ते अधिक हितकारक सिद्ध ठरेल. चीन, जपान, दक्षिण कोरिया यासारखे देश जर विज्ञान त्यांच्या त्यांच्या भाषेत शिकवत असतील तर भारतात असलेल्या सगळ्या प्रमुख भाषांमध्ये विज्ञान विषयाचा अभ्यासक्रम तयार करण्यात गैर काहीच नाही.

Techonology

Techonology

विज्ञान, तंत्रज्ञान आणि माहिती व प्रसारणाच्या क्षेत्रात भारताने आज नाव कमावले आहे. या क्षेत्रात जगात जे मोजके अव्वल देश आहेत, त्यात भारताचा समावेश आहे, ही आपल्या सगळ्यांसाठीच अभिमानाची बाब होय. या क्षेत्रात केलेल्या प्रगतीवर गर्व करावा, अशी परिस्थिती आणि चित्र नक्कीच आहे. देशात आतापर्यंत आलेली सरकारे आणि देशभक्त वैज्ञानिकांनी दाखविलेल्या इच्छाशक्तीच्या बळावरच भारताने ही प्रगती साध्य केली आहे, यात शंका नाही. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती साधताना मार्गात अनेक अडथळे आले, अमेरिकेसारख्या देशांचे प्रतिबंध आले. पण, भारतीय वैज्ञानिकांचा दृढ संकल्प आणि सरकारांचे धाडस या जोरावर भारताने कायम प्रगतीच केली, यात शंका नाही. १९७५ साली भारताने ‘आर्यभट्ट’ हा पहिला उपग्रह अवकाशात सोडला आणि २०१७ साली एकाचवेळी १०४ उपग्रह अवकाशात सोडून संपूर्ण जगाला आश्‍चर्यचकित केले. एवढ्या मोठ्या संख्येतील हे उपग्रह अंतरिक्षात स्थापित करणे सोपी गोष्ट नव्हती. पण, आत्मविश्‍वास, दृढ निर्धार, देशाभिमान, कठोर परिश्रम या जोरावर भारतीय वैज्ञानिकांनी अशक्य गोष्ट शक्य करून दाखवत जगाला तोंडात बोटे घालायला लावली, यातच सगळे आले.
भारताने तयार केलेली अण्वस्त्रसज्ज पाणबुडी ‘अरिहंत’ हा आपल्या वैज्ञानिक प्रगतीमधील मैलाचा दगड ठरला. या अरिहंत पाणबुडीने ६ नोव्हेंबर रोजी आपले पहिले अभियान पूर्ण केले. पाण्यातून प्रचंड मारक क्षमता असलेली ही पाणबुडी अतिशय विश्‍वासार्ह अण्वस्त्रप्रतिरोधक क्षमता प्रदान करते आहे, ही बाब समस्त देशवासीयांना सुखावणारी आहे. अरिहंतचे अभियान देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय आवश्यक मानले जाते. कारण, आपल्या आजूबाजूला असलेले चीन आणि पाकिस्तान हे दोन देश कायम आपल्याला त्रास देत असतात. आपले हे शेजारी सुरक्षेच्या दृष्टीने घातक असून, त्यांचा मुकाबला करण्यासाठी आणि त्यांना धाकात ठेवण्यासाठी अरिहंतची आवश्यकता होती. ती आपल्या वैज्ञानिकांनी पूर्ण केली, याबद्दल त्यांचे अभिनंदन केलेच पाहिजे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने देशात ज्या वैज्ञानिक संस्था स्थापन केल्या होत्या, त्या आज किती सक्षम झाल्या आहेत, याचा प्रत्यय आपल्याला येत आहे. देशातील तरुणांमध्ये वैज्ञानिक प्रतिभा निर्माण व्हावी म्हणून या संस्थांनी जे योगदान दिले, ते अतुलनीय असेच आहे. बार्क, सीएसआयआर, डीआरडीओ, इस्रो, आयआयटी, एनसीईआरटी या महत्त्वाच्या संस्थांशिवाय देशातील अनेक विद्यापीठेही सहभागी आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. या संस्थांमध्ये आणि विद्यापीठांमध्ये शिक्षण घेतलेल्या तरुणांनी भारताला विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगतिपथावर तर नेलेच आहे, जगभरात भारताचा डंकाही वाजविला आहे. नासा ही अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था आहे आणि या संस्थेत भारतीय तरुण मोठ्या संख्येत काम करीत आहेत. या भारतीय तरुणांनी जी अभूतपूर्व कामगिरी केली, त्याकडे सर्वप्रथम जागतिक समुदायाचे लक्ष वेधले गेले. त्यानंतर अमेरिकेतीलच सिलिकॉन व्हॅलीमध्ये भारतीय तरुणांनी जी अफाट कामगिरी पार पाडली, त्यामुळे तर भारतीयांचे वर्चस्वच प्रस्थापित झाल्याचे सिद्ध झाले.
विद्यमान परिस्थितीत भारताला अधिक सतर्क आणि सजग राहावे लागणार आहे. कारण, पाकिस्तान आणि चीन हे दोन्ही देश कुरापती करीत असतात. या पृष्ठभूमीवर अरिहंतचे भारतीय नौदलाच्या ताफ्यात सहभागी होणे महत्त्वाचे मानले पाहिजे. संपूर्ण जगातच शस्त्रास्त्र स्पर्धा चालली आहे. एकाने एक मिसाईल विकसित केले तर दुसरा त्यावर मात करण्याचा प्रयत्न करतो आहे. या शस्त्रास्त्र स्पर्धेतून जगात अशांतता निर्माण होते आहे आणि त्याचवेळी स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी प्रत्येक देश शस्त्रास्त्रे गोळा करतो आहे. त्यामुळे या स्पर्धेत भारतही मागे राहू शकत नाही. या स्पर्धेला अंत नाही. ही बाब लक्षात घेता प्राथमिक स्तरापासूनच भारतीय विद्यार्थ्यांना विज्ञान-तंत्रज्ञानाचे शिक्षण देणे गरजेचे ठरते. प्रत्येक मुलाला आणि तरुणाला यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन प्राप्त होईल आणि त्याचा फायदा सरतेशेवटी देशालाच होईल. विज्ञानाच्या शिक्षणासोबतच मानवी मूल्यांचे महत्त्व लक्षात आणून दिल्यास विज्ञानाचा दुरुपयोग होणार नाही आणि वैज्ञानिक प्रगतीचा फायदा जगाच्या कल्याणासाठीच करून घेता येईल, हेही आपण लक्षात घेतले पाहिजे.
आज गुणवत्तापूर्ण आणि मूल्य शिक्षणाला अतिशय महत्त्व आहे. पण, आज स्थिती काय आहे? प्रत्येक वेळी शिक्षण क्षेत्रातील परिस्थितीवर चर्चा होते आणि चिंता व्यक्त केली जाते. शिक्षणाचा स्तर घसरत चालला आहे, शिक्षणाचे बाजारीकरण झाले आहे, असे सांगत सातत्याने टीका केली जाते आहे. उच्च शिक्षण देणार्‍या संस्थांमधील प्राध्यापक-अध्यापकांची ४० ते ५० टक्के पदे रिक्त आहेत, शाळांमध्ये नियमित शिक्षकांचा दुष्काळ आहे, सरकारी शाळांमध्ये आपल्या पाल्यांना शिक्षण द्यायला लोक तयार नाहीत, ही स्थिती काय दर्शविते? निश्‍चितपणे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार नाही, हेच दर्शविते. माझा याबाबतीतला जो अभ्यास आहे, तो हे सांगतो की देशातील केवळ ३० टक्के मुलांनाच गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळते आहे. उरलेले जे सत्तर टक्के विद्यार्थी आहेत, त्यांना अपेक्षेनुसार शिक्षण मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. विशेषत: सरकारी शाळांमधून विज्ञान विषयाचे जे शिक्षण दिले जाते, ते अतिशय कमकुवत आहे. शाळांमधील ज्या प्रयोगशाळा आहेत, त्यांची अवस्थाही अतिशय दयनीय आहे. त्यामुळे ही परिस्थिती सुधारण्याकडे आपला कल असला पाहिजे.
उत्तरप्रदेश आणि बिहारसारखी जी राज्ये आहेत, त्या राज्यांमधील प्रायोगिक परीक्षांची स्थिती तर हास्यास्पदच झाली आहे. परीक्षांमधील कॉपी रोखण्याचे जे प्रयत्न होत आहेत, ते अपुरे पडताहेत. त्यामुळे या प्रयत्नांना अधिक गती आणि बळ देण्याची आवश्यकता आहे. शिक्षण क्षेत्रात आधी आपण जे यश मिळविले आहे, त्याचा अभिमान तेवढा बाळगून चालायचे नाही. तर सतत सजगता आणि क्रियाशीलता ठेवण्याची गरज असते. परीक्षेत केवळ पाठ केलेल्या प्रश्‍नांवर भर देणे, आयआयटीसारख्या व्यावसायिक परीक्षांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी काट्याची आणि टोकाची स्पर्धा असणे, कोचिंगचा वाढता प्रभाव असणे, कॉपी पुरविणार्‍यांचा सुळसुळाट असणेे ही व अशी आपल्यापुढे अनेक आव्हानं आहेत, ज्यांचा मुकाबला करण्याची क्षमता समाज म्हणून आपल्यालाच विकसित करावी लागेल. केवळ सरकारी यंत्रणेवर सगळा भार टाकून काम भागायचे नाही. समाजाचा एक घटक या नात्याने आपल्यापैकी प्रत्येकाने आपले कर्तव्य काय आहे ते समजून घेत ते पारही पाडले पाहिजे, नाही का? देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सत्तरच्या दशकापर्यंत देशात विज्ञानाचे जे शिक्षण दिले जात होते, त्याचा दर्जा आणि स्तर आजच्यापेक्षा जास्त चांगला होता, हे वास्तव आपण स्वीकारण्याची हिंमत दाखविणार का? मध्यंतरी देशाचे मनुष्य बळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी अशी घोषणा केली होती की, शिक्षणासाठीचा जो अभ्यासक्रम आहे, त्यातला अर्धा कमी केला जाईल. याचा अर्थ आपण असा घेऊ शकतो की, ज्याला जे विषय अभ्यास करायला आवडतात, तेच त्याने घ्यावे, म्हणजे तो त्या विषयातला तज्ज्ञ होऊ शकेल. दुसरा अर्थ असा की, ज्याला विज्ञानाची आवड आहे, त्याच्या डोक्यावर इतर विषयांचे ओझे असणार नाही. विज्ञानाचा अभ्यास करायला वेळ अधिक मिळाल्याने त्याचे विज्ञानाचे ज्ञान अधिक वाढेल, त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन अधिक व्यापक होईल, यात शंका नाही.
विज्ञानाचे शिक्षण तसे सोपे नाही. सगळ्यांनाच त्यात रुची असत नाही. पण, प्रत्येकाला त्यात रुची वाटावी यादृष्टीने जर विज्ञानाच्या अभ्यासक्रमाची रचना केली, प्रत्येकाला त्याच्या मातृभाषेत विज्ञान शिकविता आले तर ते अधिक हितकारक सिद्ध ठरेल. चीन, जपान, दक्षिण कोरिया यासारखे देश जर विज्ञान त्यांच्या त्यांच्या भाषेत शिकवत असतील तर भारतात असलेल्या सगळ्या प्रमुख भाषांमध्ये विज्ञान विषयाचा अभ्यासक्रम तयार करण्यात गैर काहीच नाही. सगळ्या कठीण इंग्रजी शब्दांना पर्यायी भाषिक शब्द शोधले आणि ते रूढ केले तर भविष्यकाळात भारताची वैज्ञानिक झेप ही अतिशय उंच असेल, याची खात्री बाळगावी. विज्ञान विषयात नवे जोडणे तसे कठीण नाही. पण, जुने काय सोडायचे, हा प्रश्‍नच आहे. या प्रश्‍नाचे उत्तर आम्ही अजूनही शोधले नसल्याने अभ्यासक्रमाचे ओझे सातत्याने वाढते आहे, हे लक्षात घेणे गरजेचे ठरते. १९६८ साली जे शैक्षणिक धोरण ठरविण्यात आले होते, त्यानुसार दहावीपर्यंत विज्ञान आणि गणित हे विषय अनिवार्य करण्यात आले होते. आजही तोच पॅटर्न कायम आहे आणि भविष्यातही ठेवायला हवा. कारण, हा उच्च वैज्ञानिक शिक्षणाचा पाया आहे.
आज पर्यावरण प्रदूषण ही सगळ्यात मोठी समस्या आहे. वायू प्रदूषण वाढल्याने नागरिकांना श्‍वसनाचे आजार जडत आहेत आणि कर्करोगासारख्या गंभीर आजाराचाही सामना करावा लागत आहे. रसायनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याने जलस्रोत प्रदूषित होत आहेत. शिवाय, जलस्रोत कमी कमीही होत आहेत. जंगलांशी असलेले माणसाचे नाते तुटत चालले आहे. ओझोनचा स्तर घटत चालला आहे. निसर्गाशी असलेला मानवीय संबंध पातळ होत आहे. खाद्य पदार्थांमध्ये भेसळ वाढली आहे. बनावट औषधांचा सगळीकडे सुळसुळाट आहे. अशा कितीतरी गोष्टी आहेत, ज्याकडे आम्ही गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. मानवीय जीवन सुखी आणि समृद्ध करायचे असेल तर या सगळ्या बाबींचा सखोल अभ्यास करून त्यावर उपाय शोधणे गरजेचे आहे. पण, त्यासाठी आम्हाला प्रत्येक नागरिकात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करावा लागणार आहे. प्रयत्न केलेत तर कठीण काहीच नाही. विज्ञानाच्या शिक्षणाला व्यावहारिकतेची जोड दिली तर अपेक्षित उद्दिष्ट सहज साध्य होऊ शकेल, यात शंका नाही.

Posted by : | on : 2 Dec 2018
Filed under : आसमंत, डॉ.वाय.मोहितकुमार राव, पुरवणी, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, डॉ.वाय.मोहितकुमार राव, पुरवणी, स्तंभलेखक (365 of 1367 articles)

Taxindia
अर्थपूर्ण : यमाजी मालकर | देशातील सार्वजनिक सेवासुविधा वाढविण्याचा आणि त्या दर्जेदार करण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे सरकारने त्या ...

×