ads
ads
आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

•न्यायव्यवस्था बदनाम करण्याचा हा सुनियोजित कट, •सर्वोच्च न्यायालयाचा संताप,…

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

•पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्ला, दरभंगा, २५ एप्रिल – आतापर्यंत पाकिस्तानची…

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मुंबई, २४ एप्रिल – राग, नाराजी असे माणसाच्या स्वभावाचे…

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

•अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण, वॉशिंग्टन, २४ एप्रिल –…

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

•मृतांची संख्या ३२१, भारतीयांचा आकडाही वाढला, ४० जणांना अटक,…

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

•चीनने व्यक्त केली भीती, बीजिंग, २३ एप्रिल – इराणकडून…

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

•राहुल गांधी यांनी स्वीकारला •विरोधी पक्षनेतेपदही सोडले •काँग्रेसला आणखी…

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

•खोट्या जाहिरातींचे प्रकरण, मुंबई, २२ एप्रिल – शेतकर्‍यांना पाच-दहा…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 18:44
अयनांश:
Home » आसमंत, डॉ.सच्चिदानंद शेवडे, पुरवणी, स्तंभलेखक » शबरीमलै : दक्षिण अयोध्या

शबरीमलै : दक्षिण अयोध्या

॥ टेहळणी : डॉ.परीक्षित स. शेवडे |

मंदिराला प्रत्यक्ष धक्का लावण्याचे प्रयत्न विफल झाल्यावर सुरुवात झाली ती अन्य मार्गांच्या अवलंबाची. २०१६ साली समीरा नामक युवतीने, आपल्याला अय्यप्पा स्वामींसमोर आपल्या मित्रासोबत शय्यासोबत करायची आहे, असे जाहीर विधान केले. ऑक्टोबर २०१८ मध्ये मंदिर उघडण्यात आल्यावर तिथे प्रवेश मिळावा याकरता हैदोस घालणार्‍या समाजसुधारकांपैकी एक होत्या रेहाना फातिमा. या बाई अय्यप्पा स्वामींच्या भक्त कधीपासून झाल्या? त्यांच्या पंथात अशी भक्ती मान्य असते का? हे खूप लांबचे प्रश्‍न आहेत.

Shabarimala Ayyappa Swami

Shabarimala Ayyappa Swami

१५ नोव्हेंबर २०१८ रोजी शबरीमलै येथील अय्यप्पा स्वामींचे मंदिर ६२ दिवसांची मंडल पूजा- मकरविलक्कूसाठी उघडण्यात आले. मंदिरात सर्व वयोगटातील स्त्रियांना प्रवेश देण्यात यावा; या आपल्या निर्णयावर दाखल करण्यात आलेल्या पुनरावलोकन याचिकेची सुनावणी २२ जानेवारी २०१९ रोजी करणार असल्याचे मा. सर्वोच्च न्यायालयाने जाहीर करून झाले आहे. शबरीमलै हे लाखो-करोडो भाविकांचे श्रद्धास्थान! या श्रद्धास्थानावर आघात करण्याचा इतिहास मात्र फार जुना आहे.
ब्रिटिशपूर्व काळात देवस्थानांच्या भोवतालची जमीन ही तेथील देखभाल, खर्च इत्यादींसाठी मंदिरांच्या नावे केलेली असे. ब्रिटिशांनी मात्र त्रावणकोर संस्थानातील ही जागा ताब्यात घेताच भोवतालची जमीनही जप्त केली आणि जाणीवपूर्वक अहिंदूंनी त्या जमिनीचा वापर करावा, अशी योजना केली. यामुळे तेथील अर्थकारण कोलमडेल आणि हळूहळू धार्मिक महत्त्व कमी होईल, अशी ब्रिटिशांची अपेक्षा होती. मात्र, तसे न घडता उलट लोकांचा ओघ अधिकच वाढू लागला. १९०२ साली मंदिराला अचानक(?) आग लागली. तेथील पुजार्‍याने आपला जीव धोक्यात घालून अय्यप्पा स्वामींची मूर्ती वाचवली. हा प्रयत्न फोल गेल्यावरही काही ना काही कुरापती सुरूच राहिल्या. १५ जून १९५० रोजी पुन्हा मंदिराला आग लावण्यात आली. याप्रसंगी मूर्तीवर कुर्‍हाडीने प्रहार केल्याचेदेखील दिसून आले. सभोवतालच्या परिसरातील धर्मांतरित ख्रिस्ती संघटनांचा यात हात असल्याचे चौकशीनंतर समोर आले. १९५० ते १९५५ या कालावधीत आणखी दोनदा हेच प्रयत्न झाले. १९५० साली सभोवतालच्या ख्रिश्‍चनांनी यात्रेकरूंच्या मार्गामध्येच आपल्याला एक क्रूझ मिळाला असल्याची आणि २००० वर्षांपूर्वी सेंट थॉमसने तो उभारला असल्याची आवई उठवली. वास्तविक पाहता, यास कोणताही आधार नव्हता. पुढे चौकशी केल्यावर हा बनाव उघडकीला आला. इतकेच नव्हे, तर व्हॅटिकननेही सेंट थॉमस हा कधीही केरळात गेलाच नसल्याचेही सांगितले. तरीही तेथील ख्रिस्ती लोकांनी तिथल्या मार्गाला सेंट थॉमस रोड आणि शबरीमलैला सेंट थॉमस हिल असे म्हणण्यास सुरुवात केली! जुलै २००६ मध्ये शबरीमलै येथील मुख्य पुजारी कांतारू मोहनारू यांचे अपहरण करण्यात आले. वेश्याव्यवसाय करणार्‍या शोभा जॉन यांच्या घरात नेऊन आक्षेपार्ह स्थितीत त्यांची छायाचित्रे काढण्यात आली. हे सारे प्रकरणदेखील तपासानंतर समोर आले. २०१६ साली शबरीमलै परिसरातून २६० किलो वजनाची स्फोटके पकडली गेली. स्फोट घडवून हे मंदिर उद्ध्वस्त करण्याचा माओवाद्यांचा प्रयत्न निष्फळ करण्यात आला.
मंदिराला प्रत्यक्ष धक्का लावण्याचे प्रयत्न विफल झाल्यावर सुरुवात झाली ती अन्य मार्गांच्या अवलंबाची. २०१६ साली समीरा नामक युवतीने, आपल्याला अय्यप्पा स्वामींसमोर आपल्या मित्रासोबत शय्यासोबत करायची आहे, असे जाहीर विधान केले. ऑक्टोबर २०१८ मध्ये मंदिर उघडण्यात आल्यावर तिथे प्रवेश मिळावा याकरता हैदोस घालणार्‍या समाजसुधारकांपैकी एक होत्या रेहाना फातिमा. या बाई अय्यप्पा स्वामींच्या भक्त कधीपासून झाल्या? त्यांच्या पंथात अशी भक्ती मान्य असते का? हे खूप लांबचे प्रश्‍न आहेत. या बाईंचा समाजसुधारणेचा इतिहास समजून घेतला की बरेच चित्र स्पष्ट होईल. २०१४ साली रस्त्यावर चुंबन घेण्याचं प्रचंड आंदोलन पुकारण्यात आलं होतं तेव्हा या बाई केरळमधून त्याचं प्रतिनिधित्व करत होत्या. त्यानंतर केरळमधील पुरुष जे परंपरागत व्याघ्र नृत्य, अंगाला रंग फासून करतात, ते करण्यासाठी हैदोस घालून ती इच्छादेखील बाईंनी पूर्ण करून घेतली. त्यांचे सगळ्यात महत्त्वाचे सामाजिक योगदान म्हणजे केरळमध्ये कुण्या एका शांतताप्रिय प्रोफेसरने बुरख्यासंबंधाने काढलेल्या अनुदार किंबहुना अश्‍लील उद्गारांचा निषेध म्हणून यांनी आणि यांच्या एका मैत्रिणीने अर्धांगविवस्त्रावस्थेत आपल्या स्तनांसमोर अर्धे कापलेले कलिंगड धरून काढलेली छायाचित्रे फेसबुकवर टाकली. यांत उल्लेखदेखील करण्यापलीकडील छायाचित्रेदेखील होती. मात्र, अशा ‘समाजसुधारणेचा’ गंधही नसलेल्या फेसबुकने याबाबत तडक कारवाई करत ती छायाचित्रे उडवून लावली! हे सारं का? तर नियम मोडण्यासाठी असं त्यांच्या फेसबुक बायोमध्येच म्हटलंय्. सहज योगायोग म्हणजे या बाई लालभाईंच्या विद्यार्थी संघटनेच्या सदस्या आहेत. याव्यतिरिक्त या मोहिमेत सामील झालेल्या कविता कोशी, मेरी स्वीटी इत्यादींची नावे आपल्याला केवळ योगायोग भासतात का?
१५ नोव्हेंबर २०१८ रोजी मंदिर पुनश्‍च उघडण्यात आल्यावर, महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक तृप्ती देसाई या आपल्या महिला मंडळासोबत मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून कोची विमानतळावर दाखल झाल्या. देसाई या कॉंग्रेस पक्षाकडून खडकवासला मतदारसंघातील उमेदवार म्हणून उभ्या होत्या, हाही एक सहज योगायोग. जेमतेम आठवडाभरापूर्वी मी स्वतः शबरीमलै येथील आघातांचा, वर नमूद केलेला इतिहास सांगण्यास फेसबुक लाईव्ह करत असताना देसाई यांनी, हे सगळं कोर्टात सांगा, अशी कमेंट केली होती. प्रसारमाध्यमांतून आम्ही इतिहासदेखील मांडू नये, असा आग्रह असल्यास किती ही असहिष्णुता! केरळला जाताना तृप्तीताई, हा पुरोगामी महाराष्ट्र नव्हे, हे विसरल्या असाव्या. त्यांना तेथील टॅक्सी ड्रायव्हर्सनी गाडी देण्यास नकार दिल्यावर आणि दिवसभर अय्यप्पा भक्तांच्या आंदोलनाला तोंड द्यावे लागल्याने रात्रीस त्यांना माघार घ्यावी लागली. पुढील वेळी त्या गुरील्ला तंत्र अवलंबणार असल्याचे म्हणाल्या. या तंत्राचा अवलंब करण्यास, त्यांना देवदर्शनास जायचे आहे, की छुप्या माओवादी युद्धावर? हे आम्हाला कळले नाही. तसेही यावेळेस त्या गेल्या असता त्यांनी व्रत पाळले होते का? त्यांची इरीमुडी कुठे होती? हे प्रश्‍नही अनुत्तरीतच आहेत. शबरीमलै परिसरातील मोक्याच्या ठिकाणी जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. मंदिर परिसरात भक्त बसू नयेत म्हणून टँकर भरून पाणी आणून ते तेथे तुंबवून ठेवले जात आहे. भक्तांंवर विनाकारण अत्याचार केले जात असल्याचेही प्रत्यक्ष यात्रा करून आलेल्या भाविकांनी सांगितले. थोडक्यात, जमेल त्या मार्गाने सरकारी दडपशाही सुरू आहे. महाराष्ट्रातील नोकरीवरून सर्वाधिक वेळा काढून टाकण्याचा विक्रम नावे असलेल्या एका बेरोजगार पुरोगामी पत्रकाराने ट्विट करत म्हटले होते की, अयोध्येचा निकाल हा हिंदूंच्या विरोधातच जाणार असल्याने शबरीमलै येथे शक्तिप्रदर्शन सुरू आहे! अयोध्येत भव्य राममंदिर उभारले जावे, हा करोडो हिंदूंच्या श्रद्धेचा आणि अस्मितेचा मुद्दा आहे. आता शबरीमलैच्या निमित्ताने देशभरातील हिंदूंची अस्मिता जागृत होत असल्यास तिला ‘दक्षिण अयोध्या’ असे संबोधण्यास आम्हाला काहीच हरकत नाही!

Posted by : | on : 25 Nov 2018
Filed under : आसमंत, डॉ.सच्चिदानंद शेवडे, पुरवणी, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, डॉ.सच्चिदानंद शेवडे, पुरवणी, स्तंभलेखक (379 of 1372 articles)

Savarkar Hotel
विशेष : विवेक घळसासी | ‘पैसा तो वेश्याभी कमा लेती है, साब! सावरकर जी का नाम देखकर आप जैसे आते ...

×