ads
ads
आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

•न्यायव्यवस्था बदनाम करण्याचा हा सुनियोजित कट, •सर्वोच्च न्यायालयाचा संताप,…

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

•पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्ला, दरभंगा, २५ एप्रिल – आतापर्यंत पाकिस्तानची…

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मुंबई, २४ एप्रिल – राग, नाराजी असे माणसाच्या स्वभावाचे…

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

•अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण, वॉशिंग्टन, २४ एप्रिल –…

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

•मृतांची संख्या ३२१, भारतीयांचा आकडाही वाढला, ४० जणांना अटक,…

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

•चीनने व्यक्त केली भीती, बीजिंग, २३ एप्रिल – इराणकडून…

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

•राहुल गांधी यांनी स्वीकारला •विरोधी पक्षनेतेपदही सोडले •काँग्रेसला आणखी…

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

•खोट्या जाहिरातींचे प्रकरण, मुंबई, २२ एप्रिल – शेतकर्‍यांना पाच-दहा…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 18:44
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, मयुरेश डंके, स्तंभलेखक » श्रद्धांची जाज्ज्वल्यता निवली आहे का?

श्रद्धांची जाज्ज्वल्यता निवली आहे का?

॥ मानसरंग : मयुरेश डंके |

सर्वसामान्य रामभक्त हिंदू भारतीयाने आजही न्यायालयावर व न्यायव्यवस्थेवर विश्‍वास ठेवला आहे, हे निश्‍चितच महत्वाचे आहे. श्रीरामभक्त त्यांच्या भावना सोशल मीडीयातून व्यक्त करत आहेत, पण त्यांनी कायदा व सुव्यवस्थेला अजिबात अडचणीत आणलेले नाही. (हिंदूंच्या या समंजस भूमिकेकडे पत्रकारितेचे लक्ष गेलेले दिसत नाही. कारण समंजस समाजाकडून ब्रेकिंग न्यूज मिळत नाहीत ना.) आपली श्रद्धास्थाने आपणच जपली पाहिजेत आणि त्यांचे जतन, संवर्धन करता येत असेल तरच त्यांना श्रद्धास्थान असे म्हणावे. स्वत्व आणि स्वाभिमान यांचा विसर पडलेला समाज त्याचं अस्तित्वच गमावून बसतो. हे न कळण्याइतके आपण दूधखुळे निश्‍चितच नाही.

Shri Ram1

Shri Ram1

प्रभू श्रीराम आणि त्यांचं जन्मस्थान हा सर्व हिंदू समाजाच्या श्रद्धेचा विषय आहे आणि त्या धार्मिक श्रद्धेविषयी कुणाच्याही मनात किंतु असण्याचं कारणच नाही. प्रभू श्रीरामजन्मभूमी ही हिंदूंची श्रद्धा अनाठायी नाही हेही कायद्याच्या कसोटीवर सिद्ध झालेलंच आहे.
अनेकांनी प्रभू श्रीरामांचं अस्तित्व होतं का? असाच प्रश्‍न उभा करून या प्रश्‍नाला मुळातूनच बगल देण्याचा प्रयत्न केला. वास्तविक पाहता, समस्त हिंदूंनी इसवी सन १४९७ ते इसवी सन १६२३ या कालावधीतील भारतातील महान संत गोस्वामी तुलसीदास यांचा जीवनपट अवश्य अभ्यासण्यासारखा आहे. ज्या नावाने श्रीरामजन्मभूमीवरील बांधकाम ओळखले जात होते त्या मुघल राज्यकर्त्याची कारकीर्द इसवी सन १४८३ ते इसवी सन १५३० या काळातील आहे. इ.स.१५२८ साली श्री राम जन्मभूमीवर हे बांधकाम पूर्वीचे मंदिर भग्न करून करण्यात आले, अशी नोंद आहे. याचाच अर्थ असा होतो की, ज्या काळात हा उद्योग करण्यात आला, त्या कालावधीत श्रीरामाचे भक्त अस्तित्वात होते आणि त्या संतकवींनी प्रभू श्रीरामांवर आधारित विपुल काव्यरचनादेखील केली आहे. आणखी एक महत्वाचा संदर्भ आहे तो म्हणजे संत कबीर. इसवी सन १४५५ ते इसवी सन १५५१ हा संत कबीरांचा जीवनकाल आहे. त्यातही आणखी महत्त्वाचा भाग म्हणजे या दोन्ही रामभक्त संतवर्यांची जन्मभूमी व कर्मभूमी उत्तरप्रदेश हीच आहे. या इतिहासाकडे आपण मुळीच दुर्लक्ष करता कामा नये. प्रभूश्रीरामचंद्रांना नाकारणं म्हणजे संत तुलसीदास आणि संत कबीरांनाही नाकारण्यासारखंच आहे.
१९७०, १९९२ आणि २००३ साली भारतीय न्यायव्यवस्थेच्या स्पष्ट निर्देशांनुसार केंद्र शासनाच्याच भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने त्या स्थळावर उत्खनन करताना पूर्वी उभ्या असलेल्या हिंदू मंदिराचे पुरावे सापडले आणि ते इंटरनेटवर उपलब्ध आहेत. या पुराव्यांविषयी वाद निर्माण केले गेले असले तरीदेखील या दोन संतांच्या कारकीर्दी व साहित्यकृतींविषयी तरी वाद नाहीत. हा एकच मुद्दा अनेक वादांचे नि:संशय उच्चाटन करणारा आहे.
म्हणूनच, आज जरी मा.न्यायालयाने निर्णय देण्याविषयीची तारीख पुढे नेली असली तरीदेखील त्यामुळे इतिहास मिटत नाही आणि तो टाळता येण्यासारखाही नाही.
सर्वसामान्य रामभक्त हिंदू भारतीयाने आजही न्यायालयावर व न्यायव्यवस्थेवर विश्‍वास ठेवला आहे, हे निश्‍चितच महत्वाचे आहे. श्रीरामभक्त त्यांच्या भावना सोशल मीडीयातून व्यक्त करत आहेत, पण त्यांनी कायदा व सुव्यवस्थेला अजिबात अडचणीत आणलेले नाही. (हिंदूंच्या या समंजस भूमिकेकडे पत्रकारितेचे लक्ष गेलेले दिसत नाही. कारण समंजस समाजाकडून ब्रेकिंग न्यूज मिळत नाहीत ना.)
आपली श्रद्धास्थाने आपणच जपली पाहिजेत आणि त्यांचे जतन, संवर्धन करता येत असेल तरच त्यांना श्रद्धास्थान असे म्हणावे. स्वत्व आणि स्वाभिमान यांचा विसर पडलेला समाज त्याचं अस्तित्वच गमावून बसतो. हे न कळण्याइतके आपण दूधखुळे निश्‍चितच नाही.
सर्वसामान्य माणसाला तुझ्या आयुष्यातले पहिले १० घटक प्राधान्यक्रमानं सांग असा प्रश्‍न विचारून त्याच्याकडून उत्तर घ्या. अडचणी,समस्या,कटकटी उत्पन्न झाल्यानंतरच बहुतांश मंडळींना देवाची आठवण होते. आणि ती तशीच होत रहावी याकरिता त्याच्या आयुष्यातले प्रश्‍न देवकृपेने सुटणं अनिवार्य असतं. श्रद्धेनं, भक्तिनं आणि कोणतीही अपेक्षा न करता, केवळ आत्मिक समाधानाकरिता देवाचं नित्य स्मरण करणारे किती? ‘मला मंदिरात गेल्यावर अतिशय छान,प्रसन्न वाटतं म्हणून मी रोज मंदिरात जातो’ असं म्हणणार्‍यांचं प्रमाण किती? ‘प्रार्थना केल्यामुळे मला खूप सकारात्मक ऊर्जा मिळते’ असं म्हणणार्‍यांचं प्रमाण किती?
सर्वसामान्यांच्या दैनंदिन आचरणातून श्रीरामाविषयीची भक्ती अत्यंत तीव्रपणे दिसत राहिली असती तर न्यायव्यवस्थेला हा प्रश्‍न इतकी वर्षं झुलवत ठेवणं अशक्य होतं. सामाजिकदृष्ट्या पहायला गेलं तर गेल्या २० वर्षांमध्ये समाजाच्या प्राधान्यक्रमांमध्ये अगदी आश्‍चर्यकारक वेगानं बदल होत गेल्याचं दिसतं. आणि याच घटकाला अनुसरून तुलना करायची झाली तर अन्य धर्मियांच्या बाबतीत त्यांच्या श्रद्धास्थानांना किंवा अस्मितांना तसूभरही धक्का लागल्याचं तर दिसत नाहीच, उलट त्या अधिक प्रखर होत गेल्याचं दिसून येतं.
भारतात अन्य धर्मही असताना केवळ हिंदूंच्याच श्रद्धांविषयी हिंदूंच्याच मनात शंका-कुशंकांच्या वावटळी उठवणार्‍या विचारांचा जन्म होणं हे शंकास्पद नाही का? अन्य धर्मियांच्या एखाद्या संवेदनशील गोष्टीसंदर्भात अशी टाळाटाळ करताच येणं पूर्वीही शक्य नव्हतं आणि आजही शक्य नाही. याचं कारण म्हणजे, ‘आम्हाला या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या वाटतात आणि आमच्या लेखी याला पर्यायच नाही’ याची जाणीव ते त्यांच्या दैनंदिन आचरणातूनच सतत करून देत असतात. म्हणूनच, त्यांच्या बाबतीतले निर्णय न्यायालयाला कमालीचे जोखमीचे आणि संवेदनशील वाटतात. पण त्याच न्यायालयाची अशी कुचंबणा हिंदूंविषयीच्या निर्णयांच्या बाबतीत होत नाही. हा फरक का पडतो? त्याचं कारण आपणच आहोत. दुसरं कोण असणार?
प्रभू श्रीराम ही जगभरातील हिंदूंच्या अस्तित्वाशीच जोडली गेलेली श्रद्धा आहे आणि ती असीम, अजोड आहे. ही श्रद्धा आता दैनंदिन आचरणात आणायला हवी, तिचं दर्शन समाजाच्या दैनंदिन आचरणातूनच व्हायला हवं. आपलं सांस्कृतिक अस्तित्व आपल्याच मातृभूमीत महत्त्वाचं मानलं जात नाही, ही स्थिती आपल्याला जाणवत नाही का? बहुसंख्यांना अजूनही दिवाळीतल्या फटाक्यांवरच्या बंधनाचीच काळजी पडली आहे. आणि खरा प्रश्‍न मात्र आ वासून उभा आहे, पण आपल्याला त्याचं सोयरसुतक नाही.
भौतिक सुविधांच्या पलिकडंचं आयुष्य असतं हेच मुळात विसरून गेलेले आपण.. आपल्या घराचा उंबरठा ओलांडून प्रश्‍न आपल्या घरात ठाण मांडून बसलेत. बारा अमावस्या आपल्या भोवती गराडा घालून नाचतायत. पण आपल्याला ते जाणवतंय कुठं? आपल्या वास्तूंमध्ये टिव्ही युनिट, फ्रीज, एसी या सगळ्याला जागा आहे. पण देवघराला जागा नाही, तुळशीवृंदावनाला जागा नाही. आपण ते घेतलंच आहे खपवून. का? कारण आपल्याला ‘आमच्याकडे देवघर आहे’ एवढंच तोंडदेखलं समाधान हवं असतं. ते आपल्या वास्तूचा अविभाज्य असायलाच हवं, असं कुठं वाटतंय आपल्याला? आपलं दैनंदिन आचरण आपल्या श्रद्धांशी खरंच घट्ट जोडलेलं आहे का, याचं आत्मपरीक्षणच करायला हवं. कारण, आपल्या दैनंदिन आचरणात आपल्या अस्मितांचं अस्तित्वच नाही आणि आपण ते ठेवूही इच्छित नाही. आपल्या दृष्टीनं ते प्राधान्यच राहिलेलं नाही. आणि हे आजचं नाही.
‘ग्रेट भेट’ या कार्यक्रमात निखिल वागळे यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची मुलाखत घेतली आहे. त्यात ‘शिवाजीराजे जर आग्र्यात अडकले असते अन् दुर्दैवानं तिथं काही कमीजास्त घडलं असतं तर?’ असा प्रश्‍न वागळ्यांनी शिवशाहीरांना विचारला. त्यावर बाबासाहेब उत्तरले, जर असं काही अघटित घडलं असतं तर सगळंच अवघड झालं असतं. आज तुम्ही ‘वागळे’ राहिला नसतात आणि मी ‘पुरंदरे’ राहिलो नसतो ! बाबासाहेबांच्या या उत्तराला किती खोल अर्थ आहे, हे सूज्ञांना निश्‍चित कळेल.
मानसशास्त्रात ‘पद्धतशीर विसंवेदन’ नावाचं एक तंत्र आहे. डूीींशारींळल वशीशपीळींळीरींळेप हे या तंत्राचं इंग्रजी नाव. अगदी शांतपणे, व्यवस्थितरित्या एखाद्या गोष्टीविषयीच्या आपल्या प्रखर,तीव्र संवेदना पार बोथट करून टाकता येतात. कालांतराने त्या इतक्या बोथट होतात की, आपल्याला त्या गोष्टींविषयी चर्चा करणंसुद्धा महत्वाचं वाटेनासं होतं. तंत्र अगदी सोपं आहे. समाजाच्या बाकीच्या गरजा अपरिमित वाढवायच्या आणि सामान्य माणसाला त्याच गरजा पूर्ण करताना पार जेरीला आणायचं. किंवा त्याच गरजांच्या चक्रव्यूहात त्याला अडकवून टाकायचं. त्याला त्याच्या मूळ जीवनशैलीविषयी विचार करता येऊ शकेल, जगण्याची उद्दिष्टं ठरवता येतील, त्याला आपल्या इतिहासाचा धांडोळा घेता येईल, चिंतन करता येईल अशी स्थितीच ठेवायची नाही. म्हणजे, सर्वसाधारण जनता केवळ चरितार्थ आणि उपजीविकेकरिता धडपडत राहिल. साहित्य, संस्कृती, श्रद्धास्थानं यांच्याविषयीच्या समाजाच्या संवेदनाच बोथट होऊन जातील. एक वेळ अशी येईल की, समाजच म्हणायला लागेल -आमचं दोनवेळचं जगणं तरी सुसह्य होऊ देत. बाकीचं बघू नंतर.
समाजाला त्याच्या मागण्यांपासून परावृत्त करण्याकरिता फार काही करावंच लागत नाही. फक्त त्याची भौतिक सुखाविषयीची आसक्ती वाढवायची आणि त्याच्यासमोरच्या विवंचना प्रचंड वाढवून ठेवायच्या. उदाहरणार्थ, भाजी महाग झाली, स्वयंपाकाचा गॅस फारच महागलाय, पेट्रोल महागलंय, पगार वाढेना, घराचा हप्ता परवडत नाही. पण मला स्मार्टफोन घ्यायचा आहे, कार घ्यायचीय, घरात एसी बसवायचाय.. पैसेच पुरत नाहीत. काय करावं आता? बस्स.. बारा महिने तेरा काळ यांतच अडकलेल्या माणसाला त्याच्या घराजवळच्या मंदिरात रोज दोन मिनिटं दर्शनाला जाण्यासाठी वेळ नाही, त्याला कशाला आठवतंय अयोध्येचं राममंदिर? त्याला मंदिरापेक्षासुद्धा सकाळची लोकल चुकल्याचं दु:ख अधिक असतं, ही वस्तुस्थिती आहे. ह्याच नीतीने सामान्य माणसाच्या आयुष्यातलाच राम हरवला. त्याला त्याच्या श्रद्धा जपण्यासाठीचा वेळही काढून घेतला गेला आणि मानसिकताही क्षीण केली गेली. हवंय कशाला राममंदिर? रस्त्यांवरचे खड्डे बुजवा म्हणावं आधी. असं सर्वसामान्य माणसंसुद्धा म्हणायला लागली. ही सगळी सामाजिक-सांस्कृतिक-आर्थिक उलथापालथ शांतपणे, चौकस बुद्धीने अभ्यासावी अशीच आहे.
माणसांच्या श्रद्धा बदलत चालल्या आहेत का? केवळ फेसबुकवर जयश्रीराम लिहीलं आणि त्याला पाचपंचवीस लाइक्स मिळाले की त्याला बरं वाटतंय का? ‘न्यायालयीन निर्णयाविषयी सोशल मीडीयातून निषेध व्यक्त केला की आपली जबाबदारी संपली’ असं त्याला वाटतंय का? आपण स्वत:लाच शोधलं पाहिजे. आपली मूळ संस्कृती आणि चिंतन आपणच मुद्दाम बाजूला ठेवतो आहोत का? याचाही विचार केला पाहिजे. ८० किंवा ९० च्या दशकात लोकांना प्रभूश्रीराम का महत्वाचे वाटत होते आणि आज आपल्याला ते का महत्वाचे वाटत नाहीत, हेही अभ्यासण्यासारखंच आहे. त्या काळात शूचिर्भूत होऊन प्रसन्न मनानं आणि श्रद्धायुक्त अंत:करणानं टीव्हीसमोर येऊन बसून न चुकता रामायण पाहणारी माणसं आज मात्र बिगबॉस किंवा कसलेकसले थुकरट शो पहायला लागली, हेही अभ्यासायला हवंय. आमच्याच पिढीतल्या ९५% पेक्षा अधिकांना रामायण माहिती नाही आणि ते जाणून घेण्याची इच्छाही नाही. ही सगळी सामाजिक परिस्थिती न्यायालयाच्या नजरेतून सुटणारी नाही. सामान्य भारतीयालाच गरज वाटत नाही तर एवढा क्रांतिकारक निर्णय कशाला घ्या, अशी चालढकलीची भूमिका न्यायालयाने का घेतली असेल याचाही विचार करायला हवा. आपल्याला जन्मभूमीस्थळी राममंदिर हवं असेल तर ती मागणी प्रत्येकानंच केली पाहिजे. तीही प्राधान्यक्रमाने !
एकूणच प्रश्‍न हिमनगासारखा पसरलेला आहे. त्याचा आवाका डोळ्यांना दिसतो त्यापेक्षा कितीतरी अधिक मोठा आहे. म्हणूनच प्रश्‍न पडतो की, आपलीच श्रद्धांची जाज्ज्वल्यता निवत चालली आहे का?
मानसतज्ञ, संचालक-प्रमुख
आस्था काऊन्सेलिंग सेंटर,पुणे.

Posted by : | on : 2 Dec 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, मयुरेश डंके, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, मयुरेश डंके, स्तंभलेखक (366 of 1372 articles)

Angela Merkel
परराष्ट्रकारण : वसंत गणेश काणे | युरोप सध्या एका कणखर नेत्याच्या शोधात आहे. ही अपेक्षा पूर्ण करणार्‍या मर्केल निवृत्त झाल्यावर ...

×