ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी » श्री योगी अरविंद यांचे गीताचिंतन

श्री योगी अरविंद यांचे गीताचिंतन

॥ प्रासंगिक : प्रा. प्र.श्री. डोरले |

‘गीतेतील ज्ञानी म्हणजे नि:संग, निष्क्रिय मानव नव्हे. जीवनाच्या सर्व घडामोडीत सर्वव्यापी परमेश्‍वराचे अस्तित्व आणि कर्तृत्व तो जाणतो. गीता म्हणजे केवळ शाब्दिक शुष्क चर्चा नसून, जीवनाच्या सर्वोच्च संघर्षात अध्यात्मनिष्ठा आणि प्रत्यक्ष जीवननिष्ठा यांच्यामध्ये एकात्मता कशी निर्माण करायची, याचे योगशास्त्र प्रकट करणारी आहे अशी श्री अरविंदांची गीतामीमांसा आहे. ईश्‍वरीशक्तीच्या विश्‍वकार्यासाठी स्वत:ला एक साधन म्हणून तयार करणे, केवळ ‘निमित्तमात्र’ समजणे, ‘सर्व धर्मांचा त्याग करून‘ ‘सर्व भावेन त्या परमेश्‍वराला शरण जाणे’ हेच गीताधर्माचे अद्वितीय वैशिष्ट्य श्री अरविंदांनी त्यांच्या चिंतनात मांडले आहे.

Yogi Arvind

Yogi Arvind

गीता प्रशस्ती : जगातील प्रमुख धर्मग्रंथांमध्ये भारतीयांचा प्रमुख धर्मग्रंथ म्हणून भगवद्गीतेला अधिकृत मान्यता आहे. ख्रिश्‍चनांचे बायबल, मुस्लिमांचे कुराण तसा हिंदूंचा धर्मग्रंथ भगवद्गीता आहे. गीता म्हणजे महाभारत या राष्ट्रीय महाग्रंथाचे एक महापर्व आहे. महाभारतातील असामान्य व्यक्ती, त्यांच्या वृत्ती-प्रवृत्ती, त्यांच्यातील संघर्ष, त्यांच्या क्रिया-प्रतिक्रिया आणि विशेषत: अर्जुनासारख्या एका महानायकाच्या जीवनात उद्भवलेला अति भव्य प्रसंग, त्याच्या भावनिक, मानसिक, आध्यात्मिक समस्या आणि त्याचे अतिशय तर्कनिष्ठ विवेचन, विश्‍लेषण आणि त्यातून भगवान श्रीकृष्णांनी केलेले मार्गदर्शन, असा या ग्रंथाचा प्रवास आहे. त्यातून ‘धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्र’ असलेल्या मानवी जीवनाचे स्पष्ट दर्शन महर्षी व्यासांनी घडविले आहे.
भगवद्गीता ही केवळ भारतीयांसाठीच सांगितलेली नसून, ती सपूंर्ण मानवसमाजासाठी सांगितली आहे. तिचे महत्त्व वर्णन करताना स्वामी विवेकानंद म्हणतात- ‘‘गीतेमधून भगवान श्रीकृष्णांनी जी शिकवण दिली आहे ती आतापर्यंत जगाला माहीत असलेली सर्वोत्तम शिकवण होती. ज्यांनी गीता लिहिली त्यांच्या बुद्धिमत्तेइतकी बुद्धी असलेली अशी व्यक्ती मानवी वंशात परत कधीच पाहायला मिळणार नाही.’’ (स्वा. ग्रं. खण्ड ७ वा) गीता ग्रंथ हा प्रस्थानत्रयीतील (म्हणजे ब्रह्मसूत्रे-उपनिषद आणि गीता) एक महत्त्वाचा ग्रंथ आहे. त्यावर आद्य शंकराचार्य रामानुजाचार्यांपासून तो आधुनिक काळातील लो. टिळक, पंडित सातवळेकर, योगी अरविंद यांनी विस्तृत भाष्ये केली आहेत. श्री योगी अरविंदांनी त्यांच्या ‘एसेज ऑन गीता’ या ग्रंथात भगवद्गीतेवर जे सखोल, तलस्पर्शी, यौगिक चिंतन मांडले आहे, त्याचा धावता आढावा, मागोवा घेण्याचा प्रयत्न करू.
गीताभाष्याचे दैवी प्रकटन : योगी अरविंदांचे संपूर्ण जीवन हे अनेक दैवी चमत्कारांनी भरलेले आहे. माणिक तोळा बॉम्बप्रकरणात त्यांना अलीपूरच्या कारागृहात ठेवण्यात आले होते. तेथे त्यांची साधना, उपासना, योगप्रक्रिया पूर्णत्वाला गेल्यात. त्यात त्यांना अदृश्यरूपाने स्वामी विवेकानंदांचे मार्गदर्शन होत असे. अलीपूरच्या कारागृहातच त्यांना भगवान श्रीकृष्णांचा सगुण साक्षात्कार झाला. त्या साक्षात्काराच्या दैवी अनुभवातूनच त्यांचे गीताभाष्य लिहिले गेले आहे. ती केवळ बुद्धीची शाब्दिक वटवट नाही, तर भगवद्गीतेच्या अठराव्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे-
यत: प्रवृत्तिर्भूतांना येन सर्वमिदं ततम्।
स्व कर्मना तमर्भ्यच सिद्धिं विदन्ति मानव: ॥१८॥४६॥
म्हणजे- ज्याच्यापासून सर्व भूतमात्राची उत्पत्ती झाली आहे व ज्याने हे सर्व विश्‍व व्यापिले आहे, त्या परमात्म्याची आपापल्या स्वाभाविक कर्माच्या योगाने उपासना केली असता मनुष्यास सिद्धी प्राप्त होते. ही अनुभूती, हा साक्षात्कार त्यांना कारागृहात झाला. त्याचे पडसाद त्यांच्या मुक्ततेनंतर उत्तरपाडा येथे त्यांच्या सत्काराच्यानिमित्ताने झालेल्या त्यांच्या जाहीर भाषणातून उमटले. त्या वेळी श्रोत्यांसमोर केलेल्या भाषणात त्यांनी आपल्या जीवनाच्या संपूर्ण ईश्‍वरार्पणसंबंधीचे सत्य प्रकट केले. गीताभाष्यात त्याचे स्वरूप त्यांनी विस्ताराने मांडले आहे. ते म्हणतात, कर्मयोग हा गीतोक्त तत्त्वज्ञानाचा गाभा आहे. केंद्र आहे. हा कर्मयोग म्हणजे ‘स्वत:च्या सर्व इच्छा, कृतींची पुरुषोत्तमाला दिलेली आहुती आहे. या आहुतीमध्ये ज्ञान-कर्म-भक्ती-योग यांची एकात्मता असते. व्यक्ती जसजशी दिव्यत्वामध्ये विकसित होत जाते तसतसे दिव्यत्वही आपल्या तेज, शक्ती, आनंदासह त्याच्याकडे प्रवाहित होते. श्री अरविंदांनी त्या दिव्यत्वाची, त्यांच्यामध्ये होणार्‍या अवतरणाची अनुभूती घेतली. त्या अनुभूतीचे वर्णन करताना ते म्हणतात- ‘‘हे संपूर्ण विश्‍व वासुदेवमय असल्याचे मी पाहिले. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी सर्वत्र व सर्वगत असणारे ब्रह्म मी सगुण स्वरूपात अनुभवले. तुरुंगाच्या कोठडीत, दारावरच्या देवडीत, देवडीवरच्या पहारेकर्‍यात, पहारेकर्‍यांवरील अधिकार्‍यात आणि सभोवताली असलेल्या कैद्यांत मला तोच परमेश्‍वर सगुण रूपात अनुभवायला आला. या संपूर्ण चराचर विश्‍वात तोच परमेश्‍वर भरून राहिला आहे. त्यामुळे भगवद्गीतेत- ‘सर्व वासुदेवम् इति’ हे जे सांगितले आहे ते सत्य आहे, हे मला प्रत्यक्ष अनुभवातून कळले. त्यामुळे भगवद्गीतेवरील माझी श्रद्धा अधिक सखोल आणि अडिग झाली.’’ शिशिरकुमार मित्र म्हणतात- ‘‘श्री अरविंदोज टाईम इन जेल वॉज डिव्होटेड टू द स्टडी ऑफ द गीता अ‍ॅण्ड द उपनिषदाज, अ‍ॅण्ड द प्रॅक्टिस ऑफ द योगाज अ‍ॅण्ड द गीता.’’ (लिबरेटर पृ. क्र. १४५) त्यामुळे श्री अरविंद हे गीतेचे केवळ वाचक नव्हते, तर ते गीताप्रणीत ज्ञान, भक्ती, कर्म आणि योग या मार्गाचे अनुभवी साधक होते. त्यामुळे त्यांच्या गीतेवरील भाष्याला, चिंतनाला सत्याच्या अनुभूतीचा आधार आहे.
गीतेतील युद्धयोग : भगवद्गीतेचा प्रारंभच ‘धर्मक्षेत्रे कुरूक्षेत्रे’ या मानवी जीवनसापेक्ष प्रमेयांनी झाला आहे. मानवी जीवन हे ‘खलु धर्म साधनम्’ जसे आहे तसेच ते भावनिक, मानसिक, नैतिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक अशा विविध संघर्षांची भूमी असलेले रणक्षेत्र म्हणजे कुरुक्षेत्रही आहे. संतांनीही याची जाणीव देताना ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ असेच म्हटले आहे. जीवनाच्या या सर्व पातळ्यांवर, आघाड्यांवर यशस्वी लढा कसा द्यायचा, हा ‘युद्धयोग’ गीतेने अतिशय चांगल्या प्रकारे विशद केला आहे. योगी अरविंदांनीही त्यांचे अनुभूतिसंपन्न असे प्रेरणादायी भाष्य केले आहे.
श्री अरविंदांचे संपूर्ण जीवन म्हणजे अनेकांगी महायुद्ध होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व स्वभावत:च समृद्ध होते. साहित्य, राजकारण, धर्मकारण, काव्यलेखन, संपादन, अनुशिलन समितीच्या द्वारा क्रांतिकारकांचे प्रबोधन, मार्गदर्शन, त्यांच्या भूमिगत चळवळीचे सूत्रसंचालन, अशा विविध पातळ्यांवर लढणारा हा स्वातंत्र्य सैनिक होता. योद्धा संन्यासी होता. त्यामुळे गीतेतील सर्वांग परिपूर्ण युद्धयोगाचे आत्मप्रत्ययाने परिपूर्ण असे दर्शन त्यांनी घडविले आहे.
गीतेतील युद्धयोगाची भौतिकापासून आत्मिकापर्यंतची (हतो वा प्राप्स्यपि स्वर्ग’…) अखंड विकसन प्रक्रिया त्यांनी विशद केली आहे. अन्यायाविरुद्ध प्रतिकारवृत्ती, क्रांतिकार्यासाठी गुप्त संघटना, सशस्त्र क्रांतीसाठी शस्त्रास्त्रांचा कारखाना, प्रगत युद्धशास्त्र शिक्षण, बौद्धिक-सामरिक शक्तीसाठी आणि मनोबलासाठी भवानीमंदिर योजना, अकुतोभय मनाने केलेले घणाघाती राजकीय सांस्कृतिक लेखन, भारताच्या मुक्तीसाठी पूर्वी कोणत्याही योगी पुरुषांनी न आचरलेला योगसंग्राम, दारिद्र्याविरुद्ध केलेला अखंड संग्राम, यासारख्या सर्वांगीण संघर्षातून गीतेतील युद्धयोगाचे त्यांचे सिद्धांत व्यक्त झाले आहेत. जिज्ञासूंनी त्यांचे ‘कुरुक्षेत्र’, ‘मॅन अ‍ॅण्ड द बॅटल ऑफ लाईफ’, ‘द क्रिड ऑफ द आर्यन फायटर’ हे लेख पाहावेत.
श्री अरविंदांनी व्यक्तिनिष्ठ कर्तव्य, राष्ट्रनिष्ठ कर्तव्य आणि दिव्य ईश्‍वरनिष्ठ कार्य अशा युद्धयोगाच्या उत्तरोत्तर विकसित होत जाणार्‍या अवस्था मांडल्या आहेत. अर्जुनाच्या संभ्रमावस्थेला कारण त्याची वैयक्तिक जीवननिष्ठा तसेच भौतिक आणि आत्मिक जीवनातील त्याला जाणवणारा विरोध या होत्या. जीवनातील कटू वास्तव आणि अध्यात्मनिष्ठ कृती याचा समन्वय कसा करायचा, या बाबतीत त्याचा गोंधळ झाला होता. जीवनातील वास्तवाच्या जाणिवेने त्याच्या मनात कर्मसंन्यासाची आणि धैर्यहिनतेची भावना प्रबल बनली. श्री अरविंदांनी अर्जुनाच्या अवस्थेतून मानवी आणि दैवी अशा दोन पातळ्यांवर युद्धयोगाचे स्वरूप स्पष्ट केले आहे. ते म्हणतात, बाह्य जीवनतील संघर्ष केवळ अस्तित्वाचा लढा असतो. वन्स वॉर ऑफ एक्झिस्टन्स असतो, तर परमेश्‍वराने उभा केलेला लढा हा त्याने निर्माण केलेल्या शाश्‍वत जीवन मूल्याधिष्ठित धर्ममूल्यांसाठी असतो. ‘युनिव्हर्सल अ‍ॅण्ड एथिकल मॉरल्स ऑफ ह्युमन बीईंग दॅट इज ‘धर्म’ या लढ्यासाठी प्रत्येक योद्ध्याने ‘स्व-धर्म’, स्व-कर्मनिष्ठा समजून उभेच राहिले पाहिजे. श्री अरविंद म्हणतात हा स्वधर्म- ‘‘भयामुळे, स्वार्थामुळे, मानसिक दुर्बलतेमुळे, निष्क्रियतेमुळे, संतसाधुत्व भ्रमामुळे, मृत्युभयामुळे, नातलगांच्या मोहममतेमुळे कदापिही त्यागला जाऊ नये.’’ या प्रकारच्या गीतोक्त युद्धयोगाच्या मांडणीतून पारतंत्र्याच्या कालखंडात देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा ‘युगधर्म’ पालनासाठी असंख्य क्रांतिकारक पुढे आले.
श्री अरविंद म्हणतात, जीवन आणि जग म्हणजे काय? अधर्म, कुप्रवृत्ती नष्ट करण्यासाठी आपण काम केले पाहिजे, हे जाणून संघर्ष केला नाही तर अपयश येते. वास्तव आणि ध्येय यातील संघर्षामध्ये व्यक्तीने बौद्धिक, नैतिक-सामाजिक युद्धयोग आचरल्याशिवाय तिला प्रगती-उन्नतीचे एक पाऊलही यशाच्या दिशेने टाकता येणार नाही.
संन्यस्त आत्मघातकी साधुत्वावर श्री अरविंदांनी घणाघात केले आहेत. संघर्ष कर्मापासून स्वत:ला अलिप्त ठेवणारा माणूस स्वत:ला मोठा नीतिमान मानू शकेल, पण अधर्मी, तामसी हिंसकांना तो मोकळे रान सोडतो. संपूर्ण मानवी इतिहास या सत्याची साक्ष देतो. हे विश्‍वसत्य श्री अरविंदांनी प्रभावी रीतीने मांडले आहे. या गीताधर्माचे पालन प्रत्येकाने श्रद्धायुक्त अंत:करणाने केले तर सहजपणाने त्याला अभ्युदय आणि नि:श्रेयसाची प्राप्ती होऊ शकेल, यात काही शंकाच नाही! परंतु, त्यासाठी गीतेचे अनुशासन पाळणे जरूर आहे. त्यासंबंधात श्री अरविंद म्हणतात- ‘‘गीतेचे अनुशासन म्हणजे नकारात्मक, कर्मसंन्यास नव्हे. सर्व कर्मांचा समन्वय हे गीतेचे वैशिष्ट्य आहे. ईश्‍वर सर्व जगाचा, लोकांचा- लोकमहेश्‍वर आहे. मानवी अंतरात्म्यातून
आणि विश्‍वात्मक शक्तीतून तो सर्वांचे प्रशासन करीत असतो.’’
‘गीतेतील ज्ञानी म्हणजे नि:संग, निष्क्रिय मानव नव्हे. जीवनाच्या सर्व घडामोडीत सर्वव्यापी परमेश्‍वराचे अस्तित्व आणि कर्तृत्व तो जाणतो. ‘योग ऑफ युनियन, वुईथ द इटर्नल अ‍ॅण्ड स्पिरिच्युअल, इन द युनिव्हर्स.’ दिव्य शक्ती आणि दिव्य कर्म यांचा संयोग हे गीताधर्माचे अद्वितीय वैशिष्ट्य श्री अरविंदांनी स्पष्ट केले आहे. गीता म्हणजे केवळ शाब्दिक शुष्क चर्चा नसून, जीवनाच्या सर्वोच्च संघर्षात अध्यात्मनिष्ठा आणि प्रत्यक्ष जीवननिष्ठा यांच्यामध्ये एकात्मता कशी निर्माण करायची, याचे योगशास्त्र प्रकट करणारी आहे अशी श्री अरविंदांची गीतामीमांसा आहे. ईश्‍वरीशक्तीच्या विश्‍वकार्यासाठी स्वत:ला एक साधन म्हणून तयार करणे, केवळ ‘निमित्तमात्र’ समजणे, ‘सर्व धर्मांचा त्याग करून‘ ‘सर्व भावेन त्या परमेश्‍वराला शरण जाणे’ हेच गीताधर्माचे अद्वितीय वैशिष्ट्य श्री अरविंदांनी त्यांच्या चिंतनात मांडले आहे.
श्री समर्थ रामदास म्हणतात तेच खरे आहे-
‘बुद्धी देतो सेवकाला। बुद्धीने पार पाववी। राम कर्ता म्हणता। यश कीर्ति प्रताप॥

Posted by : | on : 13 Jan 2019
Filed under : आसमंत, पुरवणी.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी (6 of 780 articles)

Musicalsign
मानसरंग : मयुरेश डंके | मला यातच करिअर करायचंय असं स्वत:शीच म्हणणं आणि आपलं म्हणणं इतरांना पटवून देणं यांत फार ...

×