ads
ads
दोन टप्प्यानंतर ममता झोपल्याच नाहीत

दोन टप्प्यानंतर ममता झोपल्याच नाहीत

•पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, बुनियादपूर, २० एप्रिल –…

दहशतवाद, पाकला प्रत्युत्तर देण्यासाठी मोदीच पंतप्रधान हवेत : अमित शाह

दहशतवाद, पाकला प्रत्युत्तर देण्यासाठी मोदीच पंतप्रधान हवेत : अमित शाह

बंगरूळु, २० एप्रिल – देश सुरक्षित राहण्यासाठी आणि दहशतवाद…

राज्यांमध्ये लवकरच सायबर न्यायवैद्यक प्रयोगशाळा

राज्यांमध्ये लवकरच सायबर न्यायवैद्यक प्रयोगशाळा

•महिलाविरोधी गुन्ह्यांतील डीएनए चाचणी होईल शक्य, नवी दिल्ली, २०…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

कराची, १८ एप्रिल – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात एका महामार्गावर…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

सोलापूर, १४ एप्रिल – काँग्रेस हा गाढवांचा पक्ष असल्याची…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » आसमंत, दीपक कलढोणे, पुरवणी, स्तंभलेखक » श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे |

चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा हा शुभ्रधवल पोशाख ही सोलापूरची ऐतिहासिक परंपरा आहे. या पोशाखात अनवाणी चालणारे भक्तगण म्हणजे भक्तीसुगंधाने ओतप्रोत भरलेली आणि अभेदाशी नाते सांगत दरवळणारी पारिजातफुलेच आहेत असे वाटते. सारी मंडळी श्री शिवयोगी सिद्धरामेश्‍वरांनी दाखवलेल्या समाजकल्याणकारी अध्यात्माच्या वाटेवरुन चालत असतात. शिवयोगी श्री सिद्धरामेश्‍वरांनी मनामनात मानवतेचे कल्याणकारी आकाश पेरले आहे. मातीत माती मिसळून गेली तरी शेवटी मातीच राहते. पाण्यात पाणी मिसळून गेल्यानंतर उरते ते पाणीच..! माणसात माणूस मिसळला तरी उरतो तो माणूसच.. अशा विचारांची उदात्त शिकवण देणार्‍या शिवयोगी श्री सिद्धरामेश्‍वरांचे अखंड कृपाछत्र सोलापूर शहराला लाभल्याने सोलापूर शहर पावन तीर्थ बनले आहे.

Gadda Yatra Solapur

Gadda Yatra Solapur

संक्रातीच्या काळात सोलापूरातील रस्ते कपाळी अर्गजा, डोईवरती शुभ्र ‘रुंबाल’, अंगामध्ये बारा बंदी आणि धोतर नेसलेल्या भक्तगणांनी फुलतात. चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा हा शुभ्रधवल पोशाख ही सोलापूरची ऐतिहासिक परंपरा आहे. या पोशाखात अनवाणी चालणारे भक्तगण म्हणजे भक्तीसुगंधाने ओतप्रोत भरलेली आणि अभेदाशी नाते सांगत दरवळणारी पारिजातफुलेच आहेत असे वाटते. सारी मंडळी श्री शिवयोगी सिद्धरामेश्‍वरांनी दाखवलेल्या समाजकल्याणकारी अध्यात्माच्या वाटेवरुन चालत असतात. शिवयोगी श्री सिद्धरामेश्‍वरांनी मनामनात मानवतेचे कल्याणकारी आकाश पेरले आहे. मातीत माती मिसळून गेली तरी शेवटी मातीच राहते. पाण्यात पाणी मिसळून गेल्यानंतर उरते ते पाणीच..! माणसात माणूस मिसळला तरी उरतो तो माणूसच.. अशा विचारांची उदात्त शिकवण देणार्‍या शिवयोगी श्री सिद्धरामेश्‍वरांचे अखंड कृपाछत्र सोलापूर शहराला लाभल्याने सोलापूर शहर पावन तीर्थ बनले आहे.
योगदंड आणि नंदीध्वज या दोन गोष्टींना यात्रेमध्ये मोलाचे स्थान आहे. योगदंडाचे मानकरी सोमशंकर देशमुख यांच्या घराण्यात ९०० वर्षांची योगदंड पूजेची परंपरा आहे. त्यांच्या घरी श्री सिद्धरामेश्‍वरांच्या योगदंडाचे आणि श्री किरीटेश्‍वर यांच्या रुद्राक्षाच्या किरिटाचे दर्शन घडते. त्या दर्शनाने मन एका विलक्षण लहरींनी भरुन आणि भारुन जाते. शिवयोगी श्री सिद्धरामेश्‍वरांची यात्रा भाषिक आणि प्रांतिक भेदापलीकडे घेऊन जाणारी अभेद मंगलयात्रा आहे. समानतेशी नाते सांगणार्‍या या परंपरेत अध्यात्मिक सामर्थ्य व श्री सिद्धरामेश्‍वरांच्या लोकोत्तर कार्याचे दिव्यतत्वी दर्शन होते. या सोहळ्यामध्ये मुख्य ७ उंच नंदीध्वजांच्या मिरवणुका हा आकर्षणाचा विषय आहे. मानाचे असे ७ नंदीध्वज आहेत. पहिला नंदीध्वज हा श्री सिद्धरामेश्‍वर देवस्थानचा असून याचे मानकरी शिवानंद हिरेहब्बू आहेत. याच ध्वजाला मकरसंक्रांतीदिवशी नागफणा बांधला जातो. दुसर्‍या नंदीध्वजाचे मानकरी श्री सोमशंकर देशमुख आहेत. तिसरा नंदीध्वज माळी समाजाचा असून माशाळ व गाडेकर परिवार याचे मानकरी आहेत. चवथा नंदीध्वज सोनार समाजाचा आहे. कुरुलकर व कुमठेकर यांच्याकडे याचा मान आहे. कालिका तरुण मंडळामार्फत हा नंदीध्वज मिरवणूकीत सामील होतो. पाचवा नंदीध्वज सुतार समाजाचा असून रेवणसिद्ध बन्नशेट्टी घराणे याचे मानकरी आहेत. सहावा आणि सातवा नंदीध्वज मातंग समाजाचा असून बनसोडे परिवार व कांबळे परिवार हे याचे मानकरी आहेत. अभेदयात्रेत सात नंदीध्वजाचे मानकरी वेगवेगळ्या समाजाचे असून श्रमिक व कारागिरांना समाजरचनेत मानाचे स्थान आहे, हेच ही यात्रा दर्शविते. नंदीध्वजाचे स्वरुपही चकित करणारे आहे. विसेक फूट उंच, जाड – घणसर वजनदार काठीला वरच्या भागी गोलाकार चमकदार सोनेरी वर्खाचे छत्र लावलेले असते. ही काठी केवळ कमरेच्या एका पट्टयावर व एकच व्यक्ती हाताने तोलून धरत मिरवणूकीतील गर्दीतून घेऊन जाते. अशा सात काठ्यांच्या म्हणजेच नंदीध्वजांच्या मिरवणूका पारंपारिक पोशाखातील शिवभक्तांच्या ‘हर्र बोला हर्र’ अशा जयघोषात परिक्रमेला निघतात. संक्रातीआधी ४ दिवस या उत्सवातील धार्मिक विधींना सुरुवात होते.
महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र आदि प्रांतात लक्षावधी शिवभक्तांचा थवाच अवतरतो. मकर संक्रांतीच्या शुभपर्वावरती सारी मंडळी एकत्र येतात. पहिल्या दिवशी शुक्रवार पेठेतील शेटे वाड्यात योगदंडाची पूजा होते. दुसर्‍या दिवशी सर्व नंदीध्वज सुशोभित करण्यात येतात. याला साज चढवणे असे म्हणतात. तिसर्‍या दिवशी हिरेहब्बू वाड्यापासून नंदीध्वजांच्या मिरवणूकीला प्रारंभ होतो. श्री सिद्धेरामेश्‍वर मंदिरातील अमृतलिंगाला प्रथम तैलाभिषेक झाल्यानंतर श्री सिद्धरामेश्‍वरांनी स्थापन केलेल्या ६८ लिंगांना तैलाभिषेक घालण्यात येतो. १४ किलोमीटरची प्रदक्षिणा घालीत ७ नंदीध्वजांची मिरवणूक निघते. उपवास आणि शिवध्यानाने पवित्र झालेले भक्तगण हे वजनदार नंदीध्वज पेलत प्रदक्षिणा मार्गावरुन परिक्रमेसाठी आरंभतात. कमरेला बांधलेल्या पट्ट्यामध्ये एका गोलाकार साधनामध्ये अडकवलेला नंदीध्वज पेलत वरच्या मंगल गोलाकार चक्राकडे आकाशाकडे पाहत वाट चालणे, ही अत्यंत अवघड कामगिरी श्रद्धेच्या बळावर भक्तगण सहज पार पाडतात. ६८ लिंगांना तैलाभिषेक घालून झाल्यानंतर चवथ्या दिवशी यात्रेतील परमबिंदू अक्षता सोहळा संपन्न होतो. सिद्धेश्‍वर मंदिराच्या आवारातील संमती कट्ट्यावर संपन्न होणार्‍या अक्षता सोहळयामध्ये कुंभारकन्येचा शिवयोगी सिद्धरामेश्‍वरांच्या योगदंडाशी प्रतिकात्मक विवाह संपन्न होतो. पाचव्या दिवशी संक्रात. या दिवशी गंगापूजन योगदंड व नंदीध्वजांना स्नान घातले जाते. होमाची पूजा केली जाते. नंदीध्वजाला नागफणीही बांधली जाते. होम मैदानावर होम प्रदीपन सोहळा होतो. कुंभारकन्येचे सती जाणे, या कथेचा हा प्रतिकात्मक सोहळा तेथे साजरा होेतो. त्यानंतर भाकणूक होते. संक्रातीच्या दुसर्‍या दिवशी शोभेचे दारुकाम केले जाते. या दारुकामातूनही विविध सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकण्याचे कार्य घडत असते हे विशेष होय. उत्सवाच्या अखेरच्या दिवशी देशमुख वाड्यामध्ये योगदंडाची पूजा होते. यात्रेचा हा सांगता समारंभ असतो. या दिवशी कप्पडकळ्ळी विधी होतो. म्हणजेच नंदीध्वजाचा साज उतरविण्यात येतो आणि यात्रेची समाप्ती होते. या संपूर्ण यात्राकाळामध्ये होणार्‍या विविध धार्मिक विधीतून शिवयोगी सिद्धरामेश्‍वर आणि कुंभारकन्येच्या विवाहाची कथा प्रतिकात्मकरुपाने साजरी केली जाते..
योगी श्री सिद्धरामेश्‍वरांशी विवाहाची इच्छा व्यक्त करणार्‍या कुंभारकन्येला श्री सिद्धरामेश्‍वर समजावितात परंतु ती तिच्या निश्‍चयापासून ढळत नाही. तिच्या इच्छेखातर श्री सिद्धरामेश्‍वर तिला त्यांच्या योगदंडाशी विवाह करुन दुसरे दिवशी सती जायला सांगतात. या विवाह सोहळ्यातील साजशृंगार, हळद लावणे, अक्षतासोहळा, हळद काढणे, कुंभारकन्येचे सती जाणे या गोष्टींचे प्रतिकात्मक विधी सात दिवसांच्या उत्सवामध्ये साजरे केले जातात.
यात्राकाळातील पहिल्या दिवशी रात्री बारावाजून पाच मिनिटांनी सर्व नंदीध्वजांना साज चढविण्यात येतो. सकाळी आठ वाजता सर्व नंदीध्वज मल्लिकार्जून मंदिराजवळील हिरेहब्बू यांच्या घरापासून श्री सिद्धेश्‍वर मंदिरात मिरवणुकीने आणले जातात. मुख्य योगदंडधारी हिरेहब्बूंसह मंदिरात मिरवणूक आल्यानंतर तेथे नंदीध्वजधारक व भक्तगणांना महाप्रसाद दिला जातो. त्यानंतर सुरुवात होते ती श्री सिद्धरामेश्‍वरांनी स्थापन्न केलेल्या ६८ लिंगाना तैलाभिषेक व हलदीलेपन करण्याच्या विधीला. हा विधी करीत व प्रदक्षिणा घालत सिद्धेश्‍वर मंदिरातील अमृतलिंगापासून सुरुवात झालेली ही परिक्रमा श्री मल्लिकार्जून मंदिरापर्यंत येते. श्री सिद्धेश्‍वर मंदिर, डफरिन चौक, रेल्वे स्टेशन, जुनी मील कंपाऊंड, कल्पना टॉकिज, भागवत टॉकिज, पांजरापोळ चौक, एस्.टी. स्टँडच्या पुढील समांतर रस्त्याने आयुर्वेदिक कॉलेज समोरुन सम्राट चौक, बाळी वेस, चाटी गल्ली, शिवानुभव मंगल कार्यालय, मीठ गल्ली, मधला मारुती, विजापूर वेस, जिल्हाधिकारी निवासा समोरील गुरुभेट लिंग, होम मैदान, पार्क चौक, लकी चौक, सरस्वती चौक, भागवत टॉकिज, काळी मशीद या मार्गे ही मिरवणूक श्री मल्लिकार्जून मंदिरापाशी साधारण रात्री नऊदहाच्या सुमारास येते. परिक्रमामार्गावर मोठ्या संख्येन्ने भक्तगण खोबर्‍यांचा हार अर्पण करुन पूजा करीत असतात. या मार्गावरुन येऊन हे नंदीध्वज हिरेहब्ब्ूंच्या घरी विसावतात. दुसर्‍या दिवशी सकाळी आठच्या सुमारास पुन्हा सिद्धेश्‍वर मंदिरामध्ये जाण्यासाठी नंदीध्वजाची मिरवणूक निघते. या मार्गावर संस्कारभारतीचे स्वयंसेवी कार्यकर्ते व कलासंगम ही संस्था आपल्या हस्तकौशल्याने मनमोहक रांगोळ्यांच्या पायघड्या घालत राहते. या दिवशी नंदीध्वजांना बांशिगही बांधले जाते. सन्ंमती कट्टयावर नंदीध्वज आल्यानंतर मानकर्‍यांना आहेर दिले जातात तसेच गंगापूजन व सुगडीपूजनही केले जाते. यावेळी नंदीध्वजांना खोबर्‍याचा हार बांधण्याचा मान गुरुसिद्धप्पा महादप्पा जम्मा यांच्याकडे आहे. त्यांनी हार बांधल्यावर अक्षता सोहळ्याला सुरुवात होते. मध्यान्हीच्या सुमाराला अक्षता सोहळा संपन्न होतो. मंगलाष्टके म्हणण्याचा मान शेटे परिवाराला आहे. या सोहळ्यानंतर परत ६८ लिंगाना प्रदक्षिणा घातली जाते व लिंगावर अक्षतांचा वर्षाव होतो. तेथून परिक्रमेच्या त्याच मार्गावरुन्न सकाळी ६ च्या दरम्यान हिरेहब्बुंच्या घरी हे ध्वज येतात आणि उत्सवाचा तिसरा दिवस सुरु होतो. हिरेहब्बुंच्या घरी अल्पविश्रांतीनंतर हळद काढण्याच्या विधीसाठी नंदीध्वज परत सिद्धेेश्‍वर मंदिरात येतात. तेथील तलावातील पाण्याने सर्वनंदीध्वजांना मंगलस्नान घातले जाते. यावेळी एका परडीमध्ये सुहासिनीचे वाण घातले जाते. नंतर त्यावर सूप झाकले जाते. या विधीनंतर ते वाण तलावातील पाण्यात गंगार्पण केले जाते. यानंतर नंदीध्वज पुन्हा हिरेहब्बुंच्या घरी विसाव्यासाठी येतात. दुपारी चार वाजता नंदीध्वज होमविधीसाठी निघतात. मिरवणूक सोन्यामारुतीजवळ आल्यानंतर मुख्य नंदीध्वजाला नागफणा बांधला जातो. तेथून होममैदानावर सारे नंदीध्वज पोहोचतात. तेथे कुंभारकन्येच्या सती जाण्याचा विधी केला जातो. रेवाप्पा कुताटे यांच्या वंशपरंपरागत मानाप्रमाणे त्यांच्या कुटुंबियांकडून येथे कुंभारकन्येचे प्रतिक म्हणून बाजरीच्या पाच पेंड्या अर्पण केल्या जातात. या पेंड्यांनाच साडी, बांगड्या व सुहासिनीचे इतर अलंकार चढविले जात होममैदानावर होम होतो. त्यानंतर वासराची भाकणूक होते. दिवसभर उपाशी ठेवलेल्या वासरापुढे विविध धान्य व शेतीउत्पादने ठेवली जातात. ते वासरु आधी काय खाते? त्यावर कोणते पदार्थ महाग किंवा स्वस्त होणार? याची व अन्य परिस्थितीची भाकणूक केली जाते. भाकणूकीनंतर सर्व नंदीध्वज सिद्धेश्‍वर मंदिरात जाऊन तेथून परत हिरेहब्बुंच्या घरी विसाव्यासाठी येतात. यानंतर यात्रेचा चवथा दिवस सुरु होतो. यादिवशी नंदीध्वजाची मिरवणूक दुपारी चारच्या सुमारास निघते. रात्री आठच्या सुमारास शोभेचे दारुकाम संपन्न होते. यावेळी विविध सामाजिक संदेशाच्या प्रकाशरेषांचे नयनमनोहर प्रतिबिंब श्री सिद्धेश्‍वर तलावाच्या पाण्यात पडत राहते. आकाश उजळत राहते. या सोहळ्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास नंदीध्वज हिरेहब्बूंच्या घरी विसाव्यासाठी जातात. सोहळ्याचा पाचवा दिवस म्हणजे कप्पडकळ्ळी.. सर्व नंदीध्वज मल्लीकार्जून मंदिरात येतात. तेथे सर्वनंदीध्वजांचा साज उतरवला जातो आणि यात्रेची सांगता होते.
कुंभारकन्या विवाहाची पारंपारिक कथा हे यात्रेचे कथासूत्र
एक कुंभारकन्या असते. ती शिवयोगी श्री सिद्धरामेश्‍वरांशी विवाहाची इच्छा व्यक्त करते. श्री सिद्धरामेश्‍वर तिला या इच्छेपासून्न परावृत्त करु पहातात, परंतु ती तिचा हट्ट सोडत नाही. तिच्या इच्छेखातर श्री सिद्धरामेश्‍वर तिला त्यांच्या योगदंडाशी विवाह करुन दुसरे दिवशी सती जायला सांगतात. याच पारंपारिककथेतील साजशृंगार करणे, हळद लावणे, अक्षतासोहळा, हळद काढणे, कुंभारकन्येचे सती जाणे आदि विधी यात्राकाळात साजरे होतात…
रांगोळ्यांच्या पायघड्या : संस्कारभारतीचे आगळे वैशिष्ट्य
संस्कारभारतीचा रंगावली विभाग गेले पंधरावर्षाहून अधिक काळ अक्षता सोहळ्यादिवशी नंदीध्वजाच्या मार्गावर सुंदर रंगीत रांगोळ्यांच्या पायघड्या घालत असतात. या पायघड्यांबरोबरच सामाजिक संदेश देणार्‍या बोधवाक्यांसहित रांगोळीचे गालिचे दत्त चौकात काढले जातात. या रांगोळया पहायला तेथे भक्तगण व न्नागरिक मोठ्या उत्सुकतेन्ने जमतात. यंदा संपूर्ण भारतातून पाचशेंच्या वर रंगावली कलाकार आपल्या रंगावली कलेतून पायघड्या घालणार आहेत. अखिल भारतीय रंगावली विभागप्रमुख रघुराज देशपांडे आणि संस्कारभारतीचे अवधूत मोहोळकर यांच्या व्यवस्थापनाखाली सचिव अनंत देशपांडे, महाराष्ट्राच्या रंगावली विभागप्रमुख संगीता भांबुरे आणि ममता अवस्थी, देवेंद्र अयाचित, श्रीनिवास अयाचित, बाळू वल्लाळ आदि अनेक कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
सिद्धरामेश्‍वर चरित्र रंगावली प्रदर्शन निर्मलकुमार फडकुले सभागृहात होत आहे. यात विविध १२ विषयावर ही रंगावली साकारली जाणार आहे.
आनंदयात्रा : गड्डा यात्रा
१० जानेवारी ते २६ जान्नेवारी अशी १६ दिवसांची यात्रा होममैदान, पंचकट्टा, सिद्धेश्‍वर देवस्थान परिसर येथे भरत असते.. माणसांच्या गर्दीने खचाखच भरलेले मैदान असले तरी या सर्व काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये तसेच भक्तगणांना अधिकाधिक यात्रेचा आनंद लुटता यावा यासाठी यात्रा कमिटीचे खास कार्यालय चोवीस तास सेवेसाठी चालू असते. महानगरपालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि देवस्थान समिती यांच्या समन्वयाने यात्रेची व्यवस्था चोख ठेवली जाते. या ठिकाणी मनोरंजन आणि खानाखजिना, तसेच विविध खेळणी, उंच किंवा आडवे इलेक्ट्रिक पाळणे, दैनंदिन जीवनोपयोगी वस्तू त्याचबरोबर विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल दिमाखात उभे असतात. येथे काय मिळत नाही? हे मोजायचे ठरवले तरी हाताची दहा बोटे पुरे..!
स्मार्ट सिटी योजनेत शोभिवंत झालेल्या नव्या स्वरुपातील होम मैदानावरची यंदाची पहिली यात्रा आनंदमयी..
होम मैदानाच्या चारही बाजूनी मस्त कंपाऊंड, नवे विद्युत दिवे. बाजूला वॉकिंग ट्रॅक. अत्यंत सुंदर आणि स्वच्छ अशा होममैदानाच्या नव्या स्वरुपाने भक्तगणांनी आनंदाची पर्वणी मिळणार आहे.

Posted by : | on : 13 Jan 2019
Filed under : आसमंत, दीपक कलढोणे, पुरवणी, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, दीपक कलढोणे, पुरवणी, स्तंभलेखक (235 of 1367 articles)

Kumbh 01
विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ महिन्यात विशेषत: कुंभाच्या काळात गंगा, यमुना व अदृश्य सरस्वतीच्या संगमात स्नानाचे फार ...

×