ads
ads
दोन टप्प्यानंतर ममता झोपल्याच नाहीत

दोन टप्प्यानंतर ममता झोपल्याच नाहीत

•पंतप्रधान मोदी यांचा जोरदार हल्ला, बुनियादपूर, २० एप्रिल –…

दहशतवाद, पाकला प्रत्युत्तर देण्यासाठी मोदीच पंतप्रधान हवेत : अमित शाह

दहशतवाद, पाकला प्रत्युत्तर देण्यासाठी मोदीच पंतप्रधान हवेत : अमित शाह

बंगरूळु, २० एप्रिल – देश सुरक्षित राहण्यासाठी आणि दहशतवाद…

राज्यांमध्ये लवकरच सायबर न्यायवैद्यक प्रयोगशाळा

राज्यांमध्ये लवकरच सायबर न्यायवैद्यक प्रयोगशाळा

•महिलाविरोधी गुन्ह्यांतील डीएनए चाचणी होईल शक्य, नवी दिल्ली, २०…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

पाकिस्तानमध्ये १४ प्रवाशांना घातल्या गोळ्या

कराची, १८ एप्रिल – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात एका महामार्गावर…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

काँग्रेस हा गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर

सोलापूर, १४ एप्रिल – काँग्रेस हा गाढवांचा पक्ष असल्याची…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, स्तंभलेखक, हितेश शंकर » संवैधानिक विश्‍वासार्हतेवर ‘चळवळ्यां’चा हल्ला

संवैधानिक विश्‍वासार्हतेवर ‘चळवळ्यां’चा हल्ला

॥ रोखठोक : हितेश शंकर |

Chalval

Chalval

न्यायपालिका, विधिपालिका, कार्यपालिका आणि वृत्तपालिका या चार स्तंभांवर लोकतंत्राची संपूर्ण इमारत उभी आहे. या स्तंभांमध्ये जराही निर्बलता, तडा किंवा डळमळणे आले तर काय होईल?
भारतीय लोकतंत्राला हा प्रश्‍न अधिक चपखल लागू आहे. कारण जगातील सर्वात विशाल लोकतंत्र चहुबाजूंच्या धोक्यांसाठी पुरेसे खुले आहे.
कलंकितांच्या राजकारणातील प्रवेशापासून ते प्रांतवाद-वंशवाद यांचा दंश सहन करत असलेली विधिपालिका!
नोकरशाहीच्या सुस्त-भ्रष्ट कार्यकथा!
सैन्याद्वारे निर्वाचित सरकारचे सत्तासन उलथविण्यासारख्या असत्य, मनाला वाटल्या तशा बातम्या प्रसारित करणारा आणि ‘राडिया टेप’ कांडात रंगेहात पकडला गेल्यावरही जराही लाज न वाटणारा मीडिया!
आणि न्यायपालिका…! ६० वर्षे एका टोळीच्या काठीने व्यवस्थेला हाकत असताना किती तरी वेळा नियमांना बाजूला सारण्यात आले आणि किती तरी वेळा न्यायपालिकेचा हात पिरगळण्यात आला, याचा तर कधी कुणी हिशेबही घेतला नाही.
या उपरही भारतीय लोकतंत्र केवळ टिकलेच नाही तर, ते बळकट होत राहिले. याचे श्रेय केवळ आणि केवळ या लोकतंत्रातील जनतेलाच आहे.
भारतातील ही जनता (जिची संस्कृती ‘विविध’ प्राचीन धडे शिकून समृद्ध आहे) खूप समजूतदार आहे. म्हणून ती योग्य असेल त्याचा स्वीकार, अयोग्य असेल त्याचा तिरस्कार आणि दुरुस्त होण्यालायक वस्तूंच्या परिष्काराचा निर्णय घेऊन टाकते. परंतु, हेही सत्य आहे की, जनतेच्या या समजूतदारपणाला आणि योग्य असलेल्यांप्रति विश्‍वासाला दगा देणारे-आव्हान देणारे काही लोक, याच लोकतंत्राच्या सावलीत बसले आहेत.
लोकतंत्राच्या सावलीत बसले असूनही, जनतेच्या भावनांना धोका देणे, संवैधानिक संस्थांच्या विश्‍वासार्हतेला सुरुंग लावणे आणि यासारखी तमाम कटकारस्थाने करत असतानाही, स्वत:च्या छातीवर आंदोलनवादी (अ‍ॅक्टिव्हिस्ट) प्रगतिशील बिल्ला लावणे, या मंडळींना चांगलेच साधते.
तीस्ता सेटलवाड आठवते? या कथित चळवळ्या बाईबाबत असे सांगितले जाते की, तिच्या इशार्‍यावरून तिच्या सहकार्‍यांनी दोन डझनाहून अधिक मुसलमानांच्या कबरी खोदून शव काढले होते. कारण? ‘मोदी’च्या विरुद्ध जाळे पसरविण्याचा काम वेगाने पूर्ण व्हावे म्हणून!
तुम्हाला हेही माहीत असेल की, तीस्ता व तिच्या पतीवर, एनजीओला मिळालेला आर्थिक निधी, महागड्या सौंदर्यप्रसाधनांसारख्या वैयक्तिक गोष्टींवर खर्च केल्याचा खटला सुरू आहे.
कठुआ बलात्कार प्रकरण आठवते? येथेही पीडितेच्या मदतीसाठी पैसे गोळा करणार्‍या- ‘मिल्ली’ संस्थेवर निधीत घोटाळा केल्याचा आरोप होत आहे, याचीही माहिती आपल्याला असली पाहिजे. पीडितेची वकील दीपिका राजावतचा सहकारी तालिब हुसेन, स्वत: एका बलात्कार प्रकरणात फसला आहे आणि स्वत: दीपिका या प्रकरणी झालेल्या एकूण ११० सुनावणींपैकी फक्त दोन सुनावणींना हजर राहिली आहे.
वरील दोन प्रकरणे केवळ उदाहरण आहे. अश्रू आणि आक्रोश प्रदर्शित करणार्‍या अतिसंवेदनशील-प्रगतिशील चेहर्‍यांच्या मागे एखादे कारस्थानही असू शकते, हे दाखविणारी ही उदाहरणे आहेत.
असे लोक जनआक्रोशाला भडकवून स्वत:चा केवळ स्वार्थच साधत नाहीत तर, ऐनवेळी मुद्यांपासून, घटनास्थळापासून अचानक बेपत्तादेखील होतात. अशा संधिसाधूपणा आणि रिक्ततेमुळे या मंडळींवर आघात होतो की नाही माहीत नाही, परंतु, व्यवस्थेच्या स्तंभांवर मात्र उदासीनतेचा हातोडा अवश्य चालविला जातो.
हा हातोडा बसल्यावर समाजाचे त्याच्याच संस्थाबद्दल-व्यवस्थांबद्दल काय मत होते-
-राजकारण वाईट आहे. यात केवळ वाईट लोकच असतात.
-सरकारी नोकरी आरामाची आहे. तिथे काम करावे लागत नाही. वरची कमाईदेखील होते आणि नंतर पेन्शनही मिळते.
-न्यायालयात केवळ पैसेवाले आणि दबदबा असणार्‍यांचीच सुनावणी होते.
-मीडिया स्वत:च्या ‘हिशेबा’ने बातम्या प्रसारित करतो. लोकांशी संबंधित बातमी दाबून टाकतो.
जिथे विश्‍वास असायला हवा, तिथेच अविश्‍वासाची भावना गडद कशी होत गेली!
या व्यवस्थेतच राहून आम्हाला स्वत:च्याच मुळापासून तोडण्याचे, आपापसात लढविण्याचे आणि अशा संधींचा फायदा उचलण्याचे काम कुठले लोक करत आहेत? व्यवस्थेच्या प्रत्येक पायदानावर उपद्रवी आंदोलनाची प्यादी आणि ढाल बनून कुठले लोक काम करत आहेत?
सकारात्मक आंदोलन नक्कीच आवश्यक आहे; परंतु निहित स्वार्थ किंवा वामपंथीयांसारख्या खुनशी-उपद्रवी विचारधारेची आंदोलने समाजात निराशा, विषाद आणि आक्रोश उत्पन्न करतात, जेणेकरून लोकांचा व्यवस्थेवरचा विश्‍वास उडावा.
विविध राज्यांमध्ये सुरू असलेली निवडणूक प्रक्रिया आणि जवळ आलेली लोकसभेची निवडणूक, या अशा संधी आहेत ज्यात भावा-भावांना लढवणारे, सज्जनांवर कलंक लावणारे आणि नंतर या गोंधळात लोकतंत्र आणि संवैधानिक संस्थांच्या विश्‍वासार्हतेला चोची मार-मारून रक्तबंबाळ करणारे गिधाडे घिरट्या घालतील. या गिधाडांपासून सावध राहणे आवश्यक आहे. कारण लोकसभा निवडणुकीपूर्वी लोकांच्या भावनांशी जुळलेले अनेक मुद्दे ‘रांगे’त आहेत.

Posted by : | on : 2 Dec 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, स्तंभलेखक, हितेश शंकर.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, स्तंभलेखक, हितेश शंकर (368 of 1367 articles)


तोरसेकर | महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ काँग्रेसनेते विलास मुत्तेमवार यांनी आपल्या पक्षाध्यक्षांना खूश करण्यासाठी, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निंदा करणे ...

×