ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:

सवय…

॥ बिंब-प्रतिबिंब : धनश्री बेडेकर

| www.beejconsultancy.com |

Tabla Moods Dhanashree

Tabla Moods Dhanashree

आपल्या काही सवयी आपल्याला मनापासून आवडतात, आणि लोकांना अनेकदा त्या तापदायक वाटतात. तशी माझी एक सवय मी अतिशय प्रयत्नपूर्वक घालवली आहे, पण व्यसनासारखी ती मधे मधे उफाळून येते… ती म्हणजे समोर दिसेल त्यावर आपल्या बोटांचे नर्तन करणे. माझ्या ऑफिस मध्ये माझं टेबल सोडून आता ही गोष्ट कुठेही करायची नाही हे मी खूप प्रयत्नपूर्वक पाळते…लोकांना त्रास होतो. मान्य आहे.
पण आता मी जवळ जवळ २५ एक वर्ष ही सवय जर बाळगून असेन तर वेळ लागणारच… त्याचं कारण ही तसंच आहे. माझे गुरु पंडित सुरेश सामंत यांनी नाद शोधायला खूप लहानपणीच शिकवलं. त्यांच्याकडे क्लासला जाताना आम्हाला ज्या तबला जोड्या मिळायच्या, त्या अतिशय बद्द वाजणार्‍या असायच्या… जीव खाऊन असंच काहीतरी प्रयत्न केल्याशिवाय काही उमटायचं नाही… मग आम्ही बडवत राहायचो… यामागे त्यांचा व्यापक अर्थ काय आहे हे कळायला खूप उशीर लागला!
तर, ही सवय घालवताना मला खूप प्रयास पडलेत हे नक्की. लोकांना वाटतं की हिला काहीही झालं की आनंदाने हे बडवत बसायला कसं काय सुचतं? पण तसं नसतं… माझ्या मनातील विचाराना तबल्याचे बोल कधी येऊन चिकटतात ते माझं मलाही कळत नाही… आणि प्रत्येक भावनेला स्वतःची अशी frequency असते त्याचं रूपांतरण तबल्याच्या बोलात आपोआप होतं!
म्हणजे एखाद्या अतीव आनंदाच्या क्षणी मला स्वतःच्या आनंदात गर्क होणार्‍या केरवा किंवा खेमट्याच्या मात्रा आठवतात… मग चार मात्रांच्या गिरक्या मनात चालू होऊन जातात…
मन जेव्हा खूप ठाय लयीत विचार करत असतं तेव्हा ख्यालाच्या विलंबित एकतालाच्या १२ मात्रा मनात चालू असतात… खरोखरीच सांगते अनेकदा समेवर आल्यावर विचार संपून उत्तर सापडलेलं असतं…
कधी धडधड होत असेल, कुठली भीती छळत असेल तर हृदयाचे ठोके सुद्धा वेगळेच पडतात की काय अशी शंका येते… म्हणजे पहिली मात्रा वाजवून एक मोठा pause घेऊन पुढचे बोल सुचतात… इतकी की पहिली मात्रा आणि दुसरी मात्रा यामध्ये अजून अवकाश वाढला तर बहुदा भीतीने जीवच जाईल!!!
पूर्वी मी ऑफिस मध्ये मुलाखती घेताना, एखाद्या candidate ला एखादा प्रश्‍न विचारला आणि त्याची बोबडी वळली तर माझ्या मनात आपोआप दीपचंदीचं वजन वाजायला लागायचं…
हे असं नेहमी घडत असतं. आताशा मला हे उमगू लागलं आहे… एवढंच.
मला कधी कधी वाटतं की आपलं रक्त सुद्धा अशाच लयीत धावत असल्याशिवाय हे समोर येईल ते टेबल बडवण्याचं सुचणारच नाही.
दोन मात्रांच्या मधला अवकाश म्हणजे माझा विचार असतो. हे कदाचित अनेक तबला शिकणार्‍या लोकांच्या बाबतीत होऊ शकत असेल… दोन गोष्टींमधला अवकाश समजून त्यावर पुढची निर्मिती करायला शिकवणार्‍या माझ्या सर्व गुरूंना साष्टांग नमस्कार!
संगीत ही जगण्याची गोष्ट आहे… तो टाईमपास किंवा छंद नाही… तो विरंगुळा तर नाहीच नाही… तो अर्थ शोधण्याचा व्यापक आणि अनंत प्रवास आहे…
सध्या एक गंमत सुरु आहे… काही लोक जर खूप वेळ मीटिंग मध्ये रटाळ बोलू लागले की मला मुकेशची गाणी आठवायला लागतात…हेच अगदी to the point मुद्द्याला धरून मीटिंग झाली तर सुराला चिकटून गाणार्‍या हेमंत कुमारची गाणी आठवतात… वेळेत नीट सुबकरित्या मीटिंग संपली की मालिनी बाईंची कधीही फेल न जाणारी मैफल संपल्याचा फील येतो… तर उत्तम मीटिंग संपून खूप गोष्टी अनुत्तरित आहेत, तरीही त्यांचा अर्थ पुढचे दोन दिवस लागत राहिले की मला किशोरीताईंची मैफल दोन दिवस सलग चालू आहे की काय असं वाटत राहतं. एखादी मीटिंग खटाखट संपते, अर्थ समजल्यासारखा वाटतो आणि नंतर खोल पडसाद उमटलेले असले की समजावं, कुमार गंधर्व माझ्या मनात वस्तीला आलेले आहेत…
अश्या अलौकिक दुनियेत जगताना माझ्या बोटाना जरा माझ्या विचारांसारखं नाचावंसं वाटलं तर काय बिघडलं? पण अश्या आक्रमक वेळी मला लडिवाळ गाणार्‍या प्रभा अत्रेंचा मारू बिहाग आठवतो आणि बोटं दुसर्‍याचा विचार करून नाचायची थांबतात… •••

Posted by : | on : 13 Jan 2019
Filed under : आसमंत, धनश्री बेडेकर, पुरवणी, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, धनश्री बेडेकर, पुरवणी, स्तंभलेखक (8 of 1137 articles)

Sanjaya Baru Book The Accidental Prime Minister
टेहळणी : डॉ.परीक्षित स. शेवडे | पत्रकार संजय बारू लिखित ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या पुस्तकावर आधारित त्याच नावाचा सिनेमा ...

×