ads
ads
पाकला जाणारे पाणी रोखणार!

पाकला जाणारे पाणी रोखणार!

•व्यास, रावी, सतलज नद्यांतून जात होते •नितीन गडकरी यांची…

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

ईपीएफच्या व्याजदरात वाढ

•चालू आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज, नवी दिल्ली, २१…

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

वनजमिनींवरील अतिक्रमण सक्तीने काढण्याचे आदेश

•वनवासींचे दावे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले •राज्यातील साडेबावीस हजार कुटुंबांना…

बांगलादेशात गोदामाला आग

बांगलादेशात गोदामाला आग

•८१ मृत, ढाका, २१ फेब्रुवारी – बांगलादेशची राजधानी ढाकामधील…

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

पुलवामा हल्ला ही भयानक घटना : ट्रम्प

•न्यूझीलंडच्या संसदेत हल्ल्याचा निषेध ठराव, वॉशिंग्टन, २० फेब्रुवारी –…

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्राची नाराजी

नवी दिल्ली, २० फेब्रुवारी – पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत…

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

पुराव्यांच्या फोटो प्रती ग्राह्य नाहीत : उच्च न्यायालय

•मालेगावप्रकरणी एनआयएची कानउघडणी, मुंबई, २० फेब्रुवारी – गहाळ पुरावे…

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

‘मातोश्री’च्या स्वार्थासाठी केलेली युती

•नारायण राणे यांचा आरोप, मुंबई, १९ फेब्रुवारी – शिवसेनेने…

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

भाजपा-सेना सगळ्या निवडणुका एकत्र लढणार

•लोकसभेसाठी २५-२३ आणि विधानसभेसाठी समसमान जागावाटप •अखेर शिवसेना-भाजपा युतीवर…

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

राष्ट्रविकासाचा अर्थपूर्ण संकल्प

॥ मानसरंग : मयुरेश डंके | २०१९ सालचा अर्थसंकल्प…

शककर्ते शिवराय

शककर्ते शिवराय

॥ प्रासंगिक : कुणाल नरसापूरकर | ‘स्वभावो दुरतिक्रम:’ असे…

मांजराची मुलायम पावले

मांजराची मुलायम पावले

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | भाजपाची मदत…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:50 | सूर्यास्त: 18:29
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, ब्रि. हेमंत महाजन, स्तंभलेखक » सागरी सुरक्षेची समीक्षा

सागरी सुरक्षेची समीक्षा

॥ राष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन |

भारतीय समाजातील निरनिराळ्या उणिवांचा गैरफायदा घेण्यासाठी आय.एस.आय. आणि पाक लष्कर सक्रिय आहे. काळाची गरज ही आहे की- नौदल, तटरक्षकदल, पोलिस, गुप्तवार्ता संस्था आणि निरनिराळी सरकारी मंत्रालये यामध्ये विलक्षण समन्वय असणे गरजेचे आहे. पेला अर्ध्याहून अधिक भरलेला आहे, पण निर्दोष सुरक्षा निर्माण करण्याकरता आपल्याला अजूनही पुष्कळ चालायचे आहे.

भाग-१

Costal Security

Costal Security

२६ नोव्हेंबर २०१८ ला मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण होत आहे. त्या निमित्ताने सागरी सुरक्षेची सध्याची अवस्था आणि क्षमता याचे अवलोकन करणे गरजेचे आहे.
समुद्रातून होणार्‍या तस्करीचे आव्हान हे, सुरुवातीच्या किनारपट्टी सुरक्षेच्या आव्हानांपैकी एक होते. स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच, मूल्यवान धातू आणि चैनीच्या वस्तूंची तस्करी पश्‍चिम आणि दक्षिण किनारपट्टीतून भारतात भरपूर प्रमाणात होते. तस्करी थांबवण्याकरिता व्यूहरचना अनेक वर्षे केलीच नाहीत. १९६० च्या सुरुवातीस किनारपट्टीतील पाण्यात गस्त घालण्याची आणि तस्करी विरोधी ऑपरेशन करण्याची, भारतीय नौदल व सीमाशुल्क विभागाची पहिली योजना होती. मात्र ही योजना पूर्णपणे अयशस्वी ठरली. परिणामी समुद्री तस्करी अविरत सुरूच राहिली आणि १९६० अखेरीसपर्यंत धोकादायक पातळीपर्यंत पोहोचली, ज्यामुळे समांतर अर्थव्यवस्थेचा उदय झाला.
भारतीय तटरक्षकदल दलाची कर्तव्ये
भारतीय तटरक्षकदल निर्माण करण्याची संभावना चाचपण्याकरिता के.एफ.रुस्तमजी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती निर्माण करण्यात आली. समितीने म्हटले की, किनारपट्टीवरील पाण्यात आणि नजीकच्या समुद्रात प्रभावी देखरेखचा अभाव, यामुळे तस्करी कारवाया कळसास पोहोचल्या आहेत. तिने असेही नोंदविले की, महासागरी क्षेत्रात भारताचे स्वारस्य वाढते आहे. यात तेल आणि वायू अन्वेषण व निष्कर्षणाकरिता समुद्र क्षेत्रांच्या विकासाचा, महासागरी वाहतुकीचे, विशेषतः सागरी पाण्यातील तेल वाहनांचे (टँकर्स), कार्यक्षमतेने व्यवस्थापन करण्याचा, प्रदूषण नियंत्रणाचा, शोध आणि सुटका कार्यवाहींचा, विशेषतः परदेशी लोकांनी आपल्या प्रदेशात केलेल्या शिकारी (पोचिंग) रोखण्याचा आणि परदेशी जहाजांना भारतीय पाण्यात शास्त्रीय अभ्यास करण्यास रोखण्याचा समावेश आहे.
समितीने अशी शिफारस केली की, असे तटरक्षक दल निर्माण केले जावे, जे प्रादेशिक आणि लगतच्या पाण्यात गस्त घालण्यापासून, तर या पाण्यात गुन्हेगारी कायद्यांच्या अंमलबजावणीपर्यंत, निरनिराळी कर्तव्ये बजावू शकेल.
या धामधुमीतच समुद्रतळातील संसाधनांच्या उत्खलनाचे/दोहनाचे न्याय्य आंतरराष्ट्रीय शासन प्रस्थापित करण्यासाठी, १९७३ मध्ये, समुद्री कायद्यावरील संयुक्त राष्ट्र संघाचे तिसरे सम्मेलन (यू.एन.सी.एल.ओ.एस.) भरवण्यात आले. तत्कालीन जागतिक कलाप्रमाणे, भारतानेही प्रादेशिक पाणी (टेरिटोरिअल वॉटर्स) भूखंड मंच (काँटिनेंटल शेल्फ), एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन, आणि इतर महासागरी क्षेत्र कायदा-१९७६ पारित केला. या कायद्याला भारताचे महासागरी क्षेत्र (एम.झेड.आय.-मेरिटाईम झोन ऑफ इंडिया) कायदा म्हणूनही ओळखले जाते. या कायद्याने भारताच्या मुख्य भूमीस २०.२ लाख वर्ग कि.मी.चे महासागरी क्षेत्र, देशाचे महासागरी क्षेत्र म्हणून जोडून घेतले. एवढ्या प्रचंड महासागरी क्षेत्राच्या अंतर्भावामुळे अशा दलाची आवश्यकता निर्माण झाली, जे ह्या क्षेत्रावर पोलिसिंग व देशाच्या हिताचे संरक्षण करू शकेल.
म्हणून, १ फेब्रुवारी १९७७ रोजी भारतीय तटरक्षकदलाची स्थापना, केली गेली. भारतीय तटरक्षकदल भारताच्या महासागरी क्षेत्रात सर्व राष्ट्रीय कायद्यांची अंमलबजावणी करणारी प्रमुख संघटना झाली. त्याशिवाय, भारतीय तटरक्षकदलाकडे खालील मुख्य भूमिकाही सुपूर्त करण्यात आल्या.
राष्ट्रीय समुद्री सुरक्षा समन्वयन अधिकरण समिती (ऑफशोअर सिक्युरिटी को-ऑर्डिनेशन कमिटी-ओ.एस.सी.सी.) उद्देश, धोक्याचे अनुमान करणे आणि समुद्री संपदेच्या सुरक्षेकरता आकस्मिक योजनेची अंमलबजावणी करणे. भारतीय शोध आणि सुटका क्षेत्राबाबतचे राष्ट्रीय अधिकरण आणि किनारपट्टी सीमेकरताची आघाडीची गुप्तवार्ता संस्था (लीड इंटेलिजन्स एजन्सी)
सागरी सुरक्षा उपाय – १९९० ते २०००.
‘इंडियन पीस किपिंग फोर्स’च्या श्रीलंकेतील ऑपरेशन दरम्यान श्रीलंकेचा किनारा सील करण्याचे प्रयास झाले होते. ते फसले. आपण लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलमची शस्त्रास्त्रे व दारूगोळ्यासहितची घुसखोरी रोखू शकली नाही.
भारत सरकारने, देशाच्या दक्षिण आणि पश्‍चिम किनारपट्टीवर संयुक्त ऑपरेशन हाती घेतली, त्यात तटरक्षकदल, नौदल, सीमाशुल्क विभाग, पोलिस आणि संबंधित संस्था सहभागी होत्या. अशा दोन ऑपरेशन १९९० च्या सुरुवातीस सुरू करण्यात आल्या, ऑपरेशन ताशा आणि ऑपरेशन स्वान.
सागरी पाण्याची आणि आंतरराष्ट्रीय महासागरी सीमेची विस्तृत गस्त आणि देखरेख करूनही, ऑपरेशन ताशा, श्रीलंकेतून होणारी अवैध देशांतरे आणि तामिळनाडूच्या किनार्‍यावरील अवैध मालाची तस्करी रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरले.
ऑपरेशन स्वान
भारताची पश्‍चिम किनारपट्टी स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच तस्करीग्रस्त आहे. सोने, इलेक्ट्रॉनिक विद्युत उपकरणे आणि मादक पदार्थ, महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनार्‍यावरून नियमितपणे बाहेरून देशात तस्करीने आणले-नेले जात आहेत. त्याविरुद्ध प्रतिबंधात्मक उपायही योजण्यात आले. मात्र, १९९३ मधील स्फोट मालिकांत वापरलेली स्फोटके याच सागरी मार्गावरून आलेली होती हे समजल्यावर, किनारपट्टीच्या सुरक्षेकरता एकात्मिक प्रयास केले गेले.
एप्रिल १९९३ मध्ये ऑपरेशन स्वान हाती घेण्यात आली. दोन दशके कार्यरत असूनही ऑपरेशन स्वान, एकही जप्ती (सिझर) करू शकली नाही. संसदेच्या पब्लिक अकाऊंट्स कमिटीने म्हटले की, मुंबईतील २६-११-२००८ चा दहशतवादी हल्ला टाळता आला असता. देशाच्या सागरी सुरक्षेच्या सुनिश्‍चितीस जबाबदार असलेल्या सर्वोच्च व्यक्तींच्या निरुत्साही आणि बेजबाबदार वर्तनामुळे ते होऊ शकले नाही. गृहमंत्रालयातील ‘ऑपरेशन स्वान’च्या अपयशास जबाबदार असलेले सगळ्या संस्थातिल सर्वोच्च नेतेच ह्यास जबाबदार आहेत.
सागरी सुरक्षा उपाय
सागरी सुरक्षा मनोभूमिका २६-११-२००८ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर बदलली. पाकिस्तानातून दहा दहशतवादी; नौदल, तटरक्षकदल यांना समुद्रावर चकवून आणि पोलिसांना किनार्यालगत चकवून मुंबईच्या किनार्‍यावर येऊ शकले व शहरावर समन्वयित हल्ले करू शकले, या वस्तुस्थितीने सरकारला हादरवून सोडले. त्याने वर्तमान सागरी सुरक्षा प्रणालीत असलेल्या उणिवा दूर करण्याकरिता अनेक उपाय घोषित केले गेले.
२६-११-२००८ च्या मुंबईवरील हल्ल्यानंतर, अस्तित्वात असलेल्या बहुस्तरीय व्यवस्था आणखीही सशक्त करण्यात आल्या. नौदलास, सागरी सुरक्षा संरचनेच्या मध्यभागी आणण्यात आले. नौदलास, तटरक्षकदल, सागरी पोलिस आणि इतर केंद्रिय व राज्यस्तरीय संस्था यांच्या मदतीने राष्ट्राच्या सागरी सुरक्षेस जबाबदार करण्यात आले. तटरक्षकदलास प्रादेशिक पाण्यातील सागरी सुरक्षेची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली. नौदल आणि तटरक्षकदल यांच्या वाढीव साधने आणि मनुष्यबळ नियुक्तीच्या योजनाही मंजूर करण्यात आल्या.
सागरी सुरक्षेत घडून आलेला मोठा सुधार
गेल्या काही वर्षांपासून सरकारने सागरी सुरक्षेची पुनर्रचना करण्याचे आणि संरक्षण कक्षा किनार्‍यापासून दूर समुद्रात वाढविण्याचे तसेच प्रो-ऍक्टिव्ह ऑपरेशन हाती घेतले आहेत. त्याकरिता राष्ट्रीय महासागरी परिक्षेत्र जागरूकता (नॅशनल मेरिटाईम डोमेन अवेअरनेस) जाळ्याच्या उभारणीवर लक्ष केंद्रित करण्याचा उद्देश होता. अनेक संघटनात्मक, संचालनात्मक आणि तांत्रिक बदलांद्वारा हे साधण्यात येत आहे. सरकारने नॅशनल कमांड, कन्ट्रोल, कॉम्युनिकेशन, इंटेलिजन्स नेटवर्क स्थापित केले आहे, ज्यावर इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट अ‍ॅण्ड अनालिसिस सेंटर (आय.एम.ए.सी. ) चालवले जाते. हे केंद्र, किनार्‍यावर आणि द्विप प्रदेशांवर स्थित ५१ रडार स्थानके ( २० नौदल आणि ३१ तटरक्षकदल) परस्परांशी जोडते आणि गुप्तवार्ता व समुद्रावरील असाधारण किंवा संशयास्पद हालचालींबाबत माहितीची तुलना करणे, ती एकत्रित करण्यास मदत करते.
आय.एम.ए.सी. केंद्र ऑपरेशन बाबतची महत्त्वाची ऍटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टिम(ए.आय.एस.) लाँग रेंज आयडेंटिफिकेशन अँड ट्रेकिंग,जहाजांचे स्थान कळवण्यासाठीची अनेकविध स्त्रोतांपासून प्राप्त करते. या माहितीत किनार्‍यावर इलेक्ट्रोे-ऑप्टिकल प्रणाली आणि हाय डेफिनिशन रडारच्या माहितींची भर घातली जाते. माहिती, उपग्रहाकडूनही प्राप्त होत असतेच.
भारतीय किनारपट्टीवर ७४ ऍटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टिम आहेत आणि भारतीय महासागरातून पार होत असलेल्या ३०,००० ते ४०,००० व्यापारी जहाजांचा माग काढण्यास त्या समर्थ आहेत. ३०० टन डी.डब्ल्यू.टी. वरील सर्वच व्यापारी जहाजांना ऍटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टिम बंधनकारक आहे आणि ती देखरेख करणार्‍या संस्थाना जहाजांचा माग काढण्यात आणि संशयास्पद जहाजे शोधून काढण्यात मदत करते.
अजून काय करावे ?
अशी आशा आहे की, सरकार तटरक्षकदलास आणि पोलिसदलास अतिरिक्त साधने, मनुष्यबळ निश्‍चित कालमर्यादेत उपलब्ध करून देईल. पोलिसदलास नियोजित अर्थपुरवठ्यापैकी खूप छोटासा हिस्सा दरसाल उपयोगात येत असतो. तो पूर्णपणे वापरला पाहिजे. आशा करूया की, भारतीय सुरक्षेत असलेली सर्वात मोठी फट-अकार्यक्षम प्रशासन- आता तरी बुजवली जाईल. वर्तमान योजनांची अंमलबजावणी, निकडीने हाती घेतली जाईल. ज्यामुळे सागरी सुरक्षा सशक्त होईल.
भारतीय समाजातील निरनिराळ्या उणिवांचा गैरफायदा घेण्यासाठी आय.एस.आय. आणि पाक लष्कर सक्रिय आहे. काळाची गरज ही आहे की- नौदल, तटरक्षकदल, पोलिस, गुप्तवार्ता संस्था आणि निरनिराळी सरकारी मंत्रालये यामध्ये विलक्षण समन्वय असणे गरजेचे आहे. पेला अर्ध्याहून अधिक भरलेला आहे, पण निर्दोष सुरक्षा निर्माण करण्याकरता आपल्याला अजूनही पुष्कळ चालायचे आहे.

Posted by : | on : 2 Dec 2018
Filed under : आसमंत, पुरवणी, ब्रि. हेमंत महाजन, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, ब्रि. हेमंत महाजन, स्तंभलेखक (216 of 1224 articles)

Rahul Gandhi Pushkar
जागता पहारा : भाऊ तोरसेकर | मग राहुल कोणाला हातभार लावत होते? कोणाची ए टीम म्हणून दौरे करीत होते? अशा ...

×