सावरकरजी का नाम तो लेके चल पडते हैं|
25 Nov 2018॥ विशेष : विवेक घळसासी |
‘पैसा तो वेश्याभी कमा लेती है, साब! सावरकर जी का नाम देखकर आप जैसे आते है| हो जाता है!’ मी विचारले, ‘आप संतुष्ट तो है, सत्यप्रकाश जी?’ ते हसत म्हणाले, ‘मेंरे रेस्टरॉंपे कोयी रुके न रुके; पर सावरकरजी का नाम तो लेके चल पडते हैं| इतने का भी बहुत संतोष हैं|’ मी काय बोलणार? मुस्लिमबहुल क्षेत्रात, सावरकरांच्या नावाने रेस्टारंट चालवायला वेगळेच काळीज पाहिजे. राष्ट्रीय महामार्गावरची मोक्याची जागा त्यांच्याकडे आहे. ठरवतील तर दारु, मांसाहार, बिड़ी-सिगारेटला मान्यता देऊन सत्यप्रकाश पैसे मिळवू शकतात. पण त्याहीपेक्षा सावरकर नाव उच्चारले जाणे त्यांना मोलाचे वाटते.
दिल्लीहून ऋषिकेशला निघालो होतो. चहाची तलफ झाली. ‘राष्ट्रीय महामार्ग ५८’वर गाडी धावत होती. मुजफ्फरनगरच्या आलिकडे, मन्सूरपूरजवळ हल्दीराम, मॅकडोनाल्डचे फूड मॉल आहेत. ‘यही रुके साब जी’ चालक म्हणाला. मी म्हटले, ‘ बढ़िया चाय पिने की जगह ढाबा होती है, वहीं रुकेंगे!’ आणि माझे लक्ष बाहेर गेले. ‘रुको, रुको’ मी जवळपास ओरडलोच. चालकाने वाहन रस्त्याकडेला घेतले… समोरच एक रेस्टारंट होते. सावरकर रेस्टारंट! माझ्या वाचनात रेस्टारंटची ती पाटी आली तेव्हाच मी गाडी थांबवायला सांगितले.
मी वेटरला विचारले, ‘ए रेस्टरॉं किसका है? वो कहॉंपर हैं? तेवढ्यात एक सज्जन माझ्या समोर आले. ‘मेरा हैं जी रेस्टरॉं, क्या सेवा कर सकता हुँ मैं आप की!’ काही बोलण्याआधी मी त्यांना मिठी मारली. म्हटले, ‘बसा, तुमचे नाव?, सावरकरांचे रेस्टारंटला नाव देण्याची कल्पना याबद्दल सांगा आणि प्रो. सत्यप्रकाश बोलू लागले.
क्रांतीकारकांचा पुजारी
सत्यप्रकाश यांना त्यांच्या गुरुने क्रातीकारकांचे पुजारी बनवले. श्रीचंद्रमोहनजी (डेहराडून निवासी) यांना क्रांतीगुरु म्हटले जाते. त्यांची एक संघटना आहे. ‘जनेऊँ क्रांती!’ मी मध्येच सत्यप्रकाश यांना थांबवत म्हटले, आप पंडित हो.. ब्राह्मण हो.. क्या यह ब्राह्मणोंका संघटन हैं?
ते हसून म्हणाले, ‘नाही नाही. आमच्या संघटनेचा पहिला संकल्प आहे तो जात-पात, छूत-अछूत भेद न मानण्याचा! सारे हिंदू सप्तऋषींची संतान आहे. सारे बंधू आहेत. प्रत्येकालाच जनेऊँ धारणाचा, शिखा ठेवण्याच्या आणि तिलक (गंध) करण्याचा हक्क आहे.’ पुढे ते सांगू लागले. मनापासून, तळमळीने!
आमच्या गुरुंनी वलीदपूरच्या आश्रमात हुतात्म्यांच्या स्मरणाचा प्रकल्प उभा करण्याचे ठरवले आहे. ३८० फुट उंचीचा तिरंगा तिथे उभा करणार आहोत. हेच आमचे अध्यात्म! आमचे गुरु सांगतात की क्रांतीकारकांनी त्याग केला नसता, बलिदान दिले नसते तर आज आपण असे सुखात राहू शकलो असतो का? त्या श्रेष्ठ स्त्री-पुरुषांची फार उपेक्षा झाली. पण तेच खरे आपले वास्तविक माता आणि पिता! याचे स्मरण म्हणून मी या तीन वीरांगनांचा हो फोटो लावला आहे. आणि वास्तविक पिता म्हणून सावरकरांचा फोटो लावला आहे. (सोबत फोटो आहे)
नाव तरी घेतले जाते!
सत्यप्रकाश यांच्या रेस्टारंटचे मेनुकार्डही वेगळे आहे. त्यावरही क्रांतीकारकांचे स्मरण होईल हे पाहिले आहे. सैन्य, सुरक्षाबल आणि ज्येष्ठ नागरिकांना बिलावर दहा टक्के सूट. (मुळात बीलही रिझनेबल आहे!) दूध पिणार्या लहान मुलांच्या दुधाचे पैसे घेत नाहीत. मी विचारले, पण व्यवसाय म्हणून कसे चालले आहे? ते म्हणाले, ‘पैसा तो वेश्याभी कमा लेती है, साब! सावरकर जी का नाम देखकर आप जैसे आते है| हो जाता है!’ मी विचारले, ‘आप संतुष्ट तो है, सत्यप्रकाश जी?’ ते हसत म्हणाले, ‘मेंरे रेस्टरॉंपे कोयी रुके न रुके; पर सावरकरजी का नाम तो लेके चल पडते हैं| इतने का भी बहुत संतोष हैं|’
मी काय बोलणार? मुस्लिमबहुल क्षेत्रात, सावरकरांच्या नावाने रेस्टारंट चालवायला वेगळेच काळीज पाहिजे. राष्ट्रीय महामार्गावरची मोक्याची जागा त्यांच्याकडे आहे. ठरवतील तर दारु, मांसाहार, बिड़ी-सिगारेटला मान्यता देऊन सत्यप्रकाश पैसे मिळवू शकतात. पण त्याहीपेक्षा सावरकर नाव उच्चारले जाणे त्यांना मोलाचे वाटते.