ads
ads
यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

यंदाच्या कुंभात स्वच्छ गंगा

•साधूंनी केले कौतुक, प्रयागराज, १६ डिसेंबर – गेल्या दशकभराच्या…

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

संत कन्हैया प्रभू नंद गिरी पहिले दलित महामंडलेश्‍वर

प्रयागराज, १६ जानेवारी – अखिल भारतीय आखाडा परिषदेने संत…

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

कॉलेजियमच्या घूमजावमुळे उफाळला वाद

•माजी न्या. कैलाश गंभीर यांचे राष्ट्रपतींना पत्र, नवी दिल्ली,…

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

आणिबाणी जाहीर करण्याची ट्रम्प यांची धमकी

►मेक्सिको सीमेवरील भिंतीचा वाद पेटणार, वॉशिंग्टन, १० जानेवारी –…

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

विक्रम मिस्री चीनमधील नवे राजदूत

►पदभार स्वीकारताच केली द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा, बीजिंग, ८ जानेवारी…

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

शटडाऊन सुरूच ठेवेन, आणिबाणीचाही पर्याय खुला

►डोनाल्ड ट्रम्प यांचा काँगे्रस सभागृहाला इशारा ►मेक्सिकोच्या सीमेवर भिंत…

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

ओबीसी महामंडळांसाठी ७३६ कोटी!

•तरुणांना मिळणार १० ते ५० लाखांचे कर्ज •सावित्रीबाई फुले…

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

स्वायत्त संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप नको

►नितीन गडकरी यांचे प्रतिपादन ►साहित्य संमेलनाचे सूप वाजले, यवतमाळ/…

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन

मुंबई, १२ जानेवारी – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातून आपल्या…

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

श्री सिद्धरामेश्‍वरांची सोलापूरची अभेदयात्रा

॥ तरंग : दीपक कलढोणे | चित्तशुद्धीचे प्रतिक असणारा…

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

भव्य कुंभ, दिव्य कुंभ!

॥ विशेष : श्रीनिवास वैद्य | तीर्थराज प्रयागमध्ये माघ…

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

तर्कशास्त्राची ऐशीतैशी

॥ जागता पहारा : भाऊ तोरसेकर | कालपरवाच सोहराबुद्दीन…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 07:02 | सूर्यास्त: 18:11
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी, ब्रि. हेमंत महाजन, स्तंभलेखक » सैन्यात ५ वर्षे काम अनिवार्य

सैन्यात ५ वर्षे काम अनिवार्य

॥ राष्ट्ररक्षा : ब्रि. हेमंत महाजन |

या पुढे येणार्‍या प्रत्येक सरकारी अधिकारी आणि कर्मचार्‍याला सैन्यात ५ वर्षे अनिवार्यपणे काम करावे लागेल. यापूर्वीही अशा कल्पना मांडण्यात आल्या, मात्र त्यावर अंमलबजावणी झाली नव्हती. देशाच्या रक्षणाकरिता पैसा कमी पडत असल्याने डिफेन्स खर्च कमी करून देशाची सुरक्षा कशी वाढवली जाईल, याकडे लक्ष देणे हे महत्त्वाचे आहे. त्याकरिता सरकारी कर्मचार्‍यांचा वापर सैन्याचे बजेट कमी करू शकतील.

Indian Army1

Indian Army1

‘पार्लियामेंटरी स्टँडिंग कमिटी’ने एक महत्त्वाची सूचना केली आहे की- जे सरकारी नोकरीत प्रवेश करतात त्यांना नोकरीच्या पहिले पाच वर्षे सैन्यात नोकरी करणे अनिवार्य केले जावे. यामुळे सैन्यदलात असलेली मनुष्यबळाची कमतरता पूर्ण होण्यास मदत होईल. भारतीय सैन्यात ७ हजार अधिकारी आणि २० हजारांहून जास्त सैनिकांची गरज आहे. हवाई दलात १५० अधिकारी आणि ५० हजार वायुदल सैनिक, नौदलात १५० अधिकारी आणि १५ हजार नौसैनिक कमी आहेत. सध्या भारत सरकारच्या विविध विभागांतून ३० लाखांहून अधिक कर्मचारी नोकरी करतात. त्याशिवाय राज्य सरकारांच्या हाताखाली काम करणार्‍यांची संख्या ही २ कोटीहून अधिक आहे. त्यामुळे यामधील काही मनुष्यबळ हे सैनिकी कामासाठी वाढले तर, यामुळे दोन फायदे होतील. यांचा पगार राज्य आणि केंद्र यांच्या खात्यातून जात असल्याने डिफेन्स बजेट वाढणार नाही. मात्र सुरक्षा जास्त मजबुत होईल. गेल्या चार वर्षांपासून संरक्षण क्षेत्राच्या अधुनिकीकरणासाठी फारसा निधी देण्यात आलेला नाही. अधुनिकीकरणाऐवजी सैन्याची अधोगती होते आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, वेगवेगळ्या सामाजिक कारणांमुळे संरक्षण बजेट वाढू शकत नाही. सद्यपरिस्थितीत ६८ टक्क्यांहून अधिक सामग्री ही अतिजुनाट आहे. केवळ २४ टक्केच वापरण्यायोग्य आहे. आणि केवळ ८ टक्के ही आधुनिक आहे, हे नक्कीच धोक्याचे आहे. दुसरे राज्य सरकार केंद्रिय सरकारच्या कर्मचार्‍यांमध्ये देशप्रेम, देशभक्ती, शिस्त आणि कठीण परिस्थितीत काम कऱण्याची क्षमता निर्माण होईल. ज्यामुळे ते देशाच्या जनतेशी चांगल्या प्रकारे वर्तणूक करतील आणि त्यांचा कामाचा दर्जाही उच्च होईल.
सरकारी कर्मचार्‍यांना प्रशिक्षण गरजेचे
या पुढे येणार्‍या प्रत्येक सरकारी अधिकारी आणि कर्मचार्‍याला सैन्यात ५ वर्षे अनिवार्यपणे काम करावे लागेल. यापूर्वीही अशा कल्पना मांडण्यात आल्या मात्र त्यावर अंमलबजावणी झाली नव्हती. देशाच्या रक्षणाकरिता पैसा कमी पडत असल्याने डिफेन्स खर्च कमी करून देशाची सुरक्षा कशी वाढवली जाईल, याकडे लक्ष देणे हे महत्त्वाचे आहे. त्याकरिता सरकारी कर्मचार्‍यांचा वापर सैन्याचे बजेट कमी करू शकतील. मात्र यामुळे कोणती आव्हाने निर्माण होतील, याचाही विचार केला पाहिजे. सैन्यात येणार्‍या सरकारी कर्मचार्‍यांना चांगले प्रशिक्षण द्यायले हवे. सरकारी कर्मचार्‍यांना अशा भागात तैनात करता येईल, जिथे कमी धोका आहे. उदा. भारत-चीन सीमा आज शांत आहे, तिथे त्यांचा वापर करता येऊ शकेल मात्र नियंत्रण रेषेवर प्रचंड प्रमाणात हिंसाचार होत असल्याने सरकारी कर्मचार्‍यांना तिथे पाठवणे हे धोक्याचे होईल. भारतांच्या इतर राष्ट्रांबरोबरच्या सीमा म्हणजे भारत म्यानमार, भारत नेपाळ, भारत बांगलादेश या शांत आहेत, तिथे या सैनिक कर्मचार्‍यांचा वापर करता येईल. या सर्व कर्मचार्‍यांनाही कठीण परिस्थितीत राहून काम करण्याचा अनुभव मिळेल. ज्यावेळी ते आपल्या विभागात परत येतील, तेव्हा त्यांना या आठवणी येतील आणि म्हणून ते जनतेकडे जास्त चांगल्या दृष्टीने पाहातील. नकार देतील त्यांना सरकारी नोकरीतून काढा. मात्र जे सरकारी अधिकारी सैन्यात काम करण्यास नकार देतील त्यांना ताबडतोब सरकारी नोकरीतून काढून टाकले पाहिजे. आज पोलिसांत भरती झालेले युवक माओवादी भागात जाण्यास घाबरतात व पोलिस दलाचा राजीनामा देतात. एवढेच नव्हे, तर काही अर्धसैनिक दलामध्ये म्हणजे सीमा सुरक्षा दल किंवा सीआरपीएफमध्ये जाण्याची त्यांची तयारी नसते. त्यांना केवळ जिथे काम सोपे आहेत उदा. ‘सेंट्रल इंडियन सिक्युरिटी फोर्स’ जे विमानतळावर सुरक्षेचे काम करतात तिथे जाणे युवकांना आवडते. म्हणून असे जे कठीण भागात जाण्यासाठी नाही म्हणतील, ज्यांना नोकरीमधून काढून टाकणे महत्त्वाचे आहे. सध्या हा नियम नव्या कर्मचार्‍यांसाठी लागू असला, तरीही तोच जुन्या कर्मचार्‍यांना लागू केला पाहिजे. भारतातील सध्या केंद्र आणि राज्य दोन्ही पातळीवर असलेले बहुतेक कर्मचारी सामान्य जनतेला नीट सेवा देत नाहीत. कारण त्यांच्यामध्ये कार्यतत्परता, देशप्रेम, प्रामाणिकपणा, आदर ही भावनाच कमी आहे. सध्या सरकारी नोकरीत असलेल्या कर्मचार्‍यांना दुर्गम भागात कामासाठी पाठवावे, जेणेकरून त्यांची सामान्य नागरिकांशी वागण्याची पद्धत सुधारेल.
माओवादी, जमिनी व समुद्री सीमा भागात तैनाती
माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी संरक्षण मंत्रालयातील कर्मचार्‍यांना सियाचीनला अनुभावासाठी पाठवले होते. म्हणून गृह मंत्रालय, संरक्षण मंत्रालय, अंतर्गत आणि बहिर्गत सुरक्षेसाठी जे संबंधित आहेत, त्या सरकारी कर्मचार्‍यांना अशा ठिकाणी पाठवले पाहिजे. त्यानंतर बाकीच्या सर्वच कर्मचार्‍यांना पाठवले पाहिजे. अंतर्गत सुरक्षेसाठी कार्यरत असणार्‍या केंद्रीय राखीव सुरक्षा दलाची अवस्था खूप खराब आहे. तिथेही तरुण भरती होत नाही. राज्य कर्मचार्‍यांनाही काही वर्षांसाठी या दलात पाठवून त्यांच्या राज्यात काम कऱणे अनिवार्य केले पाहिजे.
आज मध्य भारतातील सहा राज्यात माओवाद पसरलेला आहे. माओवाद पसरलेल्या राज्यांचे कर्मचारी हे माओवादी भागात आपल्या लोकांचे सीआरपीएफ आणि पोलिस यांच्याबरोबर रक्षण करू शकतील. त्यामुळे सुरक्षेची भावना वाढेल आणि त्यांची आदिवासी जनतेशी वागण्याची पद्दत अधिक चांगली होईल.
सीमावर्ती भागातील राज्य सरकारी कर्मचार्यांना तिथल्या अर्धसैनिक दलांबरोबर काम करण्यास पाठवावे. जम्मू काश्मिर, पंजाब, राजस्तान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, उत्तरप्रदेश आणि ईशान्य भारतात हे उपाय चांगल्या पद्धतीने राबवू शकतो. एवढेच नव्हे, तर ९ राज्ये आणि ५ केंद्रशासित प्रदेशांना समुद्र किनारा लाभलेला आहे. त्या राज्यातील कर्मचार्‍यांना समुद्र किनार्‍याच्या सुरक्षेसाठी पाठवण्याची गरज आहे. म्हणजेच आपण त्या राज्यातील कर्मचार्‍यांना त्यांच्याच राज्यातील कठीण भागाची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यासाठी तैनात करू शकतो. त्यामुळे पार्लमेंटरी समितीने दिलेल्या या सूचनांची अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे.
‘टेरेटोरियल आर्मी’ व ‘होमगार्ड’प्रमाणे तैनाती
भारतीय सैन्य दलामध्ये आज ‘टेरेटोरियल आर्मी’ ही संकल्पना कार्यरत आहे. त्यामध्ये सैन्याला गरज असेल तेव्हा ३० -४० ‘टेरेटोरियल आर्मी’च्या बटालियनना भरती केले जाते. जे इतर वेळेला इतर ठिकाणी नोकरी करत असतात आणि गरज पडल्यानंतर ‘टेरेटोरियल आर्मी’मध्ये सामील होऊन सैन्याला मदत करण्यासाठी काश्मीर, ईशान्य भारताच्या इतर भागांमध्ये जातात. याशिवाय पोलिस दलात होम गार्डची संकल्पना आहे. ज्या वेळी पोलिसांना जास्त ताकदीची गरज पडते, त्यावेळी इतर ठिकाणी काम करणार्‍या होमगार्ड म्हणून बोलावले जाते. अर्थातच सरकारी कर्मचार्‍यांना होमगार्ड आणि टेरेटोरियल आर्मीच्या पद्धतीने राबवण्याची गरज आहे ज्यामुळे अंतर्गत सुरक्षा सुधारण्यास आपल्याला मदत मिळेल. थोडक्यात काय, तर पार्लमेंटरी समितीने दिलेल्या सूचना किंवा अहवाल हा सीमा सुरक्षेसाठी सैन्यासाठी वापरावाच पण तो अंतर्गत सुरक्षेसाठी देशाच्या इतर कठीण प्रसंगात वापरणेही जरुरी आहे.
प्रादेशिक सैन्याची तैनाती
सामान्य नागरिकांच्या अंशकालीन सहभागाच्या आधारावरील दल असण्यामागची मूलभूत संकल्पना, उच्च धोका असेल तेव्हा मोठे आरक्षित बळ निर्माण करून टिकवण्याची आहे. हे शांतताकाळात निम्नतम खर्चात सांभाळता यावे. स्वयंसेवी नागरिकांचा, राष्ट्रीय आणिबाणीच्या काळात, निदान अंशकालीन वापर करून घेता यावा, ही संकल्पना आजही उपायोजनक्षम आहे. नियमीत लष्करास नागरी समाजाशी जोडणारी आहे. देशास अस्थिर करण्याची शत्रूची कारस्थाने उधळून लावण्याकरिता अधिकाधिक लोकांना प्रशिक्षित करून सुसज्ज राखावे याकरिता ती पूर्णतः योग्य आहे.
निष्कर्ष
अंशकालीन सेवेची संकल्पना राष्ट्राने स्वीकारली आहे. हे देशभक्तीचे, सन्मानाचे आणि प्रतिष्ठेचे प्रतीक मानले जाऊ लागले आहे. याने, नौदलात आणि हवाई दलातही आपले पंख पसरले.
राष्ट्रभावना क्षीण होणे, सांसारिक लाभांकरताची अवास्तव दौड, आव्हानात्मक जीवनशैली आणि कार्यसंस्कृती, प्रचंड प्रमाणातील खासगीकरणामुळे व्यस्त झालेली वेळापत्रके या सर्वांमुळे राष्ट्रीय सुरक्षेकडे दुर्लक्ष होते. अशा परिस्थितीत सुरक्षा गरजा भागवण्यासाठी, अंगभूत लवचिकतेमुळे प्रादेशिक सेना काम करू शकते.

Posted by : | on : 13 Jan 2019
Filed under : आसमंत, पुरवणी, ब्रि. हेमंत महाजन, स्तंभलेखक.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न
  • अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण अमित पांघळला बॉक्सिंगचे सुवर्ण

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी, ब्रि. हेमंत महाजन, स्तंभलेखक (16 of 1137 articles)

Naseeruddin Shah
रोखठोक : हितेश शंकर | कट्टर पीएफआयला कुरवाळणार्‍या काँग्रेसला, जानवे दाखविण्याचे आणि केरळमध्ये सडकेवर बछडा कापून खाण्याचे नाटक येत असेल, ...

×