ads
ads
आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

आमच्यावर कुणाचाही ‘रिमोट’ असू शकत नाही

•न्यायव्यवस्था बदनाम करण्याचा हा सुनियोजित कट, •सर्वोच्च न्यायालयाचा संताप,…

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

पाकिस्तानची बाजू घेणारे आता इव्हीएमला दोष देताहेत

•पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्ला, दरभंगा, २५ एप्रिल – आतापर्यंत पाकिस्तानची…

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मोदी म्हणाले, कधी कुणाला कमी लेखत नाही

मुंबई, २४ एप्रिल – राग, नाराजी असे माणसाच्या स्वभावाचे…

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

इराणवरील प्रतिबंधाचा चाबहार प्रकल्पावर परिणाम नाही

•अमेरिकी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे स्पष्टीकरण, वॉशिंग्टन, २४ एप्रिल –…

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

इसिसने केले श्रीलंकेतील स्फोट; जबाबदारी स्वीकारली

•मृतांची संख्या ३२१, भारतीयांचा आकडाही वाढला, ४० जणांना अटक,…

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

इराणवरील तेलबंदीमुळे मध्य-पूर्वेत अराजक माजेल

•चीनने व्यक्त केली भीती, बीजिंग, २३ एप्रिल – इराणकडून…

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

राधाकृष्ण विखे पाटील यांचा अखेर राजीनामा

•राहुल गांधी यांनी स्वीकारला •विरोधी पक्षनेतेपदही सोडले •काँग्रेसला आणखी…

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध तक्रार दाखल

•खोट्या जाहिरातींचे प्रकरण, मुंबई, २२ एप्रिल – शेतकर्‍यांना पाच-दहा…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:04 | सूर्यास्त: 18:44
अयनांश:
Home » आसमंत, पुरवणी » हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

हिंदूंनी कुठपर्यंत प्रतीक्षा करायची?

॥ विशेष : आशुतोष अडोणी |

श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर निर्माण, हा असाच गुलामीचे चिन्ह पुसून राष्ट्राचे आत्मतेज जागृत करणारा महायज्ञ आहे. लाखो हिंदूंनी या यज्ञात स्व जीवनाच्या समिधा अर्पण करून तो प्रज्वलित ठेवला आहे. आता या महायज्ञाची पूर्णाहुती समर्पित करायला, पुन्हा एकदा सोमनाथचा तेजाळ इतिहास घडविण्यास न्यायालय किंवा सरकार- कुणीतरी शीघ्रतिशीघ्र पुढे यावे, हेच आजच्या हुंकाराचे आवाहन आहे…

Shri Ram Ram Mandir

Shri Ram Ram Mandir

जन जन के मनमे राम रमे,
हर प्राण प्राण मे सीता है।
कंकर कंकर शंकर इसका,
हर सांस सांस मे गीता है।
जीवन की धडकन रामायण,
पग पग पर बनी पूनिता है।
यदी राम नही है सासो मे,
तो प्राणो का घट रीता है।
नरनाहर श्री पुरुषोत्तमका,
हम मंदिर नया बनायेंगे।
सौगंध राम की खाते है,
हम मंदिर भव्य बनायेंगे॥
हा शंखनाद आज पुन्हा एकदा देशभरातील हुंकार सभांमधून राष्ट्रीय आसमंत निनादून टाकणार आहे. कुठलाही शंखनाद हा मंगलकारकच असतो. आसमंतातील अशुभाची, आपदांची वायुमंडले नष्ट करून शुभंकराचे, विजयाचे अवगाहन करण्याची अद्भुत शक्ती त्यात असते. हिंदू मानसाचा हा हुंकारही शुभंकरासाठीच आहे. श्रीरामजन्मभूमीवर भव्य मंदिर निर्माण, हे ते शुभंकर आहे. जन्मभूमीवरील भव्य आणि वैभवशाली राममंदिर या राष्ट्राचा कारक असलेल्या हिंदू समाजात सामर्थ्य, एकात्मता आणि समरसता निर्माण करणारे शुभंकर आहे. हिंदू समाजात राष्ट्रीय चेतना पालविण्याची, जात-पात-प्रांत-भाषा या सगळ्या भेदांवर मात करून एकराष्ट्रीयत्वाचा अलख जागविण्याची अलौकिक क्षमता ‘श्रीराम’ या तीन अक्षरी मंत्रात सामावली आहे. श्रीराम हे केवळ हिंदू समाजाच्या श्रद्धेचा, आस्थेचाच तेवढा विषय नाही. श्रीराम ही या राष्ट्राची ओळख आहे. राजकारणाचा पडदा बाजूला सारून निखळ मनाने या देशाच्या इतिहासात डोकावलं, तर या सत्याची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही.
विचाराने समाजवादी असणार्‍या, प्रख्यात विचारवंत डॉ. राम मनोहर लोहियांना या सत्याचा साक्षात्कार झाला. केवळ रामच नव्हे, तर राम, कृष्ण आणि शिव या तीन देवतांचा भारताच्या राष्ट्रीय जीवनाशी असणारा अनुबंध डॉ. लोहियांना अतिशय उत्कट शब्दांत मांडला आहे. ते म्हणतात- राम, कृष्ण आणि शिव यांची नावे धर्माशी जोडलेली आहेत म्हणून काही केवळ त्या व्यक्ती लोकप्रिय झालेल्या नाहीत. जीवनातील आदर्श म्हणून या त्रिमूर्तीकडे भारतीय जनता पाहात आली आहे.
राम, कृष्ण, शिव या महान व्यक्ती एका दिवसात घडलेल्या नाहीत. कोट्यवधी हिंदवासीयांनी युगानुयुगाच्या काळात, हजारो वर्षांत त्यांच्या व्यक्तित्वात आपल्या प्रसन्नतेचे, स्वप्नांचे रंग भरले आहेत. राम मर्यादा पुरुषोत्तम आहे, तर कृष्ण स्वयंभू, अनिर्बंध आहे. शिवाच्या व्यक्तित्वात एक वेगळाच आविष्कार आहे. शिवकथेसारखी लांबी, रुंदी, जाडी असलेली दुसरी कथा या जगात नसेल. राम, कृष्ण, शिव ही हिंदुस्थानची महान व परिपूर्ण स्वप्ने आहेत. उदास गांभीर्याची प्रतीके आहे. राम जीवनाचा परमोत्कर्ष आहे, तर कृष्ण मुक्त जीवनाची सिद्धी आहे आणि शिव ही असीमित व्यक्तिमत्त्वाची संपूर्णता आहे.
हे भारतमाते, आम्हाला शिवाची बुद्धी दे, कृष्णाचे हृदय दे आणि रामाचा एकवचनीपणा व कर्मशक्ती दे. असीमित बुद्धी, उन्मुक्त हृदय आणि मर्यादायुक्त जीवन यांनी आमचे सृजन कर. म्हणूनच रामजन्मभूमीचा लढा हा एका विटा-मातीच्या इमारतीसाठीचा संघर्ष नाही. या देशातील प्रत्येक नागरिकाला जीवन कसं जगावं, आदर्श जीवनमूल्य म्हणजे काय, याचा वस्तुपाठ देणार्‍या एका राष्ट्रीय आदर्शाच्या गौरवाचा तो विषय आहे. तो या देशाच्या राष्ट्रीय अस्मितेचा विषय आहे. राष्ट्रीय स्वाभिमानाचा विषय आहे. या आदर्शावर घाला घालणार्‍या परकीय आक्रमणाचा कलंक कायमचा पुसून टाकायचा, की षंढासारखा मिरवायचा, हा जळजळीत प्रश्‍न उपस्थित करणारा विषय आहे. जगभरात असे परदास्याचे कलंक मिटवून टाकण्याची शेकडो उदाहरणे आहेत.
ज्येष्ठ इतिहासकार सर अर्नाल्ड टॉएनबी यांनी एका व्याख्यानमालेत बोलताना एक अतिशय मार्मिक उदाहरण दिले. १८१४ मध्ये रशियाने पोलंड जिंकल्यावर वार्सा शहराच्या मध्यभागी एक भव्य चर्च बांधले होते. पोलंडने ते १९१८ मध्ये ते पाडले. का? तर स्वधर्मी प्रार्थनास्थळ असूनही त्यांच्यासाठी ते गुलामगिरीचे प्रतीक होते. रशियाने चर्च कशासाठी बांधले, तर त्यांना पोलिश लोकांना हे दाखवून द्यायचे होते, आम्ही तुमचे मालक आहोत. हे चर्च रशियाने धार्मिक भावनेतून नक्कीच बांधले नव्हते. त्यांचा उद्देश केवळ राजकीय होता.
म्हणूनच अशी प्रतीकं केवळ जमिनीचे वाद नसतात. जेत्यांनी जीतांचे केलेले ते मानसिक खच्चीकरण असते. असे खच्चीकरण एकदा झाले की, मनातील विजयाची आकांक्षा समूळ नष्ट होऊन परदास्याच्या शृंखलेलाच वैजयंती मानणार्‍या पिढ्या पैदा होतात. म्हणूनच श्रीरामजन्मभूमी असो, काशी विश्‍वनाथ असो की कृष्ण जन्मभूमी, या सार्‍या राष्ट्रीय मानबिंदूंवर नृशंस आघात करण्याचे प्रयत्न विदेशी आक्रात्यांनी केले. श्रीरामजन्मभूमीवरील आक्रमणाचा इतिहास तर इसवी सन पूर्व दुसर्‍या शतकातील ग्रीक सेनानी मिनांडरपासून सुरू होतो.
इसवी सन १५२६मधे मुघल आक्रमक बाबर भारतावर चाल करून आला. भारतीय मानमर्यादा, मंदिरे यांची अक्षरश: धूळधाण करीत बाबराचा वरवंटा फिरत फिरत १५२८ मधे अयोध्येतील श्रीजन्मभूमीवर फिरला. इतिहासकार कनिंघम याने लिहून ठेवले आहे की, बाबराचा सेनापती मीर बाकी याने श्रीरामजन्मभूमीवर तोफगोळे डागून भारतीय अस्मितेचा मानभंग केला. सुमारे १५ दिवस सतत चाललेल्या या धर्मांध धुमाकुळाने १ लाख ७४ हजार हिंदू साधू, संत, बैरागी आणि सामान्य नागरिक यांची कत्तल अयोध्येत घडवली गेली. श्रीरामजन्मभूमीचा विध्वंस केल्यानंतर मंदिराच्या मलब्यातील अवशेषांचा उपयोग करून त्याच जागेवर मीर बाकीने एक ढाचा निर्माण केला. पण, या ढाच्याला जाणत्या धार्मिक मुस्लिम बांधवांनी मशीद म्हणून कधीच मान्यता दिली नाही. त्याचा इतिहासही रंजक आहे.
मंदिर तर पाडले, परंतु मशीद उभी करणे सोपे नव्हते. मंदिराच्याच मलब्यातून ती घाईघाईने उभी करण्याचे प्रयत्न सुरू झाले. तरीही सकाळपासून सायंकाळपर्यंत उभ्या केलेल्या भिंती रात्रीतून भुईसपाट व्हायच्या. महिन्यांमागून महिने उलटूनही मशीद अर्धवटच उभी राहिली. अखेर मीर बाकीने बाबराला खलिता पाठवून बोलावले. आमचे मंदिरस्थान आम्हाला परत मिळाले पाहिजे तेथे मशीद होता कामा नये, असे संघर्षरत हिंदू आखाड्यांनी त्याला निक्षून सांगितले. अखेर तडजोड झाली. या तडजोडीत-
१. जे मिनार उभे होत आहेत ते पाडून टाकण्यात यावे, २. प्रदक्षिणापथ मोकळा ठेवण्यात यावा, ३. राममंदिराचे लाकडी भव्य प्रवेशद्वार कायम ठेवावे, ४. दारावर ‘श्रीसीतापाक’ अशी नाममुद्रा असावी आणि ५. हिंदूंना नित्य पूजापाठाची परवानगी असावी आणि मुसलमानांना फक्त शुक्रवारीच नमाज पढता यावा. या पाचही अटी मान्य झाल्या. त्यामुळे खरेखुरे धार्मिक मुसलमान त्या ठिकाणी कधीच नमाज पढायला गेले नाहीत. या तडजोडीची अंमलबजावणी झाली. हिंदूंचा हा पहिला विजय होता. या विजयामुळे तिथे मीर बाकीने जो ढाचा उभारला तो मशीद या संज्ञेस कधीच पात्र झाला नाही. त्याची कारणे म्हणजे जिथे मिनार नाही ती मशीद नाही. प्रदक्षिणापथ, लाकडाचा वापर, श्रीसीतापाक हे नाव आणि मुख्य म्हणजे काफिरांचा (हिंदू) पूजापाठ चालतो ते स्थान मशीद म्हणून कसे मान्य होणार? पुढे राणी जयराजकुमारीने हे स्थान पूर्णपणे हिंदूंच्या ताब्यात आणण्यासाठी पुन्हा संघर्ष केला. त्यात ती पराभूत झाली आणि पुन्हा मुस्लिम वर्चस्व तिथे प्रस्थापित झाले, तरीही मशिदीचा दर्जा त्या स्थानाला कधीही मिळाला नाही. अर्वाचीन इतिहासात तर तेथे एकदाही नमाज पढला गेला नाही.
तसेही कुणा दुसर्‍याच्या जमिनीवर त्याच्या परवानगीशिवाय मशीद बांधण्यास पवित्र कुराणाने बंदी घातली आहे. दुसर्‍या कुणाच्या जागेवर त्याच्या परवानगीशिवाय बांधलेली मशीद ही खर्‍या अर्थाने मशीद ठरणार नाही. अशा मशिदीत नमाज पढणे हे पाप ठरेल. तो नमाज मंजूर होणार नाही, असेच मुस्लिम धर्मशास्त्र सांगते. पवित्र हदीसमध्ये पैगंबरसाहेबांनी दिलेल्या एका निकालाचा उल्लेख आहे. एका यहुदी प्रजाननाची जागा बळकावून इस्लामी सरकारच्या अधिकार्‍यांनी तेथे मशीद बांधली. पैगंबरसाहेबांनी ती जागा त्याला परत करावी, असा निकाल दिला. त्याप्रमाणे त्याला ती परत करण्यात आली.
२४ ऑक्टोबर १९९४ च्या आपल्या बहुमताच्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले आहे की, डिसेंबर १९४९ मध्ये विवादित जागेत मूर्ती स्थलांतरित करण्यात आली तेव्हापासून हिंदू तिथे पूजाअर्चा, दर्शन, उत्सव हे सर्व विना हरकत करीत आहेत. वस्तुस्थिती तर ही आहे, १९३४ पासूनच तेथे नमाज झालाच नाही. या बाबरी ढाच्याला, तो उभा करणार्‍या मीर बाकीनेही मशीद म्हटलेले नाही. त्याने तेथे जो शिलालेख प्रवेशद्वारी बसविला होता त्यात फारसीमध्ये ‘फरिश्तो के ठहरने का ठिकाना’ असेच म्हटले होते. बाबरी मशीद या नावाची नोंद महसुली नोंदीतही नाही, नोंद आहे ती मस्जिद जन्मस्थान या नावाची.
राम नावाची व्यक्तिरेखा खरंच झाली काय? पुढे देवता झाला असा कुणी माणूस कधी जन्माला आला होता का? आला असेल तर त्याचा पुरावा काय, असे प्रश्‍न रामजन्मभूमी आंदोलनाच्या काळात आणि आजही विचारले जातात. रामायणाचा दाखला देणार्‍यांना ही मंडळी ते एक काव्य आहे असे सांगून चूप बसवण्याचा प्रयत्न करते. असे प्रश्‍न मोहंमद पैगंबर किंवा येशू ख्रिस्त यांच्याविषयी विचारण्याची हिंमत मात्र या मंडळींची कधीच होत नसते. काश्मिरातील एका मशिदीमधील एक पवित्र बाल (केस) मुस्लिम बांधवांच्या श्रद्धेचा आणि आस्थेचा विषय असतो. मात्र, करोडो हिंदूंच्या आस्थेचा विषय असलेला राम काल्पनिक पात्र आहे, असे निर्लज्ज प्रतिज्ञापत्र सरकारी स्तरावर देण्यात येते. मंदिरे अनेक असू शकतात, पण जन्मभूमी एकच असते. ती आमची आम्हाला परत द्या, या आर्ततेला पायदळी तुडवले जाते. तब्बल सत्तर वर्षे न्यायालयीन गुंत्यात अडकवले जाते. त्यावरचा निर्णय हा आमच्यासाठी प्राधान्यक्रम नाही, असे सांगितले जाते. देशद्रोही आतंकवाद्यांना आपली बाजू मांडता यावी म्हणून चक्क मध्यरात्री उघडणारी न्यायासने, या संवेदनशील प्रश्‍नावर मात्र तारीख पे तारीख देत राहतात. हिंदू भावनांनी स्वतःला कुठवर सांभाळायचे?
रामजन्माचा आणि तो तिथेच जन्मला याचा पुरावा मागणार्‍यांसाठी विश्‍व हिंदू परिषदेने ‘एव्हिडन्स ऑफ दि राम जन्मभूमी मंदिर’ असे पुस्तकच प्रसिद्ध केले आहे. त्यात-
१. पौराणिक काळातील उल्लेख, २. हिंदूंच्या बाजूचा कागदोपत्री पुरावा, ३. प्रत्यक्ष स्थळाविषयीचा पुरावा, ४. मुस्लिम कागदपत्रांचा पुरावा, ५. युरोपियन कागदोपत्री पुरावा, ६. राजस्व नोंदीतील पुरावा, ७. पुरातत्त्वीय पुरावा, ८. इतिहासपूर्व काळातील पुरावा आणि ९. ऐतिहासिक पुरावा, असे भक्कम पुरावे दिले आहेत.
त्यातील केवळ मुस्लिम लेखकांच्या लेखनाचा आढावा घेतला, तरी वस्तुस्थिती स्पष्ट होते. सतराव्या शतकापासून या पुढील काळाचा जो प्रादेशिक इतिहास उपलब्ध समकालीन सूत्रांप्रमाणे, मुस्लिम लेखकांनी लिहून ठेवलेला आहे, त्या सर्वांनी कोट रामचंद्र, परगणा हवेली, अवध येथील जन्मस्थानावरच्या दशरथ महल, राममंदिर आणि सीता रसोई या सर्व वास्तू बाबराचा सेनापती मीर बाकी याने, बाबराच्या हुकुमावरून आणि सय्यद मुसा आशिकान या फकिराच्या प्रोत्साहनाने पाडल्या आणि तेथे १५२८ मध्ये मशीद बांधली, याची नि:संदिग्ध पुष्टी करणार्‍या आहेत. यातील सर्वात पहिले लेखन औरंगजेबाच्या नातीचे आहे. ‘सोफिया-ए-चहल-नसाइह-बहादुर शाही’ असे त्या पुस्तकाचे नाव. अकबरनामा लिहिणारा अबुल फजल, मिर्झा जान यांनी लिहिलेले ‘हदिक इ शहादा’ १८५८ मध्ये महंमद असघर या बाबरी कमिटीच्या खातिबाने ब्रिटिश सरकारकडे दाखल केलेले निवेदन, डॉ. झाकी काकोरावी यांचे ‘फसाना इ इब्रत’, हाजी मोहम्मद हसन यांचे ‘झिया इ अखतर’, मौलवी अब्दुल करीम यांचे ‘गुमगस्ते हालात इ अयोध्या’, अलाम् मुहम्मद नाजामुलघनी खान रामपुरी यांचे ‘तारीख ए अवध’, मौलाना हकीम सय्यद अब्दुल यांचे ‘हिंदुस्थान इस्लामी अहदमे’ हे पुस्तक. अशा अनेक पर्शियन, उर्दू ग्रंथांमधून मीर बाकीने केलेल्या रामजन्मभूमी मंदिराच्या उद्ध्वस्ततेची, अयोध्येतील अन्य विध्वंसाची प्रत्ययकारी वर्णने आली आहेत. या मुस्लिम लेखकांनाही खोटं ठरवायचं का? श्रीराम जन्मभूमीवरील मंदिर पाडूनच मीर बाकीने तेथे ढाचा उभारला, याचे सुस्पष्ट उल्लेख युरोपियन लेखकांच्या लेखनातही सापडतात. विलियन फिंज, टायफेन्थेेलर, मॉन्टगॉमरी मॉर्टिन, ईस्ट इंडिया कंपनी गॅझेटिअर १८५४, एन्सायक्लोपीडिया ऑफ इंडिया १९५८, हिस्टॉरिकल स्केच ऑफ फैजाबाद १९७०, अवध प्रांताचे गॅझेटियर १८५७, फैजाबाद सेटलमेंट रिपोर्ट १८८१, इम्पेरियल गॅझेटिअर ऑफ इंडिया १८८१, ऑर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया १८९१, बाराबंकी डिस्ट्रिक्ट गॅझेटिअर, ऍनेटी बेव्हरीजचा बाबरनामा, एन्स्लायकोपीडिया ब्रिटानिका १९७८, व्हाल्युम-१. अशा अनेक दस्तऐवजांतून रामजन्मभूमीवरच बाबरी ढाचा उभारण्यात आल्याचे समकालीन संदर्भ दिले गेले आहेत.
सर्वात महत्त्वाचे पुरावे पुरातत्त्वीय आहेत. १८ जून १९९२ ला जन्मस्थानापासून समतल करण्याचे कार्य जेव्हा सुरू झाले, तेव्हा बारा फुटांच्या खोलीवर हलक्या पिवळ्या लाल रंगाचे नक्षीकाम असलेले खरपी दगडाचे अनेक सुंदर तुकडे दिसले. या तुकड्यांचा पुरातत्त्ववेत्ते आणि इतिहासकार यांच्या तुकडीने सूक्ष्म अभ्यास केल्यानंतर, हे सारे प्रस्तरखंड अकराव्या शतकातील प्रचलित नागर शैलीतील हिंदू मंदिराचे भग्नावशेष आहेत, असा निर्वाळा त्यांनी दिला. ६ जुलै रोजी केलेल्या खोदकामात १२ फूट खोलीवर पक्क्या विटांनी बनवलेली फरसबंदी आहे आणि ही फरसबंदी जन्मस्थान मंदिरापासून सीता रसोईपर्यंत सोळा हजार वर्गमीटर इतकी विस्तारित आहे, याचाही शोध लागला. पुढे ६ डिसेंबरच्या बाबरी ढाचा विध्वंसातून जो मलबा बाहेर आला त्यात तेथे असलेल्या प्राचीन मंदिराचा जो शिलालेख गवसला, त्यामुळे तर मंदिर विरोधकांची बोलतीच बंद झाली! या मुख्य शिलालेखाव्यतिरिक्त वनमाला धारण केलेली विष्णुमूर्ती, भैरवमूर्ती असे अनेक अवशेष हाती लागलेे. मुख्य शिलालेखाचे सरकारी परवानगीने वाचन करण्यात आल्यानंतर तर त्या स्थानी मंदिरच होते, यावर शिक्कामोर्तब झाले. सलक्षणाचा पुत्र अल्हण. त्याचा मुलगा नयचंद्राने अकराव्या शतकात पूर्वी कधी उभारले गेले नसेल असे भव्य शोभिवंत आणि सुवर्णशिखर असलेले विष्णू हरीचे मंदिर त्या ठिकाणी उभारले, असा स्पष्ट उल्लेख त्या शिलालेखात आहे.
पुढे लखनौ खंडपीठाच्या निर्देशानुसार, फेब्रुवारी २००३ मध्ये ग्राउंड पेनट्रेटिंग रडार सर्वे म्हणजे भूगर्भात खोलवर जाणार्‍या रडारमार्फत सर्वेक्षण करण्यात आले. हे सर्वेक्षण टोजो इंटरनॅशनल या संस्थेने केले. १२ मार्च २००३ ते ७ ऑगस्ट २००३ या काळात केलेल्या या उत्खननाचा अहवाल अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात सादर केल्यावर, तो खंडपीठाने २५ ऑगस्ट २००३ रोजी उघडून जाहीर केला. निष्कर्षांचा गोषवारा पुढीलप्रमाणे आहे- रामजन्मभूमी या वादग्रस्त ठिकाणी एक भव्य असे बांधकाम पूर्वी होते. हे जे भव्य बांधकाम आढळले ते दहाव्या शतकातील आहे. सार्वजनिक उपयोगासाठी असलेले हे भव्य बांधकाम तेथे दीर्घकाळ अस्तित्वात होते. सोळाव्या शतकाच्या प्रारंभी याच बांधकामाच्या डोक्यावर वादग्रस्त बांधकाम उभारण्यात आले. जे अवशेष सापडले ते उत्तर भारतातील मंदिराची जी वैशिष्ट्ये आहेत, त्यासारखे आहेत. मंदिराचे गर्भगृह ज्या ठिकाणी असल्याचा दावा करण्यात येतो त्या ठिकाणी काहीतरी महत्त्वाचे विद्यमान असल्याचा पुरावा मिळतो, परंतु तेथेच रामलला विराजमान असल्याने तेथे उत्खनन करण्यात आले नाही. वादग्रस्त ठिकाणी सार्वजनिक उपयोगाचे बांधकाम मोगल काळापर्यंत होते. पन्ना स्तंभांच्या बैठकी, अलंकृत विटा-दगड आणि एका दैवी युगलाची शिल्पप्रतिमा यांचेही अवशेष आढळल्याचे हा अहवाल सांगतो. निर्देशित भव्य बांधकाम एक भव्य सभागृह होते. एकावर एक तीन मजले होते आणि टप्प्याटप्प्याने प्रदीर्घ अशा काळात बांधले गेले असावे.
इतक्या सर्व सुस्पष्ट वास्तविकतेनंतरही रामजन्मभूमीवर भव्य मंदिराच्या निर्मितीची प्रतीक्षा हिंदूंनी कुठपर्यंत करायची? कधी न्यायालयीन निर्णयाचा गुंता, तर कधी अल्पसंख्य समुदायाच्या अनुनयापोटी हिंदू जनभावना पायदळी तुडवण्याचा खेळ राजकारणी खेळत राहिले. हा लढा आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. हिंदू मानस आज प्रक्षुब्ध नाही, पण प्रज्वलंत आहे. त्याच्यावर सातत्याने होत असलेल्या अन्यायाचा उद्रेकच ६ डिसेंबर १९९२ ला झाला. त्याच्या पुरुषार्थाच्या पराक्रमी प्रगटीकरणाने शतकानुशतकं राष्ट्रजीवनाला लागलेला कलंक त्याने उद्ध्वस्त केला. परदास्याचे बर्बर प्रतीक असणारा बाबरी ढाचा भुईसपाट झाला. श्रीरामजन्मभूमी मुक्त झाली. ते केवळ एका इमारतीचे पडणे नव्हते. ती एक युगप्रवर्तक घटना होती. निद्रिस्त राष्ट्रपुरुषाला आलेली ती जाग होती. तो हुंकार म्हणजे राष्ट्रीय अस्मितेचे पाञ्चजन्य होते! राष्ट्रीय स्वाभिमानाची ती गर्जना होती. ज्यांना हिंदू समाज कधीच एक राहू नये, तो कायम शबल, परभृत राहावा असे वाटत होते, त्यांना बसलेली ती चपराक होती. नोबेल पुरस्कार विजेते विद्याधर नायपॉल यांनी या घटनेवर जी मार्मिक प्रतिक्रिया दिली ती या घटनेचे सार आहे. ते म्हणतात- भारतात जे सुरू आहे ती नवी ऐतिहासिक जागृती आहे. इतिहासात मागे जे काही घडले त्यामागे काय दडले होते, याचा बोध आत्ता भारतीयांना होतो आहे. आक्रमकांच्या आक्रमणामागे त्यांचे कोणते उद्देश दडले होते, कोणते सत्य होते, ते आता त्यांना कळू लागले आहे. ही निद्रिस्त भारतवर्षाला आलेली आत्मजागृतीची पहाट आहे. तिचा मथितार्थ राष्ट्रीयताविरोधी शक्तींनी नीट समजून घेतला पाहिजे.
म्हणूनच आता श्रीरामजन्मभूमी आंदोलन निर्णायक टप्प्यावर आले आहे. नुकतेच रामललाचे दर्शन घेतल्यानंतर अस्थायी मंदिरातील हे शेवटचेच दर्शन ठरावे, अशी जी अतिशय बोलकी आणि मार्मिक प्रतिक्रिया, रा. स्व संघाचे सरकार्यवाह मा. भैयाजी जोशींनी व्यक्त केली होती, ती सार्‍या हिंदू मानसाचे प्रातिनिधिक प्रगटीकरण आहे. ज्या पद्धतीने सोमनाथचा कलंक कायदा करून दूर करण्यात आला तसेच श्रीरामजन्मभूमीबद्दल व्हायला हवे. नव्वदीच्या दशकातला मंदिरनिर्माणाला असणारा विरोध आज काही छुटपुट इस्लामी कट्टरतावादी वगळता जवळपास मावळला आहे. त्या स्थानी पुन्हा बाबरी ढाचा उभा करा, अशी मागणी करण्याची हिंमत आता कुणी करू शकणार नाही, इतकी ताकद आज हिंदुजागृतीने उभी केली आहे. कायदा करून राममंदिर उभारल्यास आमचा मुळीच आक्षेप राहणार नाही, हे या प्रकरणातील मुस्लिम पक्षकार इकबाल अन्सारी यांचे अत्यंत महत्त्वपूर्ण ताजे विधान, बदलत्या मुस्लिम मानसिकतेची चुणूक दाखविणारे आहे. गेली पाचशे वर्षे हिंदू समाजाने दिलेल्या लढ्याचा हा विजय आहे. या प्रकरणातील एकूण गुंतागुंत लक्षात घेता, न्यायालयीन मार्गापेक्षा संसदेतील कायद्याद्वारेच या समस्येवर शीघ्र आणि स्थायी उपाय होऊ शकतो, असेच एकूण चित्र आहे.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर तत्काळ असा कायदा करून सोमनाथचा जीर्णोद्धार करण्यात आला होता. त्या निर्णयाचे स्वागत करताना महात्मा गांधी नवजीवनच्या अंकात जे म्हणाले होते ते अतिशय मननीय आहे-
कोणत्याही धार्मिक प्रार्थनास्थळावर बळजबरीने ताबा मिळवणे हे फार मोठे पाप आहे. मोगलांच्या काळात मोगल शासकांनी धर्मांधतेेमुळे हिंदूंची पवित्र प्रार्थनास्थळे, जी हिंदूंची पवित्र धर्मस्थळे होती, ती आपल्या ताब्यात घेतली. त्यापैकी बर्‍याच ठिकाणी लुटालूट करून ती नष्टभ्रष्ट करून टाकली आणि अनेकांना मशिदीचे रूप दिले. मंदिर आणि मशीद ही दोन्ही ईश्‍वराच्या उपासनेची पवित्र स्थळे असली आणि (पवित्रतेबाबत) दोहोतही काही फरक नसला, तरी हिंदू आणि मुसलमान या दोहोंच्या उपासना परंपरा वेगळ्या आहेत.
धार्मिक दृष्टिकोनातून कोणताही मुसलमान आपल्या मशिदीत किंवा ज्या ठिकाणी विधिपूर्वक नमाज पढला जातो अशा ठिकाणी एखाद्या हिंदूने एखादी (अपवित्र) वस्तू टाकली, तर ते कृत्य सहन करीत नाही. त्याचप्रमाणे कोणताही हिंदू त्याच्या मंदिरात जिथे राम, कृष्ण, शंकर, विष्णू किंवा देवी यांची उपासना केली जाते ते स्थान पाडून कुणी तिथे मशीद बांधू लागला तर ते सहन करणार नाही. जिथे अशा घटना घडल्या ती खरोखर धार्मिक गुलामीची चिन्हे आहेत.
श्रीरामजन्मभूमीवरील भव्य मंदिर निर्माण, हा असाच गुलामीचे चिन्ह पुसून राष्ट्राचे आत्मतेज जागृत करणारा महायज्ञ आहे. लाखो हिंदूंनी या यज्ञात स्व जीवनाच्या समिधा अर्पण करून तो प्रज्वलित ठेवला आहे. आता या महायज्ञाची पूर्णाहुती समर्पित करायला, पुन्हा एकदा सोमनाथचा तेजाळ इतिहास घडविण्यास न्यायालय किंवा सरकार- कुणीतरी शीघ्रतिशीघ्र पुढे यावे, हेच आजच्या हुंकाराचे आवाहन आहे…

Posted by : | on : 9 Dec 2018
Filed under : आसमंत, पुरवणी.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in आसमंत, पुरवणी (215 of 926 articles)

Rahul Gandhi 1
संवाद : सोमनाथ देशमाने | राहुल भोवती संशयाचे धुके गडद होत जाणारच, जागृत झालेला हिंदू समाज त्याची चिरफाड करणारच! हिंदुंना ...

×