ads
ads
आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

आमचे अणुबॉम्ब दिवाळीसाठी थोडीच आहेत!

•अभिनंदन प्रकरणी पाकिस्तानला इशाराच दिला होता •पंतप्रधान मोदी यांचा…

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

तिसर्‍या टप्प्यातील प्रचार शांत

•११५ जागांसाठी उद्या मतदान, नवी दिल्ली, २१ एप्रिल –…

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पवार कुटुंबीयांनी शिक्षणाचा बाजार मांडला : नितीन गडकरी

पिंपरी चिंचवड, २१ एप्रिल – पवार कुटुंबाने शिक्षणाच्या माध्यमातून…

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोटात २०७ ठार

•४५० जखमी, मृतांमध्ये ३५ विदेशी •तीन चर्च पूर्ण उद्ध्वस्त,…

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

१८ वर्षीय तरुणीला मदरशामध्ये जिवंत जाळले

•प्राचार्याविरुद्ध केली लैंगिक छळाची तक्रार •बांगलादेशातील काळिमा फासणारी घटना,…

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

रशिया, ट्रम्प यांच्या प्रचारकांमध्ये संगनमत नसल्याचा दावा

वॉशिंग्टन, १९ एप्रिल – अमेरिकी अध्यक्षपदाच्या २०१६ मधील निवडणुकीत…

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

काँग्रेसमुक्त भारताचा पहिला मान सांगलीकरांचा

•असली आणि नकली टीम २३ तारखेला कळेलच : मुख्यमंत्री,…

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेत

•व्यथित अंत:करणाने काँग्रेसचा राजीनामा, नवी दिल्ली/मुंबई, १९ एप्रिल –…

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

…तर नेत्याला रॉकेटवर बांधून पाठवले असते!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात, नगर, १६ एप्रिल –…

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

निवडणूक निकालांची प्रदीर्घ प्रतीक्षा

॥ सारांश : ल.त्र्यं. जोशी | प्रणाली एवढी विकसित…

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

मोदीकालीन परराष्ट्र व संरक्षण धोरण

॥ विशेष : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक,…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

गांधी : आडनावाचे आणि नोटांच्या गड्डीत बांधलेले…

॥ रोखठोक : हितेश शंकर | सौद्यात संपत्तीच्या मूळ…

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

फोर्ब्सच्या यादीत अक्षयची बाजी

‘फोर्ब्स’ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्यांच्या नावाची यादी जाहीर…

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

सनीला साकारायची होती ऐतिहासिक चित्रपटात भूमिका

बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच सनी लिओनीचे नाव इंटरनेटवर सर्वाधिक…

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

गरज असताना सार्‍यांनीच पाठ फिरवली!

‘रेस- ३’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणारा अभिनेता बॉबी देओल…

पंचांग
वार: | तिथी:
नक्षत्र: | राशी:
करण: | योग:
सूर्योदय: 06:07 | सूर्यास्त: 18:42
अयनांश:
Home » मानसी » टेक्नोसॅव्ही कधी होणार?

टेक्नोसॅव्ही कधी होणार?

जनरेशन गॅप
oldmanनुकतेच दोन प्रसंग घडले. परवा मैत्रिणीला भेटायला गेले होते. गप्पा चालू होत्या. तेवढ्यात तिची नात सांगत आली, ‘‘चल आजी आत. सुजूला वाढदिवसाचं विश करायला.’’ आत गेलो तर कॉम्प्यूटरच्या स्क्रीनवर मैत्रिणीचा नातू, मुलगा, सून दिसत होते. त्यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवर गप्पा सुरू झाल्या. लहानगा सुजूही आजीला नेहमी पाहत असल्यामुळे छान ओळखत होता. पलीकडून तिला पाहून आजी आजी म्हणत होता. खरंच विज्ञानाचा एक चमत्कारच आहे हा!
दुसरी गोष्ट वर्तमानपत्रात वाचनात आली. एक वृद्ध जोडपे कोर्टात गेले फिर्याद घेऊन की, त्यांना बँकेने ई-बॅकिंगचा फॉर्म मागितला. त्यांना ई-बँकिंग वगैरेतील काहीच येत नव्हते म्हणून कोर्टाने बँकेला याबाबत सांगावे वगैरे अपेक्षा या जोडप्याची होती.
हे दोन्हीही प्रसंग निरनिराळे, परंतु विचार करायला लावणारे होते. तंत्रज्ञानाच्या युगात जुनी पिढी आणि नवी पिढी यांचा मेळ काहीकेल्या जुळत नाहीये, हे खरे असले तरीही आजच्या घडीला अनेक ज्येष्ठ नागरिकांनी स्वतःला तंत्रज्ञानाशी जोडून घेण्याचे पाऊल किमान उचलल्याचे आनंदाने नमूद करावेसे वाटते.
खरंतर तंत्रज्ञानाचे नवनवे आविष्कार ज्येष्ठांसाठीही फारच फायदेशीर आहेत. त्यामुळे त्यांनी त्या दृष्टीने विचार करून स्वतःला तंत्रज्ञानाशी जोडून घेतले पाहिजे. त्यात गैर काहीही नाही. आता ई-बँकिंगचंच बघा ना… वास्तविक प्रत्येकाने ई-बँकिंग करावे असा नियम नाही. पण, खरे तर ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने ते अत्यंत सोयीचे आहे. आपल्या नवीन पिढीने जसे लवकरच तंत्रज्ञान आत्मसात केले तसे ज्येष्ठांनीही आजच्या काळात करायला हवे. त्यांच्या इतक्या वेगाने नाही, तर आवश्यकतेनुसार काळाबरोबर चालायला हवे. मोबाईल तर आजकाल सगळ्यांकडे असतात. तो ज्येष्ठांंजवळ असणे अत्यंत आवश्यक आहे. अडचणीच्या वेळी संपर्काचे साधन म्हणून मोबाईलचा वापर घराबाहेर पडताना तरी ज्येष्ठांनी करायला हवा. रस्त्यात स्वत:ला काही झाले किंवा घरी काही घडल्यावर त्याची ताबडतोब बातमी मोबाईलमुळे कळू शकते. आजकाल तरुणांकडून पत्रलेखनाची अपेक्षा करणे तसेही त्यांच्या व्यग्रतेमुळे चुकीचे आहे. वास्तविक पत्र लिहिणे व वाचणे अत्यंत आनंददायी होते हे खरे. मनातले पूर्ण, शब्दांतून व्यक्त होऊ शकत होते. पण, आता ते शक्य नाही. पत्राला पर्याय म्हणून आलेल्या ई-मेलवरसुद्धा तेवढेच लिहू शकता. अगदी टायपिंग स्पीड नसला तर काय झालं? मनातील सर्व लिहिता येते. मुख्य म्हणजे मुलांनाही ते सोयीचे नाही का… अगदी कामाच्या ठिकाणीसुद्धा तुम्ही पाठवलेले मेल ते वाचू शकतात. आजकाल तर कॉम्प्युटरपेक्षा मोबाईलवर इंटरनेट असल्यामुळे अगदी जळीस्थळी- कुठेही आणि केव्हाही तुम्ही ई-मेल वाचू शकता. पत्राची वाट पाहावी लागायची. इथे तुम्हाला त्वरित वाचता येतं. लिहून व जर तुम्ही व इच्छित व्यक्ती ऑनलाईन असेल तर म्हणजे ताबडतोब लिखित संवाद साधता येतो.
मुलाने परगावहून फोन करून सांगितले की, अमुक व्यक्ती येईल, तुम्ही त्याला पैसे द्या, मी तुमच्या खात्यात जमा करतो. तर ती व्यक्ती आली की तिच्या समोर मुलाला फोन करून तीच व्यक्ती आहे याची खात्री करून (ओळख पटवून) मगच पैशाचा व्यवहार करावा. तुमच्या खात्यात एका मिनिटात पैसे जमा झालेले दिसतील. यासाठी ई-बँकिंग अत्यंत उपयोगी आहे. आजकाल ज्येष्ठांना तिकीट काढणे, बिलं भरणे, टॅक्स भरणे किंवा इतर व्यवहारांसाठी रांगेत उभे राहणे शक्य होत नाही. अशा वेळी जर ज्येष्ठ नागरिकांनी हे शिकून घेतले, तर त्यात त्यांचाच फायदा आहे.
पूर्वी कुठे प्रवासाला गेल्यास कॅमेर्‍याने फोेटो काढत. परतल्यावर त्याच्या कॉपीज काढत. तोपर्यंत तिथल्या मजेचे वर्णन मनातच राहत असे. आजकाल मोबाईलमध्येच छान फोटो काढून ते घरच्यांना, मित्रांना ताबडतोब पाठवता येतात व वा! किती छान! सुंदर! असे अभिप्राय तिथल्या तिथे मिळतात. त्यांच्या सहभागाचा आनंद मिळतो. ज्येष्ठांनी आपला ग्रुप बनवावा, व्हॉट्‌स ऍपवर नातेवाईकांच्या गु्रपमध्ये सामील व्हावे. आता सगळ्यांचे वाढदिवस लक्षात राहत नाहीत, पण नातेवाईकांच्या गु्रपमध्ये कोणीतरी त्यांना शुभेच्छा देतो मग आपल्यालापण लक्षात येतं आज हिचा/याचा वाढदिवस आहे, नाही का? प्रत्येक सणवाराच्या शुभेच्छा देऊन घेऊन सणाचा आनंद द्विगुणित करू शकतो.
फेसबुक हेसुद्धा असेच एक दालन आहे. शाळेतल्या, कालेजमधल्या मित्र-मैत्रिणींचे पत्ते मिळून त्यांच्याशी पुन्हा भेटण्याचा, मिळण्याचा अनुभव ज्येष्ठ नागरिक घेऊ शकतात. गेट-टुगेदर ठरवून प्रत्यक्ष भेटीत जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकतात…
त्याच त्या मालिका, अर्थहीन सिनेेमे टीव्हीवर असतात. जुने क्लासिक सिनेमे, सुंदर गाणी ऐकाविशी वाटतात. अशा वेळी मोबाईलमध्ये यूट्युबवर आपण आपल्याला हवे असलेले सिनेमे पाहू शकता, गाणी ऐकून डाऊनलोड करून पुन:प्रत्ययाचा अनुभव घेऊ शकता.
तंत्रज्ञानाचे तोटे
१. आपापसातील सुसंवाद थांबले आहेत. प्रत्यक्ष भेटीतून, समोरासमोर बसून डोळ्याला डोळा भिडवून जे संवाद होतात, त्यात त्वरित तर्कवितर्क होऊन निष्पत्ती होते. हेच काम फोनवर झाल्यास निष्पत्तीला बराच विलंब होतो.
२. सतत फोन, टॅबवर व्यग्र असल्यामुळे मान सारखी त्याच त्या अवस्थेत राहिल्यामुळे दुखायला लागते. कानाचापण त्रास संभवतो.
३. मोबाईल चार्जिंगवर असताना/जास्त वेळ मोबाईलवर बोलल्यास त्याचा मेंदूवर परिणाम होऊ शकतो, असे वाचनात आले.
अर्थात ई-बँकिंगमध्ये काही धोके असतात, पण धोका कुठे नसतो? रस्त्याने जाता-जाता कोणीतरी आपल्याला उडवेल हा धोका असतोच. त्यामुळेच आपण काळजीपूर्वक चालतोच ना? तसेच हे आहे. आपला पासवर्ड लक्षात ठेवावा. एखाद्या ठिकाणी जे फक्त आपल्याला माहीत आहे अशा ठिकाणी लिहून ठेवावा. प्रत्येक वेळी उघडलेली साईट, ई-मेल, फेसबुकमधून साईन आऊट होऊनच बंद करावे. मग कसलाच धोका नाही. उलट फायदाच फायदा, आनंदच आनंद! तुम्ही सगळ्यांद्वारे सर्वांशी संपर्कात राहिल्याने एकटेपणा जाणवणार नाही. मग काय? करणार ना सुरुवात नवीन पिढीबरोबर चालण्याची, म्हणजेच जनेरशन गॅप कमी करण्याची नवी सुरुवात…!
डॉ. लेखिकांचे त्रिकुट, नागपूर

https://tarunbharat.org/?p=137
Posted by : | on : 21 Oct 2016
Filed under : मानसी.
You can follow any responses to this entry through the RSS 2.0You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Change Language: press Ctrl+g

    छायाचित्रातून

  • भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास भारताने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास
  • हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस हार्दिक पंड्या, लोकेश राहुलला बीसीसीआयची नोटीस
  • भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय भारताचा ऑस्ट्रेलियात विक्रमी विजय
  • पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक पृथ्वीचे पदार्पणातच ‘शॉ’नदार शतक
  • कोहली, मीराबाईला खेलरत्न कोहली, मीराबाईला खेलरत्न

हवामान

दृष्टीक्षेपात

व्हिडीओ संग्रह

More in मानसी (7 of 9 articles)


बारा मैत्रिणींचा वीस वर्षांपासून घट्ट नातेबंध जपणारा असा ‘सपोर्ट ग्रुप’ आहे. पंचेचाळीस ते पंच्चावन दरम्यान वय असलेल्या सगळ्या सख्या एकमेकींना ...

×